Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 07/09/2012 - 02:31
मित्रांनो आपण बरेचदा शासकीय कार्यालयांवर इंग्रजी खेरीज हिंदी (केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्यास) व मराठी (राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्यास) नावे वाचतो पण बहुतांश वेळा त्यांच्या इंग्रजी नावांचा व्यवहारात उपयोग होतो. पण लक्ष देऊन वाचल्यास भारतीय भाषांतील नावे कधी फार मजेदार तर कधी फार कंटाळवाणी वाटतात. उदा. पुण्यातील बायपास रस्त्याचे मराठी नाव - कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्ग (सलग १० वेळा म्हणायला गेल्यास कच्चा पापड पक्का पापड सोपे वाटेल). पण जर आपण लक्ष देऊन ही नावे समजून घेतली अन त्यांचा वापर सुरू केला तर अनेक फायदे होतील, जसे १) आपल्या भाषांमधले कमी वापरल्या शब्दांचे अर्थ अधिक चांगल्या प्रकारे कळू लागतील २) यातील बहुतांश उच्चारायला जरा अवघड वाटतील पण त्यांचा वापर करून करून बऱ्याच उच्चारदोषांचे उच्चाटन करता येईल. व एखादी भाषा नव्याने शिकताना उच्चारक्षमतेत मिळवलेल्या लवचीकतेचा बराच उपयोग होईल. (याबाबत परदेशी भाषांत पारंगत असणाऱ्या मिपाकरांचे विचार ऐकण्यास उत्सुक). ३) ज्यांच्या कुटुंबात लहान मुले असतील तर अशी नावे उच्चारायचा सराव त्यांच्याकडून करून घेतल्यास त्यांची उच्चारक्षमता जोमाने विकसित होण्यास मदत होईल. ४) अनेक भाषातज्ज्ञांनी परदेशी संज्ञांना एतद्देशीय स्वरूप देण्याचे अवघड व बहुमोल कार्य केले आहे, त्यांच्या या कार्याचा आपापल्या परीने गौरव करता येईल. चला तर मग या धाग्यावर या प्रकारच्या नावांची चर्चा व त्याविषयी अधिक माहितीचे आदानप्रदान करूया. काही उदाहरणे:
इंग्रजी नाव हिंदी / मराठी नाव
Agricultural Products Marketing Committee (APMC) कृषी उत्पन्न बाजार समिती (कृ उ बा स)
Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
Maharashtra State Electricity Board (MSEB) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म रा वि म)
State Reserved Police Force (SRPF) राज्य राखीव पोलिस दल
Central Reserved Police Force (CRPF) केंद्रीय राखीव पोलिस दल
National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) राष्ट्रीय कृषी और ग्रामीण विकास बँक
National Environmental Engineering Research Institute (NEERI) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान
Defense Research and Development Organization (DRDO) रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन
अवांतर - महाराष्ट्रातील नगरपालिका व महानगरपालिकांमधील सदस्यांना पूर्वी नगरपिते असे संबोधले जायचे. त्याचा अर्थ जरी नगराचे पालक असा होत असला तरी तो नगराचे रक्त पिते (पिणारे) असा घेतला जायचा. मुंबईचे महापौर असताना मनोहर जोशींनी त्याऐवजी नगरसेवक हा शब्द सुचवला जो पुढे जाऊन इतका रूढ झालाय की नगरपिते हा शब्द कधी अस्तित्वात होता याची शंका यावी.
  • Log in or register to post comments
  • 7062 views

प्रतिक्रिया

Submitted by शिल्पा ब on Mon, 07/09/2012 - 03:23

Permalink

शेवटचे दोन सोडले तर इतर

शेवटचे दोन सोडले तर इतर समजतात अन उच्चारायला अवघड नाहीत. रोजच्या वापरात एपीएमसी च सोपं वाटतं त्यामुळे असे शॉर्टकट वापरले जातात.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Mon, 07/09/2012 - 04:32

In reply to शेवटचे दोन सोडले तर इतर by शिल्पा ब

Permalink

+१

एम एस सी बी हा शब्दही पुर्णपणे कधीच उच्चारला जात नाही, तो 'एमेस्सीबी' असाच म्हटला जातो जो उच्चारायला एकदम सोपा वाटतो.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 07/09/2012 - 05:16

In reply to +१ by किसन शिंदे

Permalink

एम एस इ बी

काही वर्षांपूर्वी मराविम चे तीन कंपन्यांत विभाजन करण्यात आले... इंग्रजी नाव मराठी नाव Maharashtra State Power Generation Company Limited ( MSPGCL) / Mahagenco महानिर्मिती / महाजनको Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MSETCL) महापारेषण / महाट्रान्सको Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) महावितरण (यांना मात्र महाडिस्को असे नाव दिले नाहीये ;-))
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Tue, 07/10/2012 - 09:20

In reply to एम एस इ बी by श्रीरंग_जोशी

Permalink

+१

महाडिस्कॉम नाव आहे त्याचे
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 07/09/2012 - 05:00

Permalink

आणखी काही उदाहरणे...

इंग्रजी नावहिंदी / मराठी नाव Jawaharlal Nehru Urban Renewal Missionजवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान (पुनर्निर्माण) योजना Security Printing and Minting Corporation of India Ltd. (SPMCIL)भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण Housing and Urban Development Corporation (HUDCO) गृह व नागरी विकास महामंडळ Small Industries Development Corporation (SIDCO) लघु उद्योग विकास महामंडळ
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Mon, 07/09/2012 - 10:56

In reply to आणखी काही उदाहरणे... by श्रीरंग_जोशी

Permalink

Small Industries Development

Small Industries Development Corporation (SIDCO) लघु उद्योग विकास महामंडळ महाराष्ट्रात SIDCO आहे का? माझ्या माहिती नुसार Maharashtra Small Scale Industries Development Corporation एमएस्सेसाडिसी आहे. राष्ट्रिय स्तरावर National Small Industries Corporation (NSIC) आहे. बहुदा तुम्हाला हडको नंतर सिडको (CIDCO) लिहायचे होते.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 07/09/2012 - 11:00

In reply to Small Industries Development by निखिल देशपांडे

Permalink

CIDCO बरोबर आहे...

सिडको बाबत शोधताना महाराष्ट्रामधले मिळत नव्हते... दुरुस्तीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 07/09/2012 - 10:10

Permalink

रंगाकाका, तुमचं 'झालं' की

रंगाकाका, तुमचं 'झालं' की सांगा... !
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 07/09/2012 - 10:12

In reply to रंगाकाका, तुमचं 'झालं' की by प्यारे१

Permalink

झालय असं समजा

प्यारेचाचा - जरा लिहा की या धाग्यावर!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 07/09/2012 - 10:15

In reply to झालय असं समजा by श्रीरंग_जोशी

Permalink

कशाचं काय समजायचंय??? आटपू दे

कशाचं काय समजायचंय??? आटपू दे तुमचं..... आम्हाला काही लिहायचं नाहीये. मॉनिटर धुवायला टाकायचाय.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 07/09/2012 - 10:37

In reply to कशाचं काय समजायचंय??? आटपू दे by प्यारे१

Permalink

हम्म्म

श्री. जोशी, दर दोन दिवसांनी तुमचा धागा यायलाच पाहिजे आणि तो सतत वर राहीला पाहिजे हा अट्टाहास का ? स्पष्ट शब्दात बोलायचे तर ही कुठली विकृती आहे ? तुम्हाला आडून आडून सांगून झाले, टिंगल करून झाली तरी तुम्हाला समजत नाही का ? का मुद्दाम वेड घेऊन पेडगावला जाणे चालू आहे ? तुमच्या भिकार लेखनाने आणि त्यावरच्या तुमच्याच टुकार प्रतिसादांनी अगदी रामदास काकांच्या लेखना सारखे लिखाण देखील खाली खाली जायला लागले आहे ह्याची तुम्हाला समज नाहीये का ? हे मिसळपाव आहे, तुमचे ओसाडगाव नाही. तेंव्हा दया करा आणि मिपाचा झणझणीतपणा टिकून राहू द्या. तुमच्या साखर घातलेल्या दह्याच्या पाकृ साठी वेगळा ब्लॉग उघडा आणि तिकडे दिवसभर पांढर्‍यावरती काळे करा. आणि हो, स्पष्ट शब्दात बोलल्याचा राग वैग्रे आला (त्याची शक्यता कमीच आहे) तरी दाखवायला येऊ नका. दोघांना फाट्यावरती मारले जाईल. परिकथेतील राजकुमार ह्यांनी ह्या धाग्याला भिकार अशी श्रेणी दिलेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Mon, 07/09/2012 - 18:14

In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार

Permalink

हम्म

रोचक प्रतिसाद नाना चेंगट यांनी वरील प्रतिसादाला भिकारचोट अशी श्रेणी दिलेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 07/09/2012 - 18:18

In reply to हम्म by नाना चेंगट

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by पप्पुपेजर on Tue, 07/10/2012 - 11:13

In reply to +१ by बॅटमॅन

Permalink

+१

हेच म्हणतो !!
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 07/10/2012 - 15:20

In reply to +१ by पप्पुपेजर

Permalink

-३ इतक्या अप्रतिम धाग्याला

-३ ;) इतक्या अप्रतिम धाग्याला अशी नावे ठेवता? नवीन लोकांनी मग मराठीतून अभिव्यक्त तरी कसं व्हायचं ऑ? अभिव्यक्ती हा वैयक्तिक मामला आहे. त्यात चांगलं वाईट ठरवणारे तुम्ही कोण?
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 07/09/2012 - 18:21

In reply to हम्म by नाना चेंगट

Permalink

काय दिवस उजाडलाय. नाना आणि

काय दिवस उजाडलाय. नाना आणि पराशी सहमत व्हायची पाळी आली. देवा उचलरे बाबा लौकर. (काही नाहीये इथे............. आले लगेच पांढर्‍यावर काळं करायला) ;) गणपा यांनी वरील प्रतिसादाला खोचक अशी श्रेणी दिलेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्निल घायाळ on Tue, 07/10/2012 - 14:43

In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार

Permalink

मी पा वर कोणी काय लिहायचा आणि

मी पा वर कोणी काय लिहायचा आणि नाही लिहायचा हे तू कोण ठरवणारा ? मागच्या वेळेस सडेतोड उत्तर दिल म्हणून माझी comment संपादन मंडळी कडून काढून टाकली संपादन मंडळीना ह्या comments दिसत नाही का ? का दिसून न दिसल्या सारख्या करता ? एखाद्या नवोदित लेखकाला प्रोत्स्हान करायचं ? का नाउमेद करायच? संपादन मंडळीना खुले आव्हान,कि असे कोणी काय लिहायचं आणि नाही लिहायचं हे ठरवाचा अधिकार फक्त तुम्हाला आहे का कोणीही उठ सूट ठरवू शकतो ? संपादित.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 07/10/2012 - 15:49

In reply to मी पा वर कोणी काय लिहायचा आणि by स्वप्निल घायाळ

Permalink

जौ द्या ओ... ! येक डाव माफी

जौ द्या ओ... ! येक डाव माफी द्या . ते परा डोक्यावर पडलंय. पण घायाळ साहेब काही लक्षात आलेल्या गोष्टी : लेखक नवोदित नाही /वाटत नाही. २ दिवसाला सरासरी एक अशा गतीनं त्यांनी आपले धागे टंकले आहेत नि प्रसिद्ध देखील केलेले आहेत. त्याच्याहून जास्त गतीनं स्व तःच्या धाग्यावर त्यांनी प्रतिसाद टंकले आहेत जे कधी कधी धाग्या पेक्षा मोठे आहेत. अशा धागाकर्त्यासारख्या सिद्धहस्त लेखकाला आपण 'नवोदित' म्हणून त्यांचा आपणच अपमान करु इच्छित नाही आहात ना? बघा ब्वा!
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on Wed, 07/11/2012 - 10:52

In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार

Permalink

समस्त मिपाकरहो आजपासून कुणी,

समस्त मिपाकरहो आजपासून कुणी, कुठे, कसं आणि काय लिहावं हे ठरवण्याचे सर्वाधिकार श्री. रा. रा. परिकथेतील राजकुमार ( सर्वज्ञानी, प्रकांड पंडीत... सर्व स्वघोषित) यांना देण्यात येत आहेत. हाच नियम प्रतिसादांना सुद्धा लागू करण्यात येत आहे. हे मिसळपाव आहे, ओसाडगाव नाही. उगीच उचलली बोटे लावली कळ फलकाला हे याउप्पर चालणार नाही. अशी परवानगी न घेता येणार्‍या धाग्यांना आणि प्रतिसादांना भिकार श्रेणी देण्यात येईल ( असल्या श्रेण्यांना फाट्यावर मारू नये, चालवून घेतले जाणार नाही). आणि हो, अश्या स्पष्ट शब्दात बोलल्याचा राग वैग्रे आला (त्याची शक्यता कमीच आहे) तरी दाखवायला येऊ नका. दोघांना फाट्यावरती मारले जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 07/09/2012 - 11:38

Permalink

घ्या..

कुर्ला स्टेशनजवळील "ऊपरी उपस्कर अनुरक्षण केंद्र", त्याशिवाय दिल्लीला असलेलं "बेतार अनुसंधान एवं समन्वय स्कंध" आणि पुण्याबाहेर जुन्या मुंबई रस्त्याच्या सुरुवातीला असलेलं "वळूबीज गुणन प्रक्षेत्र" ही नावं कशी वाटतात?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 07/09/2012 - 15:59

In reply to घ्या.. by गवि

Permalink

"वळूबीज गुणन प्रक्षेत्र"

"वळूबीज गुणन प्रक्षेत्र" एखाद्या गणितीय संज्ञेचे भाषांतर वाटते :P
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 07/09/2012 - 16:04

In reply to "वळूबीज गुणन प्रक्षेत्र" by बॅटमॅन

Permalink

बरोबर आहे.. गणितीय अथवा

बरोबर आहे.. गणितीय अथवा भूमितीश्रेणीने बैलसंख्या अन गायसंख्या वाढवण्याशी संबंधित आहे ते.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 07/09/2012 - 16:25

In reply to बरोबर आहे.. गणितीय अथवा by गवि

Permalink

वळूबीज "गुणू(ण)न" प्रक्षेत्र

वळूबीज "गुणू(ण)न" प्रक्षेत्र ;)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com