१५.०७.२०१२
जून महिन्यात सुधागड परिसरात नाणदांड घाट केल्यानंतर जुलै महिन्यात कुठला ट्रेक करायचा हे ठरत नव्हते. ऑप्शन बरेच होते पण घाटवाट करायची म्हणजे जुलै महिना तसा गैरसोईचाच कारण ह्याच दिवसात वाटांवरचे गवत एवढे वाढते कि बस... पण शेवटी लाँग पेंडीग मध्ये असलेला मढे घाट आणि त्याला जोडून असलेला उपांड्या घाट करायचे असे ठरवले. ग्रुप मध्ये सर्वांना मेसेज टाकले पण बर्याच जणांना जमत नव्हते तरीही १२ जण जमलेच. मिपावर पण काही जणांना विचारले होते पण कोणाला जमत नव्हते पण अनपेक्षितरीत्या पिंगुचा "मी येतोय" असा रिप्लाय आला. मिपाकर पिंगू सोबत केलेल्या ह्या ट्रेकचा हा संक्षिप्त फोटो वृत्तांत...
______________________________
सकाळी ५.३० वाजता स्वारगेट स्थानकावर आलो तेव्हा मुंबईहून येणारा सगळा ग्रुप आलेला होता. माझ्या बरोबर पुण्याहून येण्यार्या पिंगुला फोन केला तेव्हा तोही १० मिनिटात येतो म्हणाला. अरे.... आमचा सगळा ग्रुप एसटीच्या वेळे आधी हजर म्हणजे काहीतरी गडबड होती किंवा होणार होती.... आणि झालेही तसेच.
............................................
ठरवले असे होते कि १५ तारखेच्या रविवारी तोरण्याच्या पश्चिमेला असलेल्या मढे आणि उपांड्या घाटाचा ट्रेक करायचा. तोरणा आणि राजगड परिसरातून कोकणात उतरणारे बरेच घाट आहेत पण शिवथर परिसरात उतरणारे आणि महाड, बिरवाडी बंदरामुळे प्राचीन कालापासुन वाहते असणारे मढे आणि उपांड्या हे घाट ह्या घाटवाटांपैकी प्रमुख. त्यात तानाजी मालुसर्यांच्या घटने मुळे ह्या घाटाला अधिकच महत्व प्राप्त झाले. तसा मढे घाट हा खर तर त्याहून प्राचीन आहे. पूर्वापार कोकणच्या बंदरातून देशावर होत असलेल्या व्यापारात ह्या घाट वाटांना अनन्यसाधारण महत्व आहे आणी नाणे घाट, हातलोट घाट, देव (लिंग्या) घाट या आणी अश्या काहीच घाट वाटांवर असलेल्या बांधीव पायर्यांच्या खुणा मढे घाटात आहेत हे हा घाट तेवढाच प्राचीन असला पाहिजे हे सिद्ध करते. घाटावरचे केळद गाव आणि कोकणातले कर्णवाडी गाव हे ह्या दोन्ही घाटांना जोडणारे असल्याने पुण्याहून एका दिवसात हे दोन्ही घाट सहज शक्य आहेत.
............................................
सगळा ग्रुप जमल्यावर सहज म्हणून स्थानकप्रमुखाकडे वेल्हा गाडीची चौकशी केली तर पहिला धक्का बसला. रविवारी म्हणे वेल्हा गाडी डेपो प्रमुखाच्या मर्जीवर सोडतात. म्हणजे कधी सोडतात तर कधी कॅन्सल. डेपोत जाउन चौकशी केली तर ज्याची भीती होती तेच झाले. म्हणे आज गाडी सोडायची नाही असे ठरले आहे.. :( .. मग काय स्पेशल जीप करण्यापासून ते ट्रेक कॅन्सल करण्यापर्यंत सर्व शक्यतांचा विचार झाला. पण तेव्हढ्यात असे सुचले की मिळेल त्या बस ने नसरापूर फाट्यापर्यंत जाऊ आणि तिथे पाहु. आमच्या सुदैवाने भोरला जाणारी एक एसटी सुटतच होती, धावत पळत त्यात घुसलो आणि निघालो. नसरापुर फाटयावर उतरल्यावर एक जीपवाला वेल्ह्यात यायला तयार झाला आणि आम्ही वेल्हा एस्टीच्या अर्धातास आधीच वेल्ह्यात पोचलो. वेल्ह्यात पोचल्यानंतर अजुन एक जिपवाल्या बरोबर बोलणी करून, केळदची परतीची फेरी नक्की करून, केळदला गेलो आणी ट्रेक सुरु झाला... :)
ह्या ट्रेक दरम्यान काढलेले काही फोटो...
वेल्ह्याकडे जाताना
१.
केळदकडे जाताना
२.
३.
केळद गाव
४.
केळद गावातून उपांड्या घाटाकडे जाताना
५.
केळदमधील भातांची खाचरे
६.
गाव सोडल्यानंतर लागणारा पहीला ओढा
७.
ओढा पार करून उपांड्याकडे जाताना
८.
९.
१०.
११.
उपांड्या घाट उतरताना
१२.
उपांड्या घाट अर्धा उतरल्यावर
१३.
घाटाच्या पायथ्याचे कर्णवाडी गाव. खरेतर घाट कर्णवाडी गाव उतरून तळातल्या रानवाडी गावापर्यंत जातो पण आम्हाला परत मढे घाट चढून यायचे असल्याने आम्ही कर्णावाडी पर्यंत गेलो.. ह्याच कर्णावाडीत आदल्या दिवशी मढेघात उतरून अजून एक मिपाकर जातिवंत भटका त्याच्या परसबाग उपक्रमाकरीता म्हणून येऊन थांबला होता पण त्याची आमची भेट केळदला झाली .
१४.
१५.
कर्णवाडीतून मढे घाटाच्या पायथ्याशी जाताना
१६.
कर्णवाडीतून दिसणारा उपांड्या घाट... फोटोत मध्ये दिसणारा इंग्रजी व्ही म्हणजेच उपांड्या घाट
१७.
१८.
मढे घाटाची सुरुवात
१९.
मढे घाटाचे अजून सौंदर्य.. घाटाच्या सुरुवातीला असलेला प्रचंड धबधबा. ह्याच धबधब्या साठी अनेक लोक मढे घाटात येतात. ह्या धबधब्याचे खालून पहीले दर्शन
२०.
मढे घाट चढताना
२१.
वाटेत लागणारा अजून एक छोटा धबधबा
२२.
घाटातल्या मुख्य धबधब्याचा खालून फोटो
२३.
२४.
ह्या धबधब्या जवळूनच वाट वर चढते आणी पठारा वर येते. ह्या धबधब्याचे पठारावरून अफलातून दर्शन होते आणी ह्या घाटवाटेचा एकंदर पसार लक्षात येतो.
२५.
२६.
२७.
२८.
पठारावरून होणारा मढे घाट, कर्णवाडी, रानवाडी आणी शिवथरघळ परीसराचा नजारा
२९.
३०.
अजून ह्या घाटवाटांवर बरेच लिहावयाचे होते पण सध्या वेळे अभावी लिहीता येत नाहीये...
ह्या लेखातले कही फोटो विशालने काढले आहेत अ बाकीचे सर्व फोटो मी काढले आहेत.
पुन्हा पुढच्या ट्रेकला भेटू....
वाचने
8743
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम
जबरी
जब्बरदस्त फोटू आणी वर्णन
मस्त!
बराच चढ आहे . अन वाटाही
मस्त रे मनोज. भटकंती सही
मढे घाट्,उपान्ड्या घाट.
वा!
धन्यवाद
भटकंती ची मेजवानी
सुंदर
मस्त रे !
जबरा आहे राव हा ट्रेक. एकदा
नक्कीच
In reply to जबरा आहे राव हा ट्रेक. एकदा by विशाल कुलकर्णी