मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रबळ सौन्दर्य

सौरभ उप्स · · भटकंती
http://www.misalpav.com/node/२२३४३ वरील धाग्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. प्रबळ ला ट्रबल करत चाललेल्या प्रवासात कही सुन्दर असे फोटोस टिपन्याची संधि मिळाली... खरतर फोटोग्राफी ची आवड जपताना ट्रेकिंग ची आवड कधी लागली कळलच नाही म्हणून ट्रेकिंग चे काही मी काढलेले फोटोस वरच्या धाग्यात स्पा ने टाकले आहेत... मुद्दामून काही ख़ास असे निसर्गाचे फोटोस वेगळ्या धाग्यात टाकत आहे... Camera साधा - sony cybershot DSC-W510 वापरला आहे... १. २. ३. ४. ५. ६. ७. ८. ९. १०. ११. १२. १३. १४. १५. १६. १७. १८. १९. २०. २१. २२. २३. २४. २५.

वाचने 14765 वाचनखूण प्रतिक्रिया 42

चौकटराजा Sat, 07/28/2012 - 04:27
मानवाच्या भंवतालचा सूक्ष्म निसर्ग कल्पकतेने टिपलाय. सारेच फोटू मस्त . १६ नंबरच्या फोटोत घुसून सरळ ती पाउलवाट जवळ करावी असे लगेचच वाटते. ज्या चित्रात घुसावेसे वाटते ते उत्तम चित्र असे काही मोठे छायाचित्रकार म्हणून गेलेत. वारूळाच्या मागची गूढ रानवाट बेस्ट ! सौरभ, वाउ !

चित्रगुप्त Sat, 07/28/2012 - 07:42
सर्व फोटो उत्तम. ( बघताना कॉपीराईटच्या खुणेमुळे रसभंग होतो... यावर काही इलाज करा: अगदी शेवटल्या फोटोत फूल आणि किडे खूप ठसठशीत असल्याने कॉ.रा. कडे एवढे लक्ष जात नाही, पण तेच तुटक्या झाडाच्या फोटोत झाडापेक्षाही कॉ.रा.च जास्त नजरेत भरतो... जणू आकाशातून एकादे यान अवतीर्ण होत आहे, असे वाटते. 'फोटोग्राफ बाय' सुद्धा पारदर्शक करून, एकूणच आकार लहान केल्यास बरे).

sanjivanik१ Sat, 07/28/2012 - 22:15
फोटो कशाचा टिपायचा आणि कसा टिपायचा यात फोटोग्राफीच खर गमक आहे अस मला वाटत. तुमच्या फोटोच content तर उत्तमच आहे पण ते उत्तम प्रकारे टिपले आहेत ते जास्त महत्वाच . वरून तिसरा फोटो मस्त angal ने टिपला आहे. माझ्या दृष्टीने तरी तो या सगळ्या फोटोत NO 1 . पाण्याचे थेंब अप्रतिम, माझ्या कडे पण cybershot च आहे S series चा साधाच camera आहे. पण तो पण या सारखाच भन्नाट काम करतो.

स्पंदना Mon, 07/30/2012 - 08:49
तो खेकडा कॅमेरा मागुन राह्यला का रे? दिलास का? सार्‍या फोटोंमध्ये एक प्रकारचा मार्ग दिसतो आहे मला तर. म्हणजे त्या गर्द गवतावर भोपळ्याच्या पानांची पाउलवाट, जणु एखादी फुलराणी त्यावरुन विहरणार आहे अस काहिस ..जाउ दे उगा दवणिय होइल. पण खासच रे!

नरेंद्र गोळे Mon, 07/30/2012 - 11:07
वा! उत्तम!! मन प्रसन्न करणारे निसर्गचित्रण! आवडले. चित्रचौकटींची निवड, चित्रातले केंद्रबिंदू, त्यांचेवरील प्रकाशसाधन, सुंदरता शोधण्याची आणि तीस आणखी सुबक पेश करण्याची आपली कला प्रशंसनीय आहे. अशाच उत्तमोत्तम चित्रणासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा!

प्यारे१ Mon, 07/30/2012 - 14:10
सगळेच फटु क्लास्स्स्स्स! खेकडा 'मला कडेवर घे ना' असं म्हणत असल्यासारखा क्युट आलाय! बाकी वर कुणी म्हटल्याप्रमाणं ते वॉटरमार्क कमी साईझचा कर रे!

किणकिनाट Tue, 07/31/2012 - 11:49
सर्वच फोटो अप्रतीम. जाळ्याचा विशेष उल्लेखनिय. खेकडा एकदम जिवन्त. खरे सान्गतो, स्क्रीनवर आला आणि खुर्चितच थोडा मागे सरकलो. किणकिनाट प्रस॑ग आणि सोबत पाहुन मी घ॑टा वा ग्लास बनतो पण प्रसन्न आणि मन्जुळ किणकिनाट हवाच..........

वेताळ गुरुवार, 08/02/2012 - 13:44
कॅमेर्‍यात फोटोग्राफरचे नाव देखिल प्रिण्ट छान होते आहे. ते कसे काय सेट केलेत?

सौरभ उप्स Fri, 08/03/2012 - 00:29
माफ़ करा.. ते वाटरमार्क्स जरा जास्तच मोठे आणि नको तसे चयाचित्रना त्रास देत आहेत.. माला उशिरा म्हणजे जेव्हा सगळा लेख प्रकाशित केला त्यानंतर लक्षात आल ते.. मग म्हटल जाऊ दे पुध्च्यावेलेस ही चुक पुन्हा करायची नाही.. सो, पुड्च्या वेळेस त्याची खबरदारी घेतली जाइल... तरी ज्याना पण फोटोस आवडले त्यांचे परत आभार.....

इनिगोय Wed, 08/15/2012 - 09:37
खूपच भारी आहेत फोटो तुझे.. एखादी गूढकथा वाचत असावं तसं वाटलं, विशेषतः तो वारूळाचा, दुभंगलेल्या झाडांचा आणि रानाच्या पार्श्वभूमीवर अगदीच खतरनाक आणि एकदम सूचक दिसणार्‍या घंटांचा फोटो बघून. मान गये.

पैसा Wed, 08/15/2012 - 13:35
सुपरलाईक! फक्त ते नाव जरा छोटं करायचं त्यवडं बगा!