भारतीय सांस्कृतिक प्रदूषण थांबवा पाकिस्तानी नेते , कट्टर पंथीयांची व मागणी
सध्या पाकिस्तानी कलाकार व भारतीय कार्यक्रमात सहभाग ह्या विषयांवर बरेच काही लिहून येत आहे. त्या विषयी माझे मुक्त प्रकटन ह्यात मी अबुधाबी , युके , आणि जर्मनी मध्ये अनेक पाकिस्तानी नागरिकांना भेटलो व त्यांच्याशी संवाद साधला चर्चा ,वादविवाद खूप घातले. त्यांचा कडून भारताविषयी मत जहाल ,मवाळ मते कानावर पडली. ह्याच मुद्द्याला अनुरूप अशी चर्चासत्रे पाकिस्तानी प्रसारमाध्यमात घडतात. त्यांना भारतीय वाहिन्यांवर बंदी हवी आहे. कारण ह्यांच्या मार्फत हिंदू संस्कृती पाकिस्तानी घरांमध्ये झिरपत आहे. म्हणूनच ह्या विषयावर वेगळ्या दृष्टी कोनातून विचार मांडत आहे.
पाकिस्तान मधील सामाजिक व राजकीय स्तर हा आपल्या सारखा बहु त्रिस्तरीय आहे. तेथे सुद्धा प्रांतिक अस्मिता , शिया ,सुन्नी राजकारण व जहाल व मवाळ विचारधारा आहेत. तेथे चार प्रमुख वर्ग आहेत. एक सत्ताधारी ( जे अमेरिकेच्या पाठिंब्यावर टिकून आहेत ) दुसरा म्हणजे सर्वात प्रबळ तेथील आर्मी तिसरा म्हणजे आय एस आय हि गुप्तचर संघटना व चौथा म्हणजे मुल्ला आणि कट्टरपंथी ह्या चारही वर्गाचा एकमेकावर नियंत्रण व ताळमेळ नाही आहे. मुंबई हल्ला झाला तो ह्याच सर्व वर्गातील काही लोकांमुळे
. पण सर्व सामान्य पाकिस्तानी ( मी जे परदेशात वेगवेगळ्या देशात पहिले ते आपल्या देशातील ह्या चारही वर्गापासून प्रचंड नाराज आहेत.) आपला देश रसातळाला जात आहे हे त्यांना दिसत आहे. व भारताची प्रगती सुद्धा ( त्यांच्या मानाने दिसत आहे.). पाकिस्तान मध्ये मुल्ला आणि कट्टर पंथ आणि त्यांचे लष्कर व आय एस आय नेहमीच भारत द्वेष तेथील जनतेत पसरवतात व त्यासाठी अनेक लोणकढ्या थापा तेथील जनतेला सांगतात. की पाकिस्तान हा भारतापेक्षा सर्वच पातळीवर सरस आहे.
मात्र भारतीय वाहिन्या तेथील प्रमुख शहरे व गावांमध्ये पोहोचल्यामुळे ह्यांचे बिंग उघडकीस आले.
त्यांची जळजळ ह्या क्लिप मधून कळून येते.
.
कारण ह्या वाहिन्यांना तेथे जबरदस्त लोकप्रियता लाभली आहे. ह्यातून पाकिस्तानी सिनेमा व टिव्ही ह्यांची तुलना साहजिकच पाकिस्तानी माध्यमांशी तेथील जनता कळते. व भारत ह्या बाबतीत दर्जात्मक व आर्थिक दृष्ट्या पाक पेक्षा सरस आहे हे कळून चुकले आहे.( १०० कोटीचा व्यवसाय करणारा भारतीय सिनेमा त्यांना अचंबित करतो. ) तेथील नेते व अनेक मान्यवर भारताशी तुलना होऊ शकत नाही असे जाहीरपणे म्हणतात. आज तेथील लग्नात भारतीय गाण्यांचा बोलबाला आहे. मग भारताचा एवढा द्वेष का करतात. ( भारताशी वर्ल्ड कप मध्ये सामना हरल्यावर पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी आकाश पातळ एक केले तेव्हा शाहीद आफ्रिदीने वरील उद्गार काढले .पुढे त्याने मग सारवासारवी केली. पण त्यांच्या प्रश्नाला उत्तर त्यांच्या प्रसारमाध्यमांकडे नव्हते
. मी तू नळीवर अनेक क्लिप्स मध्ये पाकिस्तानमधील बॉलिवूड चे पाकिस्तानात मधील अस्तित्व कमी करावे कारण ते भारतीय हिंदू संस्कृती त्यांच्या मुलांवर लादत आहेत. भारतीय टिव्ही मालिका व हिंदू सण ह्यांचे त्यांच्या समाजात कसा प्रभाव पडत आहे हे त्यांनी अनेक घरात मुलाखती घेऊन स्पष्ट केले आहे. व काही पाकिस्तानी कलाकारांना भारतात संधी देऊन त्या बदल्यात पाकिस्तानी बाजारपेठ काबिज केल्याचा आरोप केला जातो. आज घरी गणपती ठेवणारा सलमान पाकिस्तानात सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
जसा अमेरीका मोठी सुपर पॉवर आहे अशी प्रतिमा जगभर जनमानसात त्यांच्या सहजपणे पसरवली आहे. अमेरिकन ड्रीम हि कल्पना हॉलिवूड सिनेमांनी पसरवली. आहे. उदाहरणार्थ जगावर एलियन चा हमला व जगाचे रक्षण फक्त अमेरिकन करणार हा मक्ता त्यांच्याकडे आहे असे सतत दाखवले जाते. म्हणूनच की काय अमेरिकेलाच जगातील कोणत्याही समस्येत नाक खुपसण्याचे नैतिक अधिकार आहे असा गोड गैरसमज अमेरिकन जनतेमध्ये आहे. अमेरिकन ड्रिम हि कल्पना जगभरातील लोकांच्या गळी उतरवली आहे.
. प्रसार माध्यमे एखाद्या देशाची सांस्कृतिक बाजू जगापुढे मांडतात. भारतीय वाहिन्या पाकिस्तानात दाखवल्या जायला लागल्या व तेथील मुल्ला लोकांच्या खोट्या प्रचार जसे सर्व भारतीय मुस्लिमांचा खूप द्वेष करतात वगैरे हे पितळ उघडे पडले. आज मला भेटलेले अनेक पाकिस्तानी हे चकीतच होऊन भारतीय काय क्रम त्यातील सास ,बहु और साजीश अश्या अनेक गोष्टी पाकिस्तानात चवीने पहिल्या जातात असे आवर्जून सांगतात. आज भारताची पाकिस्तानात मध्ये नंबर एक चा शत्रू ही प्रतिमा कमी करून त्यांची जागा आज तालिबान व त्यांच्या अंतर्गत दहशतवादाने घेतली आहे. ह्यांचे श्रेय आपल्या थोड्याफार फरकाने आपल्या प्रसारमाध्यमांना जाते. त्यांच्या पाकिस्तानी संसद बुशा रेहेमान ह्यांनी पाकिस्तानात भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. कारण भारतीय सांस्कृतिक प्रदुषण त्यांची संस्कृती उद्ध्वस्त करीत आहे.
(आज हॉलिवूड सुद्धा इंग्लंड व ऑस्ट्रेलिया मधून काही कलाकारांना आपल्या देशात संधी ह्या साठी देतात. म्हणूनच आज युके मध्ये बॉण्ड सिनेमे सोडल्यास स्वतःचे सिनेमे चालत नाहीत सर्वत्र हॉलिवूड ची सत्ता आहे- आज पाकिस्तानातील श्रीमंत , मूठभर शहरी मध्यमवर्गीय व गावातील व शहरातील कनिष्ट मध्यम वर्ग ह्यांच्याकडे टिव्ही आहे .त्यांना मनोरंजनाचे एकमेव साधन भारतीय सिनेमे व टेलिव्हीजन आहे. तेथे कट्टर धर्मपंथीय विचारधारा वाढत आहेत. व पाकिस्तान चे तालिबान पंथीय राष्ट्र होण्यापेक्षा भारतीय संस्कृती चा प्रभाव असलेले राष्ट्र बनणे केव्हाही चांगले असा विचार करून तेथील सत्ताधारी वर्ग भारतीय वाहिन्यांना पाकिस्तानात खुलेआम परवानगी देत आहे. भले भारतात पाकिस्तानी वाहिन्या अधिकृतरीत्या दाखविण्यात सरकार तर्फे बंदी आहे.
भारतात जसा उच्चभ्रू वर्ग शरीराने भारतात व मनाने अमेरिकेत राहतो. व विंग्रजीतून "भिकार बॉलिवूड आणि महान ते हॉलिवूड" व अमेरिकन संस्कृती असा जयघोष आपल्या राहणीमानातून देतो. असाच वर्ग पाकिस्तानात सध्या भारताचा जयघोष करतो. भारताने जशी प्रगती केली तशी पाकिस्तान ने करावी भारताशी आर्थिक सहयोग करावा अशी पाकिस्तानी इतिहासातील प्रथमच अजब मागणी करतात.( त्यांना लिबरल म्हणून हिणवले जाते ) पण त्यांची ताकद पाकिस्तानात कूर्मगतीने वाढती आहे. आपल्या कलाकाराला भारतात मान मिळाला ह्याचा त्यांना केवढा अभिमान वाटतो हे मला स्वतःला कितीतरी पाकिस्तानी लोकांनी सांगितले आहे. आज भारतीय वाहिन्या त्यांच्या रटाळ डेली सोप मधून भारतीय संस्कृती आणि हिंदू परंपरा व सण ह्यांची पाकिस्तानात क्रेझ वाढवत आहेत. म्हणूनच भारतीय वाहिन्यांवर बंदी घालावी अश्या मागण्या व त्यावर चर्चा सत्र व पाकिस्तानात नेहमीच घडत असतात.
हज्ब ए हाल हा पाकिस्तानातील लोकप्रिय टोक शो वर भारतीय सांस्कृतिक आक्रमणाच्या विरुद्ध कशी गरळ ओकली जात आहे ते पहा. माझ्या मते त्यांच्या मूठभर लोकांना आपल्या कडे संधी देऊन आवळा देऊन कोवळा काढून घ्यावा. त्यांची तरुण व शिशू पिढी आता मोठी होणार तेच मुळी भारतीय संस्कृती सण ह्यांचे माहात्म्य मनात रूजवत. ह्या बाबतीत एक गोष्ट आठवली. सर्कशीत हत्तीण तिचे पिल्लू व साखळदंड .
मागे पाकिस्तानी व भारतीय लहान मुलांचा छोटे उस्ताद ह्या कार्यक्रमाच्या अंतिम सोहळ्यात पाकिस्तानी स्पर्धकांकडून भारतीय देवतांची गाणी गाऊन घेण्यात आली. ( ७.४१ पासुन ) किंवा ज्या सिंधी लोकांना पाकिस्तानातून बाहेर हाकलले त्यांचे गाणे गाऊन घेतले. भारतीय हिंदू संस्कृतींचे पाकिस्तानात वाढणारे प्राबल्य हा तेथे टोक शो चा आवडता विषय आहे. तरी आपल्या वाहिन्या व सिनेमे तेथे लोकप्रिय आहेत.
भारतीय सिनेमामुळे पाकिस्तानी थिएटर मालक जाम खुश आहेत.व दर्शक
भारतात बेकायदेशीर रीत्या बांगलादेशी राहतात ते येत्या ५० वर्षात तरी भारताबाहेर हाकलले जाऊ शकत नाही मग मूठभर पाकिस्तानी कलाकार आपल्याकडे येऊन काय मोठा फरक पडणार आहे. १९७१ साली पाकिस्तानी राजकारणी व पुढे लष्कराने बांगलादेशी जनतेवर प्रचंड अत्याचार केले तेव्हा बांगलादेश ची प्रसूती झाली. मुक्ती बाहिनी व रॉ ने फक्त सुईणीची भूमिका निभावली. आज पाकिस्तानी टिव्ही व सिनेमा जगत तेथील अशांत राजकारण व कट्टर पंथीय विचारधारा ह्यामुळे मरणपंथाला लागले आहे. तेथील नामवंत कलाकार भारतात कला सादर करतात.तेव्हा त्यांच्या ह्या उद्योगाच्या कबरीवर कफन चढविण्याचे काम भारतीय वाहिन्या करत आहेत हे पाहून खूप आनंद होतो.
वाचने
7190
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
चांगला लेख
लेख आवडला
वेगळा विचार...
In reply to वेगळा विचार... by मन१
आवडला...
In reply to आवडला... by दादा कोंडके
अग्गाग्ग्गा
In reply to आवडला... by दादा कोंडके
हे घ्या!
In reply to हे घ्या! by दादा कोंडके
आपला शत्रू देश पाकिस्तान मधील
In reply to आपला शत्रू देश पाकिस्तान मधील by निनाद मुक्काम …
निगेटीव
In reply to निगेटीव by दादा कोंडके
दादा दोन देशात संबंध
In reply to दादा दोन देशात संबंध by निनाद मुक्काम …
हम्म...
In reply to हम्म... by दादा कोंडके
सोप्या भाषेत...
In reply to सोप्या भाषेत... by मन१
नॉट ऑल्वेज...
In reply to नॉट ऑल्वेज... by अर्धवटराव
म्हणून चीन विरुद्ध अमेरिका
In reply to म्हणून चीन विरुद्ध अमेरिका by निनाद मुक्काम …
निनाद, मनोबा आणि अर्धवटरावांना धन्यवाद!
In reply to वेगळा विचार... by मन१
मनोबांची स्ट्रॅटेजी उत्तम
In reply to मनोबांची स्ट्रॅटेजी उत्तम by बॅटमॅन
टाळ्या...
In reply to टाळ्या... by मन१
धन्यवाद आणि अवांतराबद्दल सहमत
In reply to धन्यवाद आणि अवांतराबद्दल सहमत by बॅटमॅन
अश्या दर्जेदार अवांतर अजून
आवडले,,,,, मस्त लेख....
'क'
In reply to 'क' by तिमा
चालेल चालेल ...हळु हळु भिनत
In reply to 'क' by तिमा
तुमचा प्रतिसाद वाचून एक जुनी
In reply to तुमचा प्रतिसाद वाचून एक जुनी by निनाद मुक्काम …
हाहा
In reply to हाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लाँग लिव्ह तुलसी. हाहाहा. आणि
In reply to हाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१. हेच म्हणतो.
मस्त लेख आवडला.
निनाद मुक्काम प...निनाद
अभिनिवेशरहित नेटकं लेखन..
In reply to अभिनिवेशरहित नेटकं लेखन.. by ऋषिकेश
+१