Skip to main content

बायकांचे करिअर !!

लेखक सुधीर मुतालीक यांनी शनिवार, 04/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पन्नास टक्क्याचे आरक्षण हा विषय कधी सुरु झाला हे मला माहिती नाही. कदाचित खुप जुना असेल. पण जोरदार चर्चा व्हायला लागली तेव्हा समजला. पण वैयक्तिक मी माझ्या साठी माझ्या कंपनी मध्ये हा निर्णय खुप आधी म्हणजे हा निर्णय ऐरणीवर येण्या आधी करून टाकला होता. हा निर्णय सामाजिक बांधिलकी मधून वगैरे अजिबात आला नव्हता, हे कबुल करतो. व्यवसायाच्या सुरुवातीला म्हणजे पंधरा वर्षापूर्वी, मुलांबरोबर काही मुली मुलाखतीला आल्या. तुलनेने चांगल्या म्हणजे सबंधित कामासाठी आवश्यक सर्व गुण असणाऱ्या होत्या. त्यामुळे त्याना संधी मिळाली. काम उत्तम करू लागल्या. आणखी काही मुली कंपनी मध्ये आल्या. मुले ही आली. काही वर्षांनी जाणवण्या इतका फरक दिसायला लागला. " स्कोर काय झालाय ? सचिनच्या किती ? किती मतांनी आपला उमेदवार पुढे आहे ? शुक्रवारी कुठे 'बसायचे' ? पक्याची "लाईन" लाऊन देण्यासाठी खलबत कधी करायची ? ........वगैरे असल्या भानगडी मुलींच्या बाबतीत नव्हत्या. हे जाणवायला लागलं. हेही जाणवायला लागलं की अवलंबून किंवा विसंबून राहू शकू अशा कंपनीतल्या व्यक्तिंमध्ये मुली अग्रक्रमाने पुढे आहेत. माझ्या डोक्यात आजवर नसलेला लिंगभेद असा घुसला. आणि काही पदांसाठी फक्त मुलीच घ्यायच्या असा निर्णय कंपनीच्या फायद्या साठी घेतला गेला. त्यामुळे आज करोडो रुपयांची खरेदी, करोडो रुपयांचा हिशोब, करोडो रुपयांच्या प्रकल्पांची तांत्रिक बाजू तपासून त्यांचे विक्रीच्या किमती ठरविणे, आलेल्या अश्या ऑंर्डेर्सचे अचूक अंदाज पत्रक तयार करून प्रकल्प संपेतो पर्यंत त्यातल्या नफ्याकडे बारीक लक्ष्य ठेऊन नफा मिळविणे - खरेतर अंदाजापेक्ष्या ज्यास्त नफा कंपनीला मिळवून देणे अशी अनेक म्हंजे तंत्रज्ञान आणि अर्थ या सारख्या सर्वात महत्वाच्या खात्यांमध्ये माझ्या कंपनीत बायका नेतृत्व करतात. सर्वात महत्वाचे सत्य असे की माझा वारू बेफाम अन्यान्य ठिकाणी उधळलेला असतो, उदाहरणार्थ असे लेख वगैरे लिहायला मला वेळ मिळतो कारण माझ्या कंपनीची दुसरी संचालक माझी बायको आहे. कॉस्ट अकौंटंट आहे. त्यामुळे व्यवसायाची आर्थिक बाजू प्रचंड क्षमतेने आणि अचूक ती सांभाळते. त्यामुळे मला व्यावसाईक टेन्शन गेले अनेक वर्षे अक्षरश: शून्य. व्यवसायातल्या अनेक घडामोडीविषयी आवश्यक असणारा आर्थिक सल्ला मला आयता मिळतो, हवे तेव्हा. शेवटी व्यवसाय म्हणजे फक्त अर्थ, बाकी सगळे अर्थ उभारणी साठी !! त्यामुळे अर्थ खातेच जर पराकोटीच्या जबाबदारीने सांभाळले जात असेल तर माझा वारू उधळण्या व्यतिरिक्त करू काय शकतो ? कार्यस्थळी अफाट क्षमता असलेल्या बायकांच्या बाबतीत काही वेळा मात्र कधी कधी विचित्र खरे तर मला भीषण चीड आणणारा अनुभव येतो आणि मी बायकांनाच त्या साठी जबाबदार धरतो. गेल्या वर्षी मला माझ्या व्यवसायातल्या एका विभागासाठी 'General Manager' पदासाठी उमेदवार हवा होता. महिला उमेदवार असावा अशी अट नव्हती. पण ज्या कंपनीने आमच्यासाठी काही उमेदवार निवडले त्यात दोन पुरुष आणि दोन महिला उमेदवार होत्या. त्यातल्या दोन महिला आणि एक पुरुष उमेदवारांशी मी प्रत्यक्ष्य अर्धा अर्धा तास फोन वर बोलून मुलाखत घेतली. त्यातून एक महिला आणि एक पुरुष निवडले. दुसऱ्या फेरीच्या मुलाखतीनंतर ती महिलाच पास झाली. तिच्याशी आणखी एक प्रदीर्घ गप्पा मारण्याचा निर्णय मी घेतला. एका आठवड्याने बाई आल्या. उत्तम प्रोफाईल होते. दणदणित शिक्षण. इंग्रजी वर प्रभुत्व. वय सुमारे पंचेचाळीस. इंडस्ट्रीमध्ये मला आवश्यक असणा-या क्षेत्रात प्रदीर्घ आणि प्रचंड अनुभव. कामाच्या ठिकाणी नेतृत्व केल्याच्या खुणा. वगैरे. मी खुष. कारण मला हवा तसा उमेदवार मिळाला. सर्वात शेवटी मी त्या बाईंच्या पगारा विषयी अपेक्षा विचारल्या. त्यांनी मला जो आकडा सांगितला तो माझ्या अपेक्षेपेक्षा कमीच होता. त्यामुळे मी तीन मिनिटात मान्यता देऊन विषय संपविला. दोनेक दिवसात नेमणूकी संदर्भातील पत्र कंपनी कडून बाईना गेले. बाईंचा चार दिवसांनी फोन. भेटायला यायचे आहे. मला वाटले. पगाराविषयी त्यांचा अंदाज चुकला असणार. त्यामुळे पुन्हा बोलायचे असेल. बाई आल्या. केबिन मध्ये आल्या. बसायच्या आत त्यांनी मला सांगितलं मिस्टर आलेत आणि त्याना काही तुमच्या सोबत बोलायचे आहे. त्याना आधी मी बसायला सांगितलं. मग विचारलं. " काय बोलायचं आहे त्याना ?" त्या म्हणाल्या हेच कामाविषयी !!! मी जबरी ओशाळलो. म्हटलं मला कामा विषयी जे बोलायचे आहे "ते गेल्या तीन भेटीत तुमच्याशी बोललो आहे, त्याचा तुमच्या नव-याशी काय संबंध ?" " नाई सर. सगळं मान्य आहे. पण प्लीज. पाच मिनिटं वेळ द्या. मी नाईलाजानं हो म्हटलं. तो बाबा आला. नमस्कार चमत्कार झाला. तो काय करतो हे त्याने सांगितलं. कंपनी काय काय करते हे विचारलं. बाबा सल्लागार आहे. मोठ्या मोठ्या कंपन्यांना गुणवत्ते विषयी सल्ला देतो. पुढे तो बोलू लागला " मला हिने सांगितले हिच्यावर मोठी जबाबदारी द्यायचे तुम्ही ठरविले आहे. आम्हाला आनंद आहे. पण मला काही बोलावे असे वाटले म्हणुन मी आलो. आमची ही जरा तापट आहे. शीघ्रकोपी आहे.........." मी कानाला खोटा खोटा मोबाईल लावला आणि माझ्याच केबिन मधून त्याची बडबड चालू असताना सटकलो. केबिन बाहेर बसलेल्या मदतनीसाने मी सांगितलेला निरोप त्याना दिला. " साहेबांना तातडीचा फोन आलाय आणि दुस-या युनिटवर जावे लागले. तुम्हाला पुन्हा बोलावू. " त्याच दिवशी बाईंची नेमणूक रद्द केल्याचे पत्र बाईना पाठवून दिलं. गेल्या आठवड्यात मी एका पोर्टलवर एक आयटी संबधित वरिष्ठ उमेदवार शोधत होतो. नाशिकमध्ये नोकरीसाठी "आयटी" मधला कुणी उमेदवार ज्याला किमान पंधरा वर्षाचा अनुभव आहे असा मिळणं जरा अवघडच. पण मिळाला. बाई आहेत. सतरा वर्षे TCS मध्ये कामाचा अनुभव. सध्या वास्तव्य नाशिकमध्ये. नोकरी नुकतीच सोडलेली. जबरदस्त अनुभव. एकच मोबाईल नंबर होता, बायोडाटावर. लगेच मोबाईल वर फोन लावला. तो मोबाईल नंबर होता, बाबाचा. बाईंच्या नवरोबाचा. त्याला मी माझी ओळख करून दिली. फोन करण्याचे कारण सांगितले. बाईंचा बायोडाटा नेटवर पाहिल्याचे सांगितलं. त्याने मलाच दहा प्रश्न विचारले. तो फोन नंबर बाईंचा नव्हता. बाबाचा होता !! म्हणजे आधी हा सर्व ठीकठाक आहे का पाहणार आणि मग ठरविणार बायकोला तिकडे पाठवायचे की नाही ते! अहो त्या बाई आयटी इंजिनियर ! सतरा वर्षे इंडस्ट्री मध्ये काम केल्याचा अनुभव. त्याना कुठे नोकरी करायची याचा डायरेक्ट निर्णय घेता येत नाही ? बायका असे वागतात ? मला इथे येणारे म्हंजे अंगावर धावून येणारे उत्तर माहिती आहे. " त्या नाई अश्या वागत. त्यांचे नवरे, पुरुष त्यांना धाकात ठेवतात !!, वगैरे वगैरे तत्सम ....मला चीड याच उत्तरांची आहे. एव्हढं त्या नवऱ्याला घाबरण्यासारखं किंवा धाकात राहण्यासारखं त्यांच्यात म्हणजे नव-यात -काय असतं ? इतक्या शिकलेल्या, अनुभव असलेल्या, कार्यस्थळी वाघीण असणा-या बायका नवरा किंवा कुटुंबाच्या बाबतीत म्याव का असतात? करिअरच्या बाबतीत त्याना स्वत:चे स्वातंत्र्य का अबाधित ठेवता येत नाही? शैक्षणिक, वैचारिक आणि आर्थिक क्षमता असणा-या बायका नव-या वर इतक्या अवलंबून का असतात ? सगळ्या नसतील. पण खूप संख्येने असतात. बायकांची करिअरची संकल्पना कुटुंबाला आधार अशीच असते का ? म्हणजे ज्याला आधार द्यायचा त्यालाच पहिली प्रायोरिटी असेच का असते ? असे असायला हरकत नाही पण कुटुंब अनेक जणांचे बनते ना ? " रजा पाहिजे. मुलाची तब्येत ठीक नाही. पुन्हा सहा महिन्यांनी त्याच कारणासाठी पुन्हा हीच रजा घेते. या खेपी नवरा का नाही? परवा पुणे आकाशवाणीवर विविध भारती मध्ये कुणीतरी डॉ संजय उपाध्ये गळा काढून एक अनुभव सांगत होते. एक आई मुलीला पाळणा घरात सोडून जात होती. मुलीचा केवीलवाणा चेहरा पाळणा घराच्या खिडकीतून यांना दिसला. जो ते कित्येक दिवस म्हणे विसरू शकले नाहीत. मुलीला आई पाहिजे होती. पण आई नोकरी करणारी. म्हणजे आई मुळे पोर केविलवाणी होते. पण यांनी बापाचा उल्लेख भाषणात नाही केला. म्हणजे बाबाने नोकरी करायची हे अध्यहृत! २०१२ साला मध्ये पुण्या सारख्या ठिकाणी आकाशवाणीवर अशी भाषणे लावतात कशी ? बरे त्यांच्या भाषणा आधी निवेदन एका बाईने केले होते, म्हणजे निवेदिकेने !!! घरी प्रसंगी बंड करायचे धाडस कार्यालयात वाघीण असणा-या बायकां कडे नसते का? काही ठिकाणी तर नव-या पेक्षा ही ज्यास्त कमविते. पण तरी म्याव असते. माझी एक मैत्रीण आर्कीटेक्ट आहे. स्वत:चा व्यवसाय करते. यांचा व्यवसाय असा असतो की त्याना संध्याकाळी किमान आठ वाजे पर्यंत कार्यालयात चर्चे साठी थांबावेच लागते. संध्याकाळी कंत्राटदार रिपोर्टिंग करायला येतात किंवा नोकरदार गि-हाइके सल्ले मागायला येतात वगैरे. हिची कमाई नव-या पेक्षा बक्कळ ज्यास्त आहे. नवरा नोकरी करतो. तो सात वाजता घरी येतो. ही साडे सहाला घरी. कारण नव-याला तव्या वरची गरम पोळी लागते !!! कमाईपेक्षा कौटुंबिक आनंद महत्वाचा, नाती महत्वाची, तो तिचा निर्णय आहे वगैरे अशा टिपिकल चर्चा मला फडतूस वाटतात. त्यात किती खरे पणा असतो याची मला शंका आहे. बायकांनी करिअर विषयीची संकल्पना आता तरी बदलली पाहिजे असे वाटते.जमेल तितकी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी नोकरी किंवा घरी बसुन वेळ जात नाही म्हणुन टाइमपास करण्या साठी नोकरी याच्या पलीकडे जाऊन स्वत:चे व्यक्तिमत्व शोधण्यासाठी, त्याला झळाळी देण्यासाठी, निर्मितीचा धोधो आनंद मिळविण्यासाठी, स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी, स्वत:च्या क्षमतेची ओळख होण्यासाठी ........ का नाई ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24777
प्रतिक्रिया 144

प्रतिक्रिया

In reply to by शिल्पा ब

मुलांनासुद्धा कमीतकमी आपल्याइतकी शिकलेली अन नोकरी करणारीच बायको हवी असते हे बरोब्बर विसरलात याचं आश्चर्य नाही.
सर्व मुलांना नाही. "नोकरी करणारीच" मधील "च" सोडला तर काही"च" अंशी सहमत.
बायका एकट्याच कमावणार्‍या बसुन खाणारे नवरेही काही कमी नाहीत. जरा डोळे उघडुन पाहीलंत तर दिसेल.
तुमचे आणि माझे मुद्दे अभावितपणे समाजाच्या विशिष्ट स्तराला लागू पडताहेत असे दिसतेय. तस्मात डोळे उघडा.

In reply to by बॅटमॅन

पण हा ऑप्शन बायका का ठेवत नाहीत मग कॉलेजमध्ये खूप लग्न ग्रुप मध्ये झाली. त्यामुळे नवरा नवरी जवळपास एकाच वयाचे, २-३ केसेस मध्ये बायको ३-४ महिन्याने मोठी, पण एकाच वर्गातले. २-३ जोड्या तर ११ वी पासून एकत्र. पैकी एका जोडीमध्ये दोघानाही कॅम्पस interview मध्ये एकदमच नोकरी लागली. दोघांचाही पगार सारखा. ती खूप बडबडी, तो फक्त जवळच्या लोकांशी नीट बोलणारा. लग्नानंतर ३ वर्षात तिला फटाफट प्रमोशन मिळाली. स्वभावामुळे तो आपला काम एके काम राहिला. आता तिचा पगार त्याच्या पेक्षा थोडा जास्त आहे. तो खूप इगो ठेवणारा नाहीये त्यामुळे अगदी अभिमान सारखी परिस्थिती नाहीये पण अप्रेझल नंतर थोडा तणाव जाणवतो. दोघानाही मुल व्हायच्या आधी एकदा युरोप बघायचं. पगाराचं कारण सांगून पुढे ढकलतो. तरी नशिबाने पगारातला फरक त्यांच्या स्वभावामुळे पडलाय, पण जर हुशारीमुळे पडला असता तर तो आत्ता आहे तेवढा तरी ठीक राहिला असता का असं तिला प्रश्न आहे. ती खूप काटकसरी आहे, कधीच पैसे उडवत नाही. त्यामुळे नवर्याचा पगार किती याचा तिला फरक नाही पडत. बाकी दोघांचा एकमेकांवर प्रेम आहे त्यामुळे घेतील सांभाळून पण हे नक्की कि हा प्रश्न परिस्थिती उलट असती तर कधीच आला नसता. जर त्याचा पगार वाढला असता तर तिला कधीच काहीच वाटलं नसतं. आता जर कोणी ओळखीत लग्न करत असेल तर सांगते कि पगार नवर्याचाच जास्त हवा, पैशासाठी म्हणून नाही तर नवर्याच्या मानसिकतेची खात्री वाटत नाही म्हणून. बाईकडे नोकरी किंवा या ना त्या प्रकारे पैसा कमवण्याचे कौशल्य असेल तर ठीक, नपेक्षा घरेलू बै पण चालेल, असा ऑप्शन पुरुष बायकांच्या निवडीत ठेवतात. माझ्या आसपासच्या असंख्य उदाहरणांवरून सांगते कि नोकरी करणारी नको याचा दुसरा अर्थ घरकामाला बाई हवी असा असतो. घरात एखाद काम राहिलं कि "घरीच तर असतेस, एवढं पण नाही झालं. किंवा घरी राहून काय उपयोग." आसपास चे लोक पावलापावलाला गृहीत धरतात. जर बाई नोकरी करणारी आणि पुरुष घरकाम करणारा असेल तर किती पुरुष असा वागवून घेतील स्वताला? तुम्हाला चालेल बायकोने म्हटलेलं कि अरे घरीच असतोस ना जरा दोन वेळा वेगळी भाजी करत जा, कधीतरी गरम पोळ्या वाढत जा.

In reply to by वीणा३

तुम्ही जे उदाहरण सांगितलंत त्यावरून नवर्‍याचाच पगार जास्त का हवा हे आजिबात सिद्ध होत नाही. समजा नवर्‍याचा पगार त्या केसमध्ये जास्त असता तर मग बायकोने काटकसर केली नसती असेच एकंदर सुरावरून वाटते. निव्वळ युरोप पहावा/अन्य कैतरी मौज करावी यासाठी जणू पगार जास्त पाहिजे असं सकृद्दर्शनी वाटतंय.
माझ्या आसपासच्या असंख्य उदाहरणांवरून सांगते कि नोकरी करणारी नको याचा दुसरा अर्थ घरकामाला बाई हवी असा असतो. घरात एखाद काम राहिलं कि "घरीच तर असतेस, एवढं पण नाही झालं. किंवा घरी राहून काय उपयोग." आसपास चे लोक पावलापावलाला गृहीत धरतात.
मग नवर्‍याचा पगार कमी नको म्हंजेच तो एटीएम सारखा हवा या वाक्यात आणि तुम्ही लिहिलेल्या वाक्यात फरक नाही. काहीतरी काम केलेच पाहिजे-मग घर सांभाळा किंवा बाहेरून पैसा आणा. हे स्त्री-पुरुष दोघांना लागू आहे. पैशाची अट नसेल तर घरकामाची अपेक्षा इतकी अपमानास्पद का वाटावी? बाकी नवर्‍याने पैसा कमवावा हेदेखील लोक गृहीतच धरतात ना? ते कसं चालतं मग? जर चूक असेल तर या दोन्हीही गोष्टी चूक आहेत-एकच नाही.
जर बाई नोकरी करणारी आणि पुरुष घरकाम करणारा असेल तर किती पुरुष असा वागवून घेतील स्वताला?
हॅ हॅ हॅ..मुळात किती बायका असा पुरुष निवडतील ते आधी सांगा.
तुम्हाला चालेल बायकोने म्हटलेलं कि अरे घरीच असतोस ना जरा दोन वेळा वेगळी भाजी करत जा, कधीतरी गरम पोळ्या वाढत जा.
मी स्वतः जर घरेलू असतो , बाकी पैसा कमावणे वैग्रे जमले नसते तर केले असते मुकाट्याने, त्यात काय एवढे? पण पैसा पण कमावणार नै, घरकाम तर करणारच नै असे कुणी म्हटले तर मात्र त्याचा सक्त निषेध.

In reply to by बॅटमॅन

हुंड्याचा मुद्दा गैरलागू आहे बर्‍याच लोकांबाबतीत हा हा हा. बरं बरं. वर्तमानात या साहेब! भारतातली जाऊ द्या, महाराष्ट्रातली दोन चार तथाकथित सुधारलेली शहरे म्हणजे अख्खा महाराष्ट्र नव्हे! आजच एक बातमी कळलीये हे सिद्ध करणारी पण गप्प बसते. या चर्चा करून कंटाळा आलाय. सध्या पर्लताईंना आहे उत्साह. :)

In reply to by Pearl

किती मुलं 'मुलीची घरची (आर्थिक) परिस्थिती फारशी चांगली नाही.' या कारणास्तव (बाकी सर्व दृष्टीने अनुरूप असलेली) मुलगी नाकारतात. अवांतर मोड ऑन यावरून एक विनोद आठवला - असे म्हटले जाते की, जर तुमचे वडील गरीब असतील, तर ते तुमचे कमनशिब. पण जर तुमचा सासरा गरीब असेल, तर तो तुमचा निव्वळ मूर्खपणा!!! ;) अवांतर मोड ऑफ बाकी चर्चा गंभीरपणे चालू आहेच!

In reply to by Pearl

तुमचे सर्व मुद्दे फक्त "मुलाला उद्देशून" असे लिहिले असले तरी सरसकटीकरण झाले आहे.... जो मुलगा थोडा सेन्सीबल असेल, ज्याच्या मनगटात धमक असेल, स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास असेल आणि स्वत:च्या आई वडीलांनासुध्दा "तुम्ही चुकता आहात!" हे मान ठेवून पण ठामपणे सांगायची तयारी असेल तिथे तुम्ही विचारलेले प्रश्न लागू ठरणार नाहीत. हेच कुटूंबाच्या बाबतीत लागू होते. सुनेला मुलीप्रमाणे वागणूक देणारी आई असेल आणि सासूला आई समजणारी सून असेल तर कुणाची धमक आहे सुनेचा (ती गृहीणी असो वा नोकरी करणारी असो) योग्य मान न ठेवण्याची? आदर्शवाद आहे असे वाटत असले तरी माझ्या बघण्यातली बरीच कुटूंबे आहेत जिथे सुशिक्षीत आणि सुसंस्कृत हे दोन्ही शब्द एकत्र नांदतात. आता एका प्रश्नाचे उत्तर द्या , किती मुलींचे आईवडील, मुलाच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून तिशीच्या आतच त्याचे स्वतःचे (वेगळे) घर नसले तरी चालेल, चारचाकी नसली तरी चालेल, पगार कमी असेल तरी चालेल.. अशा अटींसह लग्नाचा निर्णय घेतात?

In reply to by मोदक

सुनेला मुलीप्रमाणे वागणूक देणारी आई असेल आणि सासूला आई समजणारी सून असेल तर स्वत:च्या आई वडीलांनासुध्दा "तुम्ही चुकता आहात!" हे मान ठेवून पण ठामपणे सांगायची तयारी असेल अ‍ॅ हॅ हॅ हॅ हॅ धन्यवाद हो. या गंभीर धाग्यावर थोड्या विनोदाची गरज होतीच.

In reply to by शिल्पा ब

या गंभीर धाग्यावर थोड्या विनोदाची गरज होतीच. - सहमत सहमत शिल्पातैंशी. स्विमिंग क्लासच्या पहिल्याच दिवशी, टँकबाहेर कुडकुडत उभा राहिलेला इसम पोहोण्याबद्दल जे इतरांना सांगत असतो ना तसा प्रतिसाद आहे मोदकचा.

In reply to by शिल्पा ब

काळा चष्मा घातला की जग काळे दिसते. त्यावर कोण काय बोलणार ? एखाद्याचा वैयक्तिक अनुभव हे वैश्विक सत्य नसते, हे कधी समजणार, देव जाणे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अगंबै हो का? उगाचच सगळ्या बायका असं बोलतात बै ! बाकी मुद्दे संपलेले दिसताहेत.. हॅ हॅ हॅ आमच्याकडुनही : बरं झालं बै तुमच्या आईला त्यांच्या आईसारखी सासु मिळाली ते ! (तुमचंच लॉजिक हो!)

In reply to by Pearl

हा (लग्न जुळवा-जुळवीचा) मुद्दा काढल्याबद्दल. ह्या मुद्द्याला एकदा चांगले झोडपायचे होतेच.
पुढचे वाचू की नाही याचा करतो आहे . स्पा चे भविष्य खरे झाले आहे. स्पा, तुस्सी ग्रेट हो...

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

तसेच लग्न जुळवाजुळवी या क्षेत्रातले तज्ञ मिपासदस्या बरेच दिवस दिसत नसल्याने हा विषय सध्या तहकुब ठेवण्यात यावा असा प्रस्ताव ठेवण्यात सभागृहापुढे ठेवण्यात येत आहे.

In reply to by ५० फक्त

ओ ५० राव.. लै दिवस तहकूब राहिल विषय.. जरा कुठे मजा यायला लागली आहे.. सगळे जण एकमेकांना टेम्पोत बसवायचा तयारीत आहेत आणि तुम्ही टायरमधली हवा सोडायच्या गोष्टी करता आहात.... ए चॉलबे नॉ... ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

@वि.मे. >> स्पा चे भविष्य खरे झाले आहे. स्पा, तुस्सी ग्रेट हो.. >> हॅ. हॅ.हॅ. तुम्ही असं म्हणणं म्हणजे 'चोराच्या उलट्या ******' असो. तुमचे सगळे प्रतिसाद एकदा शांतपणे वाचून पहा. आणि त्यावर जर तुम्ही लॉजिकली विचार करू शकलात तर तुमचे तुम्हाला कळेलच की तुमचा प्रत्येक प्रतिसाद स्पावाणी खरी ठरवतो आहे. असो. अवांतरः बाकी मला एका गोष्टीची भारी मौज वाटते. मिपावर अशा प्रकारच्या धाग्यांवर येणार्‍या प्रतिसांदांबद्दल माझं असं निरिक्षण आहे की, पुरूष आय-डींचे प्रतिसाद: पुरूष आय-डी कोणत्याही प्रकारचे, कितीही 'ढ', अविचारी, टाकाऊ, इल्लॉजोकल, टोकाचे, असमानतेचा पुरस्कार करणारे.. कोणत्याही प्रकारचे, काहीही प्रतिसाद, कोणत्याही शब्दात जाहीर करू शकतात. त्याला क्वचितच कोणी अरे ला का-रे करते. पण हेच जेव्हा एखादा स्त्री-आयडी (प्रतिवाद करणारा) प्रतिसाद देतो तेव्हा, १) अख्खा मॉब त्या प्रतिक्रियेवर नजर ठेवणार. जेव्हा शक्य असेल तेव्हा लगेच अंगावर धावून जाणार. छोट्या-छोट्या चुका पण काढणार. यातच धन्यता मानणार. २) जर स्त्री आय-डीने स्त्रियांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला (आणि कितीही व्हॅलिड मुद्दे असूदे) की लगेच ती स्त्री-वादी. (असं कोणाला पुरूषवादी म्हंटल्याचं आठवत नाही) ३) जणू काही सर्व स्त्री-आयडींना असे नियम आहेत की, - तुम्ही संयंतच लिहायचं हं. तुमच्याकडून फक्त आणि फक्त बॅलन्स्ड प्रतिक्रिया लिहायच्या अपेक्षा किंवा फार फार तर पुरूषांच्या फेवर मध्ये लिहा. - तुम्ही टोकाचे, अविचारी प्रतिसाद अजिबात लिहायचे नाहीत. अन्यथा आम्ही(पुरूष आय-डी) लगेच प्रतिवाद करायला हजर राहू. ( पण हेच जर पुरूष आय-डी ने लिहिले तर दॅट्स ओके. आणि हेच टोकाचे, अविचारी प्रतिसाद जर तुम्ही पुरूषांच्या फेवरमध्ये लिहिले तर अविचारीपणा माफ. मग उलट आम्ही तुमचा उदो-उदो करू.) - तुम्ही लॉजिकलीच बोलायच. (पुरूष आय-डी ने मात्र कितीही इल्लॉजिकल, असंबद्ध, वाट्टेल त्या शब्दात काहीही कमेंट केली तरी व्हॅलिड. कोणी त्याबद्दल विचारणार नाही, 'हे चुकतं आहे' असं सांगणार नाही) - पुरूष आय-डीने फक्त पुरूषांच्या हिताच्या असणार्‍या मुद्द्यांचा कैवार घेतला तरी व्हॅलिड. पण तेच जर स्त्री-आयडी ने फक्त स्त्री-हिताचे असणारे मुद्दे मांडले तर अमान्य. हा काय प्रकार आहे.. टीपः लगेच सोयीस्कररित्या या अवांतरचा संबंध माझ्या कोणत्याही प्रतिसादाशी लावू नये. सुज्ञांना या टीपेचा अर्थ कळेल अशी आशा. ज्यांना कळणार नाही त्यांनी सोडून द्यावे.

In reply to by Pearl

या प्रतिसादात स्त्री च्या ऐवजी पुरुष असा बदल केला तर पूर्ण सहमत आहे. उत्खनन करा आणि पहा काय ते. फक्त सोयीस्कर मुद्देच चर्चेला घ्यायचे हे तुम्ही केलेलेच आहे. स्त्री -पुरुष रिलेटेड धागा आला की अनोळखी पुरुषांबद्दल शष्प माहिती नसताना त्यांचा घाऊक द्वेष, तसेच त्यांच्या बायकोची कीव करणार्‍या मॅनरलेस प्रतिक्रिया डोळेआड करणे, लॉजिकची आई-बहीण/बाप-भाऊ(होय नंतर कुणी तरी म्हणायचे लिंगभेद) करणे, चूक दाखवली की थयथयाट करणे याची पाहिजे तितकी उदाहरणे दिसून येतील. काही आयडींचे प्रतिसाद हे बिनडोक,द्वेषमूलक आणि तद्दन संतापजनक असतात- स्त्री, पुरुष दोन्ही आयडी त्यात असतात. पण पुरुषांच्या शॉव्हिनिस्टिक प्रतिक्रियांचा निषेध पुरुषांकडून जितका होतो तितका वरील गुणवैशिष्ट्यांचा निषेध स्त्रियांकडून का होत नाही मग? इतके "पॅरागॉन ऑफ लॉजिक, व्हर्च्यू अँड व्हॉट नॉट" म्हणवता (जे वरील प्रतिसादावरून दिसतेच आहे ) तर मग प्रतिक्रियांमध्ये असा दुजाभाव का? फालतू मुद्द्यांवरून गुद्द्यावर येणारे स्त्री आयडी अनेक आहेत-जरा काही झाले की झुंडींनी प्रतिक्रिया येतात. मिपावरील अनेक जुने धागे याची साक्ष देतील. पण कुछ भी करनेका, पण स्त्रियांच्या प्रतिक्रियांबद्दल कुछ नै बोलनेका अशी जयकांत शिकरेगिरी का म्हणून? मूर्खपणा, तर्कदुष्टता ही कुठेही आणि कुणीही दाखवली तरी निषेधार्हच आहे इतके साधे कळू नये याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे एकच सांगणे आहे: "ये मिपा मेरा है और मैं यहाँ का ; जयकांत शिकरे!!!!" * वरील वाक्यातला सेन्स कळावा अशी अपेक्षा. नैतर संपादक नसताना असे का बोलतो वैग्रे फालतूपणा करू नये. ती एक उपमा आहे. हरिणाक्षी म्हटल्यास शिंगे कुठे आहेत असे विचारू नये. बाकीचे ष्ट्यांडर्ड डिस्क्लेमर्स तर हैतच.

In reply to by बॅटमॅन

हाहाहा !!!! पण बा वाल्गुदेया, तू पाषाणावर जलाचा वर्षाव का रे बरे करत आहेस ? (पितामह) विमे

In reply to by बॅटमॅन

@बॅटमॅन >>उत्खनन करा आणि पहा काय ते. फक्त सोयीस्कर मुद्देच चर्चेला घ्यायचे हे तुम्ही केलेलेच आहे.>> उलट उत्खनन करूनही तुमचं मतं असचं झालं असेल तर तुमचा अभ्यास कमी पडतो आहे असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. पूर्विच्या स्त्री -पुरुष रिलेटेड धाग्यांवरील चर्चांमध्ये सोयीचे, गैरसोयीचे सगळे मुद्दे चर्चेला घेऊन झाले आहेत. अतिशय तर्कसंगत, संयंतपणे मुद्दे मांडून झाले आहेत. पण उपयोग काय झाला. कितीही लॉजिकल प्रतिवाद केला तरी लोक आपलेच तूणतूणे वाजवत राहिले. आणि स्वतःच्या स्वार्थमूलक विचारांचे अभिमानाने समर्थन करत राहिले. (आता अजून बाकीचे डीटेल्स परत देत बसणार नाही. ज्याला हवे असतील त्याने उत्खनन करून अभ्यास करावा.) >> स्त्री -पुरुष रिलेटेड धागा आला की अनोळखी पुरुषांबद्दल शष्प माहिती नसताना त्यांचा घाऊक द्वेष, तसेच त्यांच्या बायकोची कीव करणार्‍या मॅनरलेस प्रतिक्रिया डोळेआड करणे, लॉजिकची आई-बहीण/बाप-भाऊ(होय नंतर कुणी तरी म्हणायचे लिंगभेद) करणे, चूक दाखवली की थयथयाट करणे याची पाहिजे तितकी उदाहरणे दिसून येतील.>> यातले काहीही मी केल्याचं आठवत नाही. >>पण पुरुषांच्या शॉव्हिनिस्टिक प्रतिक्रियांचा निषेध पुरुषांकडून जितका होतो तितका वरील गुणवैशिष्ट्यांचा निषेध स्त्रियांकडून का होत नाही मग?>> असहमत. या धाग्याचच उदाहरण घेऊ. पुरुषांच्या शॉव्हिनिस्टिक/असंबद्द्ध प्रतिक्रियांचा निषेध पुरुषांकडून झाला का? आता स्त्रियांबद्दल बोलू. मूळात या वादात भाग घेणार्‍या, मुद्दे मांडणार्‍या स्त्रिया माझा आय-डी घरून ६-७ आहेत. बाकीच्या स्त्री-आय डीं बद्दल तो तो आय-डी सांगेल. माझ्याबद्दल म्हणाल तर मला काही स्त्री-आयडींचे आणि काही पुरूष आयडींचे काही मुद्दे मला पटले नाहित. पण प्रत्येक प्रतिक्रियेला प्रतिसाद देण्याइतका वेळ माझ्याकडे नाही. >>पण कुछ भी करनेका, पण स्त्रियांच्या प्रतिक्रियांबद्दल कुछ नै बोलनेका>> असं माझं कधीच म्हणणं नव्हतं. >>मूर्खपणा, तर्कदुष्टता ही कुठेही आणि कुणीही दाखवली तरी निषेधार्हच आहे>> +१ >>इतके साधे कळू नये याचे आश्चर्य वाटते.>> हा निष्कर्ष तुम्ही कसा काय काढला याचे आश्चर्य वाटते. राहिला प्रश्न या धाग्यावरील, स्त्री-कमावती असावी की पुरूष कमावता वगैरे प्रश्नाचा. (ज्याबद्दल तुम्हाला असं वाटत असावं की 'हा गैरसोयीचा मुद्दा आहे म्हणून मी प्रतिक्रिया लिहिली नाही'. तर असं काही नाही) एकूणच हा मुद्दा क्लिष्ट/जटील, गुंतागुंतीचा आहे.त्याला हजार कंगोरे आहेत. खूप बाजू आहेत. पण इथे साध्या साध्या गोष्टी लोकांच्या पचनी पडत नाहीत. त्यातून ह्या गुंतागुंतीच्या गोष्टी लोकांना कशा काय समजणार. असो. तेवढा वेळ आणि शक्ती सद्ध्या माझ्याकडे नाही. पूर्विच्या धाग्यांवर असा वेळ आणि शक्ती खर्च करून पाहिली आहे. पण हाती काही लागत नाही, हेही पाहिले आहे. असो. माझा ह्या धाग्यावरचा हा शेवटचा प्रतिसाद.

In reply to by Pearl

ब्वॉर्र.....सोयीस्करपणाचा मुद्दा वगळला तर बाकीचा प्रतिसाद तुम्हाला वैयक्तिक नव्हताच!! बाकी चालूद्या. एन=१ फॉलसी, वेळ/शक्ती यांचा अभाव, शेवटचा प्रतिसाद, ही सर्व शस्त्रे इथे वापरली गेली आहेत. असो. बाकी चालूद्या.

In reply to by Pearl

या अनुषंगाने आणखीन काही प्रश्न यादीत भर घालण्यासाठी. किती मुलींनी लग्नानंतर राहण्यासाठीचे घर घेतलेले असते अथवा त्यासाठी कर्ज काढलेले असते? किती मुली मुलाच्या मालकीचे घर नसले तरी चालेल अशी तयारी दाखवतात ? किती मुलींना नोकरी न करणारा किंवा स्वतःपेक्षा कमी मिळकत असलेला मुलगा चालतो ? किती मुली स्वतःच्या आईवडिलांची जबाबदारी त्यांच्या भावांवर ढकलून देत नाहीत ? किती मुली/स्त्रिया घरामधल्या आर्थिक जबाबदारीची ओनरशिप स्वीकारतात? कोणत्याच प्रकारच्या आर्थिक जबाबदारीची ओनरशिप न स्वीकारणे हे काम स्त्रिया आणि ही ओनरशिप स्वीकारल्यामुळे/ स्वीकारावी लागल्यामुळे स्थ्रियांवर दादागिरी करणे हे काम पुरुष इमाने इतबारे पार पाडत असतात हेच खरे. अवांतर - बाईक चालवण्याचा पुरुष असण्याशी काय संबंध आहे हे मला अजूनही कळलेले नाही. जेंव्हा मला बाईक चालवता येत नसे तेंव्हा 'मुलगा असूनसुद्धा बाईक चालवता येत नाही ' या कारणावरुन ऑफिसमधल्या स्त्री-पुरुष सहकार्‍यांनी माझी पुष्कळदा टिंगल केली आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

बाईक चालवण्याचा पुरुष असण्याशी काय संबंध आहे हे मला अजूनही कळलेले नाही. जेंव्हा मला बाईक चालवता येत नसे तेंव्हा 'मुलगा असूनसुद्धा बाईक चालवता येत नाही ' या कारणावरुन ऑफिसमधल्या स्त्री-पुरुष सहकार्‍यांनी माझी पुष्कळदा टिंगल केली आहे.
कुठे? पुण्यात ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

वैयक्तीक.. वैयक्तीक... श्री आप्पांना वैयक्तीक प्रश्न विचारणार्‍या विमेंना समज देण्यात यावी. ;-)

In reply to by अप्पा जोगळेकर

आता हसवू नका हो अप्पासाहेब! चिक्कारजणी आहेत. त्यामुळे पुरुषांना कुठेही कमीपणाही देत नाही. आमच्याकडे माझ्या सासूबाई (म्हणजे मागची पिढी) या सासर्‍यांपेक्षा मिळकतीच्या बाबतीत वरचढ आहेत, गेली कित्येक वर्षे! तर एकेकाळी काही काळापुरते मला मिळणारे पैसे माझ्या नवर्‍यापेक्षा जास्त होते. आमचे लग्न झाले तेंव्हा त्याचे स्वत:चे घर नव्हते. मी माझ्या आईवडीलांची जबाबदारी कधीही नाकारली नाही आणि तेही तसे मानत नाहीत. उलट माझ्या वहिनीच्या माहेरच्या लोकांची माझ्या भावाने आनंदाने स्विकारावी या मताचे आहेत. कालच एकेठीकाणी जेवावयास बोलावले होते त्यांच्या घरी मुलीचे आईवडील तिच्याकडे राहतात एवढेच नाही तर भारतात तिचे वडील आजारी असताना तिच्या सासरी एकत्र कुटुंबात जाऊन राहिले होते. माझी मामेबहिण ही लग्नानंतर तिच्या माहेरीच, माझ्या मामांजवळ राहते (मामी आता नाहीत), नवरा व मुलीसकट. दुसरी मामेबहिण ही लग्नाआधीपासूनच नवर्‍यापेक्षा जास्त कमावते आणि त्यांचे अजून स्वत:चे घर नाही. माझी आतेबहिणही काकांना सांभाळायला कधी माहेरी तर कधी सासरी अशी वेळ पडेल त्याप्रमाणे राहते. माझे आई वडील तसे नेहमीच माझ्या (त्यावेळी) ९०+ वर्षांच्या आजोबांसाठी पडेल ते काम करत आले होते (आईचे वडील). माझ्या मामेसासूबाईंची आई त्यांच्या शेवटापर्यंत मुलीकडेच राहिली होती. माझ्या घरात आणि बाहेरही आणखी चिक्कार उदाहरणे आहेत पण येथेच थांबते.

In reply to by रेवती

सहज आठवलं ... म्हणून... माझा एक काका आहे. ते दोघं आणि त्यांचे ३ व्याही + विहिण आणि एका व्याह्यांचे व्याही + विहिण असं १० जणांचं भ्रमण मंडळ आहे. मधून मधून एकत्र सहलीला जातात कुठे कुठे... अगदीच नाही तर एकाच्या घरी सगळे जमून दंगा करतात. :)

In reply to by अप्पा जोगळेकर

मला असे वाटते हल्ली हे प्रश्न फारसे उद्भवत नसावेत. हे मुद्दे मला कालबाह्य वाटतात. काही घट्ना दिसल्यातर त्या व्यक्तिगत दोषामधुन उद्भवल्या असतील. जसा बाईकचा मुद्दा आहे, तसा स्वयंपाकाचा मुद्दा निघु शकतो. आज ही पोरगी असुन साधी खिचडी टाकता येत नाही असे टोमणे असतातच की ! दोनही आक्शेप चु़कीचेच वाटतात मला.

बायकांना करीयर दुय्यम वाटते, 'घर' महत्त्वाचे वाटते. म्हणून त्या करीयर फार गंभीरपणे घेत नाहीत. हे माझे निरिक्षण आहे. ( घर= आई,वडील, भाउ, नवरा, मुले वगरै सगळे) आता बायकांनी स्वतःची वृत्ती 'बदलावी का'? आणि 'का बदलावी'? असे पुष्कळ प्रश्न आहेत पुढे.

In reply to by कवितानागेश

सहमत. परंतु एखादीस तिच्या वृत्तीमुळे करीयरला प्राधान्य द्यावेसे वाटत असेल तर तिने ते द्यावे आणि त्याचे तिला स्वातंत्र्य असावे. पण तिने लग्नं करताना या वृत्तीनुसारच कम्पॅटिबल नवरा पहावा आणि नवर्‍यानेही मुलीचा केवळ पगार, सुंदरता न बघता कम्पॅटीबिलिटी पहावी.

चर्चा छान चालली आहे. प्रतिक्रीया देणा-या सर्वांचे आभार

नवर्‍याच्या किंवा इतर पुरुषांच्या वाईट गुणांना / काम न करण्याच्या सवयीला वगैरे नावे ठेवणार्‍या बायका स्वतःच्या मुलग्यांना तसेच वागवताना पाहून मौज वाटते. असो. बाकी , कार्यस्थळी वाघीण असणा-या बायका नवरा किंवा कुटुंबाच्या बाबतीत म्याव का असतात? या बाबतीत वर वीणा यांनी दिलेलं स्पष्टीकरण पटलं. त्यात भर अशी की या महिला सारसच्यांपुढे नवर्‍याच्या (तशाच केलेल्या) चुका जाहिरपणे दाखवून देत नाहित ही त्यांची देखील चुक असतेच!

कार्यस्थळी वाघीण असणा-या बायका नवरा किंवा कुटुंबाच्या बाबतीत म्याव का असतात? हे वाक्य पुरुषांच्याबाबतीत तितकेच खरे आहे. स्त्रीने तिच्या करीयरला दुय्यम स्थान द्यावे आणि पतीला महत्व द्यावे हा आपल्या संस्कारांचा मिळालेला वारसा आहे. स्त्रीया स्वतःहोऊनच अशी अपेक्षा का ठेवतात कोण जाणे . माझ्या माहीतीत काही मुली अशा आहेत की त्यानी एम बी बी एस झाल्यानंतर लग्न केले.( नवरा एका इंजी डिप्लोम होल्डर्/खाजगी कारखान्यात नोकरीला) नवर्‍याला आवडत नाही म्हणून स्वतःची डॉ़क्टरकी बंद केली. एका जज्ज बाइंचे ही असेच एक उदाहरण माझ्या पहाण्यात आहे.

In reply to by विजुभाऊ

हं ! मला नेहमी प्रश्न पडतो.. आपल्याला झेपत नसलेल्या मुलीबरोबर लग्नच कशाला करायचं. माहीती आहे की उच्चशिक्षीत आहे अन पुढे आयुष्यात नोकरी वगैरे करावी अशी इच्छा असेल (नव्हे लग्नाआधीच माहीती करुन घ्यावं) तर दुसरी कोणी पहावी. पण इगो आड येतो अन बायका विरोध करत नाहीत. अन ज्या बायकांना पुढे आपल्या शिक्षणाचा उपयोग करायचा नसेल त्यांनी उगाच कॉलेजची सीट वाया घालवु नये.

In reply to by शिल्पा ब

पुन्हा एकदा सहमत शिल्पातैंशी, 'अन ज्या बायकांना पुढे आपल्या शिक्षणाचा उपयोग करायचा नसेल त्यांनी उगाच कॉलेजची सीट वाया घालवु नये.' - हे असंच मी इथं एकदा पुर्वी लिहिलं होतं, अन जाम शिव्या खाव्या लागल्या होत्या मला. बाकी या विषयावर इतर वेळी हिरिरिने लिहिणा-या स्त्री सदस्या दिसत नाहीत यावेळी, करियरमध्ये अडकल्यात की संसारात, कोण जाणे काय झालंय, पण जेंव्हा परत येतील तेंव्हा हा धागा सुद्धा पुन्हा वर काढतील असा भाबडा आशावाद आहे.

In reply to by ५० फक्त

बाकी या विषयावर इतर वेळी हिरिरिने लिहिणा-या स्त्री सदस्या दिसत नाहीत यावेळी, करियरमध्ये अडकल्यात की संसारात,

लेख वाचला. प्रतिक्रियाही गेले २ दिवस वाचतो आहे. या निमित्ताने काही प्रश्न पडले ते असे: १. करियर करणार्‍या स्त्रीने 'पुरुषी'च वागले पाहिजे हा आग्रह का? म्हणजे, तिने ऑफिसमधे अमुक केले किंवा करु शकते म्हणजे घरी तमुक करूच नये असे का? ६ वाजता घरी येणार्‍या आर्किटेक्ट चे उदाहरण वर वाचले. जर ती यशस्वी आर्किटेक्ट आहे, तर याचाच अर्थ असा होतो, की तिच्या चॉईसच्या टाईमिंग्ज तिच्या क्लायंट्स अन ठेकेदारांनी स्वीकारल्या आहेत. व्हाय नॉट? घरादारावर 'तुळशीपत्र ठेवले' म्हणजेच तुम्ही 'यशस्वी' म्हणुन प्रसिद्ध होता का? घरच्यांना यःकश्चित लेखले, त्यांना तुमच्या तालावर नाचायला लावले म्हणजे तुमची करियर योग्य मार्गावर आहे असे होते काय? २. 'करियर' सोडून घर सांभाळणारे पुरुष. थोडा हिणवल्यासारखा, थोडा 'ते चांगले डॉक्टर नव्हतेच, म्हणून दवाखाना सोडून घर्बुवा झाले..' इ. प्रकारचा सूर वाचला. पुरुषांचे सोडा, स्त्रीने करियर सोडून घर सांभाळले, तर त्यात काय चुकले? मुले मोठी करणे, घर नीट चालवणे हे काही कमी दर्जाचे काम आहे का? माझ्या माहितितील अनेक यशस्वी डॉक्टर दंपतींत त्यांची मुले मुख्यतः कंपाऊंडर्स्/घरगडी वा बरे नशीब असेल तर आजी आजोबा सांभाळतात व मोठी करतात असा अनुभव आहे. यांच्या 'यशस्वी' करियरला ती एक काळी किनार असते. मुले मोठी झाल्यावर या करियरिस्ट दोघांनाही कसे वागवितात ते मी पाहिलेले आहे. आता लेखकाविषयी: एकदा संसार करण्याचा निर्णय घेतला, की दोघांनाही काही गोष्टी कराव्या लागतात. तो त्या दोघांचा पर्सनल निर्णय असतो. तिथे तुमचा एम्प्लॉयर म्हणुन काय संबंध? माझ्या एम्प्लॉयीचा नवरा माझ्याशी बोलायला आला, इतक्या फडतूस कारणासाठी जर मी तिचे कर्तृत्व नाकारू लागलो, तर माझ्यासारखा करंटा मीच. कारण त्या उच्च पदी पोहोचण्या/निवड होण्यापूर्वी त्याच स्त्रीने याच नवर्‍यासोबत संसार करीत तुमची अमुक पोस्ट मिळवण्याइतकी लायकी दाखवून दिलेली होती... इथे, तिच्या लायकिबद्दल तुमचे इन्टरप्रिटेशन चुकले असे वाटते. कदाचित लेखात मांडले तितकेच नसेल, इतरही बाबी असतील, पण जे तुम्ही मांडलेत त्यावरून तरी माझे हे मत आहे.

In reply to by बॅटमॅन

बाकी धाग्यावर काय चालायचय ते चालू द्या. पाशवी तोफा इथे निकामी झाल्यासारखा भासही असू शकतो.

In reply to by आनंदी गोपाळ

माझ्या एम्प्लॉयीचा नवरा माझ्याशी बोलायला आला, इतक्या फडतूस कारणासाठी जर मी तिचे कर्तृत्व नाकारू लागलो, तर माझ्यासारखा करंटा मीच. कारण त्या उच्च पदी पोहोचण्या/निवड होण्यापूर्वी त्याच स्त्रीने याच नवर्‍यासोबत संसार करीत तुमची अमुक पोस्ट मिळवण्याइतकी लायकी दाखवून दिलेली होती... इथे, तिच्या लायकिबद्दल तुमचे इन्टरप्रिटेशन चुकले असे वाटते. कदाचित लेखात मांडले तितकेच नसेल, इतरही बाबी असतील, पण जे तुम्ही मांडलेत त्यावरून तरी माझे हे मत आहे. +१०० टू या स्टेटमेंटला, पुण्यातल्या नयना पुजारी प्रकरणानंतर माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा ज्या स्त्रिया आहेत, त्यांना आणण्या नेण्यासाठी घरातला किंवा ओळखीचा पुरुष दररोज येत असतो सोबत, मग काय त्यांना काढुन टाकावे कंपनीने. जशी बायकांना पुरुषाची नजर कळते, तसाच पुरुषाला सुद्धा समोरच्या पुरुषाचा अंदाज येत असतोच, निदान माझे तरी माझ्या बायकोच्या पहिल्या दोन नोक-यांच्या बाबतीतले अंदाज खरे ठरले होते, चोराच्या वाटा चोराला जास्त चांगल्या माहित असतात लुबाडल्या जाणा-या पेक्षा खचितच जास्त.

फर्डु प्रतिक्रीया आहेत एकदम. भारी बॉस.