Skip to main content

जागतीक मिसळ दिन- १३ ऑक्टोबर

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 10/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळ म्हणले की अनेकांचे कान टवकारले जातात. हे रसायन असेच आहे. वेड लावते. मिपाकरांना मिसळ्ची महती मी काय वर्णावी. असो. मध्यंतरी वाचनात आले आणि काल चेपुवर वाचण्यात आले की काही मिसळप्रेमींनी १३ ऑक्टोबर हा "जागतीक मिसळ दिन" म्ह्णून साजरा करावा असे आवाहन करीत आहेत. त्या मागचा विचार अश्या प्रकारे व्यक्त केला आहे. रोज डे, वेलेन्तीआईन डे, हा डे, तो डे आपण पाश्च्यात संस्कृतीचे अनुकरण करून करतो, मग आपला स्वताचा असा एक तरी दिवस असावा ह्या भावनेतून ऑक्टोबर महिन्याचा दुसरा रविवार हा जागतिक मिसळ दिवस म्हणून साजरा करावा अशी कल्पना डोळ्यासमोर आली, व बरेच मित्रांनी त्याला हो म्हणून साथ दिली... मग होऊन जाउदे एक मराठी माणसाचा दिवस जगात, जागतिक मिसळ दिवस. जास्तीत जास्त मिसळ प्रेमी पर्यंत हा इवेंट पोचवून, जगाला सिद्ध कौरन दाखवू कि मराठी माणूस कुठेही कमी नाही. चला आपण सगळे यात सामील होउ. शनिवरी सकाळी "मिसळ कट्टा" साजरा कुठे करायचा हे लिहा.

वाचने 3330
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मिसळी बरोबर अनेकांना "पाव" आहे की स्लाइस ह्या चर्चेत रस असेल त्यान्नी पुढिल गोष्टीनची नोंद घ्यावी. आम्हाला मिसळीबद्दल ममत्व आहे. पण त्याबरोबर पाव किंवा स्लाइस असतील याची चर्चा नको.

रोज डेला एकमेकांना गुलाब देतात तसे या दिवशी एकमेकांना मिसळ द्यायची का?
शनिवरी सकाळी "मिसळ कट्टा" साजरा कुठे करायचा हे लिहा.
मुंबई,ठाणे,पुणे सोडून कुठेही चालेल.

घरूनच सामील. मटकीची उसळ तयार आहेच!

मी आज मिसळ चापून साजरा करेन :)

अस चटावरच श्राध्ध घातल्या सारख मिसळ दिवस साजरा करण्यात काय मजा हे कळल नाही :) आम्ही तर वर्ष-भर जेव्हा वाटेल तेंव्हा चापतो !!!!

णिषेढ. त्रिवार णिषेढ. आम्हा अनिवाश्यांना ( कोण म्हण्तोय तो.. झैरात झैरात !! कसं अगदी बरोब्बर ओळखलं ...) स्वतः करून खाणे आणि / किंवा इनो घेणे हे दोनच पर्याय असताना जागतिक मिसळ दिन सुचविल्याबद्दल परत एकदा णिषेढ.