अमेरिकेत यंदा राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार्या या निवडणूकीकरता रणधुमाळी चालू आहे. अमेरिकेत दोन प्रमुख पक्ष आहेत. त्यातील रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन गेल्या आठवड्यात झाले. आता डेमोक्रॅटिक पक्षाचे चालू आहे.
दोन्ही पक्षाचे उमेदवार आपण कसे साधे आहोत, कसे आपण हलाखीच्या परिस्थितीतून वर आलो ह्याचे खर्याखोट्याची सरमिसळ असणारे वर्णन करत आहेत. विविध प्रकारे आम्ही तुमच्यातलेच आहोत असे बिंबवण्याचा हा प्रयत्न. गेल्या आठवड्यात मिट रॉमनीच्या पत्नीने आपल्या भाषणात सुरवातीला आम्ही कसे साधेपणाने रहायचो वगैरे सांगायचा प्रयत्न केला. इस्त्रीचे टेबल हेच आमचे डायनिंग टेबल होते (आता यात काय विशेष असे आम्हा भारतीयांना वाटेल!) पण हा गृहस्थ अफाट श्रीमंत आहे. आत्ता तो तसा झाला असे नाही तर अफाट वडिलोपार्जित श्रीमंती ह्याला लाभली आहे. अनेक घरे, अनेक गाड्या, कंपन्या, जमिनी ह्याच्याकडे आहेत. पण तरी त्याबद्दल फुशारक्या न मारता उलट दारिद्र्याचे सोंग करावे असे यालाही वाटते. होय मी श्रीमंत आहे आणि तुम्हीही व्हावे अशी मी धोरणे बनवेन असे काही ह्याला म्हणवत नाही. कारण तसे केल्याने बहुधा पुरेशी मते मिळणार नाहीत.
काल सौ. ओबामांनी यावर कडी करुन बराक ओबामा कसा गरीब आहे. सुरवातीच्या काळात त्याच्याकडची सगळ्यात मौल्यवान वस्तू म्हणजे कचरा कुंडी धुंडाळून मिळालेले एक टीपॉय सदृश टेबल. परिस्थितीमुळे एक साईझ छोटा असणारे पण ओबामाला परमप्रिय बूट. तसे पाहिले तर ओबामा वा त्याची सौ. काही फार गरिबीत वाढलेले नाहीत. अगदी रॉमनी नाही पण बर्यापैकी चांगली सांपत्तिक परिस्थिती.
पण तरी रॉमनीसारखा अतिश्रीमंत जर गरिबीच्या फुशारक्या मारतो तर मी का मागे राहू असे यांना वाटत असेल.
सामान्य लोक श्रीमंतीचे सोंग करतात तर हे असामान्य गरीबीचे!
एका श्रीमंत घरातल्या मुलाला गरीबी ह्या विषयावर निबंध लिहायला सांगितला तेव्हा त्याने लिहिले होते की आमच्या घरी सगळे गरीब आहेत. मी, माझी आई, बाबा, माझी बहीण, माझा कुत्रा, आमच्या बागेत काम करणारा माळी गरीब आहे. आमच्या पाचही गाड्यांचे ड्रायव्हर गरीब आहेत, दोन्ही स्वैपाकी गरीब आहेत. आमच्या खंडाळ्याच्या बंगल्याची साफसफाई करणारा रामूही गरीब आहे! वगैरे वगैरे. ह्या लोकांची गरीबीची सोंगे पाहून अशा निबंधाची आठवण येते इतकेच.
वाचने
3773
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
अमेरिकेतील राजकारणाची एकंदरीत
असेच काहीसे...
In reply to अमेरिकेतील राजकारणाची एकंदरीत by जयंत कुलकर्णी
प्रकाटाआ
In reply to असेच काहीसे... by विसुनाना
+१
In reply to प्रकाटाआ by नंदन
ते काहीही असो, पण ह्या ओबामा
स्वारी, ह्यावेळी माफ
In reply to ते काहीही असो, पण ह्या ओबामा by सिद्धार्थ ४
potus
In reply to स्वारी, ह्यावेळी माफ by सोत्रि
दारिद्र्याचे सोंग घेता येतं
कठीण आहे!
अरारारा !
हम्म...
विनोद
आम्हाला काय त्याचे
(No subject)