Skip to main content

सफेद सौंदर्य व सुगंध

लेखक जागु
Published on मंगळवार, 17/07/2012
मी मनोगत नाही लिहत ह्या फुलांवर तुम्ही पाहून भावनीक सुगंध अनुभवावा व नेत्रसुख घ्याव ही विनंती. १) निवडूंग (ब्रह्मकमळ) २) जुई ३) मोगरा ४) डबल मोगरा ५) मदनबाण ६) रातराणी ७) कवठी चाफा ८) चाफा ९) अनंत १०) सोनटक्का ११) प्राजक्त १२) रानजाई १३) तगर १४) डबल तगर १५) सदाफुली १६) कण्हेर १७) मेहंदी १८) गुलाब १९) कांचन २०) तामण २१) लिलि २२) बकुळ २३) कुंती २४) नेवाळी २५) मोतीया २६) जास्वंद २७) लिलि
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 18182
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

सुरेख फोटो. लाल आणि पिवळा जास्वंद माहित होता. पांढरा जास्वंदही सुरेख. बाकी लिलीच्या फोटोवरून हे आठवलं.

मदनबाण नावाचं फुल माहित नव्हतं. तगर फुल बघुन बालपणीच्या आठवणी दाटुन आल्या :( कित्येक दिवस... नव्हे, वर्ष झाली हे फुल बघुन. अर्धवटराव

फूलं खुपच आवडली . कॉपी / पेस्ट करुन ठेवली आहेत . परवानगी न घेता क्षमस्व !

अप्रतिम! सुगंध पोचला! ही सगळी फुलझाडं तुमच्या घरी असतील तर तुमच्या वैभवाचा हेवा वाटतो आणि चिकाटीचं कौतुक वाटतं :-)

पण तगर व सदाफुलीला सुगंध असतो?

सुरेख फोटो..:) सुंदर फुलांचा फोटोंबरोबर त्या त्या फुलाचा सुगंध अनुभवल्या सारखे वाटले..

किसन घ्या नक्की. केशवराव त्यात कसले क्षमस्व ? आस्वाद घेण्यासाठिच फोटो टाकले आहेत. सहज म्हणूनच मी वरचे टायटल सुगंध व सौंदर्य टाकल आहे. त्या फुलांना सुगंध नसला तरी सौंदर्य असत. वल्ली, निवेदिता, जाई, अर्धवटराव, सुनिल धन्यवाद. बहुगुणी त्यातील कुंती, तामण, बकुळ, मेहंदी, कण्हेर माझ्याकडे नाहीत.

अप्रतीम फोटो. बहुगुणी म्हणतात तसं "ही सगळी फुलझाडं तुमच्या घरी असतील तर तुमच्या वैभवाचा हेवा वाटतो आणि चिकाटीचं कौतुक वाटतं "

लई भारी! एखाद्या पार्टीचा ड्रेस कोड असतो तसं ही सगळी मंडळी व्हाईट व्हाईट घालून आली आहेत का काय असं वाटतंय....

--^--^--^-- काय वेचुनी काय वेधावे प्रतिक्रीयेसी काय लिहावे शब्द संपले लिहुनी...लिहुनी वंदन करितो तुझीया चरणी --^--^--^--

सुंदर फोटो...प्राजक्ताचा आणि तामणचा एकदम मस्त!!

याआधीही अनेक वेळा लिहिलंय तसंच यावेळीसुद्धा जागुताईचा धागा ज्या अपेक्षेने उघडला त्याहून खूप काही मिळालं ते फोटो बघून. पावसात भिजलेली ही सुगंधी पांढरी फुलं बघून डोळे मिटले आणि माझ्या घरची ओली, सुगंधी, पावसाळी संध्याकाळ मनात अनुभवली.

सुप्रसिध्द(?) चित्रकार हुसेन यानी श्वेताम्बरी नावाचे प्रदर्शन भरवताना कोरे कान्वास ठेवून जे केले त्याजागी हे फोटु बघुन पेन्टिन्ग करायला हवे होते.... फोटो नव्हेत हे. कलाक्रुती आहेत.

परत एकदा म्हणतो, प्राजक्ताची फुलं. :-)

किती वर्षांनी बकुळी ची फुलं बघितली, खूपच छान वाटलं. माझ्या आजोळी बकुळी चा झाड आहे. लहानपणी छोटे छोटे गजरे करून हातात पायात डोक्यात गळ्यात घालायचो, खूपच मजा यायची :). अनंत पण होता, पण केस छोटे असल्यामुळे कधी डोक्यात घालता आला नाही. पण वास खूपच छान असतो त्याचा. सगळीच फुलं मस्त.

जोशिले, अभिजीत, श्रावण मोडक, पैसा, विणा, टुकुल धन्यवाद. विणा बकुळीची लिंक देते तुला माझ्या लेखनाची खरडवहीत.

यातील काही फुले-मदणबाण्,कुंती,मेहंदी,तामण्,मोतीया हि फुले फार पहायला मिळ्त नाहीत ती कुठे आढ्ळ्तात ते सांगाल का? आणी त्याची झाडे कुठे मिळु शकतील तेही सांगावे पण फोटो मात्र अप्रतिम आले आहेत

जागु, शुभ्रतेचा निसर्गाचा अविष्कार नेमका टिपला आहेस. खुपच सुंदर. लहाणपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.