साहित्यः १/२ अर्धा कप चॉकलेट चिप्स (सेमीस्वीट किंवा स्वीट आवडेल तसे), १/३ कप हेवी क्रीम (किंवा हेवी व्हिपिंग क्रिम), १ टीस्पून रूम टेंपरेचरला आलेलं बटर, १/८ टीस्पून मीठ, १/८ टीस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट/इसेन्स (ऑप्शनल)
कृती:
१) एका पॅनमध्ये मध्यम आचेवर क्रीम गरम करत ठेवा. आणि क्रीम उकळायच्या थोडंस आधी (म्हणजेच पॅनच्या कडेने हवेचे बुडबुडे जमा झालेले दिसले की) गॅस बंद करा.
२) आता एका बाउलमध्ये चॉकलेट चिप्स घेऊन त्यावर हे गरम क्रीम ओता. १ मिनिट तसचं राहू द्या. आता त्यात बटर, मीठ, व्हॅनिला एक्सट्रॅक्ट घालून चमच्याने किंवा व्हिस्कने फेटून चांगले एकत्र करून घ्या.
३) ४-५ मिनिटे तसेच राहू द्या. आता हे गनाश केक / पेस्ट्री / कुकीज सजवण्यासाठी वापरू शकता किंवा व्हॅनिला आइसक्रिम वर घालून खाऊ शकता.
वाचने
3168
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हा........!
पाकृ वाचण्याचे कष्ट घेतले
यम्मी !!!
सिनफुल!!!
वा!
मस्त.