कलासाधना म्हणजे 'वास्तव आणि कल्पना' यांच्या सहाय्याने काहीएक निर्मित करण्याची आपली क्षमता. (The ability to create something with help of a fact & fiction) आपली साधना जेवढी जास्त, तितका जीवनात तणाव कमी, तितकं जगणं सोपं.
अस्तित्वात 'कला' असं काही नाही, ज्याला आपण 'चित्र' म्हणतो तो निव्वळ `भास' आहे. आपण जर एकाद्या चित्राच्या मागल्या बाजूला गेलो, तर आपल्याला निव्वळ कॅनव्हास व फ्रेम दिसेल. आपल्या सर्वांना हे माहिती देखील आहे पण तो बोध आपण आचरणात आणत नाही.
कला वस्तुस्थिती मानणं ही आपली केवळ धारणा आहे (जस्ट अ कन्विक्शन) आणि अशा अनेक धारणा आपल्याला आपण बंधनात आहोत असा आभास घडवतात. 'कला' या अत्यंत बेसिक धारणेचं निरसन करण्याचा हा प्रयत्न.
____________________
या बोधाला अध्यात्मात कला - रहितता (आर्टलेसनेस) म्हटलंय आणि कलारहितता जाणणार्याला कलाज्जयी (कलेवर विजय मिळवणारा) म्हटलय. कलारहितता हा कलासिद्धीचा गुणविषेश मानला गेलाय आणि कलामुक्तीला असाधारण महत्त्व आहे. आर्टलेसनेस जाणणं हे दीर्घ आणि अथक साधनेचं फलित समजलं गेलय पण तो उलगडा व्हायला खरं तर कोणत्याही साधनेची गरज नाही.
___________________
कलानिर्मितीत प्रक्रिया, प्रसंग आणि घटना आहेत ही गोष्ट उघड आहे आणि त्यांची कलात्मकता मोजण्यासाठी आपण कला हे भासमान परिमाण वापरलय. आपण नेहमी कोणत्याना कोणत्या प्रक्रियेत मग्न असल्यानं कलेचा सतत वापर करतो त्यामुळे कला वास्तविक आहे अशी आपली धारणा झालीये.
______________________
कला ही कल्पना म्हणून नितांत उपयोगी गोष्ट आहे. या कल्पनेमुळे माणसाची अनेक प्रकारे सोय झालीये आणि जगणं सुखावह झालंय हे निश्चित पण कला ही वास्तविकता आहे असं वाटल्यामुळे मनावर कलेचं सतत दडपण आहे. कला भास आहे हे ज्याला कळतं तो कलेपासून मुक्त होतो! कलेपासून मुक्ती आणि कलाकारी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
एखादी गोष्ट कल्पना आहे असं कळलं की आपण ती वापरू शकतो पण ती खरी आहे असं वाटलं की मग तणाव सुरू होतो.
कला या कल्पनेतून व्यक्तिमत्त्व निर्माण होतं म्हणजे आपण स्वतःला कलाकार किंवा नकलाकार समजायला लागतो किंवा बाकीचे आपल्याला तसं समजायला लागतात; मग प्रत्येक वेळी चित्र काढताना आपली स्वतः विषयीची प्रतिमा आपल्याला सहजतेनं चित्र पूर्ण करणं मुष्किल करते. कलेच्या बाबतीत असा ताण दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना असतो, कलावंत व्यक्तीला स्वतःची कलाकारी टिकवायची असते आणि नकलाकाराला नक्कल चुकवायची असते.
कला कल्पना आहे अशी पक्की खूणगाठ एकदा मनात बसली की तुमच्या मनावरचं कलेचं दडपण एकदम नाहीसं होतं, तुमची सृजनशीलता पराकोटीची वाढते, तुम्हाला कोणत्याही ठिकाणी अनेक दृष्यं दिसायला लागतात.
________________________
कला भास आहे हा तुमचा अनुभव झाला, मनोमन खात्री पटली की दुसरी एक अद्भुत घटना आपसूक घडते: आपण स्वत: 'कलाबाधीत' आहोत हे तुमच्या लक्षात येतं, आपण अ-कला आहोत! ज्याला कला भास आहे हे कळलं त्याच्यावर कला-क्षेत्रातील घटनांचा परिणाम हळूहळू न्यून होऊ लागतो.
चित्रांची निर्मिती कलेत आहे त्यामुळे चित्र कलेपासून वेगळे आहे. आता तुम्हाला हे देखील लक्षात येतं की 'कला' चित्राला आहे, आपल्याला नाही, आपण सदैव एकसारखे आहोत, आपल्याला चित्र कळलं, मूर्ती पण कळली, आणि वास्तुकला देखील कळेल पण आपण जसेच्या तसे राहू!
कलेशी तादात्म्य कमी झाल्यामुळे तुम्ही कमालीचे उत्साही होता. याचा अर्थ तुमची क्षमता कमालीची वाढून एखादा मोनालिसा वा एकदम सिस्टीन चॅपेल रंगवेल, असा नाही पण कलात्मकता आणि तुमचा उत्साह याची गल्लत होणार नाही. असेल त्या क्षमतेनं, जमेल तसे चित्र तुम्ही उत्साहानं काढू शकाल. थोडक्यात आपण कलाकार नाही, असं वाटल्यामुळे येणारा निरुत्साह संपूर्णपणे नाहीसा होईल. कला ही कल्पना आहे हा बोध आपल्याला चिरतरुण करतो, कलेचा आपल्या चित्तस्थितीवर परिणाम होत नाही.
_______________________
कला हा भास आहे हे ज्यानं जाणलं त्याला हे देखील कळतं की प्रत्येक कलानिर्मितीपेक्षा आपण वेगळे आहोत, त्यामुळे चित्रे बघण्याची त्याची क्षमता कमालीची वाढते. प्रेक्षक या आध्यात्मिक शब्दाचा नेमका अर्थ तो आहे.
कलेपासून जेवढे आपण मुक्त तितके आळसाशी संलग्न होत जातो, म्हणजे किती वाजले? उठायची वेळ झाली, यापेक्षा झोप आली, की झोपणे, असं सरळ, साधं, नैसर्गिक जगणं सुरू होतं. कलेशिवाय जगणं किती सुखाचं आहे हे कळायला थोडा वेळ जावा लागतो पण एकदा त्यातली गंमत कळली की मग अनायासे आपण अस्तित्वाशी एकरूप होत जातो. आपल्याला केव्हा पहुडावं, केव्हा लोळावं, केव्हा झोपावं ते कळायला लागतं! जाणीव एकदम प्रगल्भ व्हायला लागते.
____________________
कलारहितता कळणं तुम्हाला `अवकाश' किंवा `स्पेस' या परिमाणाला उपलब्ध करतं. अवकाश हे स्वास्थ्याचं निधान आहे, कलेमुळे ताण आहे, अवकाशाशी संलग्न होणं तुम्हाला स्वस्थ करतं.
अवकाश हे अस्तित्वातलं सर्वात रहस्यमय परिमाण आहे, एका अर्थानं ते सर्वत्र आहे आणि दुसर्या अर्थानं ते इतकं अपरंपार आहे, इतकं सर्वव्यापी आहे की नक्की कुठेय ते दर्शवता येत नाही.
कला न करणारा आळस परिमाणाला उपलब्ध होतो असं म्हणणं ही तितकंस योग्य नाही, तो स्वत:च आळस होतो, कमालीचा निवांत होतो, या निवांतपणाला अध्यात्मात समाधी म्हटलय!
_____________________
पैसा निदान कल्पना तरी आहे पण कला तर निव्वळ भास आहे, अर्थात हे तुम्हाला जरी पटलं तरी इतरांना लगेच पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. हा विषय वादाचा नाही, बोधाचा आहे. तुम्ही लगेच त्यावर मानसिक उहापोह करु नका त्या उलगड्यात काही काळ जगा, कलारहिततेचं वेळीअवेळी स्मरण करत तिचा निवांतपणा, त्या बोधातून येणारं स्वास्थ्य उपभोगा.
जेव्हा तुम्ही या बोधातून काही दिवस जगाल तसा तुमच्या जगण्यात, हालचालीत आळशीपणा यायला लागेल. ओशोंचं एक अप्रतिम वाक्य आहे, ते म्हणतात : "कला आलस्य में बदल जाती है"
जेव्हा हा बोध तुमच्या आचरणात येईल तेव्हा मग तुम्हीही दुसर्याला एकदम बिनधास्तपणे सांगू शकाल की `अरे, कला हा निव्वळ भास आहे! ' आणि मग ते त्याला पटो न पटो तुम्हाला काहीही फरक पडणार नाही कारण तो तुमचा अनुभव झालेला असेल!
-----------------------------------------
प्रेरणा: http://www.misalpav.com/node/22262
प्रतिक्रिया
__/\__
भारी हो चित्रगुप्त. आवडेश
मस्त मस्त लिहिलंय, धन्यवाद.
सोप्या भाषेत
सगळेच भास आहेत काय हे? काल,
भास भास भास
कळ
भन्नाट...
:)
चित्रगुप्तजी तुमचा लेख आत्ता शांतपणे वाचला, चांगला प्रयत्न आहे
चित्र इतकं मोहक असतं की
मी आहे ना!
तुम्ही ? नको नको.... इतर कोणी आहे का ?
वैयक्तिक नाही घेतलेलं, प्रामाणिकच माहिती आहे
झेन प्रॅक्टिस बद्दल
साला, आता ठोकू का झेनवर एक लेख?
ठोका ठोका...
राहुद्या हो.. सोडुद्या.
खट्याळपणा
येस सर!