साहित्यः-एक वाटी जाडे तांदूळ(शक्यतो जुने असावे)
एक वाटी आंबट ताक
मूठभर पोहे
एक वाटी खवलेला नारळ
पाव चमचा हळद
अर्धा चमचा मेथी दाणे.
गूळ चवीप्रमाणे
मीठ
तूप.
कृती :- तांदूळ धुऊन घ्यावे.मेथी व ताक घालून ४-५ तास भिजत घालावे.बारीक वाटून घ्यावे. नंतर त्यात खवलेले
खोबरे,पोहे,मीठ्,हळद व गूळ घालून १०-१२ तास झाकून ठेवावे.तव्याला अथवा फ्राय पॅनला तूप लावून
जाडसर पीठ पसरावे.जाळीदार सुरनळ्याच्या कडा तांबूस झाल्या की न उलटता काढाव्या.पीठ तव्यावर
पसरले की वर झाकण ठेवावे म्हणजे वरील बाजू पण शिजेल. गरम असतानाच तुपाबरोबर खायला द्यावे.
(ह्याचप्रमाणे उसाच्या रसाच्या सुरनळ्या पण करतात्.त्यात ताकाऐवजी तांदुळ रसात भिजत घालावे.बाकी
कृती वरिलप्रमाणे).
वाचने
5645
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
हेच म्हणते. वेगळा पदार्थ आहे
In reply to मस्त by मन१
व्वा,,,,व्वा....! मस्त मस्त
चला न्याहारीसाठी अजुन एक
उत्कृष्ट!!
फारच छान.
जरा हटके दिसतेय स्वीट डिश !
मस्त मस्त.... इतक्या
खास कोकणी
पहिल्यांदा ऐकला हा प्रकार.