स्वप्न घेऊन आले पंख
डोळ्यात जखमेला पुन्हा निळे पान्हे
आभाळ-रोगाचा एखादा रोगी
कण्हतो वादळ
विराम दिला स्वतःनंतर
आता मालकीचे काही नाही
वाटा आल्या वाटा गेल्या
भेगेचा झणाणा
जळात शिरला नग्नपणे
लाटांवर आभाळ हालत राहिले ...
खोल खोल गर्भात कुणाच्या
त्याच्या परतीचे रस्ते
गुंता नुसता!
-पूर्वप्रकाशित
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1031
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुंता नुसता! हेच खरे !
हम्म्म्म्म
गुंता नुसता!