Skip to main content

साखरभात / केशरीभात

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 05/09/2012 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु , गुरुर देवो महेश्वरा | गुरुर साक्षात परब्रम्हा , तस्मयी श्री गुरुवे नम: || आज शि़क्षक दिन, सर्व गुरुवर्यांना वंदन करुन आजचा दिवस गोडाने सुरु करुयात :) साहित्य: १ वाटी बासमती तांदूळ ( स्वच्छ धुवून , निथळत ठेवावे) १/२ वाटीपेक्षा थोडीच जास्त साखर ३-४ लवंगा १ टीस्पून केशर ( हलकेच भाजून घेणे ) १ टीस्पून वेलचीपूड तूप काजू, बदामाचे काप, बेदाणे . पाकृ: पॅनमध्ये तूप गरम करून काजू हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊन बाजूला काढून ठेवणे. आता त्याच पॅनमध्ये लंवगा घालून, निथळून ठेवलेले तांदूळ घालून परतणे. परतलेल्या तांदळात २ वाट्या पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्यावा.(मी मायक्रोवेव्हमध्ये शिजवला आहे) शिजवलेला भात ताटात काढून पसरवून घ्यावा. . पॅनमध्ये साखर व पाव वाटीपेक्षा थोडे कमी पाणी घालून एकत्र करा. त्यात भाजलेले केशर घाला व गोळीबंद पाक करावा. पाक खूप पातळ राहता काम नये नाहीतर भात मिसळताच तो पांचट होईल. पाक चिकट झाला की त्यात गार केलेला भात घालून एकत्र करा. त्यात तळलेले काजू, बदामाचे काप व बेदाणे घालावेत व झाकून मंद गॅसवर एक - दोन वाफा काढाव्यात. वरुन थोडे साजूक तूप सोडावे. थोडा गार झाला की वेलचीपूड घालावी. . हा भात आदल्या दिवशी करुन ठेवावा म्हणजे छान मुरतो व चवीला ही छान लागतो. .

वाचने 38283
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

खूपच सुंदर दिसतो आहे साखरभात.रेसिपीसाठी धन्यवाद. तयार भाताचा पण साखरभात करता येतो का. असेल तर त्याची रेसिपी काय आहे.

कसला "गोड" दिसतोय भात :) अर्धवटराव

तोंपासु ~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~ (वर असलेली चिन्हे लाळेच्या लाटा आहेत.)

पाकृ मस्तच, धन्यवाद. अवांतर - सर्व गुरुवर्यांना वंदन करुन आजचा दिवस गोडाने सुरु करुयात - पण आमच्या शिक्षणाची सुरुवातच ग ग गडुचा मास्तर लई *डुचा, अशानं झाली आहे.

हया सुरेख पा.कृ. साठी आपला जाहीर निषेध !

मस्त! मस्त!! मस्त!!!

In reply to by रेवती

हो भात पूर्णपणे शिजलेला हवा नाहीतर अरधवट शिजवलेला भात पाकात घालताच आळण्याची शक्यता असते.

आहारात साखर वर्ज्य असल्याने माझा पास. पण जेंव्हा साखर वर्ज्य नव्हती तेंव्हा साखरभात/केशरभात/नारळीभात भरपूर खाल्ला आहे. गोडाच्या भाताला केशर, वेलचीच्या चवीवर मात करणारी लवंग आणि साजुक तुपाची चव.... आहाहा..... अवर्णनिय.

झक्कास्स !!!!!!!!!

खूपच छान छान

रेसिपी पाहून डोळे तृप्त झाले. आमच्या घरी असाच भात बनवतात (म्हणजे दिसतो असाच) त्याला 'जर्दा' म्हणतात. नक्कीच लझीझ असणार.

साखरभाताचं चित्रं छानच आहे, परंतु चित्रावरून तरी भात थोडा फडफडीत झाला आहे असे दिसते. भात मोकळा जरूर असावा, परंतु मऊ अन् मोकळा असावा.. असो..

काल किचनचा ताबा घेऊन हा भात आणि पेठकरकाकांनी दिलेली मश्रुम लसुणी असा बेत केला होता.. भात अप्रतिम झाला होता.. आभार!