मी आताशी अनुभव घेतोय. ६ महीन्यापुर्वीच प्रथम पुण्यात आलोय.
पी.एम.टी. मात्र जबरा आहे, पुण्यातील लोक हे विनातक्रार स्विकारतात हे पण नवलच आहे.
पी.एम.टी. सारखीच टी.एम.टी. आहे.
सखाराम गटणे
अगदी योग्य वर्णन केल आहेस...
पी.एम.टी. सारखीच टी.एम.टी. आहे.
टी.एम.टी ची तर कथाच न्यारी आहे..मध्यंतरी एका बसची मागची चाकेच निखळली होती असे वाचनात आले आहे..
माझेही असेच दिव्य अनुभव आहेत टी.एम.टी. बद्दल, कधी सवडीने सांगीन म्हणतो..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
टारझन भाऊ,
एक नंबर... त्या पी एम टी च्या दिव्य दिवसांची ... एका दहा फुटी खांबाला ती एक ठराविक छोटीशी पिवळी पाटी इतकीच आयडेंटिटी असणार्या स्टॉपवर भर पावसात बसची आणि ती सुमारे दहा वीस फुटात तरी कुठे तरी थांबण्याची योगसाधना आठवली...
बेष्ट परफेक्ट वर्णन.. झकास लिहिलं आहेस...
आणि शेवटही बरोबर आहे.. जिथून बाइक काढताना घाम फुटतो अशा गर्दीतून आणि अरूंद रस्ते, मान्यवर पुणेकर वाहन चालक, पुणेरी फुलनदेवी यातून कोणालाही धक्का न लावता ती एका बाजूला कललेली पी एम टी, क्लच नावाची कुठलीही गोष्ट न वापरता ज्या कौशल्याने हाकतात त्याबद्द्ल त्यांना पद्मश्री मिळायला पाहिजे नाहीतर अशोक चक्र तरी... (कालच वाचलं की हे शांतता काळातलं सर्वोच्च पदक आहे)...
इंजिनिअरिंग मध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी शिकलो होतो... पी एम टी आणि मुंबई लोकल साठी काय वापरला असेल काही कल्पना नाही...
पण ते लिमिट क्ष टेन्ड्स टू इन्फिनिटी तसा काही प्रकार असावा... नाही तर पहिल्याच दिवशी असा विलक्षण जनभार घेऊन स्वारगेट कर्वे रस्ता हडपसर सिंहगड रस्ता निगडी असल्या मार्गावर धावताना बसने ताबडतोब मान टाकली असती...
त्या धुळीने भरलेल्या काचेतला तो नंबरचा बोर्ड... रात्री झीरो पेक्षाही कमी वॉटचा एक दिवा तो बोर्ड वाचण्याचा प्रयत्न करून जनतेची मोफत नेत्र तपासणी व्हावी म्हणून लावण्यात यायचा...
दहा पंधरा वर्षापूर्वी काही बसेस होत्या त्या तेव्हा सुमारे पंधरा वर्ष जनसेवा करून थकल्या होत्या.. १११/ १२ वगैर कॉलेज तरूणी सारख्या बसेस पुढे या ५५/५६ या शनिपार च्या बसेस नऊवारीतल्या हळू चालणार्या आजीबाईंसारख्या वाटायच्या ... आणि का कुणास ठाऊक .. थोड्या तशाच प्रेमळही...
पी एम पी एल करून का होइना पी एम टी टिकून आहे हाच आनंद...
जादू काही होत नसते.. पण काही तरी मार्गाने पी एम टी जर खरंच सुधारली आणि पुण्यातल्या दुचाकी त्यामुळे कमी झाल्या तर पी एम टी ची इतक्या वर्षांची जनसेवा सत्कारणी लागेल...
अजून लिही रे टार्या...
अस्सल पुणेकर... :)
हे पहा आमचे पी.एम.टी. चालक - कशी काय गाडी काढतात तेच जाणोत.
जुन्या गाड्या -- आहाहा ! सो सेक्सी .. इजंट इट ?
आताच्या नविन गाड्या ... वाव ... पण १ वर्षात हिचं रुपांतर वरच्या बस सारख होणार हे निश्चित
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
टार्या, भारी लेख...
..
२७ नंबर भारतीच्या बसमध्ये एक ९६ ९७ साली एक ड्रायव्हर होता तो महाभयंकर वेगाने गाडी चालवत असे, मी बसमध्ये असताना एकदा त्याने रस्त्यावरच्या एका म्हातार्याला पाडले होते ( वाचला तो, नशीब त्याचे)... त्याच ड्रायव्हरवरती टिळक रोडवर एका चौकात थांबलेल्या पी एम टीच्या काही अधिकार्यांनी बेशिस्त चालक म्हणून काही कारवाई केल्याचे आठवते.
आणि शेवटी चार शब्द चांगल्या कंडक्टर + ड्रायव्हरबद्दल लिहिलेस तेही उत्तम...
....
हे सारे असले तरी आपल्याला पी एम टी आवडते.
वाट पाहीन पण पी एमटीनेच जाईन...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
पी.एम्.टी चे मस्त वर्णन
कालच पुण्यात पी.एम टी ने प्रवास केला. स्वारगेट ते विठ्ठल वाडी ( सिंहगड रोड ) रिक्षाभाडे ४० रु. तेथे पी.एम टी भाडे फक्त ३ रु?
बहुतेक वाहक तिकिट द्यायला चुकला असेल .
(पुण्यातील थंडीने गारठलेला मुंबईकर ) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
स्वारगेट ते विठ्ठल वाडी ( सिंहगड रोड ) रिक्षाभाडे ४० रु. तेथे पी.एम टी भाडे फक्त ३ रु?
बसचे भाडे कमी की रिक्षाचे जास्त? नाहीतरी रिक्षावाल्यांची मनमानीही चालतेच की तिकडे. अर्थात ३ रू हे भाडे कमीच आहेत आजकाल.
मस्त लिहले आहे रे!!!
फोटो भारी. :-)
और भी लिख्खो!!
पी.एम.टी. मधे नोकरी मिळण्यासाठीची (अनिवार्य) पात्रता मुद्दे वाचून व वरती आद्यमास्तरांचे नाव वाचुन आठवले की पुण्यातील एक रावसाहेब नक्की ह्याचे "क्लासेस" काढू शकतील :D
मस्त लेख लिवलाय रे टार्या....आपली पीएमटी कशी पन असली तरी लै भारी है...
(बस क्र. १०० मनपा-हिंजवडी चा एकेकाळचा नियमित प्रवासी) भटोबा
(कारण कंपनीची बस नेहेमी चुकायची ना उशिरा उठल्यामुळे...)
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
मस्त वर्णन!
आणखी काही निरिक्षणे:
१) कुठल्याच पीएमटीचा हॉर्न वाजताना मी ऐकला नाहीये.. कुठल्याही गाडीच्या मागे उभे राहिले की इ॑जीनचा ढर्राम ढर्राम आवाज करून भेडसावतात
२) मड फ्लॅपचा शोध पीएमटीला अजून लागला नाहिये, त्यामुळे पुणेरी धुळीची पुरेपुर चव मागून जाणार्याला लाभते
३) बसमधील प्यासि॑जरही थु॑कण्यात माहिर आहेत, त्यामुळे ओव्हरटेक करता॑ना कुणी बाबा खिडकीतून पि॑क टाकण्याच्या पोझमध्ये नाहीना ते पाहावे लागते. एकदा परिक्षेला जाताना एकाने माझा शर्ट र॑गविला होता, मी त्याचे कानशिल र॑गविले!
४) ब्रेक लाईटस, वळण्याचे इ॑डिकेटर वगैरे क्षुद्र एक्सेसरीज गरीब पीएमटीला परवडत नाहीत. त्यामुळे अमुक बस पुढे जाणार , था॑बणार का वळणार हे मागच्या चालका॑नी अ॑तर्ज्ञानानेच जाणून घ्यायचे असते.
५) अनेक पीएमटी ब॑द (स्विच ऑफ) केल्या तर पुन्हा चालूच होत नाहीत ह्या सबबीखाली रात्रभर चालूच ठेवतात म्हणे!
६) पीयूसी, प्रदूषणमुक्त वाहन वगैरे गोष्टी॑चा त्या॑चा काहीच स॑ब॑ध नाही. ट्रॅफिकवाले मामा पीएमटीला कधीच अडवत नाहीत (कमाई काय?)
६) सर्व स्टॉप (सध्याचे बीआरटी सोडले तर) रस्त्याच्या डावीकडेच असता॑ना, पीएमटी कायम दुभाजकाला चिकटून (म्हणजे उजव्या जलद लेनमधूनच) चालवतात. व स्टॉप जवळ आला की खस्सकन डावीकडे घेतात. मग त्यात बसच्या डावीकडून शा॑तपणे चाललेला एखादा गाफील पुणेकर जीव गमावतो :( अर्थात श॑भर कोटी॑च्या देशात माणसाच्या जिवाला काय कि॑मत म्हणा. तेव्हढीच लोकस॑ख्या कमी होते
७) महिन्याला नाही पण आठवड्याला एक तरी बळी मिळवितात! ( आमची पीएमटी कुटू॑बनियोजनाला अफलातून पर्याय आहे)
जबरा आणि अचुक पंचनामा....
=))
१) कुठल्याच पीएमटीचा हॉर्न वाजताना मी ऐकला नाहीये..
आहो गरजच काय ? एवढा १०,०००-१२,०००सीसी चा मोठा हॉर्न असताना....एक नाममात्र हॉर्न असतो, जो पाववल्याच्या सायकल ला पण असतो, पण तो फक्त ड्रायव्हरलाच ऐकु येतो... =))
४) ब्रेक लाईटस, वळण्याचे इ॑डिकेटर वगैरे क्षुद्र एक्सेसरीज गरीब पीएमटीला परवडत नाहीत. त्यामुळे अमुक बस पुढे जाणार , था॑बणार का वळणार हे मागच्या चालका॑नी अ॑तर्ज्ञानानेच जाणून घ्यायचे असते.
नेमकं हेरलंत डॉक्टर .... पूण्यातला अनुभवी माणुस पी.एम.टी.च्या कधीही डाव्याबाजुने चालत नाही. आणि काय ते इंडीकेटर्स हो... छे... अपमान आहे तो पी.एम.टी. चा.
५) अनेक पीएमटी ब॑द (स्विच ऑफ) केल्या तर पुन्हा चालूच होत नाहीत ह्या सबबीखाली रात्रभर चालूच ठेवतात म्हणे!
सहमत, पण रात्री नाही... दिवसा.. ह्या गाड्या सकाळी ५-६ ला चालु झाल्या की डायरेक्ट रात्री लास्ट फेरी नंतर बंद होतात.
७ही मुद्दे सहमत...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
वर्ष २००० मध्ये पी एम टी चा प्रवास केला होता. जवळपास २ महिने, शनिवार व रविवार.
आता किती बदल झाला माहित नाही. आणि सध्या पुण्यात बसकरीता वेगळा रस्ता ठेवणार होते त्याचे काय झाले?
आता किती बदल झाला माहित नाही.
आता ४ नव्या व्होल्वो गाड्या (बी.आर.टी){स्वारगेट-हडपसर बहुतेक} आणि बर्याच नव्या गाड्या आल्यात. पण चालक-वाहक लोक पी.एम.टी.ची क्वालिटी राखुन आहेत. :)
आणि सध्या पुण्यात बसकरीता वेगळा रस्ता ठेवणार होते त्याचे काय झाले?
=)) तो एक लै भारी जोक झालाय. त्याने बाकी ट्राफिकचा बोर्याच वाजवला आहे.
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
आता ४ नव्या व्होल्वो गाड्या (बी.आर.टी){स्वारगेट-हडपसर बहुतेक} आणि बर्याच नव्या गाड्या आल्यात
ह्म्म्म मागील वर्षी पुण्यात होतो तेव्हा पाहिली होती एक. पण प्रवास करण्याची हिंमत नाही केली ;)
आमची दुचाकी किंवा मग रिक्षाच...
मीतरी जे॑व्हा दुचाकीवर असतो ते॑व्हा दूरून जरी पीएमटी दिसली तरी रस्त्याच्या कडेला था॑बतो व ती पूर्ण दिसेनाशी झाली की गाडी चालू करतो ! हो, अजून जगायच॑य ना :)
टारोबा!
लई झ्याक! मजा आली वाचताना..
पीएम्टीच्या चालक, वाहक, बस वगैरे बरोबरच केवळ पीएमटीचे असे जे प्रवासी आहेत तेही याचा अविभाज्य भाग आहेत. आणि तेही बाकी घटकां इतकेच मजेशीर (!) असतात :)
त्या पीयम्टी-पाशिंजराबद्दलही तुझ्या शैलीत वाचायला आवडेल
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
पी.एम. टि बद्दल बराच अभ्यास आहे रे खविसा तुझा!
मला आलेला अनुभव माहीती आहे.. का? खरंतर समस्त सिटीबस सिस्टीमशी माझं काहीतरी वाकडंच आहे. म्हणजे असं की, मी बस स्टोप वर उभी असले की हमखास बस उशिरा येते किंवा कधी कधी नाहीच येत. कोल्हापूर असो.. पूणे असो की अगदी चक्क हार्टफर्ड असो. मी बसला उभी असले की, बस येणारच नाही. माझ्यामुळे बाकीच्यांच्या बसेस चुकतात. कारण मी स्टोप वर उभी माझ्यासोबत आणखी २-३ जण आणि बस मात्र येत नाही आणि आलीच तर किमान ३५ मिनिटे उशिरा.
पण पुण्यात १-२ वेळा मला बस मिळाली . म्हणजे मी बस स्टॉपवर उभी नव्हते. कोणती रिक्षा करावी असा विचार करत असताना समोर कोथरूड डेपोची बस दिसते आणि चक्क मी पळत जाई पर्यंत कंडक्टर बस थांबवून ठेवतो बस. किती नशिबवान ना मी!!
पण तसा बस या वाहनाशी संबंध कमीच आला. त्यामुळे तू लिहिलेला लेख मनापासून आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
तुझ्या घरून परत येताना माझ्या बसला छोटासा अपघात झाला असावा का :?
-----------
लेख आवडला रे टार्या.
खूप वर्षांपूर्वी पी.एम.टी. ने केलेल्या प्रवासाचे व्रण अजूनही ताजे आहेत.
टारझना, लेख खूप आवडला.. मला पीएमटीचा विशेष अनुभव नाही..(स्कार्फ लावून दहशतवादी) स्कूटी झिंदाबाद! :) पण ४-५ वेळा गेले तेव्हा दर वेळेला इतक्या कमी पैशात आपण इथून तिथे जाऊ शकतो (मोस्ट ऑफ द टाईम्स सेफली!) याचं खूप आश्चर्य वाटलं होतं.. खूप चांगली सोय आहे ती.. केव्हढी ती जबाबदारी असते ड्रायव्हरवर, कशी चालवतात बस त्यांनाच ठाऊक! जरी खूप वेळा प्रवास नसला झाला तरी गर्दी नसेल तर बसने जाणे केव्हाही उत्तम.. बसेसना ठराविक पॅसेंजर्स वगैरे लिमिट का नसतं कोण जाणे, कारण बसने न जाण्याचे मेन कारण अतोनात गर्दी हेच असायचे.. असो.. लेख आवडला!
@ लेखक महोदय !!!
छान लिहीलये !!!!
नेहेमी प्रमाणे अगदी खवीस टच आहे !!
+१ ~~~~~~
पन ह्याच पी एम टी चा एक चालक १५ वर्षापासुन एकही अप्घात न करता सर्वीस करतोये...
नाव आठवत नाही...पण पुणे शहरात हे तरी अशक्य आहे ...
शिवाय वयस्कर लोकाना मदत करणारे ,
प्रवासी आया बहिनी साठी रोड रोमीयो च्या कानपूरामाग जळगाव काढनारे सुद्धा
वाहक -चालक ही पाहिलेत मी....
तु लिहीलेल जितक खर आहे ,
तितकच हे सुद्धा खर आहे की वाहक चालक ही मानस आहेत, राव....
आणी खर सांगु तर बदलतीये रे पी एम टी.....
असो ...
( एके काळी ४२ नं चा प्रवासी )
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
>>> फॉर्मुला वनचे चालक पी.एम.टी. हायर करते. आणि मधली स्टेशनं (पिट स्टॉप्स) मनात आलंच तर ऊपकार म्हणून थांबवतात...... ११०% सहमत रे....
( अरे मायकल शुमाकरने पी.एम.टी मध्ये प्रशिक्षण घेतले असावे )
“to be sure of hitting the target, shoot first and whatever you hit call it the target.”
पी.एम.टी. , टी. एम. टी. ( ठाण्याची) , के. डी. एम.टी. ( कल्याण्-डोंबिवलीची) , एन. एम.एम.टी. ( नवी मुंबईची).....
सगळ्या एम. ट्या. सारख्याच आहेत रे भौ ....
टार्या... तुझा पी.एम. टी. बद्दल चा हा व्यासंग पाहून मन भरून आलं.......
थोडक्यात.... पी.एम. टी. चा "भूत/ वर्तमान/ भविष्य " "काळ" तू कोळून प्यायलायेस.........
तू त्यावर पी. एच. डी करायला समर्थ आहेस.........
आणि हे मनावर घेऊन जर चुकुन्-माकुन तू पी. एच. डी केलीस, तर तुझी पात्रता 'नोबेल' पेक्षा कमी असुच शकत नाही......
एकाच वेळी तु भारत आनि आफ्रिका या दोन्ही देशांची मान उंचावशील्.(जिराफासारखी..)
:)
>> --टार्या... तुझा पी.एम. टी. बद्दल चा हा व्यासंग पाहून मन भरून आलं.......
मागे एकदा मी पद्मश्री शरद जोशींचं "भारतीय रेल" वरचं कथाकथन दूरदर्शन वर पाहिलं होतं ... त्याची आठवण झाली...
त्यांचा कथाविषयाचा व्यासंग अफाटच असायचा ... #:S
टारूबाळ, चांगला नाही, लय भारी लिहिलं आहेस (स्वगतः जळ्ळं तुला कोणी चांगलं लिहिण्यापासून अडवत नाही आहे). मी तुझीही फ्यान झाले आहे.
सायबाच्या देशात राहून प्रत्येक abbreaviation चा उच्चार करण्याची सवय लागली, GMRT चं ग्रम्ट झालं, तसं मला PMPML ला पंपंल (हा ल पूर्ण म्हणायचा) असं फार वेळा वाटतं.
'पीएमटी' ची एकदम टकाटक वाजवली आहेस की!
मी पीएमटीने फार प्रवास केलेला नाही पण जो काही थोडाफार मला (माझ्या गतजन्मीच्या पुण्यामुळे असेल) अनुभवायला मिळालाय तो मी कधीही विसरु शकणार नाही!
एक खराखुरा किस्सा -
दातांना मिश्री-बिश्री लावलेली, डोक्यावरुन पदर असलेली, एक नऊवारी आज्जीबाई दोन्ही हातात पिशव्या घेऊन पीएमटित चढते. बसायला जागा नसतेच. एक पिशवी खाली ठेऊन दुसर्या हाताने वरचा बार धरुन आज्जी उभी. अशा रीतीने तिचे दोन्ही हात अडकलेले.
वाहक : आज्जे, कुटं जायाचं?
आज्जी : इंदिरानगर द्ये बाबा एक.
वाहक : (तिकिट देत) आज्जे, हे घे, आन साडेचार रुपये, सुटं दे काय?
आज्जी : आरं माजं हात गुतलं हाइत रं मागुन देते.
वाहक : आता, मागुन कधी? चल लवकर दे दे!
आज्जी : आता मग तू आसं कर, माज्या हातातली पिशी तरी धर नायतर मग माजा हात तरी धर त्याबिगर मी पैशे रं कसं दिऊ?
आज्जीचे हे खणखणीत बोल ऐकून सगळ्या बसमधे हसण्याचे फवारे उडाले. वाहकसुद्धा हसायला लागला.
शेवटी एकेठिकाणी बसायला जागा मिळाल्यावर आज्जीनी त्याचे पैसे दिले.
(अपघात सोडले तर पीएमटीचा प्रवास ही एक धमाल असते हे बाकी बर्याचवेळा खरे आहे. एकदा अनुभवून बघाच. समाज चहू अंगांनी जिवंत असल्याचे हे लक्षण आहे असे मला वाटते!)
चतुरंग
छानच लिहीतोस तू! पी. एम. टी ची विनातिकिट फेरी छान झाली.
समाज चहू अंगांनी जिवंत असल्याचे हे लक्षण आहे असे मला वाटते
चतुरंग, हाच जिवंत समाज गर्दीचा फायदा चहू अंगाने कसा घेतो ते पोरीबाळींना बरोब्बर माहितीये!
रेवती
पी.एम्.टी. भारी चालवली आहे मिपा गावी. :)
एक वाचलेली का का ऐकिव पी.एम्.टी. ची गंमत सांगते.
एका पॅसेन्जरने १०० रू. ची नोट वाहकाला दिली , सकाळची ऑफिसची वेळ, गर्दी अशी नेहमीची जत्रा चालु होती.
तर ती नोट वार्याने उडाली आणि खिडकीतुन बाहेर गेली, वाहक आणि पॅसेन्जरची शाब्दिक जुंपली.
मग बस थांबवली, बाकीच्य पॅसेन्जरस वेळ होत होता म्हणुन ओरडु लागले, मग बस मधील इतर पॅसेन्जर पैसे गोळा करून त्याला दिले, आणि मग गाडी रस्त्याला लागली :)
टारझना, जबरी !!
मलाही सुदैवाने एक साक्षात्कार झालाय....तो असा....
एकदा VIT कॉलेज हुन स्वारगेट ला निघालो होतो आमच्या 13 नं. ने.पद्मावती स्टॉप सोडुन बस निघाली आणि तोच "पी.एम.टी.चा गियर दांडू" बदलताना तो जो अडकला तो हलेचना ! Driver साहेबानी खूप प्रयत्न केला पण व्यर्थ !! शेवटी महाराजानी ऊठून जो का लाथ घातली 'त्या गियर' च्या कंबरड्यात,तो साला अगदी सरळ झाला आणि बस स्वारगेट ला पोहचेस्तोवर अशी गेली जणू काही झालेच नाही....!!
- सरकार
टारझन भाऊने तर लईच भारी लिहीले आहे. पण अजून एक...
प्र. बाई चालवत ४चाकी गाडी आणि पी. एम. टी. मधे काय साम्य आहे?
उ. वरील पैकी कोणतीही एक गोष्ट रस्त्यावरून जात असेल तर कंसाचा रथ रस्त्यातून जात असताना मथुरेतील प्रजाजन जसे रस्त्यावरून बाजूला होण्यासाठी सैरावैरा पळत सुटत तसे पुणेकर रस्त्यावरून बाजूला होतात. असा हा पी. एम. टी महीमा अगाध आहे.
मागे एकदा फातिमानगराच्या आसपास कुठेतरी पी. एम. टी. एका दुचाकीला धडक दिली आणी त्यात ३ माणसे मेली. कारण दुचाकीवरून ३ जण चाल्ले होते. चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करत होते. तरीही संतप्त जमावाने पी. एम. टी. फोडली आणि चालकालाच मारहाण केली. हा पी. एम. टी. वर अन्याय नाही काय?
पुण्याचे पेशवे
टारु भाऊ,
मस्त लिहिलय बरं का.
पी.एम.टि. चे चित्रच डोळ्यासमोर ऊभे राहिले.
>> माणुस - " मग मला चढून का देत नाही ? "
लै भारि... :-)
पी.एम.टि. चा क्वचित प्रवासी.
फारतर नेने
मस्त जमलाय.....
मी पी.एम.टि. ने जास्त प्रवास नाहि केला परन्तु ती डायवर मन्डळी (वाहन चालक) ज्या प्रकारे गाडी चालवतात त्या मधे त्यान्चा काहि दोष नाहि असे वाटते, रोड वरील ट्राफीक बघता...
प्रत्येक पी.एम.टी वाहक आणि चालक त्यान्च्या प्रमाणे चान्गली सेवा देत असेल.. आपले एक्स्पेक्टेशन्स वाढलेत तर त्यानी काय करावे?
बाकि लेख मस्तच... " मग मला चढून का देत नाही ? " हे तर साहिच !!
(बेस्ट आणि एस. टी. ने प्रवास केलेला) बाबा
पी.एम.टि. चा वक्तशीर पणा बघुन मी स्वता:च्या गाडीचा विचार करतोय.
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो.
पटकन् घे लेका ... आज काल गाडी (चारचाकी) असणे बर्याच दृष्टींनी महत्वाचे आहे ...
काळ्या काचा आणि हायड्रॉलिक्स पण बसव कळलं का ?
लेख आवडलेल्या / न आवडलेल्या आणि प्रतिक्रिया दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार .. जरा उशीरच झाला .. पण असो .. उत्तम आहे ...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
>>काळ्या काचा आणि हायड्रॉलिक्स पण बसव कळलं का ?
त्या साठी घर आहे, चांगला सागवानी पंलग घेईन ना..
मला अधिक्रुत मध्येच रस आहे.
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)
हो, पाय नसतील तर भविष्य अंधारमय आहे.
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)
झका आ आ आ आ आ आ आ आ आ आ स.............
काय लिहीलेस रे टार्या........
पूण्यात राहण्याचा अनुभव नाही झाला आतापर्यंत पण ही गोष्ट वाचून असा वाटला की जणू मी पूण्यातच किती वर्षाने राहते.....
मला तर खूपच आवडला.....
बारिक द्र्ष्टीने १ एक वर्णन केले आहे.....
आमची बेस्ट पण अशीच आहे.....
एक दमच लै भारि...
असेच लिहीत रहा......
प्रतिक्रिया
मी आताशी
अगदी योग्य
सही!
ह्म्म्म्म!
लै भारी
हीच ती पी.एम.टी.
टार्या,
भडकमकर मास्तर
२७
पी.एम्.टी
स्वारगेट
टारझन
मस्त लेख
पीएमटीचा प॑चनामा!
हाहाहा ...
वर्ष २०००
वर्ष २००७
प्रवास नाही केला
पुण्यात बसकरीता वेगळा रस्ता ठेवणार .....
दुचाक्या॑चा कर्दनकाळ
मी पण टू
टारझन .
कोन्स्टीपेशन
मस्त पण पाशिंजर कुठायत?
लेख मस्त आहे...
प्राजु म्हणूनच एकदा
टारझना,
@ लेखक
टर्या जबरा लेख
सगळ्या एम. ट्या. सारख्याच आहेत रे भौ ....
टार्या...
पद्मश्री शरद जोशींची (उत्तरेतले विनोदी लेखक) आठवण आण्णारा लेख
उच्चार
लै झ्याक रे टार्या!
अरे टारझना,
लेख मस्त..
मस्त
पी.एम्.टी.
मी ही एक भाग्यवान
अजून एक..
टारझना लई
जबरदस्त
लेख चांगला आहे....
पी.एम.टि. चा
पटकन् घे
>>काळ्या
स्वतःची गाडी लगेच घेऊन टाक
हो, पाय
अप्रतीम !
खतरू लिहीलेस एकदम......