गृहमंत्री माझा लाडका
गृहमंत्री माझा लाडका
हल्लीच मुंबईत झालेल्या हिंसाचारच्या पार्श्वभूमीवर (भलतीच जागा आठवली!) काही उल्लेखनीय गोष्टींचा इथे उल्लेख करावा वाटतो. वारंवार "कडक कारवाई " मुळे टिकेच लक्ष ठरलेल्या गृहमंत्र्यांनी यावेळेस मात्र हा शब्द वापरणे टाळले त्यामुळे थोड्याफार टीका कमी झाल्यात. दुसरी उल्लेखनीय कामगिरी हि पोलिसांनी बजावली. संयम हा पोलिसांचा उगाचच जनतेने नाकारलेला गुण दिसून आला. पण संयम पाळल्यामुळे बऱ्याच पोलिसांना मार खावा लागला.
समाजातल्या काही लोकांनी या माराचा तीव्र निषेध केला- १)मावळ प्रांतात मेलेले शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय, २)छोट्या मोठ्या कारणांसाठी रस्त्यावर उतरणारे आंदोलक, ३)जैतापूर, वसई इथली जनता तसेच राजकीय मंडळींपैकी आमदार हर्षवर्धन जाधव इ., पोलिसांचा संयम बघून या लोकांना अगदी गहिवरून आल्याच कळते. हा मोर्चा मात्र अन्न्यायाच्या विरोधात होता. अन्न्यायाला वाचा फोडता फोडता बऱ्याच गोष्टी फोडण्यात आल्या. तसेच महिला पोलिसांचा झालेला विनयभंग हा देखील यातलाच एक भाग होता. काही जण अन्न्यायाच्या विरोधात लोकलच्या टपावर चढले होते, तर काही जण सशस्त्र क्रांतीच्या निर्धाराने आले होते, काही जणांनी एकीचे बळ दाखवण्यासाठी १५-२० लोकांनी एक-एकट्या पोलिसांना घेरले. या लढ्यात दोन हुतात्म्यांना आपले प्राण गमवावे लागले (याची हुरहूर गृह्खात्यालाच जास्त लागलीये).
२६/११ दहशतवादी हल्ला, मुंबईत त्यानंतर सुद्धा झालेले ३ स्फोट , पुण्यात दोनदा झालेले स्फोट, तसेच नित्यनेमाने चालू असलेले दरोडे, खून, बलात्कार , चोऱ्या(पुतळ्यानपासून फायलीन्पर्यंत) अश्या यशस्वी कारकिर्दीचे खरे श्रेय हे गृहमंत्र्यांनाच जाते (कुणीतरी म्हणे त्यांना मोठेपणा आवडत नाही म्हणून ते हे श्रेय नाकारतात !!!). आणि शनिवारच्या प्रसंगानंतर गृह खात्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे .
टीप: "अरे पण त्यांनी dance बार बंदी आणली ते ह्यांना दिसत नाही " अश्या प्रकारच्या बचावात्मक प्रतिक्रियांचे स्वागतच आहे. कदाचित मुंबईतून आम्हाला त्यांचे हेच गुण दिसतात, जवळच्या लोकांनी आणखी गुण सांगावे(प्रतिमा सुधारेल).
काही विरोधक मंडळी उगाचच नेहमी शुल्लक कारणांवरून गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतात!(सालाबाद प्रमाणे यंदाही). कधी गृहमंत्री जातात कधी पुन्हा तेच परत येतात पण ह्या विरोधकांच आपले एकच ह्यःह !! अशा लाडक्या गृहमंत्र्यांची ही यशस्वी घोडदौड अशीच चालू राहो आणि महाराष्ट्र या क्षेत्रात सुद्धा(?) अग्रेसर होवो अशी आमची सदिच्छा .
ता. क. : नुकत्याच आलेल्या बातमी नुसार गृहमंत्री कुणाचतरी शेपूट पिरगळनार असल्याचे कळते(शोर्य!!)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
?
धर्मविरोधी अराष्ट्रवादी
मिपावर स्वागत!
प्रोत्साहन दिल्याबद्दल
दीड फुट्या
आज
फुसका बार .....