Skip to main content

मिळगाई / मिलगाई / मलगा /मोलाहा पोडी / मुळगंपुडी

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 10/08/2012 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य: १ वाटी चणा डाळ १ वाटी उडदाची डाळ १/२ वाटी पांढरे तीळ ८-१० लाल सुक्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त) भरपूर कढीपत्ता ८-१० काळीमिरी १ टीस्पून हींग मीठ चवीनुसार १ टेस्पून तेल . पाकृ: एका पॅनमध्ये कोरडेचे काळीमिरी भाजून घ्यावी व एका प्लेटमध्ये काढून ठेवावी. त्याच पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करून लाल सुक्या मिरच्या व कढीपत्ता परतून घ्यावा व बाजूला काढून ठेवावा. त्यात आता चणा डाळ सोनेरी रंगावर परतून घ्यावी, तसेच उडदाची डाळ ही सोनेरी रंगावर परतून घेऊन , प्लेटमध्ये काढून ठेवावी. . आता त्यात तीळ भाजून घ्यावे. सगळे गार झाले के एकत्र करावे. त्यात हींग व चवीपुरते मीठ घालावे. तळलेल्या मिरच्या व कढीपत्ता घालून मिक्सरवर भरडसर वाटून घेणे (कोरडेच) . हवाबंद डब्यात भरुन ठेवावे. ही चटणी तुम्ही कोरडीच सर्व्ह करु शकता किंवा तीळाचे अथवा खोबर्‍याचे तेल घालून ,मिक्स करून इडली, डोसा, उत्तप्पा, अडई बरोबर सर्व्ह करु शकता. . तिखट असल्यामुळे ह्याला गन पावडर असे ही म्हणतात. मिरच्यांचे प्रमाणा आवडीनुसार कमी- जास्त करावे. काही लोकं ह्यात मोहरी ही घालतात.

वाचने 9820
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

एकदम खमंग .... :tongue: मि अजुन एक 'मुळ्गा पुडी ' हा शब्द पण ऐकला होता... :)

In reply to by बॅटमॅन

हो आम्ही पण मुळगंपुडीच म्हणतो :) (आईच्या तामिळ मैत्रीणीने सांगितले होते हे नाव व ही पाकृ पण त्यांची आहे) दक्षिण भारतात ह्या चटणीला वेग-वेगळ्या नावांनी ओळखलं जातं, काहीजण चटणी पोडी / इडली पोडी असेही म्हणतात :)

In reply to by पक पक पक

'मुळगं' म्हणजे मिरची (लाल) + 'पुडी' म्हणजे पावडर. 'मुळगंपुडी' म्हणजे लाल तिखट. हिरव्या मिरचीला 'पच्चं मुळगं' म्हणतात.

गनपावडर इडली हा आयटम जंम रोडवरच्या दक्षिणायनमध्ये खाल्ला होता, तेव्हापासून प्रेमात पडलोय या पदार्थाच्या :)

In reply to by बॅटमॅन

आयला दक्षिणायन!! पुरलं का ? त्यांची टीचभर वाढण्याची पद्धत बघून साऊथ इंडियन हा एवढासाच भात खातात का असा प्रश्न पडला होता. पहिल्याच भेटीत हे ठिकाण मनातून उतरलं.

In reply to by सूड

क्वांटिटीबद्दल सहमत. पण पुण्यात तरी अशी क्वालिटी अन्यत्र कुठेच नाही पाहिली. जर अन्य कुठे अशी क्वालिटी असेल तर सांग, मला जायला नक्की आवडेल :)

In reply to by बॅटमॅन

मी हैद्राबादच्या चटनीज् मध्ये हा आयटम खाल्ला होता. लै भारी. बाकी दक्षिणायनबद्दल सूडशी सहमत. बाकी गनपावडरची चव बरीचशी आपल्या मेतकूटासारखीच लागते.

मस्त... परवाच मी इडली सोबत खायला केली होती. मी ह्यात वाटताना एक छोटी चिंच पण टाकली. त्यामुले मस्त चव लागते आंबट-तिखट. next time करुन बघ. :)

एक्दम जबरा चटनी आहे ही. ह्या च्या बाजुलाच प्रॉन्सची कोरडी चटणी पावडर पण पाहिली इथल्या सुपर मार्केटात.

रेसिपी सोपी दिसत्ये, नक्की करून बघेन. अवांतर: तुमचे फोटो नेहमीच छान असतात. खाद्य पदार्थांव्यातीरिक्त अजूनही काही फोटो काढले असतील तर ते पण टाका ना.

ही पोडी केली. तू दिलेल्या प्रमाणाच्या निम्मी केली. मृने सांगितल्याप्रमाणे त्यात घालण्यास चिंच नव्हती म्हणून पेरभर आमसूल घातले. स्वातीताईने सांगितलेल्या इडल्या केल्या. खूपच छान तोंडीलावणे आहे हे. पुढच्यावेळी सुधारणा म्हणून आतापेक्षा आणखी बारीक वाटणार आहे.

माझी आवडती 'पोडी'. :) अशा चटणीत कढीलिंबाची पाने सुकवून/ तळून घालायची, आणि एकत्र पूड करायची. ती चटणी पण मस्त लागते.

आम्ही चटणी पुडी असे म्हणतो बॉ