परवाचा दिवसच साला सुरु झाला तोच बेक्कारपणे.. ऑफीसला जायला निघणार तेवढ्यात फोन आला, " सर, इथून जवळच एक अपघात झालाय. एक बस पलटलीय.." म्हटलं, बोंबला ! आधी किती जखमी, मृत असतील ह्याची भिती. त्यातून मृत असतील तर बॉडीज हलवायला लागतात पटकन, नाहीतर जनक्षोभ, लॉ & ऑर्डर प्रॉब्लम नी काय काय.. मनात हे टेंशन असतांनाच हॉस्पिटलला फोन लावला, उपचारादींची तयारी करुन ठेवा म्हणून.
ह्या धाकधूकीत स्पॉटवर पोचलो. बस घसरुन उलटली होती तो गड्डा जेमेतेम ६-७ फुटांचा असल्याने, सुदैवाने जिवीतहानी झालेली नव्हती. तोपर्यंत लोकांनीही जखमींना इस्पितळात हलवलेले होते. म्हणून मग तिथल्या फॉर्मॅलिटीत न अडकता मी इस्पितळाकडे धाव घेतली.. २०-२५ जणं जखमी होते. काही किरकोळ जखमी होते, त्यांना मलमपट्टी करुन झाली होती. दोघांना जिल्ह्याच्या जागी हलवणे गरजेचे होते, त्यांना १०८च्या अॅम्बुलन्सने रवाना केले जिल्हा रुग्णालयाकडे..
नंतर डॉक्टर बोलली, "सर, एकदोन बाया अंडर ऑबझर्व्हेशन आहेत. उद्या सुट्टी देऊ शकतो. भेटणार का?" मी म्हटलं, चला.. वॉर्डात दोन-तीन बायका होत्या त्यांना भेटलो, बोललो.. तेवढ्यात एका बेडजवळ गर्दी दिसली. मी काय झालं ते विचारायला गेलो तिथे.. एक ४-५ वर्षाची चिंटूकली मलूलपणे बेडवर पडलेली होती, आणि तिच्या आजूबाजूला तिचे नातेवाईक बेडवर डोकं ठेवून रडत होते.. मी विचारलं, "काय झालंय हिला?" डॉक्टर बोलली, "ही अपघातात नव्हती. हिला सकाळी अॅडमिट केलंय. आम्हाला शंका आहे की तिला सिव्हीअर मेनिंनजाईटीस आहे. जिल्हा रुग्णालायात हलवायला पाहीजे.."
मी म्हटलं, " हलवा की मग.." ती बोलली की आम्ही तिच्या आईवडीलांना, नातेवाईकांना सांगतोय, पण ते ऐकतच नाहीयेत.. मी हबकलो. मी तिच्या आईवडीलांना विचारलं. ते म्हणाले, "सर, आम्ही तिला इथे आणलंय. आता तिच्या नशिबात असेल आणि देवाच्या मनात असेल तर वाचेल ती.." मला कळेचना, काय बोलावं ते.. वर म्हणे, तुराला (जिल्हा) नेतांना काही झालं तर? त्यापेक्षा आम्ही इथेच प्रार्थना करु आणि वाट पाहू.
माझी सरकलीच.. च्यायला, मुर्ख आहेत का काय हे लोक? मी बोललो त्यांना, "बाबारे, तिच्या नशीबात असेल ते होईल हे मान्य.. पण तुम्ही प्रयत्न तर करा. जिल्ह्याला नेतांना काही झालंच तर कमीत कमी प्रयत्न केल्याचं तर बरं वाटेल.. God helps them, who help themselves.." सीन होता तो ! नातेवाईक रडताहेत काय, तिच्या अंगावरुन हात काय फिरवताहेत, तिला पाणी पाजताहेत, प्रार्थना करताहेत.. पण तिच्यासाठी प्रयत्न न करता, देवावर हवाला टाकून बसलेत..
शेवटी थोड्याफार कनव्हिंसींग नंतर तयार झाले , तर तोपर्यंत १०८ निघून गेलेली.. (१०८ सेवा फुकट आहे, बाकीच्या रुग्णवाहीकांचे भाडे द्यावे लागते.) आता त्यांच्याकडे पैसे नव्हते. जुळवाजुळव करतो म्हणे, पण वेळ लागला असता. आधीच त्या पोरीला अॅडमिट करुन ५-६ तास झालेले.. मी डॉक्टरला विचारलं, "किती लागतील?" ती म्हणाली, दिड हजार.. माझा हात धर्मादाय कधी खिशात जात नाही. क्षणभर चलबिचल झाली. मग मी खिशातून पैसे काढले. त्या नातेवाईकाला म्हणालो, "आता नीघ. जेव्हा जमतील तेव्हा परत कर." (हो, नाहीतर एस डी ओ साहेब पैसे वाटतो म्हणून उद्यापासून गर्दी व्हायची माझ्याकडे.. ;-)) त्यांना अॅम्बुलन्समधे बसवून रवाना केलं, आणि लक्षात आलं की मी त्यांच्यापैकी कुणालाच नाव-पत्ता विचारला नव्हता ! गेले पंधराशे बुडीत खात्यात :-( !!
ऑफीसला परतलो.. डोक्यात हाच प्रसंग फिरत होता.. म्हटलं, काहीतरी केलं पाहीजे! पण काय, ते कळेना. शेवटी त्याच दिवशी संध्याकाळी ४ वाजता चर्च लिडर्स सोबत बैठक केली. त्यांना बोललो, की श्रद्धा आणि प्रार्थना ह्यावरील प्रत्येकाचा विश्वास, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण प्रयत्नांचे महत्त्वही समजवा लोकांना.. त्यांच्यापुढे कबूल केलं, की ह्याबाबतीत माझ्यापेक्षा तूमची ऑथॉरीटी जास्त महत्त्वाची आणि पॉवरबाज आहे. लोकांना सांगा की, प्रार्थनेत शक्ती असते पण तिला प्रयत्नांची जोड असेल तरच!
कबूल तर केलं बुवा त्यांनी.. प्रार्थना, देव आणि धर्माबद्दल असलेल्या लोकांच्या चुकीच्या कल्पना दुर करायचा प्रयत्न करणार म्हणून.. बघू.
त्या पोरीला वाचव रे, देवा !
वाचने
4436
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमच्या प्रार्थने बरोबर आमचीही
तेच तर..
In reply to तुमच्या प्रार्थने बरोबर आमचीही by इरसाल
त्याअर्थी
In reply to तेच तर.. by चिगो
असेल माझा हरी
चिगो मस्त लिहिलंस - म्हणजे लिहिलंस म्हणून थँक्यू
साक्षात मृत्युशी गाठ पडलेली
थोडासा असहमत..
In reply to साक्षात मृत्युशी गाठ पडलेली by आत्मशून्य
तिथे अंनिस आहे का? नसल्यास
In reply to थोडासा असहमत.. by चिगो
चर्चचा संबंध आहे. अंनिस जाणार
In reply to तिथे अंनिस आहे का? नसल्यास by बिपिन कार्यकर्ते
अहो बिका..
In reply to तिथे अंनिस आहे का? नसल्यास by बिपिन कार्यकर्ते
प्रकाटाआ..
In reply to तिथे अंनिस आहे का? नसल्यास by बिपिन कार्यकर्ते
अरेरे
हा विचित्र प्रॉब्लेम आहे...
तुरा नेत्याचा अन त्या छोट्या
अहो ताई
In reply to तुरा नेत्याचा अन त्या छोट्या by शिल्पा ब
असं होय! ठीक ए!
In reply to अहो ताई by चिगो
चिगो मला वाटतय मुलगी म्हणुन
शक्य नाही..
In reply to चिगो मला वाटतय मुलगी म्हणुन by स्पंदना
खरच? मग सॉरी.
In reply to शक्य नाही.. by चिगो
तिनदा?
प्र्.का.टा.आ.
एकदम विशेष अनुभव.. केलंस ते
स्व-धागा उत्थापन पातकम्..
मग वरचा अपर्णा अक्षय यांचा
In reply to स्व-धागा उत्थापन पातकम्.. by चिगो
अजी सायेब..
In reply to मग वरचा अपर्णा अक्षय यांचा by नितिन थत्ते