नमस्कार मंडळी,
काय भाजी करावी हे बराच वेळ विचार करुन पण नाही सुचले तर हा प्रकार नक्की करुन पहा, स्पेशली पुरुष मंडळीसाठी ही पाकृ. बायको भाव खाऊ लागली की स्वतः स्वयंपाक घरात घुसाव आणी ही पाकृ करावी. तुमची कॉलर ताठ झालीच पाहिजे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही टोमॅटोची चटणी किंवा भाजी. घ्या
साहित्य.
३ मोठे रसरशीत गर असलेले लाल टोमेटो चिरुन
२ मध्यम कांदे बारीक चिरुन
२ ईंच गुळाचा खडा चिरुन किंवा किसून
३-४ पाकळ्या लसूण बारीक चिरुन
१ छोटा चमचा मोहोरी
१ छोटा चमचा जिरे
१/२ छोटा चमचा हिंग
१ छोटा चमचा गरम मसाला
२ छोटे चमचे लाल तिखट
१/२ चमचा हळद
१ कप शेंगदाण्याचा कुट किंवा किसलेले सुके खोबरे
तेल
चवीनुसार मीठ
सजावटीसाठी कोथिंबीर.
कृती
१ कढईत पळीभर तेल टाकून त्यात मोहोरी घाला.
२. मोहोरी तडतडली की त्यात जिरे आणि लसूण घाला.
३. लसूण खरपूस तळला गेला की त्यात हिंग घालून कांदा परतायला घ्या.
४. कांदा कमी आचेवर खरपूस होईपर्यंत परतत रहा.
५. यात शेंगदाण्याचा कुट किंवा खोबरे घाला. ४-५ मिनिटे परता.
६. आता गरम मसाला, लाल तिखट आणि हळद घालून चांगलं परता तेल सुटेपर्यंत परता.
७. किसलेला गुळ घालून २ मिनिटे गूळ वितळू द्या.
८. यात आता चिरलेला टोमॅटो घालुन ५-१० मिनिटे मंद आचेवर परता.
९. भाजी किंवा चटणी चांगली रसरशीत झाली की मीठ घाला.
१० चपाती किंवा जीरा राईसबरोबर कोथिंबीर सजवून वाढा.
तळटीपः चपातीपेक्षा गरमागरम तुप-जीर्याची फोडणी दिलेल्या भाताबरोबर जास्त चवदार लागते हा वैयक्तीक अनुभव.
वरील साहित्यात प्रमाण कमी जास्त करुन तुमच्या पद्धतीने यात बदल करु शकता.
वाचने
9675
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय रे बाबा, बायकोने भाव
पिंगूशेट, आपण एकमेकांना इतके
In reply to काय रे बाबा, बायकोने भाव by पिंगू
आपण एकमेकांना इतके परीचित
In reply to पिंगूशेट, आपण एकमेकांना इतके by मराठमोळा
पिंग्या ! कधीतरी बायकोचा
व्वा ... छान! टोमॅटोची
मस्त आहे, मी नेहमी करते
मस्त !!
यातले "१ कप शेंगदाण्याचा कुट
मलाही ही भाजी आवडते. बरे झाले
+१
In reply to मलाही ही भाजी आवडते. बरे झाले by रेवती
काय म्हणता भाऊजी? सध्या थोडा
In reply to +१ by कुंदन
आवडती भाजी/चटणी.. आवड्ली.
शेंगदान्याचा कूट वगैरे घालू
>>क्रीम ऑफ मिल्क म्हणजे साय
सोप्पी अन फोटोतही छान दिसतेय.
छान!
(No subject)
भाजीची अनुपस्थिती निभावून
काल