मी काही महिन्यांपूर्वी आयडिया ची ३जी सेवा (८५० रुपये मासिक शुल्क आणि ३ जीबी वापर मर्यादा) ऍक्टिवेट करण्यासाठी विनंती केली.दुसऱ्या दिवशी कस्टमर केअर एक्झिकेटिव्ह ने मला ती सेवा ऍक्टिवेट झाल्याचे सांगितले आणि मी इंटरनेट वापरायला सुरुवात केली , पण मिळत असलेली सर्विस अतिशय खराब होती . ७.१ mbps चा स्पीड सांगून ३ mbps पण स्पीड मिळत नव्हता , डाटा अपलोड करताना तासंतास वाट बघावी लागत होती , ह्या दरम्यानच्या काळात आयडिया कस्टमर केयर ला तक्रार केली पण काहीच सेवा दिली गेली नाही, अखेर काही दिवसांनी बिल भरायला पत्र आले तेव्हा मी स्पष्ट सांगितले कि माझी सर्विस नीट करा आणि मग पैसे घ्या, पण तसे काही झाले नाही आणि काही दिवसांनी माझे कनेक्शन बंद झाले , त्या नंतर देखील मी काही वेळा आयडिया कस्टमर केयर ला फोन केले पण काही प्रतिसाद मिळाला नाही ,
आता मला बिल भरण्यासाठी कायदेशीर कारवाईची धमकी दिली जात आहे , तरी ह्या विषयी मी कोठे तक्रार करू शकतो तसेच असा अनुभव ह्या पूर्वी कोणाला आला आहे का ह्या विषयी सल्ला हवा आहे .....
वाचने
2437
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
अटी लागू
७.१ एम बी हे सांगणे म्हणजे
तुम्ही कुठल्या गावात आहात?
७.१ mbps चा स्पीड सांगून ३
कारण
In reply to ७.१ mbps चा स्पीड सांगून ३ by आत्मशून्य
8 bits = 1 Byte
In reply to कारण by तुषार काळभोर