Skip to main content

टोरेंट काय आहे !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 02/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
टोरेंट नेमके काय असते असा प्रश्न पडलाय. यु टोरेंट, बिट टोरेंट हे वापरून काही डाऊनलोडही आम्ही केलेले आहे. पण हा सारा काय खेळ आहे हे लक्षात आलेले नाही. एखाद्या सर्व्हरवरून डाऊनलोड करणे समजण्यासारखे आहे. पण टोरेंट काय प्रकार आहे. हे P2P काय असते. एखादा पिक्चर डाऊनलोड करीत असताना अपलोडही काही होत असते. काहीवेळा अपलोड जास्त डाऊनलोड कमी असा प्रकार पहायला मिळतो. म्हणजे जणू आमचा कंप्युटरच सर्व्हर आहे. बरं हा टोरेंट प्रकार सुरक्षित आहे का... की पर्सनल माहिती पाठवतो. आम्ही टोरेंट वापरतो पण पूर्ण माहिती नाही कुणी जरा नेमकी माहिती दिली तर बरे होइल

वाचने 5066
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

एखादा पिक्चर डाऊनलोड करीत असताना अपलोडही काही होत असते. हॅ हॅ हॅ हे म्हणजे एखाद्याचा रक्तगट एकाचवेळी AB (कायमचा घेता) आणि O (कायमचा दाता) असल्यासारखे आहे ;) बरं हा टोरेंट प्रकार सुरक्षित आहे का महाजालावर काहीच सुरक्षित नसतं भौ :) अगदी व्यनिसुद्धा सुरक्षित नसतात बर्रका ;) की पर्सनल माहिती पाठवतो काय म्हाईत नाय बॉ! तुमचं my Documents मधलं Downloads कडे लक्ष द्या! आम्ही टोरेंट वापरतो पण पूर्ण माहिती नाही चालायचच! टीप - मी टंकेपर्यंत गणपांचा प्रतिसाद पाहिला नव्हता. दुव्याबद्दल धन्यवाद.

गणपा यांनी दिलेला दुवा फारच माहितीदार आहे साधं सोपं सुटसुटीत दिलेले आहे अगदी ...मस्त रे गणपा भाऊ

In reply to by अविनाशकुलकर्णी

अहो अकु धन्यवाद त्या दशाननाला द्या ज्याने हा लेख लिहिलाय. मी केवळ पोष्टमनचं काम केल. :)

एक लिंक टोरेंटकी कीमत तुम क्या जानो पैसेवाले बाबू... स्टुडंट्स का भगवान होता है टोरेंट, लुख्खोंका अन्नदाता होता है टोरेंट, पायरेट्स का कंपास होता है टोरेंट, सिर्फ एक लिंक टोरेंट ;)

In reply to by बॅटमॅन

अगर दिल से किसी मूव्ही को डाऊनलोड करना चाहो तो पूरा इंटरनेट तुम्हे उस से मिलाने में जूट जाता हैं.... और अगर, एक पिक्चर को डाऊनलोड करते करते डाऊनलोडर या पूरा पि सी ही हॅन्ग हो जाये, तो पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त!!

In reply to by बॅटमॅन

मेरे पास नेटफ्लिक्स हैं, ब्लॉकबस्टर हैं, डिश मूव्ही ऑन डिमांड हैं, क्या हैं तुम्हारे पास? उं क्या हैं तुम्हारे पास? ~~~~ मेरे पास टोरेंट हैं!!

टोरेंट म्हणजे नर्मदेतील अनेक गोटे एकत्र जोडून नर्मदेवर पूल बांधायचा ! व तो सवडी सवडीने बांधायचा आणि समद्यानी मिळून बांधायचा !

अमेरीकेत टोरेंट डाउनलोडींग बेकायदेशीर आहे असं गुगलुन समजलं. http://money.cnn.com/2011/06/10/technology/bittorrent_lawsuits/index.htm थोडक्यात कॉपीराईट मटेरीयल असेल तर डाउनलोडींग बेकायदेशीर आहे. माझ्या मते भारतातही हाच कायदा आहे पण...असो.