लवकरच एका सुर्याचा अस्त...!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
'I don't think I have plenty of cricket left in me'--सचिन तेंडुलकर
हि बातमी वाचली आणि डोळ्यात टचकन पाणी आले...
सचिन...सगळ्यांचा "तेंड्ल्या" आपल्याला काही दिवसानंतर कधीच त्या खेळतट्टी दिसणार नाही, या विचरानेच मन बैचेन झाले.
क्रिकेट ते पण तेंडल्या शिवाय विचार ही करवत नाही.
त्याची २३ वर्षांची कारकिर्द डोळ्या समोर आली... १६ वर्षांचा असताना न घाबरता "वसिम अक्रम, वकार युनुस सारख्या बॉलरला सामोरा गेलेला... ते आत्ता मागच्या वर्षी वल्ड्-कप जिंकल्यावर पळत येउन युवराजला मिठी मारणारा सचिन...
सामना चालु असताना...सचिन आउट झाला तर आपण टि.वी बंद करायचो... पण आता सच्या शिवाय क्रिकेट म्हणजे...
सचिन देशासाठी फक्त क्रिकेटच नाही खेळला...तर त्याने हजारो कुटुंबियांना एकत्र आणले आहे... भारताचा सामना चालु असताना आणि सचिन खेळताना एकच जल्लोश व्हायचा.
त्याने सेंच्युरी ठोकली की लोक एक-मेकांना मिठी मारायचे... एक सिक्स मारला की अंपायरच्या आधी आपले हात वर व्हायचे...
सच्या हा नेहमी आपल्याला आपलाच एक मित्र वाटतो... तो लवकर आउट झाला की त्याला मनसोक्त शिव्या द्यायचो...सेंच्युरी मिस झाली आणि भारत हारला तर दुप्पट शिव्या.
सामना जिंकल्या नंतर कट्ट्यावर रंगलेल्या सचिनच्या गप्पा...त्याने खेळलेला एक्-एक बॉल्... आत्ता-आत्ता सचिन लवकर निव्रुत्त व्हावा म्हणून रंगलेल्या गप्पा.
मित्रांनो हजारो कुटुंबियांना एकत्र आणणारा... चार पिढ्यांचा लाडका तेंडल्या.
सचिन एक सांगु तुला...? तु भले कमी सामने खेळ... पण निवृत्त होउ नकोस, आम्ही नाही रे पाहु शकणार क्रिकेट तुझ्याशिवाय.
सचिन एक सांगु तुला...? तु भले कमी सामने खेळ... पण निवृत्त होउ नकोस, आम्ही नाही रे पाहु शकणार क्रिकेट तुझ्याशिवाय.
प्रतिक्रिया
लाडका सचिन...!
+१
पेठकरकाका आणि प्राडो
धन्स हो.
या आधी ही म्हणत आलोय आता ही
क्रिकेट मधुन कारणांशिवाय कोणी निवृत्त झालं आहे काय ?
हुम्म्म्म
लेखाचं शिर्षक वाचलं तेव्हाच
सुर्यास्ताची ऊपमा
इतकी घाई?
सचिन बरोबरच
अरे देवा म्हणजे पुन्हा एकदा
हार्वे डेण्ट
नका हो रडू, मामा..
नवा सुर्य ...
>>हि बातमी वाचली आणि डोळ्यात
हा हा...
उगी उगी!
(No subject)
त्याने आय पी एल खेळू नये
+१
शेवटी माणुसच !
लेख तय्यार ठेवा
कित्येकांनी तर ते दशका पासून