Skip to main content

थेकडी ते मुन्नार अणाईरंकाळ मार्गे

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 09/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
थेकडीच्या परिसरातील मसाल्याच्या बागा - वेलदोड्याची बाग spice garden, Cardamom plantations हमरस्त्यालगतच्या बंगल्याकडे चढत जाणारा हिरवागार रस्ता greeen road, a road o road-side bungalow रस्त्यांना जणु 'एंजल्स ट्रंपेट्सचे भारदस्त कुंपण angels trumpets, road fenced with Angel's Trumpets एंजल्स ट्रंपेट्सची नाजुक, तलम अबोली पिवळसर फुले अक्षरश: हजारांनी फुलली होती angels trumpet, beautiful flowers in pink vigentte सर्वत्र हिरवाई, झाडावर देखिल हिरवे शेवाळ आणि रस्ता व हिरवाईच्या मध्ये पिवळी पाचोळ्याची महिरप turn, green road with yellow border मुन्नारहुन चिन्नकणालला म्हणजे जिथे आमचे विश्रामधाम होते त्याच्या अलिकडे असलेले अणाईरंकाळ धरण Anairankal, dam view अणाईरंकाळ सरोवराचे हे दृश्य पाहुन मला तापोळा आठवला Anairankal, tea plantations by lake side अणईरंकाळचा विस्तिर्ण जलाशय, इथे हत्ती पाणी प्यायला येतात असे ऐकले. Anairankal, lake Anairankal, lake अणाईरंकाळ धरणावरुन दिसणार्‍या धुक्यात करविलेल्या टेकड्या Anairankal, hills in mist पुन्हा एंजल्स ट्रंपेट्स मात्र पांढर्‍या रंगात, आणि त्यात बेमालुम मिसळलेली गारवेल angel's trumpets, in white colour चिन्नकनाल म्हणजे आमचे मुन्नार जवळ आले आणि पाउस सुरू झाला, सारथी आणि चिरंजिव छतावरचे सामान झाकायला प्लास्टिक घेउन सरसावले cover up, rain on Munnar border - cover up झोड पावसातुन प्रवास करत आम्ही विश्रामधामावर पोचलो munnar in rain, arrival at Munnar निसर्गाच्या बदलत्या छटा munnar in rain, clouds in munnar in rain, clouds in vally munnar in rain, getting bright खोलितुन दिसलेले विलोभनिय दृश्य आणि त्याच्या बदलत्या छटा view from room, scene1 view from room, scene2 view from room, last scene
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7646
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मस्तं हिरवाकंच निसर्ग पाहून सोनू निगमचे हे गाणे आठवले.... हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे, धुंद व्हा रे ... हेवा वाटावा अशी तुमची ही सहल आहे. मजा करा राव. आम्ही इथे ४८ डि. से. तापमानात भाजून निघतो आहोत.

ओ रस्ते सोडुन बाकीचे फोटो टाका की, इथं च्यायला एक दिवस सुट्टी नाही मिळत आणि तुम्ही असले इनव्हायटिंग फोटो टाका...

आम्ही नेमक्या ह्याच रस्त्याने गेलो होतो पण मुन्नार ते थेकडी असे गेलो :) आणि विशेष म्हणजे ते वेलदोड्याची शेती/रोपं जिथून सुरू होतात तिथपासून वेलदोड्याचा मस्तं सुगंध दरवळत राहतो.. तर हा सफर नुसता 'सुंदर' च नाही तर 'सुंगधी' पण आहे :)

सध्या पावसाळी धाग्यांची रेलचेल सुरू आहे,,, त्यामुळे मस्त वाट्टय..... क्लासिक फोटो आणी वर्णन :-)

फोटो झकासच!! अवांतरः भटजींना आज पूजेचं आंवतण दिसत नाही, स्मायल्याच स्मायल्या टाकतायेत.

सुंदर निसर्ग.. क्या बात है.. मुन्नारची आठवण विशेषतः तिथल्या थंड पावसाळी ओल्या हिरवाईची आठवण झाली. उत्तम फोटो. धन्यवाद...

किती सुंदर छायाचित्रे! तुमच्या फटूंमुळे 'आता मात्र केरळ ट्रीप हवीच' असं वाटतय.