साहित्य:
ताजी कोळंबी साफ करून, काळा धागा काढून घेतलेली
३-४ टेस्पून खोवलेला ओला नारळ
१ छोटा कांदा बारीक चिरलेला
२-३ टेस्पून नारळाचे घट्ट दूध
३-४ लाल सुक्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टेस्पून धणे
१ टीस्पून जीरे
४ लसूण पाकळ्या
१ टीस्पून काळीमिरीपूड (तुम्ही अख्खे मिरे वापरू शकता)
१/४ टीस्पून मेथीदाणे
१ टेस्पून चिंचेचा कोळ
१/३ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
पाकृ:
एका पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करुन त्यात लाल सुक्या मिरच्या, धणे, जीरे, मेथीदाणे, लसूण घालून परतून घ्या. (अख्खे मिरे वापरत असल्यास ते पण ह्यातच परतून घ्यावे)
त्यात खोवलेला ओला नारळ व काळिमिरीपूड घालून नारळ हलक्या तांबूस रंगावर परतून घ्या.
गार झाले की मिश्रण मिक्सरला थोडे पाणी घालून वाटून घ्या.
दुसर्या पॅनमध्ये तेल गरम करुन कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
त्यात हळद व वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्या.
आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी काढा.
आता त्यात कोळंब्या घालून, झाकून ४-५ मिनिटे शिजवावे.
कोळंब्या शिजल्या कि त्यात चिंचेचा कोळ व नारळाचे दुध घालून आणखीन २-३ मिनिटे शिजवावे.
बारीक चिरलेली कोथींबीर वरुन पेरावी व थोडेसे नारळाचे दुध घालून गरमा-गरम सर्व्ह करावे.
ही प्राँन्स घस्सी / गस्सी तुम्ही साध्या भाताबरोबर, चपाती किंवा नीर डोश्याबरोबर सर्व्ह करावी.
आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी काढा.
आता त्यात कोळंब्या घालून, झाकून ४-५ मिनिटे शिजवावे.
कोळंब्या शिजल्या कि त्यात चिंचेचा कोळ व नारळाचे दुध घालून आणखीन २-३ मिनिटे शिजवावे.
बारीक चिरलेली कोथींबीर वरुन पेरावी व थोडेसे नारळाचे दुध घालून गरमा-गरम सर्व्ह करावे.
ही प्राँन्स घस्सी / गस्सी तुम्ही साध्या भाताबरोबर, चपाती किंवा नीर डोश्याबरोबर सर्व्ह करावी.
वाचने
7671
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त दिसत्ये. नक्की करून
त्या बरोबर अप्पमची पण रेसिपी
In reply to मस्त दिसत्ये. नक्की करून by वीणा३
मस्तच............
खासंच...
धन्यवाद !
In reply to खासंच... by प्रभाकर पेठकर
छान
नक्कीच करता येऊ शकेल.
In reply to छान by स्मिता.
+१
In reply to नक्कीच करता येऊ शकेल. by प्रभाकर पेठकर
हो नक्कीच
In reply to छान by स्मिता.
प्राँन्स गस्सी
मस्त दिसतय... प्रोन्सऐवजी
++१
In reply to मस्त दिसतय... प्रोन्सऐवजी by कवितानागेश
लवकर..लवकर.
In reply to ++१ by पैसा
फोटू छान आलाय पण शाकाहारी
मला वाटतं फ्लॉवर वापरुन
In reply to फोटू छान आलाय पण शाकाहारी by रेवती
अहाहा!!!
वाह!
पाकृ आवडली....
घश्शी का म्हणतात? कोणत्या
शाकाहारी घश्शी
धन्यवाद.
In reply to शाकाहारी घश्शी by पैसा
सुप्पर!