एकादशी दुप्पट खाशी ---
साहित्य :-
उकडलेले बटाटे ३ ते ४,
चार - पाच हिरव्या मिरच्या ,
थोडे लाल तिखट,
एक छोटा आल्याचा तुकडा,
वरई पिठ एक वाटी,
शाबूदाणा पिठ पाव वाटी,
बेकिंग सोडा,
चवीनुसार मीठ,
तळणीसाठी रीफ़ाईंड तेल किंवा तूप.
कृती:-
प्रथम उकडलेले बटाटे हाताने मॅश करून घ्यावेत. हिरवी मिरची, आलं
मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. तेलावर हे वाटलेलं आलं, मिरची थोडसं
परतून घ्यावं. मॅश केलेला बटाटा घालावा व लगेचच
आच बंद करावी. नंतर हे सर्व एकत्र करुन या मिश्रणाचा छान गोळा करून घ्यावा
मग वरई पिठ व शाबूदाणा पिठ व
लाल
तिखट, सोडा,व मीठ हे सर्व एकत्र करावं. थोडं थोडं पाणी घालत
गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे थोडं दाटसर पीठ बनवून घ्यावं. बटाट्याच्या
मिश्रणाचे लहान मोठ्या आकाराचे गोळे करून घ्यावेत. एका कढईमध्ये तेल
तापवून घ्यावं. आच माध्यमच ठेवावी. बटाट्याचा एक गोळा पिठाच्या मिश्रणात
घोळवून तेलात सोडवा व छान खुसखुशीत वडे तळून घ्यावेत. नारळाच्या चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करावेत
वाचने
7875
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह वा.
@एकादशी दुप्पट खाशी- हा
आता कधीतरी का होईना, फलटण
छान पाककृती.
>> वरई आणि साबुदाण्याच्या
In reply to छान पाककृती. by प्रभाकर पेठकर
फोटो शिवाय मजा नाय
हो ना ---
In reply to फोटो शिवाय मजा नाय by गोंधळी
(No subject)
In reply to हो ना --- by निवेदिता-ताई
आता कधीतरी का होईना, फलटण
अविनाशकाका
In reply to आता कधीतरी का होईना, फलटण by अविनाशकुलकर्णी
आता कधीतरी का होईना, फलटण
खुपच छन अहे..........प्रयत्न करुन बघेल.........
बाय डिफॉल्ट ताई फोटो टाका की
वर्णनावरून तर खूप टेस्टी होईल