Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नाना चेंगट on Wed, 07/18/2012 - 12:53
राम राम मंडळी आज आणि उद्या गटारी ! :) सर्व मिपाकर मित्र आणि मैत्रिणींना गटारीच्या शुभेच्छा आणि प्रेमाची भेट ! :) तुम्हाला जी आवडेल ती यामधून निवडा ! :) शँम्पेन (निवडक चोखंदळांसाठी) व्हिस्कीप्रेमींसाठी मस्ट :) रमप्रेमींनो घ्या ! :) व्होडका खास आमच्या काही दोस्तांसाठी :) कॉकटेल लहान मुलांसाठी :) ज्युस आमच्या मैत्रिणींसाठी फक्त ;) सिगारेट प्रेमींसाठी (प्रत्येकी जास्तीत जास्त दोनच. जास्ती सिगारेट पिणे हे खिशाला हानीकारक असते ) बिडी (अट्टल फुकाड्यांसाठी ) चकना (सर्वांसाठी) तर मंडळी गटारी जोरात साजरी करा मात्र लक्षात ठेवा १) दारु पिऊन गाडी चालवू नका २) क्षमतेपेक्षा जास्त पिऊन स्वतःची आणि इतरांची मजा किरकिरी करु नका ३) आपली घरी कुणीतरी वाट पहात आहे हे विसरु नका ४) दारुच्या नशेत आपण माणुस आहोत हे विसरु नका ५) जुने भांडण दारुत बुडून जाऊ द्या आणि पुन्हा मैत्री घट्ट करा. दारु किंवा अग्नी समक्ष घेतलेली मैत्रीची आणभाक आयुष्यभर टिकते असे म्हणतात ६) सर्व आटपल्यावर आपल्या आपल्याच घरी जा ७) जर शहराबाहेर कुठे गेला असाल आणि परत येतांना मधे निसर्गाच्या हाकेला ओ देऊन थांबलात तर रस्त्याच्या त्या बाजुला जा जिकडे वारा पाठीवर येईल. ८) हा सर्व माल आम्ही इकडून तिकडून खास तुमच्यासाठी आणला आहे, कुठून आणला, केवढ्याला आणला, विचारुन आणला का, जिथुन आणला त्याचे नाव सांगा वगैरे कांगावा करुन वात आणू नये. पुन्हा एकदा शुभेच्छा !! :)
  • Log in or register to post comments
  • 7706 views

प्रतिक्रिया

Submitted by प्यारे१ on Wed, 07/18/2012 - 13:05

Permalink

गटारीच्या हार्दिक

गटारीच्या हार्दिक शुभेच्छा! आम्हाला चखणाच बास्स! बाकी सर्कारी नियमानुसार कम्पल्सरी असल्यासारखं 'मात्र लक्षात ठेवा' आपल्याला काय पटलं नाय! जेला जे कराचं तेला ते करुन्देत की! बसवला टेम्पोत च्यायला!
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Wed, 07/18/2012 - 13:14

Permalink

निषेध

बिअरचा उल्लेखही नसावा?
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on Wed, 07/18/2012 - 13:20

In reply to निषेध by सर्वसाक्षी

Permalink

+१

निषेध. काय नाना बिअरला विसरलात?
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Wed, 07/18/2012 - 13:22

In reply to निषेध by सर्वसाक्षी

Permalink

सॉरी !

एक डाव माफी असावी. ही घ्या ! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on Wed, 07/18/2012 - 13:55

In reply to सॉरी ! by नाना चेंगट

Permalink

वा! एकदम चिल्ड!!

वा! एकदम चिल्ड!!
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Wed, 07/18/2012 - 13:18

Permalink

निशेध...

स्वदेशीचा साधा उल्लेखही न केल्या मुळे नानाचा निशेढ. देशीप्रेमी पैजारबुवा, सर्व बांधवांना गटारीच्या शुभेच्छा. (नानाच्या सुचना प्यायल्यावरही लक्षात राहील्या तर आपण पाणी पित आहोत असे समजावे व पेय ताबडतोब बदलावे.)
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on Wed, 07/18/2012 - 13:31

Permalink

णिषेध

आमची ओल्ड मंक कुठाय?????????? गटारीच्या शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

Submitted by चिम् चिम् मामा on Wed, 07/18/2012 - 13:32

Permalink

का प्राधान्य?

आज गटारी आहे म्हणुन काय तुम्ही सर्वाना नशा करायला प्रोत्साहन देत आहात? अहो तुम्हच्या मुळेच "न - पिणारे" पण प्यायला लागतात... पिण्याराना प्रोत्साहन मिळते... आणि सरते शेवटी काहितरी विघटित घड्ते. तुम्हचा उद्देश जरी असा नसला तरी लोक दारु प्यायचा विचार करतात... आणि येथुनच खरी सुरुवात होते. तुम्ह्च्या "मात्र लक्षात ठेवा" या अशा सुचना - विनवण्याकडे कोणी पाहत सुद्धा नाही... तुम्ह्ची पोर-बाळ जेन्व्हा नशा (दारु) करतील तेव्हा असे लेख मि.पा वर टाका... किवा त्याचा सोबत बसा (आपल्याच घरी ). या प्रतिसादाचा उद्देश फक्त आणि फक्त लोकाना जाग्रुत करण्याचा आहे... (माझा एक प्रयत्न आहे). मला शिव्या-शाप जेवढे घालायचे आहे तेवढे घाला पण मोह टाळा.
  • Log in or register to post comments

Submitted by नि३सोलपुरकर on Wed, 07/18/2012 - 13:52

Permalink

नाना

" दारु किंवा अग्नी समक्ष घेतलेली मैत्रीची आणभाक आयुष्यभर टिकते " हे मस्त लिहलेस.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 07/18/2012 - 14:49

Permalink

हार्दिक शुभेच्छा...! भरपुर

हार्दिक शुभेच्छा...! भरपुर खा.....प्या.... आणी पडा........ घरातच ;-) Image removed. अरे ते र्‍हायलं ना राव..... आपापल्या ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 07/18/2012 - 17:14

In reply to हार्दिक शुभेच्छा...! भरपुर by अत्रुप्त आत्मा

Permalink

याला म्हणतात बाटली

याला म्हणतात बाटली फुटणे......
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 07/18/2012 - 18:49

In reply to याला म्हणतात बाटली by ५० फक्त

Permalink

ह्या वयात ?

ह्या वयात ?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 07/19/2012 - 12:07

In reply to ह्या वयात ? by परिकथेतील राजकुमार

Permalink

बाटलीला वय असतं का ? ©º°¨¨°º©

बाटलीला वय असतं का ? ©º°¨¨°º© धरा ©º°¨¨°º© :-p
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 07/19/2012 - 12:16

In reply to बाटलीला वय असतं का ? ©º°¨¨°º© by अत्रुप्त आत्मा

Permalink

ऑ ?

बाटलीला वय असतं का ?
अभ्यास अभ्यास नाही गुर्जी ह्या क्षेत्रात तुमचा. अहो बाटलीच्या वयावरुन तिची किंमत हजारोत कमी जास्ती होत असते. :) आहात कुठे ?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 07/19/2012 - 12:47

In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार

Permalink

वयावरुन तिची किंमत हजारोत कमी

वयावरुन तिची किंमत हजारोत कमी जास्ती होत असते. Smile आहात कुठे ?>>> खरं आहे....आमचा तसा कसलाच अभ्यास नाही... ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 07/18/2012 - 15:00

Permalink

टक्के

जाहिरातबाजीचा क्षीण प्रयत्न या घासून गुळगुळीत झालेल्या टिप्पणीऐवजी थोडं खरमरीत विचारतो, या सगळ्या ब्रँड्सकडून किती टक्के? ;-) बिडीचं नाव काय आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Wed, 07/18/2012 - 17:05

Permalink

सर्वांना शुभेच्छा विजय

सर्वांना शुभेच्छा :) विजय मल्ल्या साहेबांनी श्रावणाच्या पुर्वसंधेला एक निवेदन सादर केले आहे..... कुत्रा पाळा, मांजर पाळा, घोडा पाळा..... वाटल्यास गाढव पण पाळा.... पण कृपया श्रावण पाळू नका ! विमान केंव्हाच रस्त्याला लागले आहे, आता भिक मागायला लाऊ नका :) ( पुढे ढकललेल्या इपत्रातून साभार )
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 07/18/2012 - 18:05

Permalink

आरं काय चाल्लंय.

प्रकाटाआ. नाना, माझं आपलं ठरलं आहे. नो गटारी वटारी. थोड्या वेळानं शीडीवर सॉरी चकतीवर पिच्चर पाहणार आहे. पिच्चर आहे. Tanu Weds Manu. गाणं आवडलं तर पोच द्या. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 07/18/2012 - 18:47

Permalink

धत्तेरे की

नुसत्या स्मायल्या काय टाकल्या आहेत. कमी त कमी फटू तरी टाकायचे. खरंतर आखाड-पार्टी अ‍ॅरेंक करायची... पाहिजे तर वैदिक पद्धतीने कर, आमची हरकत नाही. अवांतरः मुद्दा क्र. ७ अनुभवाचे बोल काय हो? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 07/18/2012 - 18:50

In reply to धत्तेरे की by रमताराम

Permalink

सहमत !

खरंतर आखाड-पार्टी अ‍ॅरेंक करायची... पाहिजे तर वैदिक पद्धतीने कर, आमची हरकत नाही.
'योगप्रभू' पद्धतीने चालणार असल्यास त्यांच्याशी त्वरीत संपर्क साधावा. ते कालपासूनच पार्टी आयोजित करण्याच्या मूड मध्ये आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 07/20/2012 - 23:07

In reply to धत्तेरे की by रमताराम

Permalink

गर्हणीय

रस्त्याच्या त्या बाजुला जा जिकडे वारा पाठीवर येईल.
अवांतरः मुद्दा क्र. ७ अनुभवाचे बोल काय हो?
ररा, नानासाहेब 'वारा येईल त्या दिशेने पाठ फिरवतात' हा तुमचा आरोप गर्हणीय आहे! ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Wed, 07/18/2012 - 20:05

Permalink

ज्जे बात!

वाहव्वा! नान्यासहित सर्वांना गटारीच्या शुभेच्छा ! - (रोजच गटारी करणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Wed, 07/18/2012 - 20:56

Permalink

कॉकटेल लहान मुलांसाठी??

कायतरी गल्लत दिसतेय ना! 'मॉकटेल' लिहायचं होतं का? आणि आजकाल किती मैत्रिणी फक्त ज्युस पितात? ;) बाकी गटारी जोरात साजरी करा :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Wed, 07/18/2012 - 22:09

Permalink

सांस्कृतिक अधोगती!

काय ही सांस्कृतिक अधोगती :( हटकेश्वर हटकेश्वर !!!
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 07/18/2012 - 22:12

Permalink

कॉकटेल लहान मुलांसाठी नाना

कॉकटेल लहान मुलांसाठी
नाना कितीही वयस्क असले तरी सोत्रिंची 'लहान मूल' अशी संभावना करणं काही बरोबर वाटलं नाही. सोत्रिसुद्धा अशी चेष्टा ते खपवून कसे घेतात कळत नाही ब्वॉ. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टिवटिव on गुरुवार, 07/19/2012 - 09:51

In reply to कॉकटेल लहान मुलांसाठी नाना by राजेश घासकडवी

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on गुरुवार, 07/19/2012 - 11:23

In reply to कॉकटेल लहान मुलांसाठी नाना by राजेश घासकडवी

Permalink

दिल दरिया आणि ..... असं काही

दिल दरिया आणि ..... असं काही म्हणतात, तसे काहिसे आहे माझे ;) -(दरिया दिल) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 07/20/2012 - 08:29

In reply to दिल दरिया आणि ..... असं काही by सोत्रि

Permalink

अरे सोकाजी, तुझ्यातही एक मूल

अरे सोकाजी, तुझ्यातही एक मूल नाही का दडलेलं? -- अदिती दवणे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Fri, 07/20/2012 - 23:41

In reply to अरे सोकाजी, तुझ्यातही एक मूल by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

तुझ्यातही एक मूल नाही का

तुझ्यातही एक मूल नाही का दडलेलं?
त्याचीही सध्या पौगंडावस्था सुरू झालीय बहुतेक ;) - (प्रौढ) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sat, 07/21/2012 - 00:17

In reply to तुझ्यातही एक मूल नाही का by सोत्रि

Permalink

OK don't loose ur heart मग

OK don't loose ur heart मग त्या पौगंड मुलामधे एक मूल दडलेले असेल शोधा म्हणजे सापडेल खोजनेसे भगवान भी मिलते है (संशोधक) जोग
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on गुरुवार, 07/19/2012 - 02:09

Permalink

चढलेली सगळी उतरली

हिंदीतून मराठीत केलेले भाषांतर वाचून... "क्षमतेपेक्षा जास्त पिऊन स्वतःची आणि इतरांची मजा किरकिरी करु नका" दोन चार पेग मारूनच लिहीलंय काय?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 07/19/2012 - 21:43

In reply to चढलेली सगळी उतरली by रामपुरी

Permalink

_/|\_

_/|\_ :)
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Fri, 07/20/2012 - 22:48

Permalink

सूचना अति उपयुक्त शेवटची

सूचना अति उपयुक्त शेवटची सूचना वाचून नाना चेंगट हे चालू व्यक्तिमत्व असले पाहिजे असे निरीक्षण नोन्दवतो
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Fri, 07/20/2012 - 22:50

Permalink

देशावर फार प्रेम

देशावर फार प्रेम असल्याने 'देशी'चाच पुरस्कार करेन
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com