मिसळपाव दिवाळी अंक
नमस्कार,
या वर्षी मिसळपावचा दिवाळी अंक काढावा असे ठरले आहे. त्यासाठी सदस्यांकडून लेख, कथा, कविता, पाककृती, भटकंती, कलादालन अश्या मिपावरील सर्व साहित्यप्रकारातील साहित्य आमंत्रीत आहे.
दिवाळी अंकासाठी आपले साहित्य येत्या २५ तारखेपर्यंत पाठवायचे आहे. तसेच हे साहित्य दिवाळी अंक या खात्यावर पाठवायचे आहे. दिवाळी अंकाविषयी अन्य काही शंका किंवा प्रश्न येथे या धाग्यावर विचारू शकता किंवा दिवाळी अंक या खात्यावर संदेश पाठवू शकता.
तसेच काही सदस्यांना दिवाळी अंकासाठीच्या टीम मध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे स्वागतच आहे.
- नीलकांत
खुप खुप शुभेच्छा,
काही सदस्यांना दिवाळी अंकासाठीच्या टीम मध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे स्वागतच आहे. >>
शामील केल्यास आनंदच असेल !
( आंजावर व्यवस्थापनाचा अनुभव असलेला )
सुहास..
आणि समस्त मिपाकरांना दिवाळीच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा :)
अरेरे! काय हा आगाऊपणा..!
दिवाळी सुरू होईपर्यंत थांबायचे नं..!
काय करायचे हे कळाले तर मलाही सहभाग घ्यायला आवडेल. त्याचप्रमाणे हे ही विचारु इच्छितो की लेखन मिपावरच पुर्वप्रसिद्ध असेल तर या अंकासाठी पाठवु शकतो का. या अंकाची थीम काय असेल हे ही जाणुन घेण्यास उत्सुक आहे.
या अंकाची थीम काय असेल हे ही जाणुन घेण्यास उत्सुक आहेमृत्युन्जयाशी सहमत. काहीतरी थीम असल्यास उत्तम -(दिवाळी अंकासाठी एक कॉ़कृ तयार ठेवलेला) सोकाजी
काहीतरी थीम असल्यास उत्तम'मद्यपानाचं उदात्तीकरण न करता समाजात होणारं वैचारीक प्रदुषण कमी करणं, एक काळाची गरज" ही थीम म्हणून कशी वाटते? ;)
मुळात, तीन पेग रिचविल्याशिवाय, थीम नक्की काय आहे हेच कळणार नाही.
आरे प्रभा मला तर चार पेग रेचव्ल्य्शिवाय काही कळणार नाही
आणि तुझ्या वाक्याशी सहमत
ते मिपाचे पेठकरकाका आहेत. एकेरीत संबोधू नये असे सुचवते.
आज्जीशी सहमत !!
जाऊ दे रे. स्वत:ला establish करायचे प्रकार आहेत हे. चांगले लेख लिहून establish होण्यापेक्षा हे सोपे.
एक तर कुणाची चूक झालीच तर एकवेळ प्रभाकर म्हणेल?, पण थेट प्रभा?? एक तर काकांच्या प्रोफाईल वरून त्यांच्या वयाचा सहज अंदाज करता येतो. तरीही हे म्हणजे कठीण आहे. बघू, कळेलच काही दिवसात, जैतापकर दादरच्या देवरुखकरांचे कुणी लागतात का ते:-) तसे नसेल तर आनंदच आहे.
:)
अगदी अगदी !! दादरचे देवरुखकर बरेच दिवस दिसले नाहीयेत, आयडी बदलून घेतलंनीत का काय ते बघायला हवं एकदा.
' दादरचे देवरुखकर' म्हणजे अनेक देवरुखकर किंवा पुरुष देवरुखकर असा अर्थ होतो ना? इथं चर्चा चालली आहे ते देवरुखकर त्या आहेत ना ? (शेवटचे वाक्य 'दादा ते आले ना ?' या चालीवर आले वाचावे}
इथं चर्चा चालली आहे ते देवरुखकर त्या आहेत ना ?असं त्यांना मनापासून वाटत असावं असा अंदाज आहे ;-)
हे असं आयडीवरून खात्रीशीररीत्या कळतं होय? माहीत नव्हतं ;)
इथं चर्चा चालली आहे त्या देवरुखकर 'त्या'असाव्यात असे निदान वाटते आहे. खरं खोटं कोणास ठाऊक ? हल्ली स्त्री डुआयडी घ्यायची फ्याशन आहे म्हणे. ;)
रेवती, सूड, विश्वनाथ मेहेंदळे धन्यवाद. पण माझ्या मनांत राग नाही. ईश्वराला आपण अरे-तुरेच करतो.
ईश्वराला म्हणेनात का काही..
पण आमच्या पेठकरकाकांना? ....
मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकासाठी खुप खुप शुभेच्छा...
मिसळपाव वर आधीच प्रसिद्ध झालेले साहित्य - दिवाळी अंकासाठी पाठवता यील का ?
मिपावर किंवा अन्यत्र कुठेही पुर्वप्रकाशित साहित्य कृपया पाठवू नये.
मिपाच्या पहिल्या-वहिल्या दिवाळी अंकासाठी हार्दिक शुभेच्छा
हो आणि theme नक्की कळवा
माझ्या मते एक बांधील थीम अशी नसावी.
रांगोळीच्या विवध रंगासारखा वा दिवाळीच्य फराळासारखा सर्व प्रकारच्या साहित्याने नटललेला अंक असावा.
ह्येच बोलतो....
जमेल ती मदत करायला मी तयार आहे.... आणि हो अंकाला शुभेच्छा :) :)
मिपाच्या दिवाळी अंकासाठी खूप खूप शुभेच्छा.
चुटकुले, सुविचार आणि आरोग्यविषयक सदर ह्यांचाही समावेश असावा असे सुचवितो.
व्यंगचित्रे राहिली का?
मिपाच्या पहिल्या वाहिल्या दिवाळी अंकासाठी शुभेच्छा. मिपाचं वैविध्यपूर्ण अशा प्रवासात हे आणखी एक दमदार पाऊल.
अंकाची जवाबदारी उचलणार्या मंडळींना, मालकांना, आणि तांत्रिक काम सांभाळणार्या सर्वांना शुभेच्छा.
चुटकुले, सुविचार आणि आरोग्यविषयक सदर आणि व्यंगचित्र आणि माहितीपूर्ण लेख यांचाही समावेश करावा या सुचनेशी सहमत.
पहिल्या वहिल्या अंकात कै ना कै आलं पाहिजे, यासाठी दोन चार ओळी खरडेन म्हणतो. बाकी, आपण सांगाल त्या कामांसाठी आम्ही आपल्या सोबत आहोतच.
-दिलीप बिरुटे
मि.पा. च्या पहिल्या - वहिल्या दिवाळी अंकास शुभेच्छ्या !
मिपाच्या पहिल्या वहिल्या दिवाळी अंकासाठी मनापासून शुभेच्छा! :)
मिपाच्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकाची वाट बघतोय, दिवाळीत रुचकर फराळासोबत मिपावरच्या दिग्गज लेखकांच्या खुसखुषीत लेखांची मेजवानीही मिळेल ह्याची खात्री आहे.
अंकास मनापासुन शुभेच्छा आणि सर्व संबंधितांचे अभिनंदन.
- छोटा डॉन
अंकासाठी काहीतरी करायची फार ईच्छा आहे हो पण, तुम्ही मुदत खूप कमी दिलीय. जरा वाढवून नाही का मिळणार?
तयार असे काहीच नाही म्हणून विनंती करतोय.
मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकास शुभेच्छा :)
मला ही ह्यात सहभाग घ्यायला नक्की आवडेल
उपक्रमास शुभेच्छा!
अहो मिपाचा अङ्क आहे हो हा ;) :D :P
(मार खायच्या आत पळतोच कसा इथून आता )
खुप खुप शुभेच्छा !
मीहि माझ्याकडुन जमेल ते लिखान देण्याचा प्रयत्न करेन :)
हे वाचून मनापासून आनंद झालाय.
दिवाळी अंकाच्या या उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा!!
यात सहभागी होण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.
मिसळपाव दिवाळी अंकाला हार्दिक शुभेच्छा!
अरे वा! हार्दीक शुभेच्छा !
मिसळपाव दिवाळी अंकाला हार्दिक शुभेच्छा!
थीम नसावी असे माझे सुद्धा मत आहे-
साहित्यातील सर्व प्रकारांचा समावेश असणारे लेखन असणारा अंक असावा.
दिवाळीचा आनंद वाढवणारी बातमी. मिपाच्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकाला खुप खुप शुभेच्छा.
अरे वा! दिवाळी अंकासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
दिवाळीचा आनंद वाढवणारी बातमी. मिपाच्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकाला खुप खुप शुभेच्छा. +१
दिवाळीचा आनंद वाढवणारी बातमी. मिपाच्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकाला खुप खुप शुभेच्छा. +१
मिपाच्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकाला खुप खुप शुभेच्छा.
दिवाळी अंकासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
मिपाच्या पहिल्यावहिल्या