नमस्कार मंडली,
नावा वरुन कळलच असेल या रेसीपीत मिंट (पुदिना) महत्वाचा घटक आहे. चला तर साहीत्य बघुया(प्रमाण आपल्या आवडी वर सोडतो ;-))
आकाराने मध्यम ते मोठी ताजी कोळंबी(स्वच्छ धूवुन आणि धागा काढुन), पुदिना, हिरवी मीरची, मिठ, ऑलीव्ह ऑईल (अथवा आवडी प्रमाणे दुसरे कोणतेही खाद्य तेल),कोथिंबीर, लिंबु, सफेद / काळी मिरी आणि लसुण .
एका खलबत्त्या मधे कोळंबी वगळता उर्वरीत साहित्य घ्या.........
लसुण, पुदिना भर्पुर, हिरवी मीरची, कोथिंबीर(साधारण पुदीन्याच्या निम्मी),मिठ (मी मुद्दाम खडा मिठ वापरल आहे.साध मिठ आणि खडा मिठ चवित फरक पडतो ), सफेद / काळी मिरी आणि ४ त ५ चमचे ऑलीव्ह ऑईल आता या मिश्रणात साधारण आर्धा लिंबु पिळा आणि चांगल एकजिव लगदा/ गो़ळा होई पर्यंत ठेचा.
कोळंबीला पाठीच्या बाजुने खोलवर चिर घ्या आणि तयार चटणी या कोळंबी मधे भरा. (मसाला मिरची मधे मसाला भरतो तस)
आता ही चटणी / वाटण लावलेली कोळंबी साधारणतः कमितकमी आर्धा तास ते २ तास मुरवत ठेवा. मुरवणे महत्वाचे आहे शक्यतो ही स्टेप गाळु नका.
आता तवा घ्या आणि तो थोडा तापला की त्यावर या मुरलेल्या कोळंब्या सजवा आणि वरुन एक झाकण ठेवा. (वरुन किंवा बाजुने वेगळ तेल सोडल नाही तरी चालेल.)
या अश्या.....
अंदाजे ८/१० मिनीटे झाकण ठेउन दोन्ही बाजुनी शेकुन घ्या. आवडी प्रमाणे डेकोरेशन करुन सर्व्ह करा "प्रॉन्स विथ मिंट मॅजीक"
टिपा = १) सुरवातीस तेल कमी घ्या जास्त कोरड वाटत असेल तर गरजे प्रमाणे नंतर देखिल घालता यीईल
२) शक्यतो खडा मिठ वापरा.
३) मी ३ वेळा ही चटणि केली आहे. प्रथम खलबत्त्या मधे दुस-या वेळेस मिक्सर आणि खलबत्त्या मधिल चटणिची चव सगळ्यांना आवडल्याने तिस-या वेळी खलबत्ताच.
४) कोथिंबीर आणि पुदीना यांची केवळ पाने नवापरता काड्या देखिल जरुर वापराव्यात. या काड्यांधेच जास्ती रस ,स्वाद आणि सुवास असतो हे अनुभवातुन शिकलो आहे.
५) कोळंबीचा धागा काढुन धुतल्यावर टिश्यु पेपरने पुसून जमेल तेवढी कोरडी करुन घ्या. मॅरीनेशन चांगल होत. तसच कोळंबी लहान न घेता मोठीच घ्या आणि वरील साल तशीच ठेवा. शेलोफ्राय /शेकणं झाल्यावर ही साल आपोआप वेगळी होते. वरील साली मुळे कोलंबीचा फ्लेवर/स्वाद वाढतोच शिवाय तव्याला नचिकटल्यामुळे कोळंबी करपत देखिल नाही.
६) पुदीना चटणी रोजच्या जेवणात तोंडी लावण म्हणुन सुद्धा छान लागते. माझ्या मुलाने प्रयोग म्हणुन ब्रेड वर ही चटणी लावली वरून चिज किसुन टाकले आणि मायक्रो मधे टोस्ट केला . प्रयोग ईतका भन्नाट रीत्या यशस्वी झाला की उरलेली चटणी आणि आर्धा ब्रेड जाग्यावर खल्ल्लास. ;-)
७) पुदीना चटणी करताना आवडत असल्यास कढीपत्याची पाने देखिल टाकु शकता.

वाचने
7901
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त दिसतेय पा कृ
कुंदन भाऊ
In reply to मस्त दिसतेय पा कृ by कुंदन
(No subject)
पाकृ आणि टिपा लै भारी
गंपा सेठ
In reply to पाकृ आणि टिपा लै भारी by गणपा
गणपत शेठ
In reply to पाकृ आणि टिपा लै भारी by गणपा
अय्या
In reply to पाकृ आणि टिपा लै भारी by गणपा
कुंदनशेख? उसंडु की पर्पझन-डू?
In reply to अय्या by शुचि
तुम्हाला माहीत नाही? कुंदन
In reply to कुंदनशेख? उसंडु की पर्पझन-डू? by बॅटमॅन
अस्तील ब्वॉ. मोठी लोकं
In reply to तुम्हाला माहीत नाही? कुंदन by शुचि
सुरेख!!! चव मस्तच असणार शंकाच
झकास..
भारी पाकृ!
कातिल!
खासच रेसिपी...
छान
सुनिलजी
In reply to छान by सुनील
जयपाल उवाच - कोथिंबीर आणि
In reply to छान by सुनील
मस्तच हो जयपालशेट, एकदा बैठक
आय एम इव्हररेडी
In reply to मस्तच हो जयपालशेट, एकदा बैठक by मराठमोळा
:)
In reply to आय एम इव्हररेडी by jaypal
वाह वाह.... फोटोग्राफी,
बटाटा किंवा वांगी वापरुन केले
दादूस, कधी येऊ?
पुन्हा कोळंबी
हम्म्म
गवताळ ???
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
चिकन