✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नाटकामागचं नाटक - २

अ
अर्धवट यांनी
Tue, 09/11/2012 - 05:43  ·  लेख
लेख
भाग १ तर असे लपलपते फ्लॅट तयार होउन मोडक्या कंबरेनं त्यांच्याकडं बघितलं की खूप्खूप समाधान वाटतं.. नाटक हळूहळू आकाराला येत असतं, मधूनच एखादा वा एखादी चिडून निघून जाणं, मग परत शोधाशोध वगैरे चालूच असतं. साऊंडट्रॅकची सीडी तयार झालेली असते, त्यावर पण संवाद चालू होतात.. हे दहापंधरा दिवस म्हणजे तालमीतलं क्रीम असतं.. नाटक जमणार की हापटणार हे खरंतर इथंच ठरतं. इथे नाटकातलं नाट्य सापडायला लागतं..आतापर्यंत संवाद पाठ झालेले असतात, अ‍ॅक्शन, फॉर्मेशन, पॉज, पोझिशन, लूक, टायमींग, लिसनींग, पंच, लाफटर, एन्ट्र्या वगैरे भरायला लागतात, प्रत्येक नट मग तो कितीही पादरापावटा असला तरी शब्दामागचं काहीतरी शोधायला लागतो.. एरवी तालमीत दोन डायलॉगच्या मधे होणार्‍या कॉमेंट्स, गप्पा, शिव्या बंद होत जातात.. प्रयोग अंगात हळूहळू भिनत असतो.. याच काळात एके दिवशी दोनतीन गब्रू एखादा प्रसंग असा काही उठवतात की सगळा हॉल अचानक निशब्द होउन जातो.. अचानक काहितरी उत्कट सापडलेलं असतं.. दोन मिनिटं शांततेत जातात नंतर ओल्या डोळ्यांनी एकमेकांना मारलेल्या मिठ्या आणि 'भ' च्या बाराखडीतलं कौतूक यातच उरलेली रात्र जाते..आणि तालमीचा अचानक प्रयोग होउन जातो… साला बाकी कसली नशा तर केली नाही आजपर्यंत पण त्या एका रात्रीची नशा मात्र उतरता उतरत नाही.. प्रयोग हातात येत असतो.. पण बाकी काही अजून तयार नसतं.. स्पर्धा असेल तर ठीक आहे पण स्वत:चा प्रयोग असेल तर इतर सगळे सोपस्कार आलेच, प्रायोजक मिळवणे, 'वाड्यावर' जाऊन थिएटर सवलतीच्या दरात मिळण्याची व्यवस्था करणे, जाहिराती डीजाईन करणे, संपादकाला फुकट पास देऊन जाहिरात कमी खर्चात छापली जाण्याची तजवीज करणे, एकदोन पत्रकारांना जेवायला घालून, एखादी कौतुकाची बातमी छापून आणणे, नाटकाची तिकिटे डीजाईन करणे, नाटकाच्या जाहीरातीचे फ्लेक्सबोर्ड डिजाईन करणे, ते एखाद्या प्रींटरकडून स्वतः उभं राहून प्रिंट करून आणणे, ते फ्लेक्स्बोर्ड लावायला मेटलच्या फ्रेम मिळवणे. गावातून चक्कर मारून कुठल्या चौकात जास्त पब्लिशीटी होइल याचा अदमास बांधून, त्या चौकातला आधीचा बोर्डचे बांबू काढण्यापुर्वी मांडववाल्याला गाठणे, त्यालाच शेदोनशे रुपयात पटवलं तर नवीन परात बांधायचा त्रास वाचतो, आहे त्याच बांबूच्या परातीवर आपला बोर्ड लटकवून द्यायचा, हे अर्थातच रात्री बारा वाजल्यानंतर... मग दुसर्‍यादिवशी सकाळी दहावाजता एका भडव्याचा फोन येतो, तो नगरपालिकेतील अतीक्रमण विभागाचा म्हणे अधिकारी असतो, मग तो सक्काळसक्काळ नडतो... एरवी त्याच्या बेडरूममधे अतीक्रमण झालं तरी झोपतो निवांत साला आणी आमी कॉलेजची पोरं म्हणून माज दाखवतो होय रे.. मग आम्हीपण इरेला पेटतो, डायरेक 'वाड्यावर' जातो, नाटकाला आमंत्रण द्यायचं कारण काढून.. हा नवीन त्रास म्हाराजांच्या कानावर घातला.. की तिकडून थेट नगराध्यक्षाला वा 'शीवोसायबाला' फोन... च्यायला.. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.. मग आम्ही त्याच्या नाकावर टीच्चून शीवोसायबाला आमंत्रणाचे दोन पास देऊन येतो.. मग परिनिरीक्षण मंडळाचं पत्र लागतं, पोलीसची परवानगी लागते.. पोलीसांचा फारसा त्रास नसतो, नाटकवाली पोरं म्हणून ते फार त्रास देत नाहीत, आमचा नेहेमीच ओळखीचा पीआय गाठला की तो सगळं काम बसल्याबसल्या करून देतो वर प्रेमानं बसवून घेउन चहा पाजतो. त्यात एखादा एस्पीसाहेब मराठी आणि हौषी निघाला तर तो दोनाचे चार पास हक्कानं मागून घेतो आणी नाटकाला बायकापोरांसकट आवर्जून येतो. मग प्रयोगाची तारीख जवळ येत असते, तेव्हा नेमका नाटकाचा स्थानीक कॉन्ट्रॅक्टर काहितरी कुरापत काढतो, त्याला नाटक देऊन वट्ट पैसे घेउन पोरांनी मोकळं व्हावं असा त्याचा डाव.. पण आता माघार नाही.. तिकिटाची पुस्तकं छापून येतात, चार दिवस आधी एक पोरगा सकाळ संध्याकाळ 'शाहुकला'ला प्लॅन घेऊन बसवावा लागतो... गावातल्या प्रतिष्ठीतांचे, नावजलेल्या डॉक्टरांचे, वकीलांचे, जुन्याजाणत्या माणसांचे फोन येत असतात्, आपुलकीनं पुढच्या तिकीटांची मागणी केली जाते, आम्हीही मग शब्दाचा मान ठेवून वेळात वेळ काढून कुणीतरी जाऊन तिकीटे देउन येतोच, अहो या लोकांमुळे तर गावाचं गावपण असतं, काही चुकलंमाकलं तरी कौतुकाचा, प्रेमाचा हातही फिरणार असतो. नाटक जवळपास पुर्ण बसत आलेलं असतं, नेपथ्य तयार झालेलं असतं, कपडेपट तयार असतो, जाहिरात आलेली असते, फ्लेक्स लागलेले असतात, तिकिटे बर्‍यापैकी खपलेली असतात, पोरं दिवसरात्र जिवाला जीव देउन काबाडकष्ट करत असतात.. आणी असाच अचानक आल्यासारखा एकदम नाटकाचा दिवस उजाडतो.. क्रमशः

Book traversal links for नाटकामागचं नाटक - २

  • ‹ नाटकामागचं नाटक - १
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
नाट्य
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
4314 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

मस्त! अगदी जीवंत होउन आला हा

स्पंदना
Tue, 09/11/2012 - 05:50 नवीन
मस्त! अगदी जीवंत होउन आला हा भाग. तस्साच्या तस्सा भिडला इथवर. चला नांदी ची तयारी होउ दे आता.
  • Log in or register to post comments

लई भारी झालेत दोनी भाग, पुढचे

५० फक्त
Tue, 09/11/2012 - 08:30 नवीन
लई भारी झालेत दोनी भाग, पुढचे बी भारीच होणार जनु....धन्वयाद.
  • Log in or register to post comments

मस्तच...

मन१
Tue, 09/11/2012 - 08:31 नवीन
हाही भाग धावता, ओघवता.....
  • Log in or register to post comments

अवडुंबर !

शिल्पा ब
Tue, 09/11/2012 - 09:03 नवीन
अवडुंबर !
  • Log in or register to post comments

दुसरा भागही मस्त झाला.

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 09/11/2012 - 09:17 नवीन
दुसरा भागही मस्त झाला. पुढच्या भागाची उत्सुकता वाढली आहे.
  • Log in or register to post comments

येऊ द्यात..

बहुगुणी
Tue, 09/11/2012 - 12:40 नवीन
गाडीचा फोर्थ गिअर पडलाय :-) मस्त रंगात आलं आहे वर्णन, पुढचा भाग लवकर येऊ द्या!
  • Log in or register to post comments

खूपच छान!!! मज्जा येतेय

चेतन माने
Tue, 09/11/2012 - 12:52 नवीन
खूपच छान!!! मज्जा येतेय वाचताना, पुढच्या भागाची वाट बघतोय !!!
  • Log in or register to post comments

जिवंत वर्णन!! जियो.

बॅटमॅन
Tue, 09/11/2012 - 12:53 नवीन
जिवंत वर्णन!! जियो.
  • Log in or register to post comments

दुसरी घंटा झाली!

पैसा
Tue, 09/11/2012 - 20:49 नवीन
धुपाचा वास आला आणि नांदी कधी सुरू होणार म्हणून वाट बघतेय. हा पण भाग अप्रतिम! तुम्ही हौशी ग्रुप असताना तिकिट लावून नाटक केलंत? शाबास पठ्ठे!
  • Log in or register to post comments

धन्यवाद ज्योतै.. तिकीट लावून

अर्धवट
गुरुवार, 09/13/2012 - 08:14 नवीन
धन्यवाद ज्योतै.. तिकीट लावून सलग तीन रात्री तीन नाटकांचे प्रयोग केले आहेत, या उपद्व्यापाला नाट्यमहोत्सव असं नाव दिलं होतं. तीन दिवस अगदी बाजीप्रभू व्हायचा सगळ्यांचा, तीसर्‍या रात्री पहाटे एकदा गडावरून तोफांचे आवाज आले की मग अगदी तुडूंब समाधानानं "ग्रूपला पर हेड कीती नुकसान झालं" ते मोजायला घ्यायचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नाटक हे व्यसन आहे. ज्याला

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 09/13/2012 - 12:30 नवीन
नाटक हे व्यसन आहे. ज्याला लागेल त्याचे काही खरे नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

उत्तम.. मजा आली.. शाहु

भडकमकर मास्तर
Wed, 09/12/2012 - 17:46 नवीन
उत्तम.. मजा आली.. शाहु कला आणि राजवाडा म्हणजे कोल्हापूर काय?
  • Log in or register to post comments

मास्तर मास्तर... सातारा हो..

अर्धवट
Wed, 09/12/2012 - 17:56 नवीन
मास्तर मास्तर... सातारा हो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

पुढं

श्रावण मोडक
Wed, 09/12/2012 - 23:31 नवीन
ते पुढे गेले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

वाचतीये.

रेवती
Wed, 09/12/2012 - 20:49 नवीन
वाचतीये.
  • Log in or register to post comments

रुपारेलची आठवण झाली.

जाई.
Wed, 09/12/2012 - 23:24 नवीन
रुपारेलची आठवण झाली. पु.भा.प्र
  • Log in or register to post comments

भारी लिहीलंय! मज्जा आली.

नगरीनिरंजन
गुरुवार, 09/13/2012 - 11:10 नवीन
भारी लिहीलंय! मज्जा आली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा