Childhood Trauma and Violent adulthood हा विशय किचकट आहे. मानवी मेंदुवरचे संशोधन बाल्याव्स्थेतआहे.त्यामुळे १००% बरोबर विधान शक्य नाही. सर्व अंदाज मागील अनुभवावरुन बान्धलेल्या पुड्या. माझ्या प्रकटनाशी असहमत असाल तर त्यात गैर काहीही नाही. आपल्या चवकटीच्या बाहेर असलेल्या विशयावर असहमती मी नेहेमीच बघतो. सहमत असुन सुद्धा असहमती ला सेल्फ डिनायल म्हणतात.All humans choose self denial as escape route from reality असे म्हणतात. असे काही नसते म्हणणे सर्वात सोपा मार्ग.
माझे प्रकटन प्रतिबींब आहे.झालच् तर प्रतिध्वनी. आशय नाही. थीम नाही. आयका आणि वाटा.पट्ले नाही सोडुन द्या.
Childhood Trauma is result of child abuse. Childhood Abuse म्हणजे नुस्ता लैगिक छळ नव्हे. मानसिक आणि आर्थिक पण असतो.पुढिल घटना मानसिक मध्ये मोड्ते.
अत्यन्त गरिबीतुन वर आलेले एक सुप्रसिद्ध डॉक्टर. सुखी समधानी. दोन मुले. मोठी मुलगी नक्षत्रासारखी. मुलगा ठिक ठाक. सर्व सुरळित. जुन महीना. १ली ची तयारी.दफ्तर रेनकोट ची खरेदी झाली. १ल्या दिवशी ट्रायल. चिरंजिवानी दफ्तर खांद्यावर चढवले. आईने रेनकोट घातला.खांदे आक्रसल्यावर रेनकोट टरकन फाट्ला.
गरीब डॉक्टरना २५० चे नुकसान सहन झाले नाही . काय केलेस हे असे काहीतरी ओरडुन त्यानी त्या पोराच्या पाठीवर जोरात धपाटा मारला. मारापेक्शा पोर डोळ्यातल्या खुनशी रागाला भ्यालं आणि तिथेच मुतले. आईने मध्यस्ती केली विशय तिथे संपला.
दुसरा दिवशी पासुन पोर बोलायचा थांबला. जवळ जवळ मुका.
पाचव्या दिवशी बोलताना फाफलायला लागला. आकाश कोसळ्ले . एका बेसावध क्षणी आपल्याच हाताने आपल्याच मुलाचा घात.
दोन वर्शांची स्पिच थेरपी, सायकोथेरपी - उपयोग नाही. कोणाच्यातरि रेफरन्सने माझ्याक्डे आले. कर्मकहाणी कळली. आईचे अश्रु थांबत नव्हते. डॉक्टरांची मान खाली.
देवाचे स्मरण करुन सर्व आढावा घेतला. इथे सेकंडरी कॉम्प्लीकेशन पण होती. ताईचा नंबर १ला. वक्त्रुत्व स्पर्धेत १ली. वगैरे वगैरे. सारखी तुलना.
शिकली सवरली घाणीच्याटोपल्या करण्यात हुशार.ठोकुन काढावेसे वाटले. असो.
सल्ला दिला तो असा.
मी: त्याला सर्वात जास्त काय आवड्ते?
आई: W.W.F.(रोल रिवर्सल - मुलाच्या मनात, मार खाणारा बाबा-मारणारा मी)
बाबा: कीति सांग्तो ते सर्व खोट आहे. पण ऐकतच नाही.(इथे पण आपलीच पुन्गी)
मी: बरोबर वेळी घरी या. मुलाबरोबर बसुन तो जसा रमतो तसा तुम्ही रमा. खर्या खोट्याची ऐसी की तैसी. आईला खुण केली. तीने दरडावल्यावर साहेब तयार झाले.WWF MULABAROBAR KASE ENJOY KARAYACHE TYACHE PRACTICAL DAAKHAVALE. GHARACHAA ANUBHAV. सर्व प्रयोगात ताईला सांमील करण्यास विसरलो नाही. पाचवीतली मुलगी बाबापेक्षा हुशार निघाली. सर्व काही सुरळित झाले.एका महिन्यात तोतरेपणा गेला. पोराची आणि बाबाची बर्यापैकी दोस्ती झाली.
आज मुलगा नागपुरला कॉम्प.
इजिनीयरींग करतोय.
इथे काही प्रश्न उदभवतात.
१. माटुंग्याची वी.जे.टी.आय. सारखी सीट सोडुन मुलगा नागपुरला का गेला?
२.आजही मुलगा फक्त चारच दिवस का घरी येतो?
३.वरवर दिसत असले तरी त्याने आपल्या बाबाला माफ केले का?
४. ह्या बालपणीच्या ट्रोमाचा पुढील त्याच्या आयुश्यात काही परिणाम राहील का?
will he be a violent personality
५. बाबा आपल्या भुतकाळाला कधीच विसरणार नाही का?(गरीबी वगैरे. )
६. पुढिल आयुश्यात येणार्या प्रसंगात भुतकाळातील जखमा तारतात का मारतात.?
5. तुम्हाला बाबाने , भावाने खुप मारले त्याचे मानसिक वण तुमच्या वागण्यात दिसतात का?
६. हा सर्व खुळ्चट्पणा आहे. असे काहीही नसते.
तुमचे उत्तर तुम्ही शोधा.
अगले भाग मे मिलते है हमलोग.
याद्या
4651
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लेख आहे...
विषय मोठा
मास्तर आणि दंतवैद्य
विचार करायला लावणारा लेख
मनावर दडपण
विनायकराव,
उत्तरे
सहमत
In reply to उत्तरे by प्रियाली
अजुन येउ दे.
टोपल्या.
लिंक्स