संध्याकाळच्या चहाबरोबर तोंडात टाकायला खुसखुशीत व पौष्टिक पदार्थ
(हे प्रमाण दोन माणसांसाठी आहे)
साहित्यः
मोड आलेले मूग २ वाट्या
हिरव्या मिरच्या २-३
आलं २-३चकत्या
चिरलेली कोथिंबीर १ मूठ
मीठ चविनुसार
पावाचा चुरा जरुरीनुसार (अंदाजे १ वाटी)
उकडलेला बटाटा १ (मध्यम आकाराचा)
डाळीचे पीठ (बेसन) १ मोठा चमचा
पाणी जरुरीनुसार
तेल तळण्यासाठी
कृती
१) मिरची, आलं, कोथिंबीर व थोडं मीठ एकत्र वाटुन घ्यावे.
२) मूगात वाटण ओलसर होईल इतपत पाणी घालुन जाडसर वाटुन घ्यावे
३) एका भांड्यात (मायक्रोवेव्हला चालणार्या) वाटलेले मूग, हिरवं वाटण, कुस्करलेला बटाटा, बेसन आणि चवीनुसार मीठ घालुन मिश्रण कालवुन घ्यावे
४) मिश्रण मायक्रोवेव्ह मध्ये 'हाय' पॉवर वर एक मिनिट ठेवावे (वेळेचे गणित मिश्रण कितपत ओलं आहे त्यावर ठरवावे).
५) मिश्रण बाहेर काढुन गार होऊ द्यावे
६) मिश्रणात पावाचा चुरा आवश्यकतेनुसार घालुन घट्ट गोळा तयार करावा (मिश्रण ओलसर राहिल्यास पाक्ळ्या आतुन मऊ राहतात)
७) या गोळ्याचे दोन इंच लांबीचे रोल करुन ते कर्णरेषेत (तिरके) कापुन घ्यावे (यामुळे पाकळीसारखा आकार येतो आणि कुरकुरीत तळले जातात)
८) कढईत तेल चांगले तापल्यावर मध्यम आचेवर या पाकळ्या लालसर होईपर्यंत तळाव्यात
९) तळलेल्या पाकळ्या टिश्यु पेपरवर हलक्या हाताने टिपुन घ्याव्यात.
१०) गरमा गरम पाकळ्या टोमॅटो सॉसच्या बरोबर फुलाप्रमाणे मांडुन वाढाव्या
वाचने
17543
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
खमंग !!!
भन्नाट...!!!
मस्त!!!
छान
वाह! वाह!
सुरेख स्नॅक्स प्रकार.
मस्त आहे!
.................
उद्या करुन बघते.
मस्तच दिसत आहेत पाकळ्या.
रविवार असून साजर्या
मस्तं.
छानच दिसतायत. सध्या मिपावर
अप्रतिम ..
आठवण झाली
वा
मस्तं !!
खंग्री पाकृ एकदम. दिल बाग बाग
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
मस्त.
खुप छान!
सुंदर सादरीकरण आणि अतिशय
मस्त पाककृती
फोटो मलाच दिसत नाहित का?
मस्त...भन्नाट...एक शंका
छान!
मस्त कृती आवडली. कोफ्ते पण