मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झटपट पौष्टिक वड्या

नूतन · · पाककृती
vadi साहित्यः ओट्स २ वाट्या पिस्ता, बदाम, खारीक, आक्रोड, शेंगदाणे यांचे जाडसर कूट १ वाटी वेलची पूड १/४ चहाचा चमचा चिरलेला गूळ २ वाट्या पाणी २ चहाचे चमचे साजुक तूप १ चहाचा चमचा पिस्ता बदाम काप सजावटीसाठी कृति १ तव्यावर मंद आचेवर ओट्स हलके भाजुन, एका भांड्यात काढ्न घ्यावे. २ पिस्ता, बदाम, खारीक, आक्रोड व शेंगदाणे यांचे जाड्सर कूट ओट्समध्ये मिसळावे. ३ वेलची पूड वरील मिश्रणात मिसळुन घ्यावी. ४ पॅनमध्ये गूळ, पाणी व तूप एकत्र करुन मध्यम आचेवर ठेवावा व सतत ढवळत राहावे. ५ गूळ विरघळून उकळी येऊ लागल्यावर आंच कमी करुन एक दोन मिनिटे ढवळत राहावे. ६ गॅसवरील पॅन खाली उतरवून त्यात तयार केलेले ओट्स चे मिश्रण घालावे व ते दोन मिनिटे ढवळावे. ७ घट्टसर गोळा झाल्यावर तूप लावलेल्या ट्रे मध्ये मिश्रण थापावे. ८ सजावटीसाठी वर पिस्ता-बदाम काप लावावेत. ९ मिश्रणाचा गरम पणा थोडा कमी झाल्यावर वड्या आखुन घ्याव्यात. १० मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात. (दिलेल्या प्रमाणात साहित्य घेतल्यास फोटोतील आकाराच्या २० वड्या होतात)

वाचने 8157 वाचनखूण प्रतिक्रिया 18

सूड Mon, 10/08/2012 - 15:40
वड्या आवडल्या पण किती दिवस टिकतात ? का करायच्या नि खायच्या सरळ ? रेशिपीत आय मीन गूळ कढवताना पाणी घातलंय म्हणून विचारलं.

नूतन Mon, 10/08/2012 - 21:48
सर्वांचे आभार. ह्या वड्या प्रयोग म्हणुन केल्या होत्या. पण बर्‍या झाल्या म्हणुन शेअर केल्या. या वड्या आठ दिवस टिकायला हरकत नाही, पण तितके दिवस शिल्लक राहील्या तर..