Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बहुगुणी on Fri, 08/17/2012 - 23:21
लेखनविषय (Tags)
प्रेमकाव्य
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
भाषांतर
हळू हळू येतेय बिनपावली तुझ्या खांद्यामागे सकाळ सोनसळी पांढूरल्या तावदानात धीट होत, सूर्य येतोय आत उशीवर बरसताहेत तुझे केस तू अजूनही झोपेतच आहेस! वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं सांगितलेलं गुपित, पुन्हा सांगावं बघ, मी सकाळ देतोय तुला हा दिवसही घे, माझ्या फुला! येतील हलत्या पडद्यामागे सूर्याची किरणे फडफडणाऱ्या पापण्यामागे स्वप्नांचे फिरणे झोपेत तुझे स्वप्नांना बिलगणे सुखाचे क्षण आठवून ओठांचे विलगणे वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं सांगितलेलं गुपित, पुन्हा सांगावं बघ, मी सकाळ देतोय तुला हा दिवसही घे, माझ्या फुला! खिडकीच्या कट्ट्याखाली माती देतेय हुंकार बागडत्या बाळागत दिवसाला येतोय आकार सकाळ-गाणं ऐकत तुझ्या पापण्याचा झुला झुले नृत्यशाळेतला जणू पंखा हलकेच डुले सूर्यप्रकाशाने अखेर उघडलं पडद्याचं भुयार तुही झालीस, मला वाटतं, प्रवासाला तयार वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं सांगितलेलं गुपित, पुन्हा सांगावं बघ, मी सकाळ देतोय तुला हा दिवसही घे, माझ्या फुला! टॉम प्रॅक्स्टन लिखित आणि त्यानेच गायलेलं मूळ गाणं:
  • Log in or register to post comments
  • 3316 views

प्रतिक्रिया

Submitted by रेवती on Fri, 08/17/2012 - 23:26

Permalink

वाह! सुंदर.....

वाह! सुंदर.....
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sat, 08/18/2012 - 04:42

Permalink

अंहं!

अंहं!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 08/18/2012 - 20:35

Permalink

मस्त!

छान आविष्कार!
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Sat, 08/18/2012 - 20:45

Permalink

मस्तच...

छान
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Sun, 08/19/2012 - 21:55

In reply to मस्तच... by मन१

Permalink

+१

छान
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sun, 08/19/2012 - 14:07

Permalink

छान.

छान. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Mon, 08/20/2012 - 13:49

Permalink

सुरेख!

सुरेख!
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Mon, 08/20/2012 - 14:30

Permalink

अगदी सुरेख!!!

अगदी सुरेख!!!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com