Skip to main content

कोण कुणाचा शत्रू ?

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 11/07/2012 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरचे काही धागे वाचल्यानंतर माझ्या मनात खालील शंका उद्भवल्या आहेत. शत्रू नसलेल्या मित्रांसाठी नम्र विनंती. कृपया खुलासा व्हावा. ( ढीसक्लेमर : सदर शंका प्रामाणिक असून कोणाही धागाकर्त्याचे मन दुखावण्याचा त्यामागे हेतू नाही. ) आयड्या बायड्यांचे शत्रू असतात का ? 'मित्रं' शत्रूंचे शत्रू असतात का ? विडंबन धाग्यांचे शत्रू असतात का ? सुडंबन विडंबनाचे शत्रू असतात का ? डू. आयडी 'धू' (वांधार) आयडींचे शत्रू असतात का ? (पोटप्रश्न : शत्रूंचे डू. आयडी कसे ओळखावे ?) प्रतिसादक धागाकर्त्याचे शत्रू असतात का ? उपप्रतिसादक प्रतिसादकांचे शत्रू असतात का ? मालक कुणाचे शत्रू असतात का ?

वाचने 3943
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

In reply to by कवितानागेश

======================== आजचा सुविचारः संपादकांना टोमणा मारा , विचारवंत व्हा! ;) -सुहासू

In reply to by सुहास..

चूक ! आजचा सुविचार : संपादकांना खरडा, विचारवंत व्हा ! नानात्सु किंवा आजचा सुविचार : विचारवंतांचे मित्र बना, संपादक व्हा ! नानात्सु ( संपादक फारसे मनावर घेणार नाहीत, घेतले तरी .... असो ;) )

In reply to by नाना चेंगट

तुम्हारा बी चुक्याच ! ( सांगु का मास्तरांला ! ;) ) आजचा सुविचार : संपादकांशी भांडा , टिआरपी खेचा ! वेतन सुमार सगळे ;) किंवा आजचा सुविचार : नानबांचे मित्र बना, वैदिक व्हा ! पिळवटलेला हातरूमाल* *सौजन्य : ऋष्या किंवा आजचा सुविचार : वाचनमात्र व्हा, कष्ट वाचवा ! ;) वाश्या दिलदार

मिपावरचे काही धागे वाचल्यानंतर माझ्या मनात खालील शंका उद्भवल्या आहेत. >>> नेमके कुठले धागे ( पायपुसणीचे का ;) ) आणि नेमक्या कुठल्या शंका शत्रू नसलेल्या मित्रांसाठी नम्र विनंती. >>> || आंजांवर ना कोणी शत्रु ना कोणी मित्र || हि उक्ती अजुन आपल्यापर्यंत पोचली नाही का ? कृपया खुलासा व्हावा. >> एक विनोद पत्रकार = अर्ध्या तासात संपणारा विषय दोन दिवस धगत ठेवणे . शिक्षक = दोन दिवस चालणारा धडा अर्ध्या तासात संपविणे. आपल्याला काय हवे ? ( ढीसक्लेमर : सदर शंका प्रामाणिक असून कोणाही धागाकर्त्याचे मन दुखावण्याचा त्यामागे हेतू नाही. ) >>> अरे रे , किती ही विनशीलता ? आयड्या बायड्यांचे शत्रू असतात का ? >> उलट विचारा, बायड्या आयड्यांचे शत्रु असतात का ? 'मित्रं' शत्रूंचे शत्रू असतात का ? >> नव्हे शत्रुघ्न सिन्हा असतात ...खा मो श !! विडंबन धाग्यांचे शत्रू असतात का ? >> नाही ! मस्का बन असतात ;) सुडंबन विडंबनाचे शत्रू असतात का ? >> सुड ला विचारा .... डू. आयडी 'धू' (वांधार) आयडींचे शत्रू असतात का ? (पोटप्रश्न : शत्रूंचे डू. आयडी कसे ओळखावे ?) >> मोट्टा प्रश्न आहे ...वाचक/ लेखक/प्रतिसादक/ सिध्दहस्त लेखक/जिलबी लेखक आणि नवोदित लेखक...यापेक्षा सरळ ऑपरेटर ला विचारा प्रतिसादक धागाकर्त्याचे शत्रू असतात का ? >> तुम्ही पुण्याचे दिसता ;) उपप्रतिसादक प्रतिसादकांचे शत्रू असतात का ? >> नाही ...सहप्रतिसादक ( व्वा काय शब्द सापडलाय ;) ) असतात. मालक कुणाचे शत्रू असतात का ? गेल का कोंबड पाण्यात !! अहो मालकांना ट्यारप्या नको का ??

कोण कुणाचा शत्रू ? = हे कळणं मुष्किल आहे.. पण शत्रू हा शब्द सदर धाग्यात १२ वेळा आल्याने, शत्रू या धाग्याचा मित्र आहे.... हे नक्की ;-)

In reply to by शिल्पा ब

१-२ का ? शत्रुत्वाचा मुद्दा पुष्कळशा धाग्यांमधून अन प्रतिसादांमधुन डोकावताना दिसला. खरं तर धाग्यापेक्षा प्रतिसाद, उप-प्रतिसाद, छुपे-प्रकट तीर अन क्षेपणास्त्रे यांनीच भंजाळले. (कोण म्हटलं ते, 'कुछ लेते क्यूं नही ?' )

In reply to by सस्नेह

चालायचंच!! कोणीच कोणाचं नसतं का म्हणतात ना! तुम्हीच काय ते करायला पुढाकार घ्या आता...तुमच्या सहीप्रमाणे. खरं का नै?

या सारख्या प्रश्नांची उकल्-उत्तरे फक्त "विचारवंत" देउ शकतील सबब हा ध्यागा पास...