✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बांगड्या आणि गजरा !! ..( Confusing but soooo sweet ! )

स
सुहास.. यांनी
Tue, 07/24/2012 - 11:16  ·  लेख
लेख
पुर्वप्रकाशित डिसक्लेमर : समस्या वैयक्तिक पातळीवरून मांडली असली तरी ती जागतिक समस्या आहे असे लेखकाचे मत आहे .शिवाय त्या समस्येचं आजवर कोणीही निवारण केले असण्याची शक्यता अतिशय कमी आहे (जे साक्षात ब्रह्मदेवाला जमलं नाही ते आम्हाला काय कप्पाळ जमणार आहे . शिवाय आमच्या मित्रांना, नवरा-बायकोच्या नात्यातला एक प्रकारचा जो गोडवा(भांडणातही आणि परस्परविरोधी सवयीतही ! ) असतो, त्याचा आंनद कसा लुटायचा हे ही सांगायचा आमचा एक झीण प्रयत्न ! ;) दिनांक : १ ऑगस्ट २००९ स्थळ : निळकंठेश्वर (कात टाकलेला रम्य निसर्ग) वेळ : साधारण सकाळी साडे आठ ती : खुप छान परिसर आहे रे हा. एकदम झकास . मी : काल-परवाच कोणीतरी सुचवला. ती : ती नारदमुनी ची मूर्ती किती क्युट दिसते आहे ना !( आँ !) मी : तुला एक सांगू ? मला मुर्तीच तितकसं महत्त्व वाटत नाही, पण आपण मूर्ती कडे किंवा एखाद्या वस्तूकडे बघताना आपल्या मनात असलेल्या त्याच्या प्रतिमे कडे बघत असतो असे मला वाटते. ती : म्हणजे ? मी : अगं ! तुझ्या हातात बांगड्या आहेत ? ती : नाssssssही !! मला बांगड्या घालायला अजिबात आवडत नाही. एक तर सर्जरी करताना खूप अडचण करतात आणि दुसरं म्हणजे ते स्त्री च्या... , जाऊ दे , तु सांग काय सांगत होतास ते ? मी : ओके बाबा , चल उदाहरणार्थ माझ्या हातातलं कडं घे , हे कडं गेली सहा वर्षे माझ्या मनगटात आहे. माझ्या फायनलच्या वर्षात मला चांगले टक्के मिळावेत म्हणून एका मित्राने आणून दिले होते ते मला शिर्डीवरून . ती : मग ? मी : आता हे बघ मी शिर्डीला कधी ही गेलो नाही. पण हे कडं मी मला फायनलला कमी टक्के पडले असून असूनही घालतो. ती : म्हणजे तुझा साईबाबा वर विश्वास आहे तर . मी : असेल ही बहुतेक , पण माझा माझ्या त्या मित्राच्या विश्वासावर विश्वास आहे हे नक्की . माझा हितचिंतक पॅरलली साई असला तरी , त्याच प्रकारे मूर्ती आणि प्रतिमेच आहे. ती : कधी-कधी तू खूप छान बोलतोस. मी : तुला आवडणार असेल तर असेच मी तुझ्याशी आयुष्यभर बोलू शकतो. (हजरजबाबी बाळ्यासाठी प्रचंड टाळ्या !) ती : हे 'प्रपोजल' आहे का ? मी : होय ! आय लव्ह यू ! लग्न करशील माझ्याशी ? ती : मला विचार करायला वेळ हवा आहे ? मी : दिला ! इथून आपल्याला जी पहिली सि.सि.डी. लागेल, तेथे थांबे पर्यंतचा ! ती : हा खूप कमी वाटत नाही तुला ? मी : मॅडम ! साल दोन हजार नऊ आहे हे ! थिन्क क्विक, अ‍ॅक्ट क्विकचा जमाना आहे हा आणि तेव्हढेच माझे कॉफीचे पैसेही वाचतील (समोरून धबधब्यावरून कोसळणाऱ्या खळाळत्या पाण्यासारखं हास्य !! जीव खल्लास !! हसली म्हणजे...हसली म्हणजे...म्हणजे रेशीमगाठ बसली ! ) ****************************************************************************** दिनांक १५ ऑक्टोबर २००९ स्थळ : माझ्या घरातील स्वयंपाकघर मी : मम्मी, तिला बांगड्या आवडत नाहीत. मम्मी : मग ? तिने घालाव्यात असं काहीही नाही. पण आपलं कर्तव्य म्हणून कराव्याच लागतील. मी : अगं म्हणून काय सोन्याच्या करायच्या ? मम्मी : हे बघ ! एक तर परक्या ची पोरं अशी पळवून आणल्यासारखी आणणार आहेस तु, मग तिचं सर्वकाही आपणच करायला नको का ? मी : अगं आधीच लग्नाचं सगळं काही करताना बँक बॅलन्स ला आग लागली आहे, जर परत रेसेशन मध्ये फसलो ना तर काही धडगत नाही माझी . मम्मी : गप्प बैस ! बापासारखेच कंजूष आहात सारे ! (आतल्या खोलीतून वर्तमानपत्र चुरगळलेला आवाज ! ) थांब, दोन मिनीटे आलेच मी. दोन मिनीट शांतता मम्मी : हे घे ***** , त्या अजुन **** टाक आणि बांगड्या घेउन ये. मी : पण मम्मी मम्मी : जा आता लवकर (आज्ञाधारक बाळ्या !) ****************************************************************************** दिनांक : २० ऑक्टोबर २००९ वेळ : सकाळी १०.३० स्थळ : आळंदीतील 'पवार' मंगल कार्यालयाचा स्टेज (समोर हवन ! मंत्र चालू ! समोर ३०-४० जणांचा गोतावळा ! ) ब्राम्हण : हम्म ! टाका . ती : इतक्या महाग बांगड्या आणायची काय गरज होती का ? मी : श्शsss ! आपण लग्न करतो आहे ना !! ब्राम्हण : हम्म ! टाका. मी : हार कुठे गेले ? ती : मम्मीकडे आहेत . अरे, सन दोन हजार नऊ आहे हे ! मॉर्डनायजेशनचा जमाना आहे हा . (न्युटनचा तिसरा नियम.) आज नंतर मी नाही घालणार . मी : घालू नकोस, पण किमान आजच्या पूर्ती तरी राहू देत. मम्मी : गप्प बसा दोघेही जरा ! लग्न लागतयं तुमचं. ब्राम्हण : हम्म ! टाका . ****************************************************************************** दिनांक : १८ नोव्हेंबर २००९ वेळ : सकाळी ७ स्थळ : माझ्या लोहगावातल्या घराचं किचन. ती : अय्या ! सोड , डॅडी उठतील ना ! मी : तुला सुट्टी असताना इतक्या लवकर का उठली आहेस ? ती : डँडी साठी साबुदाणे भिजवायला विसरले रात्री , म्हटल आता भिजवले की किमान अकरा पर्यंत तरी बनविता येतील . मी : मी बाहेरून आणतो ना ! ती : काही नको ! त्या पेक्षा एक काम कर , केळी घेउन ये. दुपारपर्यंत डॅडीं साठी वेफर्स आणि केळी तरी असतील.अरे पण तु काल उशीरापर्यंत काय ते स्क्रिप्टींग का काय तरी (बसला ना टोला सकाळी सकाळी !)करत होतास ना ? तु कसा काय लवकर उठलास ? मी : खरं सांगू ? तुझ्या हातातल्या बांगड्यांची किन-किन कानावर पडली आणि जाग आली.तुझ्या नाजूक गोऱ्यापान हातात हिरव्या-लाल आणि त्या सोन्याच्या बांगड्या छान दिसतात. ती : .......अरे मम्मीने एव्हढ्या प्रेमाने दिल्या आहेत म्हणून पंधरा-एक दिवस घातल्या. आता सवय झाली. ****************************************************************************** दिनांक : १४ मार्च २०१० वेळ : रात्री ११.५० स्थळ : माझं लोहगावातलं घर. (फोनवर , ती अमरावतीवरून ! ) मी : हां ! बोल गं ! ती : ........ मी : हॅलो ! माझा आवाज येतोय ना ! ती : (केवळ स्फुंदण्याचा आवाज ) मी : काय गं काय झालं रडायला. ती : ........... मी : अगं सांग की मला असे बेचैन करू नकोस. ती : त्या बांगड्या हो त्या ना !! त्या हरवल्या ? (हुंदके चालूच !) मी : अरे रे (कसं सावरायचं आता.) ती : माझ्या किती आठवणी होत्या त्यात (?) .मम्मी ने माझ्यासाठी आणल्या होत्या. मी : जाऊ देत . कधी हरवल्या ? ती : दोन दिवस झाले, सर्जरीला जाताना काढून ठेवल्या होत्या कप्बर्डमध्ये . नंतर येउन पहाते तर गायब. मी : म्हणजे चोरीला गेल्या असतील .आता एक काम कर, मी सोनाराशी बोलतो. त्याला पैसै पाठवितो आणि जशाच्या तश्श्या बांगड्या बनवायला सांगतो. मम्मीला आत्ताच काही सांगू नकोस. ती : आणि सोनाराने सांगीतले तर... मी : मी सांगतो त्याला काय सांगायच ते ! तू रडू नकोस. सर्वकाही ठीक होईल. ती : हम्म ! मी : जेवलीस ....................... ****************************************************************************** दिनांक : काल-परवा स्थळ : बैंगलोरच्या ऑफिसातली माझी खुर्ची वेळ : ऑफिस भरगच्च असल्याची .(तिचा फोन..) ती : हाय मी : हाय (दिल खूष !) , काय गं करमत नाही का माझ्याशिवाय ? आता दहा मिनिटांपूर्वी तर फोन केला होतास. ती : करमत नाही ते खरं आहे, पण डॅडींचा फोन आला होत आत्ता. ***** पाहिजेत म्हणाले . काय करू ? माझ्याकडे आहेत देऊ का ? मी : नको ! मी लगेच ट्रान्सफर करतो आहे. ती : मी दिले तर काय वाईट आहे. हे म्हणजे माझे ते माझे आणि तुझे तेही माझेच असे होते आहे. मी : तसे काही नाही गं ! वेळ पडल्यावर घेईन तुझ्याकडून. ती : ट्रान्सफर वरून आठवले. तु पुण्याला ट्रान्सफरचे काय केले आहेस ? मी : नाही गं अजुन. थोडा वेळ लागेल. ती : तुझं ना माझ्यावर प्रेमच नाही. मी : अस्सं कशा वरुन ? ती : तु आजपर्यंत मला कधी गजरा आणून दिलास का ? मी : क्काय ? (खुर्चीवरून पडल्याचा आवाज !! ) आयच्या गावात या मॉडर्नायजेशनच्या !!!!!!!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
6019 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

मस्त...

मन१
Tue, 07/24/2012 - 11:21 नवीन
पूर्वीही वाचले होते, तेव्हाही आवडले होते.
  • Log in or register to post comments

लै भारी रे.

प्रचेतस
Tue, 07/24/2012 - 11:29 नवीन
लै भारी रे.
  • Log in or register to post comments

खुपच छान

आप्पा
Tue, 07/24/2012 - 11:29 नवीन
आवडले. वाचुन मन प्रसन्न झाले. छान
  • Log in or register to post comments

......... च्यायच्चं....! काय

प्यारे१
Tue, 07/24/2012 - 11:32 नवीन
......... च्यायच्चं....! काय बोलू रे! :( ह्या 'मम्म्यां'नी पोरींच्या संसारातलं लक्ष कमी करायला पायजे राव. पोरी नि त्याहून जास्त जावई सुखी होतील. (सॉरी रे!)
  • Log in or register to post comments

हाहाहा

पप्पुपेजर
Tue, 07/24/2012 - 11:50 नवीन
+१ प्रतिसाद!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

यातील मम्मी या सासूबाई आहेत

रेवती
Tue, 07/24/2012 - 19:45 नवीन
यातील मम्मी या सासूबाई आहेत असा माझा समज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

+१

शैलेन्द्र
गुरुवार, 07/26/2012 - 19:34 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सुपर्ब !

जे.पी.मॉर्गन
Tue, 07/24/2012 - 12:44 नवीन
क्रिस्प अँड क्विक ! एक्दम झकास ! जे पी
  • Log in or register to post comments

'क ड क' रे वाश्या!!

प्रभो
Tue, 07/24/2012 - 13:42 नवीन
'क ड क' रे वाश्या!!
  • Log in or register to post comments

हाहाहाहा .. मस्त

मी_आहे_ना
Tue, 07/24/2012 - 14:24 नवीन
सुहास, मस्त एकदम... मजा आली वाचून
  • Log in or register to post comments

(No subject)

नाना चेंगट
Tue, 07/24/2012 - 14:27 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मस्तच!

sagarpdy
Tue, 07/24/2012 - 15:33 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

हा हा.. वाश्या. एकदम खुसखुशीत

मेघवेडा
Tue, 07/24/2012 - 16:57 नवीन
हा हा.. वाश्या. एकदम खुसखुशीत कुरकुरीत खमंग वगैरे.. मजा आवी ग्यो!
  • Log in or register to post comments

मस्त लिहलयं रे...

मदनबाण
Tue, 07/24/2012 - 18:28 नवीन
मस्त लिहलयं रे... ;)
  • Log in or register to post comments

मस्त रे!

पैसा
Tue, 07/24/2012 - 19:54 नवीन
कितीही वेळा वाचलं तरी तेवढीच मजा येतेय!
  • Log in or register to post comments

मस्तच.....खूप आवडले

निवेदिता-ताई
Tue, 07/24/2012 - 20:03 नवीन
मस्तच.....खूप आवडले
  • Log in or register to post comments

मस्तच... साध .. सरळ पण एकदम

गणेशा
Tue, 07/24/2012 - 20:18 नवीन
मस्तच... साध .. सरळ पण एकदम खरे चित्रण वाटले.. आवडले
  • Log in or register to post comments

प्रसन्न चित्रण.

बॅटमॅन
Tue, 07/24/2012 - 20:32 नवीन
प्रसन्न चित्रण.
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/24/2012 - 22:00 नवीन
आवडेश. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

झक्कास..

चिगो
Tue, 07/24/2012 - 23:24 नवीन
लै भारी भाऊ.. एकदम आवड्या..:-)
  • Log in or register to post comments

आवडले..

मोदक
Wed, 07/25/2012 - 00:12 नवीन
आवडले.. :-)
  • Log in or register to post comments

मस्त रे वाश्या! यातला बाळ्या

किसन शिंदे
Wed, 07/25/2012 - 03:38 नवीन
मस्त रे वाश्या! यातला बाळ्या म्हणून माझ्या नजरेसमोर फक्त तुच येतो आहे. ;)
  • Log in or register to post comments

एकदम मजा आली वाचताना

वीणा३
Wed, 07/25/2012 - 10:39 नवीन
एकदम मजा आली वाचताना :)
  • Log in or register to post comments

क्युट आहे. फक्त गजराच नाय बे

झकासराव
Wed, 07/25/2012 - 11:23 नवीन
क्युट आहे. :) फक्त गजराच नाय बे बर्‍याच गोष्टीनी अस होत. तु मला साधी एक सोन्याची अंगठी सुद्धा नाही दिलीस. तुझं माझ्यावर प्रेमच नाही हा डायलॉग ऐकुन बसलोय मी.. (साखरपुड्याची वेगळी बरं... )
  • Log in or register to post comments

वा!

साती
Wed, 07/25/2012 - 16:06 नवीन
मजा आ़ली! बायकोचं असं म्हणणं असेल की आईला वाईट वाटू नये (बांगडया हरवल्या एवढ्या प्रेमाने केलेल्या ) म्हणून बांगड्याना खर्च केला जरी बांगड्या ती घालणार असली तरी! माझ्यासाठी खास असा साधा गजरा तरी आणलास का?
  • Log in or register to post comments

मस्त! काही म्हण बांगड्या गजरा

स्पंदना
Wed, 07/25/2012 - 17:08 नवीन
मस्त! काही म्हण बांगड्या गजरा या गोष्टी पुरुष कधीही शेअर करु शकत नाहित त्यावर मक्तेदारी फक्त आमची.
  • Log in or register to post comments

बांगड्या गजरा या गोष्टी पुरुष

बॅटमॅन
Wed, 07/25/2012 - 18:39 नवीन
बांगड्या गजरा या गोष्टी पुरुष कधीही शेअर करु शकत नाहित त्यावर मक्तेदारी फक्त आमची.
ओ पण शेअर करायला बांगड्या गजरा पुरुष वापरतीलच कशाला नै का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

एक वेळ गजरा...

अनुरोध
Fri, 07/27/2012 - 13:37 नवीन
एक वेळ गजरा ठीक आहे (हातात बांधुन करु आम्हि शेअर ;) )...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

:)

निशदे
Wed, 07/25/2012 - 19:42 नवीन
च्यायला भारीच की........... :) आवडले..... फ्लो मस्त जमला आहे अगदी..........
  • Log in or register to post comments

छान लिहिलय....

ईश आपटे
गुरुवार, 07/26/2012 - 19:39 नवीन
छान लिहिलय.... खुसखुशीत.......
  • Log in or register to post comments

(No subject)

प्राजक्ता पवार
गुरुवार, 07/26/2012 - 21:58 नवीन
:)
  • Log in or register to post comments

क ड क!

सोत्रि
गुरुवार, 07/26/2012 - 22:52 नवीन
एकदम मस्त! :) - (नेहमीच खुर्चीवरून पडणारा*) सोकाजी * लग्नाला १२ होऊनसुद्धा ;)
  • Log in or register to post comments

(No subject)

शिल्पा ब
Fri, 07/27/2012 - 00:03 नवीन
:)
  • Log in or register to post comments

(No subject)

मितभाषी
Sat, 07/28/2012 - 17:35 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा