साहित्य -
१) १ वाटी तुरीची दाळ (यासोबतच हरभरा किवा मसूर / मुग दाळहि घालू शकता)
२) ५ लसून पाकळ्या (बारीक चिरून घ्यावे)
३) १ इंच आले (बारीक चिरून घ्यावे)
४) हिरव्या मिरच्या - ५ (बारीक चिरून घ्याव्या )
६) फोडणी साठी - कडीपत्ता , जिरे आणि तेल
७) तडका साहित्य - गरम मसाला, लाल तिखट, २-३ लाल सुक्या मिरच्या.
कृती -
१) तुरीची दाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी.
२) एका कढई मध्ये थोडे तेल घालून चांगले कडक होऊ द्यावे त्यात आधी मिरच्या , कडीपत्ता , जिरे घालावेत. नंतर आले लसून घालून एक दोन वेळा परतून लगेच त्यात शिजलेली दाल घालून थोडेसे पाणी घालून उकळू द्या. एक दणदणीत उकळी आली ki लगेच खाली उतरवून एक भांड्यात काढून घ्या.
तडका -
१) कढई मध्ये फोडणी पेक्षा थोडे जास्त तेल घालून चांगले कडकडीत तापू द्यावे. तेल तापले कि ग्यास बंद करून त्यात गरम मसाला, लाल तिखट, लाल सुक्या मिरच्या तुकडे करून घालाव्यात आणि हा तडका तयार डाळीवर घालावा.
दाल तडका कालच केला होता पण फोटो काढण्याआधीच संपला त्यामुळे फोटोसाठी क्षमस्व !!
वाचने
10125
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मोठ्या अपेक्षेने धागा उघडला
+१ फोटु का नाही वो टाकला
In reply to मोठ्या अपेक्षेने धागा उघडला by पियुशा
फोटू नसल्यामुळे... पास...!
तडका पोहचला नाही.
फोटो लवकरच टाकण्यात येईल !!
आमचूर
प्रतिक्रिया लवकरच टाकण्यात
+१
In reply to प्रतिक्रिया लवकरच टाकण्यात by परिकथेतील राजकुमार
मस्त ... मला कॄती हवीच
बरेचदा पाककृती काय आहे या