
साहित्यः
इडली रवा ३ वाट्या
उडिद डाळ १ वाटी.
मीठ चवीनुसार.
तयारी:
उडीद डाळ चार वेळा पाण्यातून धुवून घ्या.
धुतलेली डाळ आणि इडली रवा, भरपूर पाण्यात, वेगवेगळा भिजत ठेवा.
कृती:
६-७ तास भिजवल्यावर जास्तीचे पाणी निथळवून टाका आणि उडिदाची डाळ कमीत कमी पाण्यात मऊ मुलायम वाटून घ्या.
इडली रवा पाणी निथळवून घट्ट पिळून घ्या.
वाटलेली उडदाची डाळ आणि इडली रवा, एखाद्या मोठ्या पातेल्यात, एकत्र मिसळून रात्रभर उबेच्या ठिकाणी ठेऊन द्या.
दुसर्या दिवशी पीठ फुगुन दुप्पट होईल.
हे पीठ चवीनुसार मीठ घालून मिसळून घ्या.
मिनि इडल्यांच्या साच्यांना तेलाचे बोट लावून त्यात इडल्यांचे पीठ घालून इडली पात्रात १५ ते १७ मिनिटे वाफवून घ्या.
इडली पात्र नसल्यास, साध्या कुकर मध्ये वर वजन (शीट्टी) न ठेवता इडल्या बनवून घ्या.
इडल्या वाफवल्यावर इडली पात्रातुन इडली साचा बाहेर काढून १० मिनिटे थंड होण्यास ठेवा.
नंतर सर्व इडल्या एखाद्या मोठ्या बाऊल मध्ये किंवा पसरट पातेल्यात काढून ठेवा.
सांबारः
सांबार मसाला साहित्यः:
बॅडगी मिरच्या १० नग. (नसल्यास गोल (बोरासारख्या) मिरच्या १० ते १२)
धणे ६ लहान चमचे (टी स्पून)
उडीद डाळ ३ लहान चमचे
जीरं १ लहान चमचा
मेथी दाणे १/२ लहान चमचा
खवलेला नारळ १/२ वाटी
कांदे २ नग (लांब आकारात चिरुन)
टोमॅटो २ नग (लांब आकारात चिरुन)
तेल गरजे नुसार.
सांबार मसाला कृती:
नारळा व्यतिरिक्त बाकी मसाला पुसट तेलावर परतून घ्या.
२ लहान चमचे तेल तापवून, लांब आकारात चिरलेले कांदे सोनेरी रंगावर परतुन घ्या. कांदे नीट परतले गेले की त्यात लांब आकारात चिरलेले टोमॅटो घालून टोमॅटो मऊ शिजेपर्यंत परता. हे तळलेले कांदा-टोमॅटो मिश्रण बाजूला काढून थंड करून घ्या.
आता, परतलेला मसाला+कांदा-टोमॅटो मिश्रण+खवलेला नारळ एकत्र करून मिक्सर मधून मुलायम वाटून घ्या.
सांबार साहित्यः
तुरडाळ १ वाटी
हळद १/२ चमचा
चिंच कोळ १ मोठा चमचा (टेबल स्पून)
कांदे ३ मध्यम
टोमॅटो ३ मध्यम
मोहरी १ लहान चमचा
कढीलिंबं पाने ४ डहाळ्या
कोथिंबीर मुठभर (बारीक चिरुन)
लाल आख्ख्या मिरच्या ४ नग
हिंग चिमुटभर
मीठ चवीनुसार
तेल २ ते ३ लहान चमचे.
तयारी:
हळद घालून तुरडाळ शिजवून घ्या आणि शिजल्यावर घोटून त्याचे वरण करून घ्या.
कांदे आणि टोमॅटो लांब आकारात चिरुन घ्या.
कृती:
तेल तापवून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की लाल मिरच्या आणि कढीलिंबाची पाने घालून परतुन घ्या.
आता त्यात कांदा घालून परता. कांदा शिजून मऊ झाला की टोमॅटो घालून परता.
टोमॅटो शिजला की वरण + वाटलेला मसाला + हिंग + कोथिंबीर + चिंच कोळ + चवीनुसार मीठ घालून खळखळून उकळा. तुमचे सांबार तयार झाले आहे.
सजावट आणि सादरीकरणः
एका मोठ्या बाऊल मध्ये १४ छोट्या इडल्या (जास्त घेतल्यासही हरकत नाही) घालून त्यावर
एकदम गरम सांबार घाला. एक मोठा चमचा साजूक तुप घालून वरून कोथिंबीर भुरभुरून सादर करा.
डुबुक इडल्यांचा आस्वाद घ्या.
शुभेच्छा....!
मस्त
असे पाच वाडगे भरुन इडल्या
In reply to असे पाच वाडगे भरुन इडल्या by ५० फक्त
+१. असेच म्हणतो. "कृष्ण
In reply to +१. असेच म्हणतो. "कृष्ण by बॅटमॅन
आई शप्पथ.....!
In reply to असे पाच वाडगे भरुन इडल्या by ५० फक्त
+१
In reply to +१ by मन१
यस्सर....
छान छान.
डुबु़क इडली...खल्लास
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
मस्त!
फोटू मस्त! सांबाराच्या
जीवघेणा फोटो
खपले. काय देखणा फोटो आहे.
खल्लास
वाह निव्वळ तोँपासू
जबराट...
आई गं......
अतिशय आवडता पदार्थ...
येत्या रविवरी
इडली
मी
In reply to मी by मन१
हाहाहा ... .... हो मीही ऐकलय
जबरदस्त
सांबार.
In reply to सांबार. by प्रभाकर पेठकर
हेच
In reply to हेच by निनाद
तेल आणि कोकमांचा वापर.
In reply to तेल आणि कोकमांचा वापर. by प्रभाकर पेठकर
व्वा!
In reply to व्वा! by निनाद
कोकमं आणि कोडंपुल्ली.
In reply to हेच by निनाद
ते तर बंगाल्यानाही माहित नाही
!
सदर प्रतिसादकर्त्यास नीजधामी
डुबुक्क्क्क्क....! प्यारे
मस्त
मला जे काही म्हणायच आहे ते वर
इड्लेई
खल्लास !
काकाजी, तुस्सी ग्रेट हो !!!
मस्त
मस्त! सांबाराची मसाल्यासह
सांबार करून पाहिले काका. खूपच
In reply to सांबार करून पाहिले काका. खूपच by रेवती
धन्यवाद.
आजकाल