हा वन डीश मील साठी छान, सोपा, टेस्टी ऑप्शन. ही खिचडी कमी तिखट केली तर लहान मुलं पण आवडीने खातात. लहान मूलांना द्यायला हा एक हेल्दी ऑप्शन आहे.
साहित्यः
अर्धी वाटी तेल, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, कढिलिंबाची ४-५ पानं, २/३ पाकळ्या लसूण बारीक चिरून किंवा किसून (साधारण १ टीस्पून), कच्चे/भाजलेले शेंगदाणे पाव वाटी, सुकं खोबरं अर्धी वाटी, गोडा मसाला अर्धा टीस्पून, तिखट अर्धा टीस्पून, तांदूळ १ वाटी, पाऊण वाटी हिरवी (स्प्लिट) मूगडाळ, १ टीस्पून मीठ, ४ वाट्या पाणी
कृती:
१) एका स्टीलच्या कुकरमध्ये तेल गरम करत ठेवावे. एकीकडे तांदूळ आणि मूगाची डाळ धुवून ठेवावी.
२) तेल गरम झाले की त्यात जिरे, मोहरी, हिंग घालून फोडणी करावी. आता त्यात शेंगदाणे, कढिलिंब, लसूण घाला.
शेंगदाणे परतून घ्या. मग सुकं खोबरं घाला. हळद घाला. मग तांदूळ आणि मूगाची डाळ घाला. चांगले परता.
३) आता त्यात पाणी, तिखट, मीठ, गोडा मसाला घाला. आवडत असल्यास १ चमचा तूप घाला.
४) कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर ३ शिट्ट्या होऊ द्या.
५) १५ मिनिटांनी कुकरचे झाकण पडले/निघाले की गरम गरम मूगाच्या डाळीची खिचडीवर तूप घालून लोणचे, दही, भाजलेला/तळलेला पापड ह्या बरोबर खा.
टीपः
इथे १ वाटी = १ आमटीची मोठी वाटी असे प्रमाण घेतले आहे.
वाचने
7610
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा माझा प्रिय खाद्य प्रकार
हा माझाही खूप आवडता प्रकार...
In reply to हा माझा प्रिय खाद्य प्रकार by मदनबाण
पण या बरोबर मठ्ठ्यापेक्षा कढी
In reply to हा माझाही खूप आवडता प्रकार... by निवेदिता-ताई
पण या बरोबर मठ्ठ्यापेक्षा कढी छान लागते.मला दोन्ही आवडते. ! ;)बाळ्बोध पण टेस्टी डिश.
छान !!!!!!!१
वाह! मुगाची खिचडी
वाहवा!
सोप्पी पाकृ
खरं तर मु. खि. आवडत नसलेले
अडी-नडीला धावून येणारा पोटभरू
नुसते?
In reply to अडी-नडीला धावून येणारा पोटभरू by गणपा
नरम गरम पदार्थ :)
क्या बात हैं!!
मुगाची सालावाल्या डाळीची खिचडी
सर्वत्र उपलब्ध.
In reply to मुगाची सालावाल्या डाळीची खिचडी by रमेश आठवले