(एका मुलाखतीतील मुक्ताफळे.... दुसरा भाग)
‘कमिंन सर ?’उमेदवार क्र. ४ .. कॉलेजकुमार.
‘या. बसा तिथं.’
उमेदवार बसतो.
‘नाव ?’
‘सुमित अरुण नार्वेकर ‘
‘शिक्षण ?’
‘MSCIT करून आता एस. वाय. बी. कॉमकरतोय. ’
‘कॉम्प्यूटरवर १ ते ३० पाढे बनवायचे आहेत.कोणते Application वापराल ?’ मी.
‘अं..C किंवा जावा..’
‘ते languagesआहेत. Application कोणतं ?’
‘Application ?....’
‘Programming language आणि Application मध्ये काय फरक ?’
‘.......’
‘बरं, अकौंटची बुक्स कोणती ?’ लेखा सदस्य.
उमेदवार बरोबर सांगतो.
‘समजा, आमची कंपनी फायद्यात आहे का तोट्यात ते तुम्हाला बघायचंय...कशात बघणार ?’
‘Balance sheet मधे..’
‘का Profit and Loss statement मधे ?’
‘हो,हो, Profit and Loss statement मधे.’
‘किती बाजू असतात त्यात ?’
‘दोन.. Profit आणि Loss ‘
‘पाहिलंय का कधी Profit and Loss statement ?’
‘हो, वडिलांच्या दुकानात...’
‘कसलं दुकान आहे ?’
‘सोनारकाम. संध्याकाळी वडील घरी जातात तेव्हा मीच पाहतो दुकान.’
‘अहो, मग त्याला नुसती Profit ही एकच बाजू असणार...’ लेखा सदस्यांचा, विनोदाचा तिरकस तीर मारण्याचा प्रयत्न.
‘नाही हो, दोन आहेत..मी पाहिलंय ना.’ उमेदवाराच्या निरागस भाबडेपणामुळे तीर निष्फळ होतो.
‘सध्या आपल्या महापालिकेचे महापौर कोण आहेत ?’ इतका वेळ भ्रमणध्वनीमध्ये गुंग असलेले बॉस आता मुलाखतीकडे मोर्चा वळवतात.
‘......’
‘आपल्या जिल्ह्यात तालुके किती ?’
‘....अं, माहिती आहे ..पण आता आठवत नाही...’
‘हे आपलं शहर कोणत्या तालुक्यात आहे ?’
‘जिल्हा आहे..’
‘मग जिल्ह्याच्या शहराला तालुका नसतो ?’
‘....?..’
‘तुमची कॉलेजची वेळ ?’
‘सात ते अकरा..’
‘मग दहाचं ऑफिस कसं काय attend करणार ?’
‘शेवटचा तास बुडवणार..’
‘रोज ? अन बुडालेला अभ्यास काय इथं करणार काय ?’
‘नाय नाय, घरी करतो की संध्याकाळी...’
‘अन दुकानाकडे कोण पाहणार मग ?’
‘....’
‘ठीक आहे, या तर मग.’
=====
पुढची उमेदवार .१७-१८ वयाची ग्रामकन्या.
‘सर, आत येऊ ?’
‘हं ....बसा.’
उमेदवार खुर्चीचे हात घट्ट धरून खुर्चीच्या एक चतुर्थांश भागात टेकते.
‘अहो, आरामात बसा...’ मी.
एक चतुर्थांशाचा एक द्वितीयांश होतो.
‘नाव ?’
‘दिपाली शिंत्रे’
‘गाव ?’
‘भिलवडी.’
‘भिलवडीचेएखादे वैशिष्ट्य सांगू शकाल ?’ प्रशासन सदस्य.
‘....?’
‘भिलवडीबद्दल चार वाक्ये बोलायची झाली तर काय आधी सांगाल ?’
‘आमच्या गावात म्हसरं लई आहेत..’
‘खुक खॉक..’ लेखा सदस्य हास्याचे रुपांतर आयत्या वेळी खोकण्यात करतात.
‘मग त्यांचं दूध काय सगळं नदीत सोडतात का ?’ प्रशासन सदस्य.
‘नाही, डेअऱ्या आहेत की ढीगभर !’
‘मग तेच विचारले की तुम्हाला आधी ..!’
‘अय्या..!’ आता उमेदवार खुर्चीच्या तीन चतुर्थांश भागात जरा सैलपणे विसावते.
‘काय शिकता ?’ लेखा सदस्य.
‘बी. ए. पहिल्या वर्षाला आहे.’
‘पण ही जागा अकौटसाठी आहे..’
‘बारावीला कॉमर्सलाच होते. आता आर्ट्स घेतलं.’
‘का ?’
‘टायमिंग जमत नाय. सकाळी शेतावर जावं लागतं.’
‘किती शेती आहे ?’
‘दोन एकर..पण जादा काय मिळत नाय त्यातून..’
‘हिशेब कोण बघतं शेताचा ?’
‘वडील.’
‘वडील काय शिकलेत ?’
‘सातवी’
‘मग तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त शिकलाय ना...., तुम्ही का नाही बघत ?’
‘मला काय समजतंय त्यातलं..?’
‘नाही ? मग आमच्या कंपनीच्या अकौंटमधलं कसं काय बुवा समजणार ?’ लेखा सदस्य.
‘अं.......!’
‘कॉलेज किती ते किती असतं ?’ प्र. सदस्य.
‘नऊ ते बारा.’
‘पण आमचं ऑफिस तर दहाला सुरु.’
‘रोजच काय कॉलेजला नाय जावं लागत.... मी एक्स्टर्नल करणारे.’
‘असं का ? ठीक आहे.... या आता.’
=====
उमेदवार क्र. ...? सुबक ठेंगणी कॉलेज कन्यका.
‘’मे आय कमिन ?’
‘हुं....’
उमेदवार थेट जाऊन खुर्चीत बसते. न विचारताच नाव सांगते.
‘मिताली देशमुख.’
‘आं? इथं तर सोनाली वाघमारे लिहिलंय?’
‘ती गेली.. तिचा कॉलेजात प्रोग्राम आहे...’
प्रशासन सदस्य पान उलटतात.
नाव शोधण्यात १ मिनिट जाते.
‘हं, सांगा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण ?’
‘पृथ्वीराज चव्हाण.’
‘आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ?’
‘पतंगराव कदम.’
‘कोणतं खातं आहे त्यांचं ?’
‘....’
‘पालकमंत्री काय करतात ?’
‘....?’
१ मिनिट शांतता.
‘अकौंटची काय माहिती आहे ?’ लेखा सदस्य.
‘बँकेमधे, मोठ्ठ्या कंपन्यांमधे अकौंट ठेवतात..’
‘ते नव्हे, अकौंटचे प्रकार सांगा.’
‘........’
‘अकौंटला किती बाजू असतात ?’
‘बाजू ?...’
‘बरं, ते राहूदे, बारावीला कोणता विषय आवडीचा ? कशात मार्क जास्त आहेत ?’ बॉस अवघड प्रसंगातून सुटकेचा हात देतात.
अकौंटमधला धोका नुकताच ठो देऊन गेला असल्याने असल्याने उमेदवार यावेळी विचार करून धोरणीपणे उत्तर देते.
‘मराठी’
‘कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव काय ?’ मी.
‘......अं.......’ धोरण अंगाशी येते.
‘शार्दूलविक्रीडित हे काय आहे ?’ बॉस.
‘...अं नक्की माहिती नाही पण....’
‘हं....?’
‘.... कर्नाटकातील धरण प्रकल्पाचे नाव असावे......’
‘धरण...?’ बॉसचे अलमट्टी होणे आता दूर नाही.
‘मितालीबाई, तुम्ही आमच्याकडे नोकरी करायचे का ठरवले ?’ याठिकाणी ‘कुठून डोक्यात घेतले’ असे बॉसला म्हणायचे होते हे त्यांच्या व्यग्र मुद्रेवरून स्पष्ट वाचता येते.
‘पप्पाम्हणाले, तुझा शाळेचा खर्च निघेल..’
‘छान. पण मग कॉलेज अन ऑफिस दोन्ही कसं करणार ? कॉलेज अकरापर्यंत ना ?’
‘शेवटचा तास बुडवायला प्रिन्सिपॉलची परवानगी घेणार...!’ आत येण्यापूर्वी मितालीबाईनी आधीच्या उमेदवारांशी सल्लामसलत केली आहे, हे तिच्या तत्पर उत्तरावरून स्पष्ट होते.
‘छान. या आता.’
‘मे आय कम इन ?’ आणखी एक स्मार्ट कन्यका.
‘Yes, take seat ..’
‘नाव ?’
‘मधुबाला देशपांडे’
‘हं, बारावीला मार्क्स किती ?’
’८५.६७ टक्के, सर’
‘अरे वा, इतके मार्क्स असून सायन्सला न जाता कॉमर्स का घेतलं ?’
‘वडिलांची फर्म आहे अकौंटची.’
‘मग त्यांच्याचकडे का नाही काम करत ?’
‘वडील म्हणाले, मोठ्या कंपनीचा अनुभव हवा.’
‘म्हणजे अनुभव घेतला की सोडणार आमची कंपनी ?’
‘...तसं नाही, सर...’
‘मग कसं ?’
‘.........’
‘बारावीतला आवडीचा विषय कोणता ?’ मी.
‘इंग्लिश’
‘एखाद्या इंग्लिश कवीचे नाव सांगता येईल ?’
‘......अं, ..आता नाही आठवत..’
अर्धा मिनिट शांतता.
‘विलियम वर्डस्वर्थ कोण होते ?’
‘......’
‘बोला, बोला लवकर.....’ प्र. सदस्य.वेळ संपत आलीये.
‘...वेस्ट इंडीज क्रिकेट टीमचे भूतपूर्व कॅप्टन .... ?’
‘क्रिकेट पाहता तुम्ही ?’
‘नाही बै..’
‘मग हे कसं माहित ?’
‘जीकेच्या पुस्तकात वाचलं..’
दहा (च) सेकंद शांतता.
‘अकौंट कशासाठी ठेवतात ?’ लेखा सदस्य.
‘profit किंवा loss पाहण्यासाठी.’
‘आणखी कशासाठी ?’
‘...नाही माहिती.’
;आमच्या कंपनीने नवीन कॉम्प्यूटर घेतला, अकौंट एन्ट्री कशी कराल ?’
‘डेबीटला..?’
‘की क्रेडीटला ?’
‘अं..क्रेडीटला. नाही, नाही डेबीटलाच...’
‘कॉलेजचं टायमिंग ?’ बॉस
‘साडेसात ते साडेदहा.’
‘पण ऑफिस दहाला आहे. मग दहाला ऑफिसला येणार ?’ कसं ते एव्हाना बॉसला पाठ झालं आहे.
‘हो..!’
‘आभारी आहे. या.’
पुढची उमेदवार आणखी एक ग्राम कन्या.
‘साहेब, आत येऊ का ?’
‘या, बसा त्या खुर्चीत.’
आत आल्यावर खुर्चीत बसण्यापूर्वी कन्यका एकदम हात जोडून नव्वद अंशात वाकते. एअर इंडीयाच्या महाराजाप्रमाणे.
.नमस्कार साहेब..’
‘आं...? हां हां….नमस्कार बसा बसा.’ नमस्काराच्या अभिनव पद्धतीमुळे अंमळ बावचळलेल्या बॉसला सावरायला काही सेकंद लागतात. त्यामुळे नाव विचारायचं त्यांच्या पटकन लक्षात येत नाही.
प्रशासन सदस्य सरसावतात.
‘नाव काय ?’
‘श्रीदेवी सुरेश माळी’
‘गाव ?’
‘येडे मच्छिंद्र ‘
‘शिक्षण ?’
‘बारावी पास. ‘
‘पुढे शिकत नाही ?’
‘परिस्थिती नाही, साहेब.’
‘काय करतात वडील ?’
‘...नाहीत....!’
‘ओह...’
काही सेकंद शांतता. उमेद्वाराच्या, पूर्वी कधीतरी स्वर्गवासी झालेल्या वडिलांसाठी आम्ही आत्ता शांतता पाळतो आहोत...मी मनातल्या मनात विचार करते.
‘हम्म.., बारावीत काय काय शिकला अकौंट ?’ लेखा सदस्य.
‘जमा खर्च, तेरीज, ताळेबंद, नफा तोटा...’
‘मराठी मिडीयम काय ?’
‘व्हय. पण एक विषय इंग्रजीत होता साहेब.’
‘Balanceला मराठीत काय म्हणतात ?’ इतका सोपा प्रश्न ? बॉसवर ‘नमस्कारा’चा चांगला परिणाम झालेला दिसतो....
‘शिल्लक.’
‘गंगाजळी ला इंग्रजीत काय म्हणतात ?’
‘........’
‘बारावीला मार्क किती ?’
’६४.३७ टक्के’
‘काढा बरं टक्केवारी...’
हाताची बोटे मोजत उमेदवार टक्केवारी काढते.
‘ही तर ६४.३६ आलीय की..!’
‘...राउंड केलंय अर्जात...’
काही सेकंद शांतता.
‘भारताची घटना कुणी लिहिली ?’ मी.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर.’
‘भारतात मागास वर्गासाठी आरक्षण प्रथम कुणी सुरु केले ?’
‘आंबेडकरांनीच...’
‘... शाहू महाराजांचं नाव ऐकलय का ?’
‘अं?..हो, हो, शाहू महाराजांनी सुरु केलं आरक्षण..’
‘मुलींची शाळा प्रथम कुणी सुरु केली ?’
‘सावित्रीबाई फुले .’
‘अन जोतीराव फुल्यांनी काय केलं ?’
‘अं.. त्यांनीच सुरु केल्या मुलींसाठी शाळा....’
‘नक्की महात्मा फुल्यांनी कि सावित्रीबाईंनी ?’
‘...अं... दोघांनी ...’
सौम्य हशा.
‘आता एक शेवटचा प्रश्न. तुम्हाला ही नमस्काराची पद्धत कुणी शिकवली बरं ?’ बॉस मिस्कीलपणे.
‘माझ्या आज्जीने... ती म्हणायची, महादेव असूदे नाहीतर नंदी...., येवस्थित वाकून नमस्कार करावा...’
‘...! ठीक आहे.. या तुम्ही आता.’
नमस्कार महादेवाला का नंदीला याचा विचार करत बॉस बेल दाबतात__चहा मागवण्यासाठी..!
------------****************--------------
मुलाखत .. आणखी काही मुक्ताफळे
वाचने
13785
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
महादेव असूदे नाहीतर नंदी....,
=))
फुटलो.
जबरी किस्से आहेत हे ही.
खाली क्रमशः लिवायच राहिलं काय? :)
लेख तर अख्खा भारीच आहे पण
In reply to महादेव असूदे नाहीतर नंदी...., by गणपा
लेख तर अख्खा भारीच आहे पण औतरणचिन्हातले वाक्य सर्वांत जहबहराहाट!!!!
हाहाहाहा
मस्त... हा भागही वाचून मजा आली!
aavadesh....vinodi lekhan
aavadesh....vinodi lekhan mhanun!
या उलट
एका केमीकल फॅक्टरीच्या केमिस्ट या पदासाठी मुलाखत चालू होती. प्रथम काही जुजबी प्रश्नाना नीट उत्तरे मिळाल्यावर
आता लेक्काच्याला कसा पकडतो बघा अशा अविर्भावात मुलाखत कर्त्याने प्रशन विचारला ..
" हे सगळं ठीक आहे पण आम्ही नक्की कोणते प्रॉडक्टस करतो हे जरा सांगाल काय ? "
होय सर आपण पेट्रोलियम अॅडेटिव्हज व सिंथेटिक रेसीन्स बनवता " उमेदवार उत्तरला
अरे....हे तुम्हाला कसं माहीत ?
सर.. माफ करा... पण हे सोपं आहे..... आपण जे मला मुलाखतीचे पत्र पाठवले आहे त्याच्या लेटर हेडवर् ते लिहिले आहे .
" यू आर सिलेक्टेड "
नोकरी न मिळण्याचे कारण...
मुलाखतकर्ता: (उमेदवारास) आत्ता तुम्ही जो जीना चढून ह्या ऑफिसात आलात त्या जीन्याला पायर्या किती?
उमेदवार : २४.
मुलाखतकर्ता : अरे व्वा! बरोबर ओळखलेत की. कसे ओळखले?
उमेदवारः मोजून आलो होतो. बाबा म्हणाले होते, मुलाखतकर्ते असेच मूर्खासारखे प्रश्न विचारतात.
शेवटचा
चेंडु सीमापार.
भयानकरित्या हसतोय.
बॉस काय समजायचे ते समजला असावा.महादेव नंदी, अगागा गा
ह्येच ह्येच!
In reply to शेवटचा by इरसाल
महादेव असो वा नंदी...आई ग!
अजुन किती शिल्लक आहेत उमेदवार? लवकर टाक नाही तर विसरुन जाशील त्यांची मुक्ताफळे.
मुलाखत देण्यअ पेक्षा मुलाखत
मुलाखत देण्यअ पेक्षा मुलाखत घेणे हे जास्त कठीण काम असते.
काय एक एक नमुने भेटतात.
मुलाखती नंतर सुध्दा काही महाभाग मुलाखत घेणार्यांचे नंबर मिळवतात आणि फॉलोअप करतात.
त्याचातर जास्त वैताग येतो.
मी घेतलेल्या एका मुलाखतीची
मी घेतलेल्या एका मुलाखतीची आठवण टंकल्याशिवाय आता राहवत नाही.
थोडी पार्श्वभूमी देतो. कंपन्यांचे २ मुख्य प्रकार असतात (अजुनही आहेत. हे २ महत्वाचे):
पब्लिक आणि प्रायव्हेट. पब्लिक कंपनीत ७ किंवा अधिक सभासद असतात तर प्रायव्हेट मध्ये २ ते ५०. त्यामुळे वार्षैक सर्वसाधारण सभेसाठी किमान कोरम पब्लिक कंपनीचा ५ तर प्रायव्हेट कंपनीचा २ असतो. ही संपनी कायद्याच्या विद्य्र्थ्यासाठी बेसिक माहिती आहे. प्रश्नोत्तरे अशी झाले:
"वार्षैक सर्वसाधारण सभेचा कोरम किती असतो"" = मी
"हॉल भरेपर्यंत"
"-------------" - मी
"हो. हॉल भरला. की मीटिंग सुरु होते."
"किती मोठा हॉल असणे अपेक्षित आहे"
" हा एवढा की बालगंधर्व एवढा"
" अं. म्हणजे बालगंधर्व मध्ये तर नाटके होतात ना? कंपनीचा मीटिंग हॉल असतो"
"तो किती मोठा असतो?"
"नाही. म्हणजे नाही माहिती. पण अं कदाचित अं. इतकाच मोठा असेल."
एव्हाना मी डोके पकडले होते. माझे. तिचे नाही. तिचे पाय पकडण्याची इच्छा झाली होती"
"हॉल नाही भरला तर?"
"मला थोडे थोडे आठवते आहे. बहुधा ८ - १० लोक लागतात" - एव्हाना बाळीला आपण भन्नाट घोळ घातला आहे ते कळाले होते.
" ८ की १०?"
" बहुधा १०"
" पब्लिक कंपनीत किती किमान सभासद लागतात? "
"७" यावेळेस उत्तर बरोबर होते.
"मग एखाद्या कंपनीत जर ७ च सभासद असतील तर?"
"अं. तर मग कोरम ७ चाच असेल. नाही. थांबा थांबा. अं कदाचित सगळ्याच कंपन्यांना ७ चा कोरम लागतो"
"कंपनी प्रायव्हेट असेल तर?"
" तरी ७ ज---ण ला- ग-- ता...... बहुधा त्यांना पण ७ च जण लागतात. हो ना? पण मग ते कोरम कसे जुळवतात? प्रायव्हेट कंपनीत तर २ च सभासद असतात ना"
"का? तिथेही ५० सभासद असु शकतातच की"
" हा... बरोबर आहे. पण मग २ च जण असतील तर? मग काय करतात सर? त्यांचे मत २ दा काऊंट करतात का?" (ऑं पण तरीही आकडा ४ च होइल ना - हे मी मनातल्या मनात) "
"इंटर्व्ह्यु मी घेतो आहे की तुम्ही. तुम्ही कसले प्रश्न विचारता आहात?"
(जीभ चावत)"सॉरी सर"
"तुम्ही खरोखर ईंटर पास झाला आहात?" मी कुत्सितपणे विचारले
"हो. झाले आहे ना. त्यामुळे मी लगेच सुरु करु शकते आर्टिकलशिप. माझा फायनल चा पहिला अटेंप्ट डिसेंबरमध्ये आहे."
"---------" मी ब्लँक झालो. ही बया जॉइन व्हायचा विचार करते आहे की काय?
" मी सांगतो तुम्हाला काही होउ शकते का ते. सिलेक्ट झालात तर फोन करेन परत."
"सर ते नंतर कोरम चे उत्तर सांगा हा खरं. मी आहे अजुन इथेच . **** कंपनीचा इंटर्व्ह्यु सुद्धा देते आहे. मी त्या दुसर्या ईंटरव्ह्युअरला मनोमन शुभेच्छा देत दुसरीकडे वळलो.
"
भन्नाट आहेत मुलाखतीतले अनुभव.
भन्नाट आहेत मुलाखतीतले अनुभव. :D
हा हा हा हा हा
हा हा हा हा हा
मस्त खुशखुशीत किस्से !
मुलाखत घेण्याचा प्रदीर्घ अनुभव असल्याने हा अजुन एक किस्सा !
मी सहसा तांत्रिक घेत असतो, बाकी मॅनेजर विचारतो. सर्व टेक्नीकल प्रश्न विचारून झाले, उमेदवार एकदम ड्युड टाईपचा
मी : तु आयटी शिवाय अजुन काय करतोस
तो : सर, पब्ज डिस्को ई.ई.
मी : ?
तो : सर आत्ता ईथे सर्व पूरूष असल्याने सांगतो, आय एम फ्लर्ट !
माझा मॅनेजर : वी डोन्ट नीड यु , थॅन्क्स !!
( हाफिसात युनिक्स ला आठ मुली होत्या ;) चांगल टेक्नीकल नॉलेज असुन एका मार्कांने उमेदवार नापास झाला. )
अर्रर्र बिचाऱ्याच फ्लर्टिंगचं
In reply to हा हा हा हा हा by सुहास..
अर्रर्र बिचाऱ्याच फ्लर्टिंगचं टायमिंग चुकलं म्हणायच. ;)
मग काय
In reply to अर्रर्र बिचाऱ्याच फ्लर्टिंगचं by गणपा
बाकीचे मॅनेजर हबकले असतील नां? हे उत्तर ऐकुन.
अरे काय सांगु गणपा/ ईर्याभौ
In reply to मग काय by इरसाल
अरे काय सांगु गणपा/ ईर्याभौ , एक- एक नग भेटतात मुलाखतीला !! तु, मी आणि धागा कर्ती या पेक्षा तो एक अर्धवट नावाचा आयडी आहे, ३ मिनीटात मुलाखत संपवतय बेण !! त्याचे पण अनुभव येवु दे ..मग बघ मजा !!
बाकीचे मॅनेजर हबकले असतील नां
In reply to मग काय by इरसाल
बाकीचे मॅनेजर हबकले असतील नां? हे उत्तर ऐकुन.
__________________________________
=))
लै भारी किस्से.
लै भारी किस्से.
मजा आली वाचून.
हे लेखनही अगदी भारी झाले आहे.
हे लेखनही अगदी भारी झाले आहे.
ठ्ठो.........
शेवटचे वाक्य येईपर्यंत चेहर्यावर हसू होते पण......
"माझ्या आज्जीने... ती म्हणायची, महादेव असूदे नाहीतर नंदी...., येवस्थित वाकून नमस्कार करावा...’ ""
हे वाचून साक्षात फुटलो....... :D
आता थोडे अवांतर नंदी वरून
In reply to ठ्ठो......... by निशदे
मी कम्पनीत कामाला असताना विप्रो चे एक प्रोग्रामर आमच्याच कंपनीला जॉईन आले. आमचा परिचय व मैत्रीही झाली.
मी एके दिवशी माझ्या पीसी वरून त्यांच्या पीसीकडे पहात म्हणालो." तुम्ही ग्रेट आहात पण या कंपनीची रीत आहे माणूस सोडून गेला की त्याची किंमत कळते म्हणजे बैल गेला नि झोपा केला.... "
माझ्या कडे मिस्किलपणे रोखून पहात ते म्हणाले.. " आँ म्हणजे आम्ही बैल वाटतं ! "
हाही भाग उत्तम
अतिशय खुसखुशीत किस्से आहेत. मजा आली.
गमतीदार मुलाखतींना
अशा नर्मविनोदी वाक्यांची फोडणी मस्त जमली आहे.
....
वरील मुलाखतींमधील उत्तरे विनोदी आहेत हे खरे, पण मला त्यात काही आश्चर्य वाटले नाही. तसे म्हणाल तर यातील प्रत्येकच अननुभवी आणि एकंदरीत अधुनिकतेची (मॉडर्न) नोकरी मिळवण्यासाठी लागणारी तोंड ओळख नसलेला अथवा मार्गदर्शनास मुकलेला (ली) वाटला (ली).
पण मध्यंतरी ऐकले होते की एका आय ए एस / युपिएससी मधील उमेदवाराने गांधीजींबद्दलची माहिती देताना त्यांना, "कस्तुरवा आणि विनोबा" अशा दोन पत्नी होत्या असे सांगितले. (ज्या व्यक्तीने हे सांगितले ती व्यक्ती विनोद करत नव्हती)
मला एकंदरीत
उमेदवारास संवादात engage करून त्याच्या गुणाची पारख करणे आणि ते कामासाठी तसेच कंपनीसाठी योग्य आहेत का हे बघणे महत्वाचे असते... पण अनेकदा तसे घडताना दिसत नाही. अर्थात काही क्षेत्रे आणि पदे अशी असतात की जेथे केवळ त्या कामातली केवळ कुशलता बघणे महत्वाचे असते. उ.दा.: (विशेषतः पुर्वीच्या काळात) टायपिंग स्पिड, एखाद्या विशिष्ठ प्रोग्रॅमिंगसाठी निवडलेल्या व्यक्तीस ती प्रोग्रॅमिंग लँग्वेज येते का ते बघणे वगैरे... ते करताना देखील कोण कुठून आले आहे, पार्श्वभुमी काय हे समजून त्याबद्दल आढी, कुत्सितपणा वगैरे नसणे महत्वाचे असते...
मात्र इतर वेळेस, विशेष करून जर प्रोफेशनल पोझिशन्स साठी कुणाला घेत असलात आणि त्याचा देखील क्लेरीकल पोझिशनसाठी घेत असल्याची दृष्टी असली तर ते अयोग्य आहे असे वाटते. अनेकदा अशा नजरेतून सिलेक्ट करताना आपण चांगल्या उमेदवारास दूर लोटू शकतो आणि कुणाला तरी चुकीच्याला घेऊ शकतो. केवळ कॉलेजातले मार्क बघून घेणे देखील पटत नाही. तो एक क्रायटेरीयन असावा पण सगळेच त्यावर अवलंबून नसावे. अमेरीकेत अनेक ठिकाणि अतिउच्च ग्रेडपॉईंट अॅव्हरेज असलेल्या मुलांना तसेच घेतले जात नाही, उलटा अधिक विचार केला जातो, की अशी (हुशार) व्यक्ती ही टिममधे काम करू शकेल का? तसे करता येत नसेल आणि ती गरज असेल तर अशा व्यक्तीचा काय उपयोग?
त्या व्यतिरीक्त जाता जाता...
इंटरव्यूज प्रमाणेच कॉलेजातील viva (oral exams) संदर्भात आठवते. आमच्या तसेच दुसर्या (दोन्ही जुन्या) अभियांत्रिकी कॉलेजात असे काही (friendly) प्राध्यापक होते ज्यांच्या हाताखालून पिढ्या तयार झाल्या त्यातील काही ज्युनिअर प्राध्यापक म्हणून परत त्याच कॉलेजात लागल्या. त्यातील काही नवीन प्राध्यापकांना स्वतःचा स्मार्टनेस दाखवण्याची हौस असायची म्हणून म्हणा, अथवा वृत्तीच तशी, पण असे काही प्रश्न विचारायचे ज्याने मुले निरुत्तरीत होतील, रडत बाहेर येतील आणि आयुष्याचा नाही पण नंतर बाहेरच्या विश्वात लागणारा आत्मविश्वास घालवून बसू शकतील... जेंव्हा असले वर्तन जुन्या प्राध्यापकांच्या लक्षात आले, तेंव्हा त्यांनी या नव्यांना (त्यांच्याच आधीच्या विद्यार्थी असलेल्या) प्राध्यापकांना बाजूस घेऊन रँडम टेक्निकल प्रश्न विचारले. अर्थातच त्यांची गडबड झाली, उत्तरे देता आली नाहीत. मग हे म्हणाले, "तुला तेंव्हा पण उत्तरे देता आली नाहीत, आत्ता पण सगळे येत आहे असे नाही, मग मुलांना कशाला त्रास देतोयस?" :-)
थोडक्यात विद्यार्थी झाले अथवा नोकरीस आलेला उमेदवार झाला, त्याला स्वत:चे ज्ञान दाखवताना आपण त्या एजग्रुप मधे असताना कसे होतो, आत्ता बाहेर मुलाखत देयची वेळ आल्यास काय होईल याचा विचार तर करावाच॑, पण त्याहूनही अधिक त्याला संवादात engage करत, त्याची खरी लायकी (qualification) समजून घ्यावे असे वाटते.
(No subject)
In reply to .... by विकास
:)
+१ !!
In reply to .... by विकास
+१ !!
पटले. पण...
In reply to .... by विकास
एकंदरीतच मुलाखत / व्हायव्हा कशी अन का घ्यावी याबद्दलचे तुमचे विश्लेषण पटले.
पण..
लेखाच्या 'टॅग' मधे 'विनोदी' असे आहे..
तसेच
In reply to पटले. पण... by आनंदी गोपाळ
तसेच "नोकरी" पण आहे. :-) बाकी बरेच जण प्रतिसादांमध्ये अनुभव सांगत असल्याने एकंदरीतच चर्चा चालू झाल्याने लिहीले इतकेच. :-)
विनोद म्हणून लेख खूप छानच आहे.
In reply to .... by विकास
"आपण त्या एजग्रुप मधे असताना कसे होतो ...संवादात engage करत, त्याची खरी लायकी (qualification) समजून घ्यावे असे वाटते". ही तुमची टिप्पणी आवडली. तुम्ही सांगितलात तसाच काहिसा दृष्टिकोन नोकरीत असताना तांत्रिक मुलाखत घेताना होता. नंतर व्यवस्थापनाच्या काही पुस्तकं/लेखांमधुन मुलाखत घेण्यामागचे बरेच बारकावे कळले. विशेषतः स्वतःच्या खिशातून पगार देऊन कामावर ठेवणार असाल तर एका वेगळ्या जबाबदारीची आणि मुलाखतींना लागणार्या वेळेच्या किमतीची जाणीव होते.
विकास यांना अनुमोदन.
In reply to विनोद म्हणून लेख खूप छानच आहे. by सुधीर
विकास यांना अनुमोदन.
बर्याचदा असेच होते. काही वेळा रिपीटेटिव्ह काम असते. ते काम बघून, सरावाने जमू शकते. त्यासाठी फार उच्च श्रेणीची आवश्यकता नसते. उलटपक्षी तेथे उच्च बुद्धीमत्तेचे लोक टिकतही नाही.
मुलाखत / व्हायव्हा कशी अन का
In reply to .... by विकास
मुलाखत / व्हायव्हा कशी अन का घ्यावी याबद्दलचे विश्लेषण इथे देण्याचे प्रयोजन समजले नाही.
विकासजी, आपले मुद्दे सत्य आहेत व वरील लेखनातील मुलाखतीही यास सुसंगत आहेत. कसे ते सांगते.
>>>तसे म्हणाल तर यातील प्रत्येकच अननुभवी आणि एकंदरीत अधुनिकतेची (मॉडर्न) नोकरी मिळवण्यासाठी लागणारी तोंड ओळख नसलेला अथवा मार्गदर्शनास मुकलेला (ली) वाटला (ली).
अर्थातच बारावी शिकलेल्या मुलामुलीना अनुभव तो काय असणार ? म्हणून प्रश्न साधे सोपे व अनुभवावर आधारित नसलेले होते. तसेच जवळपास सर्वच उमेदवार ग्रामीण भागातील होते.
>>>उमेदवारास संवादात engage करून त्याच्या गुणाची पारख करणे आणि ते कामासाठी तसेच कंपनीसाठी योग्य आहेत का हे बघणे महत्वाचे असते...
अर्थात. यासाठीच केवळ Academic प्रश्न न विचारता general ही विचारले होते. इथे नमूद केले पाहिजे की Academic knowledge पेक्षा General Awareness हा आमच्या कंपनीत जास्त महत्वाचा आहे. यासाठी प्रश्न सर्व प्रकारचे विचारले गेले . तसेच उमेदवाराचा कल जाणून घेण्यासाठी आवडीचा विषय व त्यावरचे प्रश्न आम्ही विचारले.
>>थोडक्यात विद्यार्थी झाले अथवा नोकरीस आलेला उमेदवार झाला, त्याला स्वत:चे ज्ञान दाखवताना आपण त्या एजग्रुप मधे असताना कसे होतो, आत्ता बाहेर मुलाखत देयची वेळ आल्यास काय होईल याचा विचार तर करावाच॑, पण त्याहूनही अधिक त्याला संवादात engage करत, त्याची खरी लायकी (qualification) समजून घ्यावे असे वाटते.
मुलाखतींमध्ये कुठेही उमेदवारांना harassment करून निरुत्तर केल्याचे दिसत नाही. उलट येत नसलेल्या प्रश्नाला बगल देऊन इतर चांगल्या बाजू पाहण्याचा प्रयत्न आम्ही केला.
गोपनीयतेच्या नियमामुळे काही प्रश्न मी वर दिले नाहीत. पण तेही साधेच होते. एकूणच, Academic knowledge पेक्षा उमेदवाराची कामाची गरज, टिकाव धरण्याची क्षमता आणि एकूण आकलनक्षमता हीच पाहण्याचा प्रयत्न केला आहे हे या मुलाखतीं मधून दिसते.
बहुतेक काही तरी गैर समज होतोय
In reply to मुलाखत / व्हायव्हा कशी अन का by सस्नेह
बहुतेक काही तरी गैर समज होतोय.
विकासरावांचा तो प्रतिसाद तुम्हाला उद्देशुन नव्हता अस मला वाटतं. (विकासराव खुलासा करतीलच.)
एकंदर विषय मुलाखतींचा आहे त्या ओघात त्यांनी आपले मत मांडले, याचा अर्थ तुमची पद्धत चुकीची होती वा तुम्ही मुलाखत देणार्यांना हरॅस करत होता असा खचीतच नसावा.
नाही मी कुणचा ही वकील नाही. ;)
विकासरावांचा प्रतिसाद आणि तुमची प्रतिक्रिया वाचुन जे वाटलं ते मोकळे पणे बोलीलो ईतुकेच. :)
अजिबात गैरसमज नाही!
In reply to बहुतेक काही तरी गैर समज होतोय by गणपा
विकासरावांनी आपल्या प्रतिसादात सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे,
त्यामुळे जास्त पगार देण्याएव्हडी परिस्थिती नसूनही स्वतःचा बहूमोल वेळ खर्च करून एका साध्या अकाउटंटच्या पोस्ट साठी नोकरीच्या आशेने आलेल्या ग्रामीण भागातील मुला-मुलींची गम्मत बघणारे मोठ्या हुद्यावरच्या लोकांचा त्यांना निश्चित राग आलेला जाणवतोय.
पुढे त्यांनी म्हटल्याप्रमाणे, उमेद्वाराला 'एंगेज' न करता आल्याआल्या सटासट राष्ट्रीय राजकारणावर प्रश्न विचारलेलं सुद्धा समर्थनीय नाहीये. ही काय त्यांना पुणे महानगरपालिकेत उंदीर मारणार्या विभागाची मुलाखत वाटली काय?
मीही कुणाचा वकील नाही. ;)
वरचे प्रतिसाद बघून जे वाटलं ते मोकळेपणाने लिहिलो इतकच! :)
हम्म कुणी सांगावं चष्मा बदलला
In reply to अजिबात गैरसमज नाही! by दादा कोंडके
हम्म कुणी सांगावं चष्मा बदलला तर मलाही तुमच्या सारखं वेगळ दिसेलही.
हो/नाही
In reply to अजिबात गैरसमज नाही! by दादा कोंडके
तुमचे मुद्दे "चूक - बरोबर", या हेतूने मी लिहीलेले नव्हते. कारण विशिष्ठ निवडीकरता काय बघायचे हे या संदर्भात तुम्हालाच माहीत होते... पण त्यातील मुद्याला आधारून काही विश्लेषण नक्की केले आहे. थोडक्यात हे वैयक्तिक नव्हते.
नाही हे रागावून अथवा अन्याय झाला वगैरे म्हणत लिहीलेले नाही. तसा उद्देशही नाही. वर स्नेहांकितांनी स्पष्ट केल्याप्रमाणे त्यांनी नक्कीच उमेदवारास engage करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अशी उत्तरे (उमेदवारांकडून) मिळत असताना त्यांची तुलना कशी करावी ह्या बाबत माझा जेनेरीक मुद्दा होता. एखाद्या गोष्टी कडे कसे बघावे या संदर्भातील हा मुद्दा आहे. यात काही मी मानवता अथवा धर्मादाय अथवा ग्रामिण अनुशेष भरून काढावा वगैरे म्हणत नाही तर नक्की आपल्याला काय फायद्याचे आहे हे समजून घेण्याबद्दलचे हे मत आहे. बर्याचदा ते होत नाही, हे या चर्चेदरम्यान म्हणायचे होते.
दोन आठवड्यापुर्वीच्या शनीवारची गोष्ट आहे. पुण्यातील एक अतिशय यशस्वी असलेल्या (नॉनसॉफ्टवेअर) कंपनीच्या मराठी सिईओबरोबर दिवसभर होतो. या कंपनीने भारतात तर यश संपादन केले आहेच पण त्याच बरोबर त्यांनी अमेरीकेत आणि दक्षिण अमेरीकेतही (जगभर ६०+ देशात) चांगलेच बस्तान बसवलेले आहे. कंपनीत अर्थातच भरपूर कर्मचारी आहेत. ऑफिस स्टाफ आणि इंजिनिअर्स देखील. असे बोलताना विषय निघाला तेंव्हा ते म्हणाले की आम्ही आय आय टी अथवा इतर मोठ्या तसेच शहरी भागातील संस्थांमधून निवडण्यापेक्षा बहुतेक वेळेस ग्रामिण भागातील उमेदवारांना प्राधान्य देतो. कारण काय तर त्यांना त्यांच्या मर्यादीत विश्वातून बाहेर पडण्याची संधी मिळते, (पगार, इतर फायदे आणि वातावरण चांगले दिल्याने) ते पटकन सर्व आत्मसात तर करतातच पण कंपनीत टिकतात आणि चांगले करीअर करतात. (जे स्वतःस आधीपासूनच मोठे समजणारे करत नाहीत) त्याचा कंपनीच्या कामावर आणि नफ्यावर चांगला परीणाम होतो. आता प्रत्येकाने असेच करावे असे माझे म्हणणे नाही, हे सांगावे लागू नये इतकीच अपेक्षा. :-)
आम्ही आय आय टी अथवा इतर
In reply to हो/नाही by विकास
आम्ही आय आय टी अथवा इतर मोठ्या तसेच शहरी भागातील संस्थांमधून निवडण्यापेक्षा बहुतेक वेळेस ग्रामिण भागातील उमेदवारांना प्राधान्य देतो.१०० टक्के सहमत. ग्रामीण भागातील उमेदवार शहरीपेक्षा जास्त sincere असतात याचा अनुभव आला आहे.
झकास किस्से!
In reply to आम्ही आय आय टी अथवा इतर by सस्नेह
स्नेहांकिता, तुमचे किस्से मस्त आहेत.
खूप आवडले.
:)
अगदी बरोबर
In reply to आम्ही आय आय टी अथवा इतर by सस्नेह
ह्या आगदी बरूबर ! म्या ग्रामीन बाघातलाच हाय !
आधीच्या भागाइतकाच सुरेख .
आधीच्या भागाइतकाच सुरेख .
मजा आली एक एक किस्से वाचताना :)
अजून काही असतील तर नक्की टाका पुढचा भाग.
व्हेअर डू यु स्टे ?
आम्ही ३ जण मुलाखती घेत होतो. मी , अजून एक सहकारी आणि एच. आर. ची एक "अविवाहित" प्रौढ स्त्री
एका साधा / शिंपल पोरा ची मुलाखत संपली होती.
हया बाईनी सहज म्हणून विचारले "व्हेअर डू यु स्टे ?"
उमेदवाराने उत्तर दिले - "आय आम् बेचलर."
(त्याला मी बेचलर असल्याने मित्रां बरोबर राहतो असे म्हणायचे होते )
लगेचच त्याला बाहेर काढले व आम्ही दोघे हसू लागलो. बाई समजून न समजल्या सारखे करून निघून गेल्या. मग आम्ही खो खो हसलो,
मुळात "व्हेअर डू यु स्टे ?"
In reply to व्हेअर डू यु स्टे ? by तर्री
मुळात "व्हेअर डू यु स्टे ?" हा प्रश्न चुकीचा आहे, तो "व्हेअर डू यु लिव्ह?" असा हवा.
चुकीच्या प्रश्नाला चुकीचे उत्तर..
यावरुन (बहुधा) अनिल
यावरुन (बहुधा) अनिल अवचटांच्या एका आत्मकथनातला भाग आठवला. मेडिकलच्या एका वर्षी शेवटच्या तोंडी परीक्षेत एका प्रोफेसरने एका मुलाला जोखून खूपच ओपन एन्डेड प्रश्न विचारला : "टेल अस अबाउट एनी टॉपिक यू नो.."
आता मुलाला म्हणायचं होतं की "सर तुम्ही कोणत्याही टॉपिकवर प्रश्न विचारा.."
पण इंग्रजी डळमळते असल्याने तो म्हणाला, "आस्क एनी टॉपिक यू नो.."
.. आणि तो तोंडी परिक्षेत फेल मारला.. :)
गोष्ट मुलाखतीतील नाही पण हेच- शब्दांचा घोळ...
In reply to यावरुन (बहुधा) अनिल by गवि
आमच्या कंपनीत एक कानडी भाषिक अकाउंट ओफिसर होते. मराठी बर्यापैकी येत होते. एकदा त्यांच्या साहेबांसमोर ( जे मराठी भाषिक होते. ) काही पेपर्स सह्यांसाठी ठेवून म्हणाले " मी पेपर्स ठेवतो तुम्ही तुमच्या लहरीप्रमाणे सह्या करा. ( त्याना म्हणायचे होते सवडी प्रमाणे सह्या करा ! ) हा किस्सा त्या सहीवाल्या साहेबानी एकदा गप्पा मारताना सांगितला व आम्ही दोघेही हसत राहिलो .
लेख मजेशीर!
लेख मजेशीर आहे हे खरेच, पण विकास यांचा प्रतिसादही आवडला.
मुलाखतीला आलेली बहुतेक पोरे ही लहान गावातली, जनरल नॉलेज कमी असणारी आणि गरजू दिसत आहेत. अशी मुले एका ठराविक प्रकारचे काम दिले तर नीट करतात. त्यासाठीच नव्हे तर एरवीही पालकमंत्री कोण? शार्दूलविक्रीडित म्हणजे काय, खेळातील एखादे रेकॉर्ड याबद्दलची माहिती नोकरीत कधीही लागत नाही. तरी असे प्रश्न कशासाठी असतात हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. पहिल्या भागातली एका मुलाला अडीच मिनिटात जज करने ही गोष्टही मला फार आवडली नाही. नोकरी शोधत असताना एका ग्रामीण बँकेत ऑफिसरच्या लेखी परीक्षेत चांगला स्कोअर करून आणि तोंडी परीक्षेत प्रत्येक प्रश्नाचं बरोबर उत्तर देऊनही नोकरी मिळाली नव्हती हे आठवलं. मुलाखत घेणार्यांनी तिथेच मला सांगून टाकलं की तुमचं क्वालिफिकेशन जास्त आहे, आमच्या नोकरीत तुम्ही टिकणार नाही!