Skip to main content

बरबटलेले साहित्यक्षेत्र

लेखक Kavita Mahajan यांनी गुरुवार, 13/09/2012 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर ह.मो. मराठेंना लेखनातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून अटक झाली. १५,००० रु. च्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. एबीपी माझा या चॅनलवर मी या मुद्द्याबाबत बोलले होते, तेव्हा सहसंवादक श्री. सदानंद मोरे म्हणाले होते की,"महाजनताईंचे विचार चांगले आहेत, पण भाबडे आहेत. निवडणुका म्हटलं की हे सारं करावंच लागतं." हे ऐकून काही बोलण्याची संधी मिळाली नाही, कारण ते समारोपाचं बोलले होते. असंच असेल तर मग उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी उमेदवाराला किडनॅप करणे, मतदारांना पैसे वा काही वस्तू वाटणे, मतपेट्या पळवणे इत्यादी सगळे प्रकारदेखील राजकारणात प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आपण पाहत ऐकत आलेलो असतोच. हे सगळेही साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत होऊ द्यायचे का? कारण 'करावंच लागतं' मध्ये असं काहीही येऊ शकतं आणि निवडणुकांमध्ये ते क्षम्यही मानलं जातं. "मी जात सांगून मत मागितलं नाही," असं ह.मो. म्हणत असले तरी मुळात जात सांगितलीच कशाला? जातिनिरपेक्ष विचार करणार्‍या दुसर्‍याची जात विचारण्याची व स्वतःहून ( अकारण ) स्वतःची जात सांगण्याची गरज भासत नाही. "असे करणे म्हणजे 'मी नाही त्यातली, कडी लावा आतली' हा प्रकार होतो", असे एक विधान मी केले. तेही अनेकांना आक्षेपार्ह वाटले. जुन्या समर्पक म्हणी आहेत. तिचा अर्थ पाहिला, तर ह.मों.च्या वर्तनाशी ती तंतोतंत जुळते. त्यात मला काही चुकीचे वाटत नाही. ह.मो. जर निवडून आले तर संमेलनावर ब्राह्मणी सावट असेल, असे मत चॅनलवर मांडले गेले. मग संमेलनाचे चिपळूणचे आयोजक यांनीही याचा निषेध केला. एकूण सारे साहित्यक्षेत्र या निवडणुकींच्या धुरळ्यात दरसाली बरबटते, याची मात्र खंत वाटते.

वाचने 27271
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

तथाकथित पुरोगामी साहित्तीक,,, जातिच्या बाबतीत अत्यंत दुधखुळे आणी तितकेच दांभिक असतात, ह.मो.मराठेही तस्सेच आहेत. त्यांच्या पुरोगामित्वाची इतिश्री म्हणजे, इतक्या वर्षांच्या त्यांच्या हयातीत त्यांना जात सोडणे म्हणजे काय..? हेच नीट कळलेलं नाही... त्यामुळे जे त्यांच्या मनात आहे,ते इतरत्र उघडं पडणारच....! बाकी चालू द्या...!

In reply to by भाग्या

माझ्या खरडवहित भेटा/किंवा व्यक्तिगत निरोप पाठवा,,,तिथे सांगतो. :)

दलित साहित्य संमेलन वेगळे सुरु झाले तेव्हा जातीचे राजकारण सुरु आहे असे वाटले नाही का हो तुम्हाला? त्यावेळेस साहित्यक्षेत्र बरबटल्यासारखे नाही का वाटले?

In reply to by इस्पिक राजा

दलित साहित्य संमेलन वेगळे सुरु झाले तेव्हा जातीचे राजकारण सुरु आहे असे वाटले नाही का हो तुम्हाला? त्यावेळेस साहित्यक्षेत्र बरबटल्यासारखे नाही का वाटले?
अगदी सहमत आहे..! त्या वेळी कविताताईंनी काही सरसावून लिहिल्याचे आमच्या पाहण्यात नाही.. आम्हीही सदर कर्यक्रम पाहिला होता. त्यात सदानंद मोरेंनी मांडलेली मते आम्हाला पटली. मोरेसाहेब हे खूपच व्यासंगी आणि सारासार व सांगोपांग विचार करून बोलणारे गृहस्थ वाटले.. असो, बाकी हल्ली ब्राह्मणांवर चिखलफेक करायची फ्यॅशनच सुरू झाली आहे..! :)

In reply to by कॉमन मॅन

>>>>>बाकी हल्ली ब्राह्मणांवर चिखलफेक करायची फ्यॅशनच सुरू झाली आहे..! अहो कॉमन मॅन, ह.मो.मराठे यांना ही चिखलफेक खपत नव्हती. पूर्वीपासून त्यांच्या मनात हा असंतोष खदखदत होता. ब्राह्मण बंधुंवर होणार्‍या अन्यायाच्या बाबतीत ह.मो. मराठे यांनी ''ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार'' अशी एक पुस्तिका २००४ लिहिली होती. आमचे आदरणीय जालमित्र रावसाहेब यांनी तेव्हाच ते पुस्तक विकत घेतले आणि त्यावर थोडे मंथनही ओसाड गावात घडवून आणले होते, त्याची आठवण आज होत आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by इस्पिक राजा

दलित साहित्य संमेलन वेगळे सुरु झाले तेव्हा
फरक आहे. तांत्रिक मुद्दा असा की दलित ही जात नाही. 'दलित' कोणीही होऊ शकते, असू शकते. तरीही समजा असे म्हटले की दलित या जातीने वेगळे संमेलन केल्याने साहित्य क्षेत्र बरबटले तरी हमोंना अखिल भारतीय साहित्य संमेलनात जातपात आणण्याचा हक्क पोचत नाही. त्यांनीही स्वतःचे वेगळे संमेलन सुरु केले तर गोष्ट वेगळी. पण मुद्दा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा आहे. त्यात जात-पात कशाला? असुरक्षित वाटणार्‍यांनी आपले वेगळे संमेलन सुरु करावे हे बरे. असो.

दलित शोषिताच्या अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा .. बोलणारा तो पुरोगामी इस्लाम इसायांच्या अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा ..सेक्क्युलर . हिंदू व ब्राह्मणाच्या अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा ..तो प्रतिगामी..जातीय वादी..देश तोडणारे लोक.. अश्या लोका विरुद्ध देश द्रोहाच गुन्हा का लावत नाही.. म्हणून ब्रिगेडी आंदोलन छेडणार आहेत

In reply to by अविनाशकुलकर्णी

चूक!! जो आपल्या शिक्षण्/व्यवसाय/देश/भाषा यापेक्षा जन्माची/चा जात/ धर्म याला आपली ओळख समजतो तो प्रतिगामी.. एखादा कलेक्टरसारख्या पदावर असूनदेखिल जन्माच्या जातीवरून स्वतःला मागासवर्गीय समजतो तो प्रतिगामी.. जो विशेष कर्तृत्व नसताना जन्माच्या जातीवरून स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो तो प्रतिगामी. जर ह.मों.वर टीका करणारा जर पुरुषोत्तम खेडेकरला पाठीशी घालत असेल तर तोही प्रतिगामी. जर आझाद मैदानातील दंग्यांचा निषेध करताना गुजरात दंगलीला पाठिशी घालत असेल तर तो देखिल प्रतिगामीच..

सर्वप्रथम एक विनंती: मिपाची आकाशवाणी करून नये. अर्थात प्रतिसादांशी संवाद ठेवावात. मते वेगळी असणे यात गैर नसते पण संवाद न करणे हे काही योग्य नसते, विशेष करून जर कोणी स्वतःस विचारवंत समजत असेल तर. असो, "जात नाही ती जात" ह्या वाक्याचा चावून चावून चोथा झाला आहे. पण जात अजून अनेकांच्या मनातून जात नाही हे वास्तव आहे. "असे करणे म्हणजे 'मी नाही त्यातली, कडी लावा आतली' हा प्रकार होतो", असे एक विधान मी केले. सहमत. ह.मो. जर निवडून आले तर संमेलनावर ब्राह्मणी सावट असेल, असे मत चॅनलवर मांडले गेले. हे वाक्य आपण म्हणाले आहे का? (उत्तर मिळाले नाही तर, आपण म्हणले असेच गृहीत धरूया). जर आपण म्हणले असले तर आपण पण जातीच्याच चष्म्यातून पहात आहात असे वाटत नाही का? आपण म्हणले नसले तर त्या वाक्याला त्या कार्यक्रमात आपण आक्षेप घेतला होता का? माझ्या मते जातीचे राजकारण हे केवळ राजकारण्यांनी केलेले नाही तर त्याला जीवंत ठेवणारे माध्यमे आणि निधर्मी विचारवंत पण तितकेच जबाबदार आहेत. आता जे काही साहीत्यक्षेत्रात दिसत आहे ती या सगळ्याची अनेक वर्षात झालेली परीणीती आहे असे वाटते.

In reply to by विकास

हे वाक्य आपण म्हणाले आहे का? (उत्तर मिळाले नाही तर, आपण म्हणले असेच गृहीत धरूया) हे वाक्य माझे नव्हते. चॅनलचा सूत्रसंचालक प्रसन्न याचे हे समारोपाचे वाक्य होते. या वाक्यानंतर चर्चा झाली नाही.

In reply to by विकास

मिपाची आकाशवाणी करून नये. अर्थात प्रतिसादांशी संवाद ठेवावात. मान्य. ज्या विषयांमधले मला काही कळते असे मला वाटते, त्याविषयावर मी जरूर बोलते.

अ.भा.म. साहित्य संमेलनाच्या बाबतीत अगदी कानातल्या कानात तर कधी जाहीर असं विचारपीठावरही नेहमीच बोलल्या गेलं आहे की अभामसासं हे ब्राह्मणी साहित्य संमेलन आहे. विद्रोही साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, वगैरे आपापले प्रत्येकाचे इथे संमेलने आहेत पण त्यातल्या त्यात अभामसासं हे सर्व मराठी माणसाचे आहे, असा एक आपल्या सर्व मराठी माणसाचा समज आहे तो किती खरा आणि खोटा ते सांगायला माझ्याकडे कोणताही विदा नाही. साहित्यसंमेलनाशिवाय मराठी माणसाचं काही अडत नाही हा भाग वेगळा. काही चर्चा, परिसंवाद, काही वादविवाद, काहींचे कौतुक, काहींना महाराष्ट्र शासनाच्या काही पदावर मिरवायला मिळालं म्हणजे साहित्य संमेलनाचं सूप वाजत असतं. प्रत्येक थोरा मोठा साहित्यिकांचे साहित्याच्या बाबतीत आपापले झेंडे आहेत. अभामसासंमेलनात ब्राह्मणेतर साहित्य संमेलनाध्यक्ष झालाच नाही असं काही नाही. शंकरराव खरात, केशव मेश्राम हे दलित तर मुस्लीम म्हणुन यु.म. पठाण सर यांचं नाव घेता येईल. पण जाती-पाती सोडुन या निवडणुका होतात असं म्हणनं जरा धाडसाचं होईल. साहित्यसंमेलनात जातीची गटबाजी असते. आपापल्या प्रदेशाची गटबाजी असते. विद्वत्तेतील सिनियर-ज्युनियर असा वाद आहे. विविध अशा गटातटाचे राजकारण साहित्याला नवे नव्हे. ह.मो.मराठे यांनी जरा घाईच केली. काहीही न बोलता त्यांना संमेलनात 'आपली' ठराविक मतं पडणारच होती. ब्राह्मणद्वेष कसा होतो त्यासाठी साहित्यिकांना पत्रक काढत मजकुर लिहिणे थोडं अतिच झालं असं माझं मत आहे. ब्राह्मणाचा कसा द्वेष होतो, ब्राह्मणांनी संघटन केले पाहिजे , ब्राह्मणांनी काय सुधारणा केल्या वगैरे मुद्दे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या मतांसाठी आवश्यक होते, असे मला वाट्त नाही. आणि ते ज्यांना आवाहन करीत होते ते लेखक मंडळी अशा आवाहनाला जाहीर प्रतिसाद देतील हा विचार त्यांच्या मनात आलाच कसा हे न उलगडणारे कोडे आहे. साहित्यिक म्हणुन ते मराठी सारस्वताला परिचित आहेत. जातीय द्वेष पसरविल्या जात आहे असे सिद्ध होणारच होते, माफी मागूनही त्यावर पडदा पडला नाही, असे दिसतच आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही चर्चा, परिसंवाद, काही वादविवाद, काहींचे कौतुक, काहींना महाराष्ट्र शासनाच्या काही पदावर मिरवायला मिळालं म्हणजे साहित्य संमेलनाचं सूप वाजत असतं. अरे साहेब दोन तीन महत्वाचे मुद्दे राहिलेच की "साहित्यप्रेमी" मुख्यमंत्र्याची हजेरी आमरस पुरी , आम्रखंड पुरी वगैरे पुस्तकाच्या प्रकाशकांची चांदी

In reply to by चौकटराजा

अहो राजे, अजून भले बुरे खूप मुद्दे आहेत. पण धाग्याचे शेपूट पाहता...असो. सदरील धाग्याच्या निमित्तानं चर्चा प्रस्ताव टाकणार्‍या, मराठी साहित्यातील प्रतिभावंत लेखिका मला ज्यांच्याबद्दल आदर आहे आणि ज्यांच्या लेखनाचा मी चाहता आहे त्या कविता महाजन कदाचित त्यांच्या या धाग्यावर विषयाच्या निमित्तानं अधिक उणे लिहितीलही. देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे हे अभामसासं जवळून पाहता आले. अभामसासंमेलनात सर्वच वाईट आहे, असं नाही. तुमच्या माझ्यासारख्या वाचकांना पुस्तकाची मेजवानी असते. पूस्तक खरेदी करतांना भरपूर डिस्काउंट असतो. साहित्यिकांना जवळून पाहता येतं. हौशा गौशांचे आणि निवडक कवींचे कवीसंमेलन इंजॉय करता येते. . चर्चेचे विषय कधीकधी छानच असतात. राजकीय मंडळी साहित्याच्या निमित्तानं काही मनोगत किंवा काही विचारांची मांडणी करतात ते माहितीपूर्ण आणि मोठं गमतीदारही असतं. असो. -दिलीप बिरुटे

In reply to by चौकटराजा

पुस्तकाच्या प्रकाशकांची चांदी
पुस्तकाच्या प्रकाशकांची चांदी झाली आहे असे एक संमेलन दाखवा*. तुमचे म्हणणे खरे ठरले तर तुमच्या हस्ते ह्या संमेलनाला माझ्याकडून ११,१११ /- रुपायांची देणगी मी देणार. *आणि प्लिज पेपरात आलेली किंवा साहित्य संमेलन संयोजकांनी पुरवलेली आकडेवारी सादर करू नका. अशा चांदी झालेल्या प्रकाशकालाच समोर आणाल तर बरे होईल. कोणी म्हणेल की 'प्रकाशक कशाला कबूल करेल चांदी झाल्याचे '? हरकत नाही. निदान जायचा यायचा खर्च सोडून वर 'नफा' म्हणता येईल असे पैसे मिळाले असे म्हणणारा प्रकाशक तरी शोधाच. गेल्या साहित्य संमेलनात अक्षरशः अध्यक्षांची पुस्तके देखील सगळ्या स्टॉल्स मध्ये मिळून ५ च्या वरती विकले गेली नसतील राव. ती क्रांतीतै कुठे गेली ? एकाच प्रकाशकांनी तिचे आणि डहाके साहेबांचे पण पुस्तक छापलेले आहे. तिला असेल अधिक माहिती बहूदा. च्यायला, मला तर स्टॉल लावून पुस्तक विक्रीचे जेवढे पैसे नफा म्हणून मिळाले, त्याच्या पेक्षा जास्ती तर त्या संमेलनावरती लिहिलेल्या लेखाचे मिळालेत. :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

मागे एकदा अमृतवेल या कार्यक्रमात पुस्तक व्यवहार , साहित्य संमेलन यांचा संबधी काही प्रकाशकानी ( की विक्रेत्यानी ? ) माहिती दिली होती की वेव्हाराची व्याप्ती साहित्य संमेलनातील पुस्तक प्रदर्शनाचे वाढली आहे त्याचा अर्थ आम्ही प्रकाशकांची चांदी असा घेतला .तो कारणपरत्वे विक्रेत्यांची चांदी असा घ्यावयास आमची हरकत नाही. प्रकाशकाच्या " वेदना" आपल्यासच ठाउक परा !

ह. मो. मराठे "विद्वेषाच्या विरोधात जागृती" करण्याचे काम करताहेत, साहित्यक्षेत्र बरबटविण्याचे काम नव्हे! त्यांच्या कार्याला शुभेच्छा देणे होत नसेल तर विरोध तरी करू नका!

मुळात आजकालच्या मराठी साहित्यक्षेत्रातील (जे एक डबके आहे असे आमचे वैयक्तिक मत आहे) घडामोडींचा मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, काही उपयोग आहे का? अध्यक्ष व्हायचे ही केवळ वैयक्तिक आकांक्षा घेत कंपूबाजी, अड्डेबाजी करत मीच किती प्रतिभावान, बाकीचे छचोर असली वैचारीक (!) बैठक असलेली अत्यंत संकुचित विचारसरणी, संकुचित सामाजिक जाणीव आणि तद्दन सुमार वकुबाची मंडळी साहित्यसंमेलनाच्या मार्फत आपली टिमकी ढोल असल्यासारख्या वागत असतात. त्यांच्यावाचून त्यांच्या घरच्यांचे सुद्धा अडत नसेल तर बाकीच्या जनतेला काय फरक पडतो ! असो. एक करमणूकीचा तमाशा एवढेच त्याचे महत्व ! घ्या मजा पाहून !! ;) बाकी, धागे जसे येतात तसेच इतर धाग्यांवर प्रतिसाद पण दिले तर सदस्यत्व रद्द होत नाही हे धागाप्रवर्तकांना समजावून सांगायाची गरज पडत आहे असे वाटते :)

मुळात आजकालच्या मराठी साहित्यक्षेत्रातील (जे एक डबके आहे असे आमचे वैयक्तिक मत आहे) घडामोडींचा मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, काही उपयोग आहे का?
हाही एक प्रश्न आहेच..!

'ब्रा' हा शब्द टंकताक्षणीच प्रतिसाद वा धागा उडवला जाईल अशी काही तांत्रिक व्यवस्था या संस्थळावर करता येईल का ? पुढचा सगळा त्रास वाचेल. -- ब्राशिंगराव बरबटे

१. तुम्ही खेडेकर आदी प्रभूतींची पुस्तके वाचली आहेत का ? २. एखाद्या समाजाला टार्गेट करून त्या वर हीन टीका करणे योग्य आहे का ? ३. जर त्या टीकेला त्या समाजा मधल्या ज्येष्ठ साहित्यिकाने ( किंवा समाजा मधल्या कोणीही ) उत्तर दिले तर ते चुकीचे आहे का ?? ४. एखाद्या समाज घटकासाठी दिलेले योगदानाचा उल्लेख करणे चुकीचा आहे का ? ( शाहु , फुले यांनी दलितांसाठी काम केले ...हा उल्लेख जातीवाचक आहे का ? ) ५. जात सांगणे चुकीचे आहे तर मग संभाजी बिग्रेड कोणते राजकारण करत आहे ? ६. साहित्या मध्ये दलीत साहित्य असा उल्लेख केला तो योग्य आहे का ? ७. स्वताच्या जातीचा उल्लेख करणं यात काय गैर आहे ? जात ही भारतीय संविधानाने मान्य केलेली आणि सध्या समाज मान्य आहे ( आदर्शवादामधे मान्य नसेल तरीही )... आणि स्वताच्या जातीविरुद्ध विद्वेष पसरवणार्या विरुद्ध विरोध केला तर त्यात काय चुकले .. ८. दलीत समाजा साठी, हिंदू समाजासाठी , मुस्लीम समाजासाठी जे कार्य करतात त्यांचा उल्लेख चालतो ?? आणि ब्राह्मणांना विरोध म्हणजे 'पुरोगामीपणा' असे तुम्हाला वाटत आहे का ? बाकी तुम्हाला खरडी मधून काही दुवे देतो ..ते पहा ..मग ह मों नी विरोध का केला ते कळेलच ..

In reply to by कपिलमुनी

त्यांचा धागा आणि तुमचे विचार यांचा काय संबंध ? बिग्रेड ने काय केलं हे बिग्रेड लाच विचारा ना ! -- स्वतःची जात विसरून प्रतिसाद लिहायला शिका. --- टोपणनावे घेऊनही जात लपत नाही ती अशी

In reply to by आशु जोग

ह मों नी बिग्रेडींच्या विद्वेषाला विरोध केला...कारण तो ब्राह्मणांच्या ( एका विशिष्ट जाती ) विरोधात होता.. म्हणून त्यांच्यावर आरोप करण्यापूर्वी मुळ विद्वेष काय आहे ते समजून घेतला पाहिजे .. आणि कोणता मुद्दा असंबद्ध वाटला ते सविस्तर लिहा ..उत्तर देण्यात येइल .. मूळ धाग्यामध्ये जात आहे त्यां मुळे जातीवाचक उल्लेख आला आहे... आणि मी माझी जात लपवणार नाही ...त्यासाठी टोपणनावांची गरज नाही.. मी जात विसरणार नाही...फक्त त्याच्या आधारावर कोणताही भेद करत नाही

ह.मो. मराठे, असीम त्रिवेदी आदींना एफ.आय.आर. दाखल झाल्यावर लगेचच अटक करण्याची तत्परता दाखवणारे पोलीस हीच तत्परता एफ.आय.आर. दाखल झालेले श्री. अशोक चव्हाण, श्री. राजेंद्र दर्डा, श्री. विजय दर्डा, सुरेश कलमाडी यांच्या बाबतीत का दाखवत नाहीत????

तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे आम्ही साहित्यसंमेलनाला हजेरी पुस्तकं विकत घेण्यासाठी लावतो. इतर तमाशे चालू द्यात!

"इंटरनेट वरती फोरम्स ( पक्षी: मिसळपाव) असताना वेगळे साहित्य संमेलन भरवायची आणि खर्च वाढवायची गरज आहे का?" असा एखादा धागा काढावा का? ;) बाकी चालू द्या.

धागा सुरू करणार्‍या बाई, भांडणं लाऊन, कुठे गेल्या? अजुनही, मिपावर, जातीवाचक चर्चांचा धागा काढावयास परवानगी आहे?

धर्म, जात या वैयक्तिक बाबी आहेत, आणि त्या तशाच असू द्याव्यात असे मला वाटते. साहित्य संमेलनच नाही तर कुठल्याही सार्वजनिक क्षेत्रात काम करताना, केवळ आपण भारतीय आहोत असेच समजून वावरावे, वागावे. (आणि सगळ्यानीच असे केले) तरच सामाजिक एकोपा निर्माण होऊ शकतो. नाही तर असे वाद कधीच संपणार नाहीत.

कोणी काही म्हणो, आम्हाला मात्र हा धागा आण लिखाण प्रचंड आवडले. अहो, आजकालच्या ह्या धकाधकीच्या जीवनात हास्याचे चार क्षण मिळवून देणारे साहित्य तसे नष्टच होत चालले आहे. ह्या लेखनाने मात्र मनमुराद हसवले. पुन्हा एकदा धन्यवाद. बाकी, जात, पात, धर्म, त्यांचे अभिमानी - दुराभिमानी इत्यांदींना काही एक समज देणारी सुचना मधे स्वगृहाच्या पानावरती पाहिली होती. हा धागा अजूनही इथेच पाहता, त्या सुचनेची अंमलबजावणी होताना मात्र दिसणार नाही हे स्पष्ट जाणवत आहे. आता लहान तोंडी मोठा घास घेत पुन्हा एकदा विचारावेसे वाटते, की ठरवून दिलेल्या काही एक धोरणांची, निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी दरवेळी नीलकांत येण्याचीच किंवा त्यानेच हस्तक्षेप करण्याची खरंच आवश्यकता आहे का ? 'कातडी बचाव' किंवा 'बाकीचे बघून घेतील' अशी भुमीका सोडून, नेमलेले अधिकारी लोक स्वतः कारवाई करायला कधी पुढे येतील का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

;) सुप्पर लाईक

In reply to by परिकथेतील राजकुमार

बाकी, जात, पात, धर्म, त्यांचे अभिमानी - दुराभिमानी इत्यांदींना काही एक समज देणारी सुचना मधे स्वगृहाच्या पानावरती पाहिली होती. हा धागा अजूनही इथेच पाहता, त्या सुचनेची अंमलबजावणी होताना मात्र दिसणार नाही हे स्पष्ट जाणवत आहे. आता लहान तोंडी मोठा घास घेत पुन्हा एकदा विचारावेसे वाटते, की ठरवून दिलेल्या काही एक धोरणांची, निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी दरवेळी नीलकांत येण्याचीच किंवा त्यानेच हस्तक्षेप करण्याची खरंच आवश्यकता आहे का ? 'कातडी बचाव' किंवा 'बाकीचे बघून घेतील' अशी भुमीका सोडून, नेमलेले अधिकारी लोक स्वतः कारवाई करायला कधी पुढे येतील का ?
+++++++++++++++++९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९ सहमत!!!... ___________________ * आमचा प्रतिसाद 'मंडळा'ला बहुधा फारच लागलेला दिसतोये.. त्यामुळे तो डीलीट केल्या गेल्या असावा.... :) असो!.. दखल घेतल्याबद्दल आभारी आहे....... ____________________ जातीवाचक लिखाणास बंदी असल्याचे नियम सर्वांना (पक्षी : ब्राह्मण, लेवा पाटील... इत्यादि) सारखेच लागू असावेत.. अशी पुन्हा एकदा माफक अपेक्षा आहे. :)

कविता महाजनांनी कांही 'निवडक' प्रतिसादांना उत्तर दिले ही आनंदाची बाब आहे. पण अजून कांही, खालील जोडण्यांवर विचारलेल्या, प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. http://www.misalpav.com/node/22731#comment-425450 http://www.misalpav.com/node/22731#comment-425455 http://www.misalpav.com/node/22731#comment-425509 http://www.misalpav.com/node/22731#comment-425525 http://www.misalpav.com/node/22731#comment-425560

In reply to by प्रभाकर पेठकर

या प्रश्नांची संमेलन होईपर्यंत मिळतील काय? नाहितर एवितेवी संमेलन होऊन गेलेय (रद्द झाले नाही हि शक्यता धरली नाही) तेव्हा आता का खुलासा / उत्तर द्यायचे असा पवित्रा घेतला जाउ शकतो...... बाकी "वर्ण वर्चस्व" याला "ब्राम्हण वाद " असा शब्द वापरुन पुर्वापार फक्त आणि फक्त ब्राम्हणच जातिभेद पाळित असत असा आग्रही समज करून देण्यात तथाकथीत "विचारवंत्/पुरोगामी" जालावरच जास्त पसरले आहेत हे नम्रपणे नोंदवु ईच्छीतो...

In reply to by नाखु

उत्तरे मिळाली कि आम्हाला पण कळवा.... तुमच्या बरोबर आम्च्या पण घोर अज्ञानाची जळमटे दूर होतील हि "बाप्पा" कडे प्रार्थना....

हमोनी आत्मपरिक्षण केले असावे त्यांनी सपशेल माफि मागितली या वरुन वाटते असो इथे प्रतिसादांची नुसतीच झोंबाझोबी दिसते त्या दिवशीची चर्चा मी सुद्धा ऐकली आहे कविता महाजन यांनी योग्य मते मांडली आहेत अर्थात, तरीही हमोंची भुमिका ही तेवढि चुकिची आहे असे वाटत नाही कारण त्यांच्या जागी इतर जात-धर्मिय असता आणि तशी परिस्थिती असती तर त्यांनी सुद्धा तेच केले असते जे हमों नी केले,(मला ते नैसर्गिक आणि समर्थनिय वाटते) मात्र त्याची जागा साहित्या क्षेत्रासारख्या ठिकाणी नसावि त्यामुळे नेहमीच वादासाठी कुप्रसिद्ध असलेले आणि शासनाचे २५ लक्ष अनुदान लाटणारे हे मंडळच बरखास्त करावे असे वाटते

In reply to by शिल्पा ब

जे तुम्हि माझ्या मागे लागून करता तेच समजा हवे तर तुम्हि स्वतः वरुन बरे जग ओळखता बाकि या पुढे माझ्याकडून प्रतिवादाची अपेक्षा ठेवू नका कारण तुम्हाला फाट्यावर मारण्यात येत आहे. ता. क. या प्रतिसादास ज्यांना हवे तसे त्यांनी पहावे, हवे ते निष्कर्ष काढावेत काय सोवळे -ओवळे पाळायचे ते पाळा . . . . आणि वैयक्तिक बोलण्यापेक्षा मुळ चर्चेवर जमले तर बोला

In reply to by अजातशत्रु

तुमचं निरीक्षण आहे हे...आमचे अनुभव अनमोल आहेत त्यामुळे सगळीकडे ते उधळत नैत आम्ही..बरं का अ जात शत्रु .. आणि वैयक्तिक बोलण्यापेक्षा मुळ चर्चेवर जमले तर बोला अ‍ॅ हॅ हॅ हॅ हॅ .....यालाच सौ चुहे खाके वेग्रे म्हणतात .

In reply to by अजातशत्रु

मात्र त्याची जागा साहित्या क्षेत्रासारख्या ठिकाणी नसावि त्यामुळे नेहमीच वादासाठी कुप्रसिद्ध असलेले आणि शासनाचे २५ लक्ष अनुदान लाटणारे हे मंडळच बरखास्त करावे असे वाटते. दोन्हीही विधाने मान्य.

कोण हा ह. मो. मराठे आणि कसले साहित्य संमेलन ? बोंबलेनात का तिथे ? सामान्य माणसाच्या आयुष्यात त्याने काय फरक पडतो देव जाणे. जे सांप्रतच्या काळाशी सुसंगत लिखाण करतात (उदा. गिरीश कुबेर, अच्युत गोडबोले, अतुल कहाते आणि असे असंख्य) ते कधी असल्या चिखलात लोळताना दिसत नाहीत. शिवाय त्यांना बहुधा साहित्यिक म्हणायचे नसते असे वाटते.

In reply to by अप्पा जोगळेकर

>> सामान्य माणसाच्या आयुष्यात त्याने काय फरक पडतो देव जाणे असा निरागस बुरखा घेणारे लोक जास्त डेंजरस असतात

In reply to by Kavita Mahajan

लिहिणारे / लेखन करणारे सगळेच 'साहित्यिक' नसतात...! साहित्यिक असण्याची पात्रता काय असावी ? एखादि व्यक्ति जर कविता करत असेल किंवा एखादा वैचारीक लेख लिहित असेल तर तो साहित्यिक ठरू शकेल काय? साहित्यिक असण्याचे निकष काय असावे?

In reply to by अजातशत्रु

एखादि व्यक्ति जर कविता करत असेल किंवा एखादा वैचारीक लेख लिहित असेल तर तो साहित्यिक ठरू शकेल काय? कार्यक्रमाची लिंक पाहीली असता कार्यक्रमाचे सुत्र संचालक श्री. प्रसन्न जोशी ह्यांनी श्री. विठ्ठल वाघ आणि श्री. हमोंचा उल्लेख अनुक्रमे ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक आणि साहित्यिक असा केला आहे. म्हणजे कवी आणि वैचारिक लेखन करणारा लेखक साहित्यिक वर्गात मोडतो. बाकी तांत्रिक अटींची कल्पना नाही. आता, लेखक/लेखिका आणि साहित्यिक/साहित्यिका ह्यांच्या पातळीत दर्जात्मक काही फरक असतो का हेही ठाऊक नाही.

ह. मो. मराठे यांना विरोधकरणारे कोण तर संभाजी ब्रिगेडवाले जे मराठ्यांसाठी लढतात. फारच विनोदी योगायोग आहे हा. :-) बाकी चालू द्या.

In reply to by पाषाणभेद

ह. मो. मराठे आणि संभाजी ब्रिगेड या दोघांनाही विरोध करणारे अनेकजण आहेत. हे आपल्या माहितीस्तव.

In reply to by Kavita Mahajan

(विचारवंत )* हमोंना जाहीर (जालावर) व बिगेडला गुप्त (मनातल्या मनात) विरोध करतात.. शब्द्श्रेय..... मा. नानासाहेब..

१. हमो मराठे यांचं लेखन हे अध्यक्ष पदाच्या दर्जाचं आहे का? ( इतर ललित गद्य लेखन) त्यांच्या आततायी पणाचा नाही पण ब्रिगेडच्या हीन प्रचाराचा आणि गलिच्छ भाषेचा विरोध करण्याच्या भूमिकेचं मी समर्थन करतो. त्यांच्या एकूण चार पानांच्या बायो डेटा (मराठी?) त्यांच्या साहित्य सेवे बद्दल माहिती असावी ज्या अनुषंगाने त्यांचं अध्यक्षपद योग्य ठरेल. ते सोडून त्यांनी लिहिलेल्या काही लेखांवर का इतका वाद होतो आहे? ते जर तितके विशेष लेखक नसतील तर पडतील. इथे भले भले लेखक पोळलेले आहेत. हमोंचं काय विशेष? त्यांनी जर भावनांना हात घालून ब्रिगेडविरोधाचा मुद्दा जातीवर नेऊन मते मिळवण्याचा प्रयत्न केला असेल तर तो अत्यंत फालतू दर्जाचाच म्हणावा लागेल. किमान साहित्य संमेलनाला तरी यातून वगळावं. महाबळेश्वरला काय झालं हे सर्वांना माहीत आहे. जर हमो असे वागत असतील तर तेही त्याच रांगेत आहेत. २. कविता ताई - शिवरायांच्या बदनामीची केंद्रे हे प्रकाशित पुस्तक आहे ... पत्रक वगैरे नाही. शिवधर्म ही कायमस्वरुपी वेब साईट आहे. अत्यंत गलिच्छ आरोप, घाणेरडी भाषा वापरली गेली आहे आणि अजूनही वापरली जात आहे. आनंद यादवांच्या बाबतीत जे घडलं तेही जगजाहीर आहे. एकच प्रश्न आहे की त्या वेळी तुम्ही कुठल्याही चर्चेत भाग घेतला होता का, प्रिंट, चॅनेल्स किंवा इतर कुठल्याही माध्यमातून तुम्ही तेव्हा संमेलनाशी थेट संबंध नसताना त्याचा पूर्ण विचका करणार्‍या कोनालाही काहीही प्रश्न विचारले होते का. किंबहूना हीच "बरबटलेपणाची" भूमिका तेव्हा मांडली होती का? (असेलही. असल्यास स्पष्ट करावी ही विनंती. या मागे हमो बरोबर आणि ब्रिगेड तेवढी चूक असा माझा दावा नाही. पण दोन्ही extremist (मराठी ?) वृत्तींना एकच वागणूक दिली जावी. ) वरील दोन्ही प्रश्न आहेत, मुद्दे नाहीत (मला उत्तरे माहीत नाहीत..)

In reply to by मैत्र

त्यांनी जर भावनांना हात घालून ब्रिगेडविरोधाचा मुद्दा जातीवर नेऊन मते मिळवण्याचा प्रयत्न केला असेल तर तो अत्यंत फालतू दर्जाचाच म्हणावा लागेल. त्या चर्चे दरम्यान असा मुद्दा आला की मतदारांमध्ये ब्राह्मण बाहुल्य किती? पूर्वी होते, आता तसे नाही. मतदारांमध्ये सर्वजातींचे मिश्रण आहे. त्यात पुन्हा सर्व ब्राह्मणांची मते हमोंनाच मिळतील असे नाही. दुसर्‍या उमेदवारासही मिळतील. आणि पत्रक वाचून फक्त 'ब्राह्मण' उमेदवार म्हणून (त्यांचे साहित्यिक कार्य नाकारून) हमोंना मतदान करणारे किती? तर संख्या नगण्य असेल असे वाटते. म्हणजेच, पत्रकाने भावनिक आवाहन वगैरे मुद्दा गैरलागू ठरतो. हमोंच्या साहित्याचे त्यांनी दोन भाग केले आहेत. एक ललित लेखन आणि दुसरे वैचारीक लेखन. कुठल्याही साहित्यिकाचा (ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर) त्याच्या सर्व साहित्याचा साकल्याने विचार करून त्याचे साहित्यिक अनुदान लक्षात घेतले पाहिजे. ते तसे घेतले तर सर्व वादातील हवाच निघुन जाते आणि हमोंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यासाठी निर्माण झालेली संधी दुसर्‍या उमेदवाराच्या हातातून निसटून जाते. हे त्या उमेदवाराचे नुकसान आहे. त्यामुळे इथे मुद्दामहून, ठरवून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद घालून विरुद्ध पार्टीच्या उमेदवारास (श्री. बागवे), योग्यता असो वा नसो, 'बळ मिळवून द्यायचा प्रयत्न' हेही जातियतेला खतपाणी घालणारेच कृत्य आहे. मग प्रश्न असा येतो की फक्त हमोंवर ब्राह्मण्याचे लेबल लावून राळ का उडविली जावी? जातियतेला खतपाणी (ह्या चर्चेद्वारे) घालण्याच्या कार्यास श्री. बागवे आणि सौ. कविता महाजनबाई हे दोघांनीही हिरीरीने हातभार लाविला आहे. म्हणजेच मुद्दा जातीयतेवर नेऊन मते मिळविण्याचा प्रयत्न (केला जात असेल तर) दोन्ही पक्षांकडून होतो आहे. मग एकट्या हमोंवर आगपाखड करण्यात त्यांच्यावर अन्याय होतो आहे. चर्चे दरम्यान महाजन बाईंचे छद्मी आणि श्री. बागवे ह्यांचे गालातल्या गालात हसणे बरेच 'बोलके' होते. extremist (मराठी ?) वृत्तीं = अतिरेकी वृत्ती ('विचारसरणी' जास्त समर्पक शब्द वाटतो).

In reply to by मैत्र

मराठेंची भूमिका आणि संभाजी ब्रिगेड दोन्हींनाही माझा विरोध आहे. जे जे जातीयवादी आहे, त्या सर्वालाच आहे. तथापि वाईट / विघातक घटनांची यादी काढून त्यावेळी तुम्ही काय केले? असे कुणालाही विचारणे हे मला विनोदी वाटते. केवळ 'प्रतिक्रिया देत राहणे' हे कोणत्याही ललित लेखकाचे 'मुख्य काम' नसते. मात्र काही वेळा अशा असतात की एक व्यक्ती म्हणून / नागरिक म्हणून लेखक काही भाष्यं करतात आणि आपल्याच क्षेत्रात काही टोकाचे अयोग्य चालले असेल तर त्यावेळी मात्र खात्रीने प्रतिक्रिया त्यांनी द्याव्यात अशी अपेक्षा चुकीची नाही. बाकी गोष्टी त्यांच्या मुख्य लेखनातून वेळोवेळी उमटत असतातच. ती त्यांची एकातर्‍हेने प्रतिक्रियाच असते. मात्र वृत्तपत्रीय लेखनाप्रमाणे कथा-कविता-कादंबरी-शोधनिबंध या रोज लिहिल्या जाणार्‍या आणि तात्कालिक असणार्‍या गोष्टी नव्हेत. साहित्य क्षेत्रातील चुकीच्या गोष्टींविषयी मी वेळोवेळी माझ्या मुख्य लेखनातून भाष्य केले आहे. माझी पुस्तके न्याहाळली, तर सापडेल. आनंद यादवांबाबत जे झाले त्यावेळी एक प्रदीर्घ लेख मी लोकसत्ता मध्ये लिहिला होता. ( इथे लिंक कशी द्यायची ते माहीत नाही. पण माझ्या भिन्न या ब्लॉगवर 'आम्ही लाचारांच्या फौजा' हा लेख इच्छुकांना वाचण्यास मिळेल.) त्यावर नंतर खूप चांगली चर्चा झाली, पण प्रत्यक्षात काही निष्पन्न झाले नाही. कारण लेखकांची युनियन इत्यादी नसते आणि लेखन हा क्वचितच कुणाचा पूर्णवेळ व्यवसाय असतो. त्यामुळे लेखक वेगळे, लेखनक्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते वेगळे दिसतात. महामंडळावरील बहुतेक लोक असे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी क्वचित काही हौशी लेखन केले आहे.

In reply to by Kavita Mahajan

वाईट / विघातक घटनांची यादी काढून त्यावेळी तुम्ही काय केले? असे कुणालाही विचारणे हे मला विनोदी वाटते.
यात विनोदाचा दूरवर संबंध नाही. याला विनोद म्हणून तुम्ही बगल देण्याचा प्रयत्न करता आहात. मी दोन वेगळ्या गोष्टी मांडण्याचा / विचारण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे हमोंचा मुद्दा हा संमेलनाकडे वळवण्याचा. ब्राह्मण किंवा इतर या पेक्षा ते साहित्यिक म्हणून संमेलनाध्यक्ष अशा दृष्टीने किती योग्य आहेत हे महत्त्वाचं. त्याबद्दल काही माहिती कोणालाही असेल तर इथे मांडल्यास सगळ्यांनाच समजेल. दुसरं म्हणजे तुम्ही (कविता महाजन) कुठली बाजू घेत आहात हे स्पष्टपणे जाणून घेण्याचा प्रयत्न होता. कारण हमोंशी झालेल्या चर्चेत तुमचं मत हे हमोंच्या ब्राम्हण कार्डाचा मतांसाठी वापर याच्या विरोधा पेक्षा ब्राम्हण विरोध अशा स्वरुपाचं वाटलं. हा त्या कार्यक्रमाच्या स्वरुपाचा दोष असू शकतो. 'आम्ही लाचारांच्या फौजा' लेखाची लिंक देता आली तर खूप उत्तम. (लिंक देण्यासाठी वाविप्र पहा किंवा प्रतिक्रियेच्या चौकटीच्या वर जे आयकॉन्स येतात त्यात उजवीकडून सहावा हा पृथ्वी आणि एक साखळी दाखवतो. त्यावर टिचकी मारून येणार्‍या बॉक्स मध्ये लि़ंक पेस्ट करा. खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे दिसेल प्रकाशित होण्यापूर्वी. इथे test च्या जागी तुमची लिंक असेल. शब्दाच्या नंतर असू द्या. म्हणजे त्या शब्दावर hyperlink तयार होईल. मिपाच्या परिभाषेत याला 'दुवा' म्हणतात.

In reply to by मैत्र

मी बगल दिलेली नाही. उलट या विधानानंतर माझे म्हणणे सविस्तर लिहिले आहे. वाक्य विनोदी वाटले तरी मी उत्तर गांभीर्यानेच दिले आहे. एक लेखक म्हणून ह.मो. संमेलनाध्यक्षपदासाठी योग्य असले तरी त्यांनी जे जातीचे मुद्दे अकारण मध्ये आणले, त्यामुळे वातावरण गढुळले. हे मुद्दे मध्ये आणले नसते, लेखन पाहता ते एकमेव बरे नाव होते. बागवेंचे लेखन मला व्यक्तिशः सुमार वाटते. शिरीष गोपाळ देशपांडेंचे कोणतेही लेखन मला वाचनीय वाटले नाही. कोतापल्लेंनी तरुण वयात कुणीही लिहिते तसे काही लेखन केले आहे, नंतर आयुष्यभर काही उल्लेखनीय लिहिलेले नाही. या तुलनेत फक्त ह. मो. च आहेत, ज्यांच्या पुस्तकांची नावं तरी वाचकांना माहीत आहेत. त्यांच्या पुस्तिका वाचकांना माहीत होत्या. परिचय पत्रकात त्यांनी या लेखनाचा नुसता उल्लेख करण्यासही ( पुस्तकांच्या यादीत ) हरकत नव्हती. पण त्यासोबत त्यांनी जे काही लिहिले आहे त्यामुळे वाद उसळला. कोणत्याही जातीला वा त्या जातीच्या संस्था आपल्या जातीसाठी करत असलेल्या चांगल्या कार्याला माझा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. पण जात-धर्म-कर्मकांड अशा गोष्टी व्यक्तिगतच ठेवलेल्या बर्‍या. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून त्यांनी केवळ आपले साहित्यिक कर्तृत्व सांगणे आणि तेवढेच सांगणे योग्य होते. व्यक्तिगत आयुष्यात आपण काय-काय केले आहे आणि नाही हे सांगण्याची ही जागा नव्हती. त्यांनी 'आपण जे केले आहे' असे म्हटले आहे, त्यावरही काही लोकांनी आक्षेप घेतले आहेत. त्याबाबतची हरि नरके यांची फेसबुकवरील प्रतिक्रिया आपल्या माहितीस्तव मी खाली देते.

In reply to by मैत्र

अ.भा.मराठी साहित्य संमेलनात वाद हे झडलेच पाहिजेत असा महामंडळाच्या घटनेत एखादा नियम आहे किंवा कसे याची मला माहिती नाही.सालाबादप्रमाणे चिपळुणला होणा-या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणुक गाज ु लागली आहे.गेल्या ८५ साहित्य संमेलनात न घडलेली जातीय प्रचाराची घटना यावर्षी प्रथमच पाहायला मिळत आहे.त्याचे मानकरी आहेत लेखक आणि अध्यक्षपदाचे एक उमेदवार श्री.ह.मो.मराठे. हमोंनी या निवडणुकीत जातीय प्रचार करुन या निवडणुकीला झेडपीच्या निवडणुकीच्या पातळीवर उतरविले आहे. काही लोक दागिने मोडुन खातात,काही आपली गरिबी मोडुन खातात तशी हमोंनी निवडणुक प्रचारात स्वता:ची जात "मोडुन खायला" सुरुवात केली आहे.{आपले आडनाव ’मराठे’ असले तरी} आपण "ब्राह्मण" आहोत आणि आपणच एकमेव ब्राह्मणांचे तारणहार आहोत असे त्यांनी आपल्या प्रचारपत्रकात सुचकपणे नमुद केलेले आहे.ब्राह्मण समाजाच्या विरुद्धच्या सगळ्या अपप्रचाराला वाचा फोडण्याचे "ईश्वरी कार्य" आपण हाती घेतल्याची माहिती हमोंनी या पत्रकात देवुन मते मागितली आहेत. हमो म्हणतात, "गेल्या दिडशे वर्षांपासुन महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचे वातावरण पद्धतशीरपणे तयार करण्यात येत असुन सध्या त्याचा कळस गाठण्यात येत आहे." याचा अर्थ हमोंचा रोख महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याकडे आहे.दिडशे वर्षांपुर्वी त्यांचे स्त्री व दलित शिक्षणाचे काम सुरु झाले होते. हमोंचा अंगुलीनिर्देश तिकडेच आहे. ब्राह्मण पुरुषांच्या सरसकट कत्तली करण्याची चिथावणी देणा-या पुरुषोत्तम खेडेकरांच्या विखारी पुस्तकाविरुद्ध हमोंनी भुमिका घेतल्याचे ते या पत्रकात ब्राह्मणांना आवर्जुन सांगतात.तेव्हा ते हे दडवुन ठेवतात की खेडेकरांच्या या पुस्तकाविरुद्ध पोलीसात तक्रार करणारे हमो नसुन शाम सातपुते,संजय सोनवणी आणि मधुकर रामटेके हे होते.हमोना केवळ लाजेकाजेस्तव नंतर भुमिका घ्यावी लागली पण पोलीसकेस झाल्यानंतर हे "शुर शिपाई" तब्बल सहा महिने पुस्तकावर मुग गिळुन गप्प राहिले होते. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण मतदार असल्याने त्यांना "भिक्षांदेही करण्यासाठी" हमोंनी हे पत्रक काढल्याची टिका एबीपी माझा वाहिनीने थेटपणाने करुन या जातीय प्रचाराचे वस्त्रहरण केले. टिका सुरु झाल्यावर हमोंनी साळसुदपणाचा आव आणुन केलेला खुलासा अतिशय विनोदी होता. "एबीपी माझा" शी बोलताना ते म्हणाले, "मी पत्रकात असे कुठे लिहिलेय की मी ब्राह्मण आहे म्हणुन ब्राह्मण मतदारांनो मला मत द्या." वा: हमो! तुम्ही मतदारांना आणि महाराष्ट्राला बोळ्याने दुध पिणारे समजता काय?तुमचे जातीय डावपेच आम्हाला कळत नाहीत काय? हमोंच्या चार पानी पत्रकातील पुर्ण दोन पाने या ब्राह्मणकार्याची जाहीरात करणारी आहेत. त्यात हमोंनी घटनेने दिलेल्या सामाजिक आरक्षणाविरुद्धही गरळ ओकलेले आहे. त्यांनी सामाजिक न्यायाऎवजी त्याला "जातवार आरक्षण"असे संबोधले आहे. कष्टक-यांना जमिनीची मालकी देणा-या कुळकायद्यालाही हमोंचा विरोध आहे. रानडे,आगरकर,केशवसुत,कर्वे,लोकहितवादी यांची तोंडदेखली नावे घेणारे हमो नेमके कुणाचे वारसदार आहेत?गं.बा.सरदार,य.दि.फडके,अरुण साधु,वसंत बापट,लक्ष्मण्शास्त्री जोशी आदींचा वारसा हमोंना नको आहे.त्यांना सदानंद मोरे यांनी वाहिनीवर जातविरहीत प्रचाराचे प्रमाणपत्र देवुन त्यांची तळी उचलुन धरली असली तरी हमो हे विष्णुशास्त्री चिपळुणकरांचेच वारसदार आहेत आणि रानडे-केशवसुतांची नावे घेवुन ते त्यांना बदनाम करीत आहेत हे स्पष्ट आहे. मतदारांमध्ये दोन जातींचे लोक प्रामुख्याने आहेत.एकुणात ४० टक्के मतदार ब्राह्मण असल्याचे हमो सांगत असले तरी प्रत्यक्षात हे प्रमाण ५५ते ६० टक्केपर्यंत असावे असे जाणकारांचे मत आहे.त्याखालोखाल मतदार सत्ताधारी जातीचे आहेत.या दोघांची जुंपल्याचे चित्र निर्माण करुन हमोंना "विरोधीभक्त" ब्रिगेडकरवी ते मतदारांसमोर बिंबवायचे आहे. दोन प्रतिगाम्यांमध्ये कायम संगनमत असते हे अनेकदा दिसुन आले आहे.ही मिलीभगत ईथेही नसेलच असे नाही. हमो म्हणतात,"पुढे जेम्स लेनचे पुस्तक व तो स्वत: यांची भारताच्या सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता केली."हमोंची ही मांडणी सत्याला धरुन नाही. सरकारने लेनच्या बदनामीकारक आणि विकृत पुस्तकावर बंदी घातली होती. घटनेच्या कलम १९ नुसार असणा-या लेखन व अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार न्यायालयाने ही बंदी उठवली.ती उठवण्यात आली कारण सरकारने हा आदेश काढताना खुप चुका केलेल्या होत्या.त्याचा फायदा पुस्तकाला मिळाला.पण ही याचिका लेनने केलेली नव्हती.किंवा लेनला निर्दोष ठरवावे अशीही मागणी नव्हती.पुस्तक वाचायला मिळावे अशी वाचकांची याचिका होती.लेनला कोर्टाने निर्दोष मुक्त केले ही हमोंची माहिती त्यामुळेच दिशाभुल करणारी आहे. हमोंनी या पुस्तकातील वादग्रस्त मजकुर आपल्या पत्रकात जसाच्यातसा उद्धृत करुन आणखी एक चुक केलेली आहे.ही चुक यापुर्वी फक्त संभाजी ब्रिगेडने हजारो पत्रके छापुन केलेली होती. तीच ब्रिगेड आत्ता हमोंना त्यासाठीच टार्गेट करीत आहे.आहे की नाही मिलीभगत?प्रागतिक मतदार यातुन हमोंपासुन दुरावले तरी सनातन्यांची मते पक्की करण्याच्या तसेच संभाजी ब्रिगेडसारख्या अतिरेकी आणि जातीयवादी मराठा संघटनांना जेम्स लेनचे कोलीत देवुन चिथवायचे आणि तटस्थ मतदारांची सहानुभुती मिळवुन निवडुन यायचे अशी गणिते धुर्तपणे मांडुन हमोंनी हे पत्रक काढलेले असावे. हा वाद ओढवुन घेवुन सहानुभुती मिळवायची आणि निवडुन यायचे असा डावपेच यामागे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.हा वाद कसे वळण घेतो त्यावर मराठे जिंकणारकी हरणार ते ठरेल. प्रबोधनकार ठाकरे यांच्या "माझी जीवनगाथा" या आत्मचरित्रात एक आठवण दिलेली आहे.१९२३ च्या राजकीय निवडणुकीत भास्करराव जाधव यांनी, "सातारा जिल्हा मराठा मतदारांचा असुन आपण मराठा आहोत सबब मराठ्यांची मते मराठ्यासच मिळाली पाहिजेत" असे प्रचारपत्रक काढले होते.{पान.२४४} आज कायदे बदललेले आहेत. असा थेट जातीय प्रचार करता येत नसल्याने आजच्या "आडनावांच्या मराठ्यांनी"अधिक चतुर मार्ग वापरला आहे इतकेच.पण वृती तीच आहे.प्रागतिक महाराष्ट्राने याचा धिक्कार केला पाहिजे.

In reply to by Kavita Mahajan

स्पष्ट उत्तराबद्दल आभार. या लेखातून असं दिसतंय की हमोंनी त्यांच्या पत्रकात लेनच्या पुस्तकातला मजकूर छापणे वगैरे प्रकार केले आहेत. त्यांच्या ब्राम्हणांना किती काळ झोडपणार वगैरे लेखांचा समावेश करणे पण मान्य आहे. कारण तो त्यांच्या कामाचा , साहित्याचा भाग आहे. पण जर वरचा नरके यांचा लेख हा खरा असेल तर हमोंनी ब्रिगेडच्या आक्रस्ताळी उद्योगांचा खांदा करून मतपेटीवर बंदूक रोखली आहे. ही ब्राम्हण्यापेक्षा खरं तर जास्त राजकीय खेळी आहे इतर उमेदवारांना मागे टाकण्याची. एकूण ब्रिगेडविरोधी मते त्यांच्या पारड्यात जाऊ शकतात. कार्यक्रम मात्र जरा एकांगी वाटला हमो विरोधात आणि सूत्र संचालक भावी वागळे होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसत होते. त्यामुळे इतकी चर्चा झाली. अवांतरः तुमचा 'आम्ही लाचारांच्या फौजा' वाचण्याची इच्छा आहे, लेख जालावर उपलब्ध असल्यास. नाव वाचून अजून उत्सुकता वाढली आहे.