आषाढी स्पेशल : कोंबडी वडे (मालवणी वडे)
साहित्यः
गव्हाचे पीठ - २ वाटी
तांदुळाचे पीठ - १ वाटी
ज्वारीचे पीठ - पाऊण वाटी
बेसन - १/२ वाटी
धणे - १ चमचा
बडिशेप - १ चमचा
जीरे - १/२ चमचा
मेथी - १/२ चमचा
हळद - १ चमचा
मीठ चवीनुसार
तेल तळण्यासाठी
कोळसा - १
कृती:
१. कढईमधे धणे, बडिशेप, जीरे व मेथी भाजुन घ्यावी. हे गार झाल्यावर मिक्सर मधे एकदम बारीक पुड करुन घ्यावी.
२. एका भांड्यामधे सर्व पीठे, चवीनुसार मीठ, हळद व बारीक केलेली पुड टाकुन एकत्र करुन घ्यावे. हे पीठ गरम पाण्याने चपातीच्या कणके प्रमाणे मळुन घ्यावे.
३. हे करताना गॅसवर कोळसा गरम करुन घ्यावा व २-३ चमचे तेल गरम करुन घ्यावे.
४. मळलेल्या पीठामधे एक खड्डा करावा. त्यात गरम केलेला कोळसा ठेवावा व त्यावर गरम केलेले तेल ओतावे. लगेच ते पीठाने झाकावे.
५. ही कणीक झाकुन रात्रभर किंवा ७-८ तास उबदार जागी ठेवावी.
६. ७-८ तासांनंतर पीठ चांगले फुगुन येइल. पीठ परत एकदा थोडा तेलाचा हात लावुन मळुन घ्यावे.
७. कढईमधे तळणीसाठी तेल गरम करण्यास ठेवावे.
८. मळलेल्या पीठाचे छोट गोळे करुन घ्यावे. एका प्लॅस्टिकच्या पिशवीला तेलाचा हात लावुन त्यावर गोळा हाताने थापुन घ्यावा.
९. वडा एकदम पातळ किंवा एकदम जाड नको. वडा थापुन झाल्यावर त्या मधे एक भोक करुन घ्यावे.
१०. तेल गरम झाले असल्यास त्यात थापलेला वडा अलगद सोडावा. वडा दोन्ही बाजुने golden brown होई पर्यंत तळावा.
११. गरम गरम मालवणी वडे मटणाचा रस्सा किंवा चिकन सोबत serve करावा.
मटण मसाला
साहित्यः
मटण - १/२ किलो
कांदा - २
टोमॅटो - १
आले - १ इंच
लसुण - ४-५ पाकळ्या
सुके खोबरे - १/४ वाटी
आले-लसुण पेस्ट - २ चमचे
हळद - २ चमचे
लाल तिखट - २ चमचे
गरम मसाला - १ चमचा
धणे पावडर - ३ चमचे
मिठ - चवीनुसार
तेल - १/२ वाटी
कृती:
१. मटणाचे तुकडे करुन घ्यावेत. त्याला १ चमचा आले-लसुण पेस्ट, १ चमचा हळद, १ चमचा धणे पावडर व चवीनुसार मीठ लावुन घ्यावे.
२. एका पातेल्यात तेल गरम करावे. त्यात १/२ बारीक चिरलेला कांदा टाकुन परतुन घ्यावा. कांद्याचा थोडा रंग बदलल्यावर त्यात मटण टाकुन नीट परतुन घ्यावे व एकदम कमी गॅसवर झाकुन ठेवावे.
३. ५ मिनिटांनी मटणाला पाणी सुटले असेल. त्यात अजुन १ कप पाणी टाकावे व परत झाकुन शिजु द्यावे.
४. असे साधारण २०-२५ मिनिटामधे मटण शिजेल. गॅस बंद करुन मटण झाकुन ठेवावे.
५. गॅस वर १ कांदा, आले, लसुण व खोबरे भाजुन घ्यावे. ह्याची मिक्सर मधे एकदम बारीक पेस्ट करुन घ्यावी.
६. कढईत तेल गरम करावे. त्यात १ बारीक चिरलेला कांदा परतुन घ्यावा. त्यात १ चमचा आले-लसुण पेस्ट टाकुन परतावे.
७. कांदा परतल्यावर त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणे पावडर व चवीनुसार मिठ टाकावे.
८. हे १-२ मिनिटे परतल्यावर त्यात वाटलेला मसाला टाकुन निट परतुन घ्यावा.
९. हा मसाला तेल सुटे पर्यंत परतावा. त्या नंतर त्यात चिरलेला टोमॅटो टाकुन १ मिनिट परतावे.
१०. ह्यात आता शिजलेले मटण टाकावे. मसाला खुप घट्ट असल्यास त्यात थोडे थोडे मटणाचे सुप टाकावे.
११. झाकण ठेवुन मटण ४-५ मिनिटे शिजु द्यावे.
१२. गरम मटण फ्राय खाण्यासाठी तयार आहे.
वाचने
20083
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुप दिवसानंतर ...
धन्यवाद कौशी, हो, खुप
In reply to खुप दिवसानंतर ... by कौशी
आषाढी की गटारी स्पेशल .
छान
४थी स्टेप नाहि कळली...
ह्म्म..
In reply to ४थी स्टेप नाहि कळली... by अर्धवटराव
धन्यवाद आहो, कोळसा ठेवायचा
In reply to ह्म्म.. by मोदक
ओक्के...
In reply to धन्यवाद आहो, कोळसा ठेवायचा by Mrunalini
वा वा.. श्रावण आदि पाळत
कृती पेक्षा जे भन्नाट फोटो
जबरदस्त!!
बरोबर.
In reply to जबरदस्त!! by सानिकास्वप्निल
चल माझ्या पाकृ पेक्षा काहीतरी
चमचमीत