श्री. स्टिफन कोवे या प्रसिद्ध लेखकाचे आज वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त वाचले.
स्टिफन कोवे यांचे "The 7 habit of effective people" नावाचे जगविख्यात असे पुस्तक आहे. आजपर्यंत २ कोटी इतक्या प्रतींची विक्री या पुस्तकाची झालेली आहे. जगातील ३७ भाषांमध्ये याचे भाषांतर झालेले आहे.व्यक्तिगत परिणामकारकता गाठण्यासाठी या पुस्तकाने अनेकांना मदत केलेली आहे.
या पुस्तकातील यशस्वी होण्याची सप्तपदी खालील प्रमाणे.
व्यक्तिगत विजयाच्या ३ पायर्या.
सवय क्र. १ : भविष्याकाळासाठी सक्रिय व्हा. ( Be proactive).
सवय क्र. २ : आपण जे काय करणार आहोत त्याचा शेवट कसा असेल याचा अदमास घ्या. ( Begin with end in the mind).
सवय क्र. ३ : बाहेर च्या गोष्टी योग्य त्या आशयातून समजावून घ्या. ( Put first thing first).
सार्वजनिक विजयाच्या ३ पायर्या.
सवय क्र. ४ : आहे त्या स्थितीत सर्वांचा फायदा होईल असा निर्णय घ्या. ( Think win-win)
सवय क्र. ५ : अगोदर समजावून घ्या आणि मगच इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. ( seek first to be understand and then to be understood).
सवय क्र. ६ : रचनात्मक संवाद आणि निर्मितीचा प्रयत्न करा. ( Synergize).
नूतनीकरणाची शेवटची पायरी.
सवय क्र. ७:: स्वतःचे कौशल्य सदोदित प्रगल्भ करत जा. ( sharpen the saw).
मला या पुस्तकातील श्रवण क्षमता हा विषय मनापासून आवडला आणि बर्यापैकी फायदाही झाल्याचे नमुद करावे वाटते.
या प्रतिभावंत लेखकाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली आणि एकदातरी हे पूस्तक वाचावे ही शिफारस.
द्वारकानाथ कलंत्री.
वाचने
2814
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
श्रद्धांजली !!!
स्टिफन कोवेंना श्रद्धांजली.
श्रद्धांजली!
स्टिफन कोवें यांना
श्रद्धांजली...
श्रद्धांजली..