केळ्यांचे वेफर/माहीती
मसु. ही पाकृ माझी नाही.
सध्या केरळात पडिक असल्याने रोजचा भर मसाला डोसा, वडा सांबार, इडली चटनी, टिपीकल केरळा राइस (जाडा सफेद), मासे यांवर अधिक आहे.
मी रहातो तिथे रस्त्यापलिकडे सुपर बेकरी आहे.मी त्याच्याकडुनच केळ्याचे वेफर किंवा तिखट शेंगदाणे घेत असतो. पण कधीचा ते चित्रबद्ध करायला चान्स मिळत नव्हता.
आज कंपनीतर्फे इफ्तार पार्टी होती तिथे व्यवस्थितरित्या हादडुन परत येताना कॅमेरा हातात असल्याने अचानक आठवण आली.अनायसे तिथे वेफर बनवणे सुरु होते.तर तिथे चालु असलेल्या वेफर क्रिया देत आहे.
सुरुवातीला कच्चे केळे नीट सोलुन घेतात.(हायजीन को फाटे पे मारो)
मग तिथला कारागीर ते केळे एका वेफर बनवणार्या मशीनमधे दाबतो ते सरळ खाली कढइमधे उकळत असलेल्या खोबरेल तेलात पडतात.
तिथे त्यांना व्यवस्थितरित्या तळु देतात.
मग २/३ वेळा वर खाली उडवुन पुन्हा थोडा वेळ तळतात.
मग तो कारागीर एखाद्या वेफरचा तुकडा मोडुन बघतो, व्यवस्थितरित्या तळले गेले किंवा नाही.
जर तो तुकडा कुरकुरीत आढळला की शेजारी ठेवलेल्या डब्यातुन अंदाजे ५०/६० मिली मीठाचे पाणी कढइमधे तरंगणार्या वेफरवर टाकतो. ५ सेकंदानी कढइ मधले वेफर एका पसरट भांड्यात काढतो ज्याला छोटे छोटे छिद्र असतात जास्तीचे तेल निघुन जायला.
थोडावेळ त्यात ठेवुन मग त्यांची रवानगी एथे.....
महत्वाचे : वेफरला आलेला पिवळा रंग खोबरेल तेलात तळल्यामुळे असतो. आधी मलासुद्धा वाटायचे की हळदीच्या पाण्यातुन काढुन तळत असावेत.
ज्या बेकरी वाल्याकडे हे फोटो घेतले तो दिवसाला साधारण २०० किलो (केळयाचे फक्त) वेफर विकतो, बाकीचे वेगळे.
काड्या......
हे लोक फणसाच्या गराचे व रताळ्याचेही वेफर बनवतात ते नंतर कधी.

वाचने
16740
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
वा.... मस्तच... मला हे
छान
अतिशय आवडतात केळ्याचे वेफर
हे केळ्याचे वेफर
In reply to हे केळ्याचे वेफर by सानिकास्वप्निल
रताळ्याचे वेफर टेस्टी असतात...
In reply to रताळ्याचे वेफर टेस्टी असतात... by मोदक
रताळ्याचे वेफर टेस्टी
चांगली माहिती
फोटू छानच. तळणीतच मिठाचे पाणी
मस्त. रताळे, बीट वगैरेंचे
In reply to मस्त. रताळे, बीट वगैरेंचे by शिल्पा ब
रताळे, बीट यांचे वेफर हेल्दी
In reply to रताळे, बीट यांचे वेफर हेल्दी by शैलेन्द्र
रताळे, बीट इ. चे वेफर्स
In reply to रताळे, बीट इ. चे वेफर्स by शिल्पा ब
"रताळे, बीट इ. चे वेफर्स
फणसाच्या गर्यांचे वेफर्स
छान माहिती आणि फोटो. ही
वा.. मस्त.. केळ्याचे गोडसर
In reply to वा.. मस्त.. केळ्याचे गोडसर by गवि
बरोबर गवि
छान. मी घरी भाजीच्या
केळ्याचा प्रकार
In reply to केळ्याचा प्रकार by काळा पहाड
राजाळी
केळा वेफर्सचा कारखाना आणि
In reply to केळा वेफर्सचा कारखाना आणि by प्रभाकर पेठकर
काका
....
ओह!
मस्त.. तळलेले केरळी पदार्थ
मस्त!
केळ्याचे वेफर्स खूप आवडतात पण
वा... मस्त माहिती.जर तो
वा! मस्त
छान माहिती आणि फोटो ही
मस्त!
शिराझ