एकदम सोपी, अगदी आयत्या वेळी ठरवून करता येण्यासारखी ही रवा इडली:
साहित्य-
२ वाट्या रवा, १ वाटी दही, मीठ चवीनुसार, १ चमचा तेल, १/२ चहाचा चमचा खायचा सोडा
कृती-
तेलावर रवा हलका भाजून घ्या, रंग बदलू देऊ नका.
दही घुसळून घ्या.
रवा कोमट झाला की त्यात दही व मीठ घाला ,पाणी घाला. रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे पाणी घालताना थोडे जास्त राहू द्या. हे मिश्रण कालवून साधारण अर्धा तास ठेवा.
इडली पात्राला तेलाचा हात लावून घ्या.
रव्यात सोडा घालून चांगले ढवळा व इडलीपात्रात घाला.
१२ ते १५ मिनिटे वाफवा.
आणि चटणी किवा सांबाराबरोबर किवा दोन्हीबरोबर खा.
चटणी-
१ वाटी खवलेला नारळ,अर्धी वाटी डाळं, ४-५ हिरव्या मिरच्या, पेरभर आल्याचा तुकडा, २ लसूण पाकळ्या, कोथिंबिर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर हे सगळे थोडे पाणी घालून वाटणे. दही किवा ताक घालून सरसरीत कालवणे.
हवी असल्यास वरुन तेल, मोहरी, उडीदडाळ, कढिपत्ता यांची फोडणी घालणे.


वाचने
11740
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा... सांबार इल्ले ?
तोंपासु
व्वा.... माझी आई असेच
वा! मस्तच
सांबार हवेच हो..
हो का...
In reply to सांबार हवेच हो.. by नाना चेंगट
रवा कशाचा
रवा
In reply to रवा कशाचा by सन्जयखान्डेकर
आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
काय शिंची कटकट आहे.... असले
In reply to आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह by परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ
In reply to काय शिंची कटकट आहे.... असले by बिपिन कार्यकर्ते
थांब. लवकरच आपल्या भेटीचा योग
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
बिका?
In reply to आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह by परिकथेतील राजकुमार
छे रे
In reply to आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह by परिकथेतील राजकुमार
सुंदर फोटो
+१
In reply to सुंदर फोटो by सहज
हायला... ही तर इडलीचटणीची
मस्त! अगदी हलकी झालेली दिसत
वा!
स्वयंपाकघरात एक इंच आलं मोजायला फूटपट्ट्या कोण ठेवतो?
In reply to वा! by पैसा
खल्लास!!
अहाहा...
In reply to खल्लास!! by चतुरंग
आहा.. सकाळीच इडली-सांबार खाऊन
स्वाती--- रवा कोण्ता
मस्त
मी केल्या होत्या पण
वॉव स्वाती तै.....
लय भारी! घरीच इडली ग्राईंडर
मस्त!
कधी येऊ खायला?
या प्रकाराने इडली मस्त
स्वातीताई, काल ह्या इडल्या