✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संदेहमुक्ती

म — मूकवाचक, Mon, 08/13/2012 - 14:02
श्री. अ‍ॅलन जेकब्ज (श्री. रमण महर्षी फाउंडेशन (युके) चे अध्यक्ष) यांच्या एका कवितेचा स्वैर भावानुवादः Once and for all, let's end all confusion, Brahman is Real the world's an illusion. लोपता समूळ, जगाचा आभास, येते प्रचितीस, ब्रह्ममात्र सार्‍या संदेहांना, घेउनी प्रचिती, द्यावी मूठमाती, कायमची We're tricked by the senses and fickle mind, There's nothing truly lasting here to find. जगी शोधू जाता, सारे अशाश्वत, मिळे ना शाश्वत, येथे काही फसवाच सारा, दहा इंद्रियांचा, चंचल मनाचा, मायाभास ...All's a mirage of mobile flux and change, Beyond our limited perceptual range, जडसृष्टी सारी, नसे वस्तु सत्य, आभासी अनित्य, मृगजळ तरी पहा तिचा, नसे आदि अंत, दशेंद्रिये तेथ, पांगुळती The planet's perishing and in decay,But Reality's unchanging in every way. अरे धरित्रीही, असे नाशिवंत, काळाग्नीच्या मुखात, चालली ती परि सर्वभावे, सत्य सनातन, असे चिरंतन, आत्मरूप Sadhak met a Sage on a mountain preaching, Gladly he asked Him for some teaching. गिरीकंदरात, भेटे सत्पुरूष, देई उपदेश, अनायास हर्षित साधक, अरूणाचलीच्या देवा, म्हणे मज द्यावा, उपदेश He answered "all you see isn't as it seems, The life you live is just a film of dreams, बोले सत्पुरूष, दृष्यजात सारे, वाटतसे खरे, तैसे नाही आजवर तुझ्या, जीवनाची वाट, होती चित्रपट, स्वप्नमय So wake up child from this sleep of delusion Once and for all end all chronic confusion" मोहनिद्रेतून, मायावी मदिर, जागा हो सत्वर, वत्सा माझ्या जुन्या संदेहांना, साधोनी जागृती, दे रे मूठमाती, कायमची (तळटीपः अरूणाचलीच्या देवा - भगवान रमण महर्षी) मूळ काव्यः END CHRONIC CONFUSION Once and for all, let's end all confusion, Brahman is Real the world's an illusion. We're tricked by the senses and fickle mind, There's nothing truly lasting here to find. ...All's a mirage of mobile flux and change, Beyond our limited perceptual range, The planet's perishing and in decay, But Reality's unchanging in every way. Sadhak met a Sage on a mountain preaching, Gladly he asked Him for some teaching. He answered "all you see isn't as it seems, The life you live is just a film of dreams, So wake up child from this sleep of delusion Once and for all end all chronic confusion" - Alan Jacobs

प्रतिक्रिया द्या
4012 वाचन

💬 प्रतिसाद (20)

अतिशय सुंदर..

अक्षया
Mon, 08/13/2012 - 14:18 नवीन
अतिशय सुंदर भावानुवाद. :)
  • Log in or register to post comments

उत्तम.....

ज्ञानराम
Mon, 08/13/2012 - 15:26 नवीन
उत्तम..... अप्रतीम.. "सुसंगती सदा घडो, स्रुजन वाक्य कानी पडो..."
  • Log in or register to post comments

उत्तम.....

ज्ञानराम
Mon, 08/13/2012 - 15:26 नवीन
उत्तम..... अप्रतीम.. "सुसंगती सदा घडो, स्रुजन वाक्य कानी पडो..."
  • Log in or register to post comments

उत्तम!

पैसा
Mon, 08/13/2012 - 15:31 नवीन
मूळ रचनेत काव्य नावालाच आहे. पण मूकवाचकाचा भावानुवाद सरस उतरला आहे.
  • Log in or register to post comments

अगदी असेच म्हणतो... +1 टू

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/13/2012 - 18:33 नवीन
अगदी असेच म्हणतो... +1 टू पैसा ताई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+२

प्रचेतस
Mon, 08/13/2012 - 21:03 नवीन
भावानुवाद अतिशय सरस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

+३

मोदक
Tue, 08/14/2012 - 03:02 नवीन
+३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मस्तच

चैतन्य दीक्षित
Mon, 08/13/2012 - 16:16 नवीन
अनुवाद खूप छान झाला आहे. पैसातैंशी सहमत
  • Log in or register to post comments

मस्त !

नाना चेंगट
Mon, 08/13/2012 - 18:41 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच सुंदर.

कवितानागेश
Mon, 08/13/2012 - 20:04 नवीन
नेहमीप्रमाणेच सुंदर.
  • Log in or register to post comments

सुरेख !

मदनबाण
Tue, 08/14/2012 - 19:08 नवीन
सुरेख ! :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मूकवाचक
गुरुवार, 08/16/2012 - 13:56 नवीन
प्रतिसाद देणार्‍या सर्व मिपाकरांना मन:पूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुंदर अनुवाद.

अस्मी
गुरुवार, 08/16/2012 - 18:05 नवीन
सुंदर अनुवाद.
  • Log in or register to post comments

सुन्दर ! ! !

निरन्जन वहालेकर
Fri, 08/17/2012 - 21:58 नवीन
सुन्दर ! ! ! मुळ कवितेपेक्षा भावानुवादच सरस ! ! !
  • Log in or register to post comments

सुन्दर ! ! !

निरन्जन वहालेकर
Fri, 08/17/2012 - 22:01 नवीन
सुन्दर ! ! ! मुळ कवितेपेक्षा भावानुवादच सरस ! ! !
  • Log in or register to post comments

अनुवाद खुपच छान आहे !!!

स्वप्निल घायाळ
Sat, 08/18/2012 - 15:42 नवीन
अनुवाद खुपच छान आहे !!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मूकवाचक
Wed, 08/22/2012 - 14:05 नवीन
शेवटी चिरंतन कालप्रवाहाचा किनारा मला सापडला आणि तिथेच मी स्थानापन्न झालो. चिंतनात मग्न, (त्या प्रवाहात) सूर मारण्यासाठी, (मनमुराद) पोहण्यासाठी, आणि अंततः अमर्त्यतेच्या त्या सागराशी एकरूप होण्यासाठी. 'पिंडे पिंडाचा ग्रासु' करून, मी तेजस्वी प्रकाशाचा सागरच होउन गेलो. कित्येक पूर्वजन्मांच्या स्वप्नवत लाटा आता त्या एकाच तेजशलाकेच्या सागरात विरघळून गेल्या आहेत. (पिंडे पिंडाचा ग्रासु - आपल्या 'मी'पणाचा, अहंतेचा आपल्याच सच्चिदानंद आत्मस्वरूपात विलय करणे) - "चिरंतनाचा किनारा" या परमहंस योगानंद यांच्या चेपुवर वाचलेल्या कवितेचा भावानुवाद At last I found the banks of eternity and there I sat, musing, to plunge, swim, and melt in that ocean of immortality. Melting myself within Myself ,I became the ocean of luminous light. All dream waves of many incarnations have melted into the sea of one flame." -"Banks of Eternity" a poem by Paramhansa Yogananda
  • Log in or register to post comments

फारच छान अनुवाद. आपण तर

कवितानागेश
Wed, 08/22/2012 - 18:28 नवीन
फारच छान अनुवाद. आपण तर भाषातज्ञ दिसता! :) अवांतर प्रश्न: रमण महर्षींना सत्य समजले होते का? योगानंदांना सत्य समजले होते का? अ‍ॅलन जेकबना सत्य समजलं आहे का? तुम्हाला सत्य समजले आहे का? कुणी तसे सांगत नाहीये, :( म्हणून खात्री करुन घ्यायला विचारतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

सुरेख!!

अक्षया
Wed, 08/22/2012 - 14:22 नवीन
सुरेख..!!
  • Log in or register to post comments

आवडले पण

चौकटराजा
Sun, 08/26/2012 - 18:00 नवीन
जगी शोधू जाता, सारे अशाश्वत, मिळे ना शाश्वत, येथे काही फसवाच सारा, दहा इंद्रियांचा, चंचल मनाचा, मायाभास हे आवडले. दॉ, वसंत चिपळोणकर यानी लिहिलेले " विज्ञानातील क्रांत्या" या पुस्तकात एक प्रतिपादन असे आहे की मानवी मनाचे विश्वाचे जे आकलन आहे त्याला फक्त मनातच स्थान असते. मानवी मनाचे सारे राज्य लेबलांचे असते. निसर्गाला हे अध्यात्म ते विज्ञान असे काही जाणवत नाही. निसर्गाचेच हे म्हणणे आहे की " हे सारे असार आहे !" पण मानवी मनाच्या क्शितीजापर्यंत मात्र माणसाला खरा व खोटा कोणतातरी अर्थ स्वीकारल्याशिवाय पर्याय नसतो.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा