सध्या लिहायला फारसे काही सुचत नाही आहे. पण काहीतरी खरडायचे आहे.
काय करावे ?
म्हणून आता दिसेल ती नवी बातमी मिपावर चिकटवावी असे ठरवले आहे.
कुणाचा वाढदिवस, कुणाचे परीक्षेतील यश, कुणाचे लग्न, कुणाचा जन्म हेही मिपावर चिकटवणार आहोत.
याही पलिकडील बातमी असेल तर सोन्याहून पिवळे...
टोल बाबत सत्य काय ते जनतेसमोर मांडण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी केली होती.
त्याप्रमाणे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केल्यानंतर लक्षात आले की मूळ खर्चापेक्षा काहीपट टोल वसूल होत आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र टोल हा गंभीर प्रश्न बनला होता. महामार्गावर तर टोल आहेतच पण कोल्हापूरासारख्या ठिकाणी
शहरातील रस्त्यावरही टोल भरावा लागत असे.
यात काही टोल अनधिकृतही सापडले.
काही ठिकाणी ४० किमीच्या आत २ टोलनाके हाही प्रकार आढळला.
राज यांनी काढलेला मुद्दा महत्वाचा आहे.
टोल भरणे आवश्यक असेल तर त्याचा हिशेबही पारदर्शकपणे जनतेला मिळाला पाहीजे.
आपण पैसा कशासाठी देतो आहोत हे जाणून घेणे गैर नाही.
राज यांनी नव्याने मुद्दे काढले असे नाही. लोकांच्या मनातही शंका होत्याच.
यामुळे टोल म्हणजे वादावादी, बाचाबाची आणि मारामारीचे ठिकाण बनलेले पहायला मिळत असे.
अनेक ठिकाणी टोल भरायला नागरीक विरोध करीत असत तिथे लोकांना बदडून काढायला
टी शर्ट जीन्समधील पैलवान ठेवलेले असत.
काही अनधिकृत टोलला मोठ्या भाई, दादा नेत्यांचे आशीर्वाद आहेत असे समजते.
गरीबांच्या एस टी ला टोल का हा न कळणारा प्रश्न आहे.
प्रचंड गबर झालेल्या आमदार, खासदार यांच्या गाडीला टोलमाफी का असाही प्रश्न आहे.
टोल कुणाकुणाला माफ याची भली मोठी यादी दिलेली असते. पण
आपल्या मर्जीतल्या काही जीपवाल्यांनाही टोलमाफी दिली जाते.
वाहतूक पोलिस अशी खूण असलेल्या जीपला टोलमाफी नाही. पण ही गाडी प्रवाशांची वाहतूक करताना आढळू शकते.
एखाद्या आमदाराचे नाव सांगून त्याची गाडी टोल चूकवत प्रवासी वाहतूक करताना आढळू शकते.
म्हणजे सरकारी पैसा चूकवायचा आणि आपल्या तिजोरीत भरायचा हा काही जनप्रतिनिधींचा धंदा पहायला मिळतो.
राज यांनी आन्दोलन छेडले आहे. पुढे काय होइल सांगता येत नाही.
पण जे एकट्या दुकट्या सामान्य माणसाला शक्य नव्हते ते करायला आता सामान्य माणसाला हत्तीचे बळ आलेले आहे.
हे टोलविरोधी आंदोलन यशस्वी व्हावे हीच एक इच्छा !
वाचने
3097
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>वाहतूक पोलिस अशी खूण
कुणी कितीही बोंबाबोंब केली
असेच म्हणतो.....
In reply to कुणी कितीही बोंबाबोंब केली by शिल्पा ब
?
In reply to कुणी कितीही बोंबाबोंब केली by शिल्पा ब
हुम्म्म्म्म
चार चाकीही नाही आणि महाराष्ट्रातही नाही...
In reply to हुम्म्म्म्म by इरसाल
"चालू द्या" टायपता टायपता आठवलं
लोकं लाख विचार करतील पण पुढे
In reply to "चालू द्या" टायपता टायपता आठवलं by मी_आहे_ना
=))
In reply to लोकं लाख विचार करतील पण पुढे by शिल्पा ब
तुम्ही केलंय ना ! झालं तर मग!
In reply to =)) by सोत्रि
टोल-धाड
माज
उद्या तुमच्या सायकलसाठी
In reply to माज by परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ
In reply to उद्या तुमच्या सायकलसाठी by शिल्पा ब