Skip to main content

गुरूपोर्णिमेदिवशीचा सुंदर चंद्र

लेखक Pearl यांनी शुक्रवार, 06/07/2012 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10301
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर आलंय चित्र! अगदी खिडकी उघडून चंद्रदर्शन घ्यावे इतका स्वच्छ आलाय.

बहुत खूब....! खूप छान चंद्र.... अवांतरः दूरदर्शनच्या सह्याद्रि वाहिनीवर एकदा प्रवचन पाहिले होते. (दूरदर्शन नं चुकून लावलं असावं आणि मी चुकून पाहिलं असावं ;) ) प्रवचनकारांचं नाव आठवत नाही पण त्यांनी सांगितलं ते खूप छान होतं. गुरु पौर्णिमेला आपण गुरुंची पूजा करतो. पण त्यांची खरी पूजा म्हणजे त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं. कधीतरी जमतं , बर्‍याचदा जमत नाही. ज्या दिवशी जमतं त्या दिवशी आपल्या चित्ताकाशात आपण पाळलेल्या गुरुआज्ञेचा परिणाम म्हणून जणू 'पूर्णचंद्र' असतो. टिप्पूर चांदणं. त्या दिवशी खरी पौर्णिमा साजरी होते. :) कधी अजिबातच जमत नाही तेव्हा 'अमावस्या'च जणू. न करायच्या गोष्टी, निषेधाच्या गोष्टी आपण वासनांच्या आहारी जाऊन करतो तेव्हा हा चंद्र पूर्ण नाहीसा झालेला असतो. :( नि जमणं नि अजिबात न जमणं ह्या मधले टप्पे म्हणजे प्रथमे पासून चतुर्दशी पर्यंतच्या कला.... तेव्हा, सत्गुरुंनी सांगितलेले 'डूज आणि डोन्टस' सातत्यानं पाळले , त्यांचा अभ्यास केला, त्यानुसार साधना झाली तर खर्‍या अर्थानं गुरुपौर्णिमा साजरी करणं. आपण अशा प्रकारे साजरी करतो???

In reply to by प्यारे१

विषयाला फाटे फोडायची प्यारेकाकांची सवय फारच जुनी ब्वॉ.... ;-) बाकी, फोटो छान आलाय.

सुंदर आलाय फोटो. कोणता कॅमेरा वापरला? फोटोवर काही संस्करण करण्यात आलेले आहे का?

In reply to by अमोघ शिंगोर्णीकर

धन्यवाद अमोघ. कॅनन चा डिजीकॅम वापरला आहे. (Canon announces PowerShot SX20 IS) कोणतेही संस्करण केले नाहिये. फोटो घेताना कॅमेराचा सनसेट मोड सेट केला होता. आणि जसा फोटो आला तसाच्या तसा इथे दिला आहे. कोणत्याही प्रकारचा छोटासा बदल पण केला नाहिये. त्यादिवशी चंद्र दिसतच इतका छान होता त्यामुळे फोटोही मस्त आले.

In reply to by Pearl

फोटो घेताना कॅमेराचा सनसेट मोड सेट केला होता.>>>> ओक्के. मग बरोबर. नाही कारण मनात संस्करण करण्यात आल्याचे शंका यासाठी आली की, चंद्राचा रंग हा वेगळाच दिसतोय. आतापर्यंत शुभ्र पांढरा आणि पार मळकटलेला पाहिला आहे. सनसेट मोड वापरल्याने कॅमेर्‍याने त्या वेळची रंगसंगती साधलेली दिसतेय. बाकी म्हटलंच आहे. फोटो छानंच. :) कलोअ अमोघ शिंगोर्णीकर

वाह!! अगदी सुरेख आलाय फोटो. हा फोटो चंद्रोदयाच्या वेळी काढलाय की सनसेट मोड मुळे पिवळसर झाक आलीये?

धन्यवाद स्मिता. हा फोटो रात्री ९ च्या दरम्यान काढला आहे. फोटोमध्ये जसा दिसत आहे तंतोतंत तसाच चंद्र आकाशात दिसत होता. केशरी चंद्र दिसत होता. म्हणूनच लगोलग कॅमेरा घेऊन चंद्राचा फोटो काढला. सनसेट मोड मुळे पिवळसर झाक आली नाहिये.

झूम फोकस या बाबतीत यशस्वी फोटो. पण .. मुळात चंद्रासारख्या शीतल प्राण्याला उष्ण रंगसंगतीत बघण्याचे म्हणजेच सनसेट मोड लावण्याचे कारण काय ? पौर्णिमेचा उगवता चंद्र मंद केशरी वा गुलाबी दिसतो ती उष्ण रंगसंगतीत शिरण्याची त्याची मर्यादा योग्य आहे. एरवी चंद्र फिकट निळा, फिकट हिरवट निळा अशी शेड घेऊन येतो तेच डोळ्याला सुखावह वाटते.

In reply to by चौकटराजा

धन्यवाद चौकटराजा. मी काही फोटोग्राफिमधील एक्सपर्ट नाही. फक्त हौशी फोटोग्राफर आहे. 'ऑटो' मोड / नाइट मोड वापरून जे डोळ्यांना दिसत आहेत तसे सुंदर कलर फोटोत येत नव्हते, म्हणून मी सनसेट मोड वापरून पाहिला. फोटो घेतला त्यावेळी चंद्राची गडद केशरी प्रभा प्रत्यक्ष दिसत होती. पण तुम्ही म्हणता तसे सनसेट मोडमुळे फोटोमध्ये थोडी उष्ण रंगसंगती जाणवत असेल. मी गुगल करूनही पाहिले, तर त्यात त्यांनीही लिहिले आहे की सनसेट मोडमुळे 'sky's colors appear deeper' . तर पुढच्या वेळी चंद्र कॅमेरात टिपताना कोणता मोड ठेवावा आणि काय सेटिंग करावे, यावर तुमच्या आणि इतर जाणकार मिपाकरांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल. त्यायोगे मला फोटोग्राफीच्या काही टिप्स मिळतील.