फाउलं वायबर कुकन!
आमच्या त्सेंटाआजीची मैत्रिण ख्रिस्टिन.. तिच्याकडे गेलेलो असताना तिने हा केक खिलवला.. केकचे नाव आणि रेसिपी विचारल्यावर ती हसायलाच लागली. ह्या केकचे नाव फाउलं वायबर कुकन म्हणजे आळशी बायकांचा केक!
तिची रेसिपी घेऊन घरी आलो आणि अज्जिबात आळशीपणा न करता मी आणि आजीने हा केक करायचा घाट घातला.
आणि माझ्या अमृतमहोत्सवी पाकृ साठी ही केकृ निवडली-
साहित्य-१)बेससाठी:
२०० ग्राम मैदा,७५ ग्राम साखर,७५ ग्राम बटर,१ अंडे,१ टीस्पून बेकिंग पावडर
२)सरफेससाठी:
५०० ग्राम मागरक्वार्क/ लो फॅट चक्का, २अंडी, १५० ग्राम साखर, १ पाकिट वॅनिला पुडिंग पावडर, १०० ग्राम साउअर क्रिम/ष्मांड, १/२ कप सनफ्लॉवर तेल, १ ते १.५ कप दूध, चिमूटभर मीठ, १ चमचा आयसिंग शुगर/सानंष्टाइफ
३)टॉपिंग साठी:
साधारण १ वाटी भरुन टिन्ड अॅप्रिकॉट/प्लम/संत्री (ह्यापैकी जे आवडेल/उपलब्ध असेल ते)
कृती-
बेससाठीचे साहित्य म्हणजे मैदा+बेकिंग पावडर,साखर,बटर,अंडे एकत्र करणे व चांगले मळणे.कणकेप्रमाणे गोळा तयार होईल.
मळताना पाणी/दूध याची गरज नाही. अंडे आणि बटरमधील स्निग्धतेने मळले जाते.
हा गोळा फ्रिजमध्ये ४५-५० मिनिटे ठेवणे.
टिनमधील फळे चाळणीवर घालून ठेवणे म्हणजे पाक निथळून जाईल.
अवन १८० अंश से.वर प्रिहिट करणे.
क्वार्क,अंडी,साखर एकत्र करणे व चांगले फेटणे व ते ५ मिनिटे तसेच ठेवणे व नंतर त्यात वॅनिला पुडिंग पावडर, तेल, दूध,साउअर क्रिम असे एक एक घालून बिट करत राहणे.चिमूटभर मीठ घालणे.
मिश्रण पातळ आहे असे वाटेल परंतु बेक केल्यावर ते घट्ट होते.
फिजमधील गोळा बाहेर काढून तो केकमोल्डवर पसरणे,फक्त तळाशी न पसरता कडांपर्यंत नेणे म्हणजे केकमोल्डच्या आत मैद्याचा जणू एक मोल्डच तयार होईल.
ह्यावर आयसिंगशुगर भुरभुरणे म्हणजे घालायच्या मिश्रणातील रस बाहेर येत नाही.
मघाचचे क्वार्क,वॅनिला पुडिंगपावडर इ.चे मिश्रण आता यावर ओतणे.
त्यावर चाळणीवर घातलेली फळे लावणे.(आम्ही अॅप्रिकॉट वापरले आहेत,पण मी वर म्हटल्याप्रमाणे संत्री,प्लम्स असे इतर जे फळ उपलब्ध असेल ते आपण वापरु शकतो)
१८० अंश से वर प्रिहिटेड अवन मध्ये ५०-५५ मिनिटे बेक करणे.
आणि.. एवढ्या खटाटोपाच्या केकृला आळशी बायांचा केक का म्हणतात? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळते का ते केक तयार होईपर्यंत शोधायचा प्रयत्न करणे.

वाचने
8835
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
वाव ! तोंपासु. पाकृ.
छानच आहे !!
खतरनाक
+ सहमत
In reply to + सहमत by रामदास
सुरेख
अमृतमहोत्सवी पाकृ अगदी
In reply to अमृतमहोत्सवी पाकृ अगदी by रेवती
याला आळशी बायकांच्या केकाची
In reply to याला आळशी बायकांच्या केकाची by प्रभाकर पेठकर
हे मात्र पटले. आता हा केक
In reply to याला आळशी बायकांच्या केकाची by प्रभाकर पेठकर
पटलं!
झकास!!!!!!!!!
अगागागा
बाप...रे....! हा आळशी...मग
हे केक आयते कधी चापायला
In reply to हे केक आयते कधी चापायला by गणपा
१जॅक्टली चापायला मिळणार???
हा आगळावेगळा केक आवडण्यात आला
मस्तच!!
खल्लास!!
In reply to खल्लास!! by चतुरंग
@ केकावली >>> --^--^--^--
In reply to @ केकावली >>> --^--^--^-- by अत्रुप्त आत्मा
+१. असेच म्हणतो.
वाह! वाह!
आई ग तेव्हढा कट केलेला भाग
In reply to आई ग तेव्हढा कट केलेला भाग by स्पंदना
अगदी, अगदी!
मस्त
माझ्या १३च्या नैवेद्याच्या
मी केक पाहिला नाही मी
फाऊल फाऊल! याला आबांचा केक
काय खतरनाक फोटो दिसतोय...
अहाहाहाहाहा!
वा !
स्वातीतै, तुला केकसम्राज्ञी
नको देवराया.... इ.इ.
अरेच्चा!
भारीच
असले फोटो म्हणजे मी पण
आज जळून जाण्याचा / जीव
मस्तच...
In reply to मस्तच... by Pearl
आलाच आलाच अंड्याचा उल्लेख
जबराट !!
चला.. आता येथे कुणीतरी आळशी
एक राहीलच की हो...