नमस्कार!
माझी पुतणी वास्तुस्थापत्यशास्त्राची विद्यार्थिनी असून भारतात वास्तुस्थापत्यशास्त्र (architecture) या शाखेत पदवीसाठी अभ्यास करते आहे. तिला शोधनिबंधासाठी विषय निवडावयाचा होता, तेंव्हा या व्यवसायातील ज्या भ्रष्टाचाराची तिला मनापासून चीड आहे, त्या भष्टाचाराची तिने निवड केली आहे. या संदर्भात इथल्या अनुभवी वाचकांनाकडून काही मदत मिळेल या आशेने इथे प्रतिसादाची / चर्चेची विनंती करीत आहे.
तिला सध्या अभिप्रेत असलेले काही मुद्दे असे:
१. भ्रष्टाचारामुळे निकृष्ठ दर्जाचा माल वापरला जाऊन होणारं नुकसान
२. नियमांतील पळवाटांमुळे टेंडरशी विसंगत दर्जाचं काम केलं जाऊन पैसे देऊन ते 'पास' करून घेतलं जाणं
३. एंजिनियरने सांगितलेल्या दर्जाचे पालन न करता निकृष्ठ दर्जाचा माल वापरून काम करणे (उदाहरणार्थ, १२ इंचाच्या सळईऐवजी ८ इंचाच्या सळया वापरून बांधकाम RCC चे काम करणे)
४. काम करतांना कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता चोख, दर्जेदार व सुरक्षित काम करणे अपेक्षित असतांना, प्रत्यक्ष कामात मात्र 'भेटी' स्वीकारून 'तडजोड' केली जाते ('माननीयांच्या' वा नगरसेवकांच्या 'फॅकटरी' च्या आराखड्यासाठी समव्यावसायिकाची फॅक्टरी पाहून येण्यासाठी 'सिंगापूरची सफर' करून येणे, वगैरे),
५. व्यवसायातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दुसर्या आर्किटेक्टने केलेलं डिझाईन चोरणं, त्याच्या/तिच्या 'रेट्'पेक्षा कमी किंमतीत काम करून देण्यास तयार होऊन अखेरीस कामाच्या दर्जात तडजोड करणे.
६. स्वतःच्या डिझाईनचा दर्जा उत्तम असूनदेखील चांगल्या आर्किटेक्टलाही नगरविकास खात्यातील प्रत्येक टेबलावर 'पाकिट' द्यायला लागणे.
७. रोजंदारीवर काम करणार्या गवंडी, वीटा वाहणार्या बायका, वगैरेंकडून त्यांना कामावर ठेवण्याच्या 'हमी'च्या बदल्यात त्यांच्या विवक्षित रोजगारापेक्षा कमी पैसे देऊन आर्किटेक्टने 'टक्का' वसूल करणे (१२ रु. प्रति-तासाऐवजी १० रू. प्रति-तास मेहेनताना देऊन पैसे वाचवणे), इत्यादि.
तुम्हाला या किंवा अशा इतर काही गैरप्रकारांविषयी माहिती/अनुभव असल्यास या निबंधात मदत करू शकाल काय?
विषय धाडसी असल्याने लिखाणात कोणतेही वैयक्तिक संदर्भ येणार नाहीत याची तिला अर्थातच काळजी घ्यावी लागेल. तेंव्हा प्रतिसादकांनीही माहिती देतांना विशिष्ट नाव/ संदर्भ टाळावेत ही अपेक्षा.
मदतीबद्दल सर्वांचे आधीच आभार!
वाचने
5805
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
भ्रष्टाचार
मराठी चोरी
In reply to भ्रष्टाचार by सुनील
आपण वर नमुन केलेल्या गोष्टी '
आम्हाला किती देता ते बोला
हे
या प्रकारच्या भ्रष्टाचारामुळे
आता सरकारने लढा देण्या योग्य
In reply to या प्रकारच्या भ्रष्टाचारामुळे by बिपिन कार्यकर्ते
असहमत.
In reply to या प्रकारच्या भ्रष्टाचारामुळे by बिपिन कार्यकर्ते
व्याख्या
In reply to या प्रकारच्या भ्रष्टाचारामुळे by बिपिन कार्यकर्ते
आधी चेक करा.. असे विषय शोध
अजून एक प्रष्ण.. आपल्या
प्रत्यक्ष एम्.जीं. ना हा
In reply to अजून एक प्रष्ण.. आपल्या by एम.जी.
३. एंजिनियरने सांगितलेल्या
मलाही हेच वाटते. हा विषय
विषयाची सुसंबद्धता तपासून पाहा
सर्वसाक्षींशी सहमत. ती
In reply to विषयाची सुसंबद्धता तपासून पाहा by सर्वसाक्षी
च्यायला !
$%$#%^%^&&^&^%$%$#%
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
खी खी खी
In reply to $%$#%^%^&&^&^%$%$#% by स्पा
धन्यवाद!
प्राध्यापकांनी आग्रह केला आहे
In reply to धन्यवाद! by जानकी
मदत?
हम्म
आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल
गुंत आहे...
राजू बन गया जंटलमॅन बघा!
प्रबंधामधे चार भाग
मला तर या जानकीबैं डुआय आहेत
In reply to प्रबंधामधे चार भाग by एम.जी.
प्रकाटाआ