दररोज वृत्तपत्रे, वाहिन्यांवर पाह्तो, आज साईबाबांना ५ किलो सोन्याचा हार अर्पण केला, तिरुपतीच्या हुंडीत अज्ञात इसमाने करोडो रुपये दान केले, लालबागच्या राजाला सोन्याचा पंजा लावला इ.इ.
वस्तुतः हे धन त्या दानकर्त्याने कोणाकडून तरी लुबाडलेले असते, ती बोच जावी म्हणून ही देवाला लाच दिली असते.खरे तर या धनावर नारायणा पेक्षा दरिद्री नारायणाचा हक्क जास्त पोहोचतो. देवस्थानांनीही ह्या धनाचा विश्वस्त म्हणून सुयोग्य वापर करावा असे वाटते.
आज पश्चिम महराष्ट्रातील सोलापूर , सांगली, सातारा, नगर, व उभा मराठवाडा दुष्काळाच्या खाईत लोटला आहे. माणसांपेक्षा गुरांचे काय करावे हे शेतकर्यांना समजेनासे झाले आहे. चांगली गुरे अक्षरशः ५००० रुपयात खाटकाला विकली जात आहेत. सरकारने चारा डेपो बंद करुन चारा छावण्या चालू केल्या आहेत. चारा छावणीत गुरे घेऊन जावे तर सर्व ऊद्योग बंद करुन तेथेच रहावे लागते.
अश्या बिकट परिस्थितीत जर देवस्थानांनी पुढाकार घेवून चार्याची समस्या सोडविली तर हिंदू धर्माचे गोवंश संवर्धनाचे कार्यच होणार आहे.
तसेच देवस्थानांनी काही निधी कृषी विकासाकडे वळवला, बंधारे बांधले, ग्रिन हाऊसेस साठी कर्ज दिले, प्रगत शेतीसाठी निधी वळवला तर हा देश सुजलाम सुफलाम होईल. तसेच पैसा कारणी लागेल.
वाचने
4710
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
चूक
बापु मामा.
ह्या विषयावर बरेच बोलून/लिहून
छान प्रतिसाद.
In reply to ह्या विषयावर बरेच बोलून/लिहून by प्रभाकर पेठकर
छान प्रतिसाद
In reply to ह्या विषयावर बरेच बोलून/लिहून by प्रभाकर पेठकर
सहमत
ट्रस्ट, कायदे- पोलिस आणि
एवढ्या पैशाची गरज आहे?
गाय हा एक उपयुक्त पशू आहे
अनेक विषयांची भेसळयुक्त खिचडी !
यू सेड इट.
In reply to अनेक विषयांची भेसळयुक्त खिचडी ! by तर्री
म्हणणे थोडेसे रास्त वाटते.
सडेतोड व समर्पक /
In reply to म्हणणे थोडेसे रास्त वाटते. by llपुण्याचे पेशवेll
अंधश्रद्धा, धंदा आणि अपवाद
बापू नाना,
प्रॉब्लेम काय आहे?
प्रॉब्लेम हे असे आहेत.
In reply to प्रॉब्लेम काय आहे? by राजेश घासकडवी
>>देवांच्या कष्टमरांना
In reply to प्रॉब्लेम हे असे आहेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिकलो सवरलोय होईल हळुहळु सुधारणा.
In reply to >>देवांच्या कष्टमरांना by राजेश घासकडवी