✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वन हिट वंडर - ५ -> 'Mambo no. 5'

प
प्रास यांनी
Tue, 07/03/2012 - 16:13  ·  लेख
लेख
मूळ जर्मन असलेल्या लोऊ बेगा या संगीतकार गायकाचं एक गाणं १९९९ साली एकाच वेळी युके, कॅनडा, युएस् आणि ऑस्ट्रेलियात प्रकाशित झालं आणि थोड्याच काळात ते प्रचंड लोकप्रिय झालं. पुढे अनेक देशांच्या लोकप्रिय गाण्यांच्या चार्ट्समध्ये ते अगदी चोटीकी पादान पर जाऊन पोहोचलं. हे गाणं होतं, 'Mambo no. 5'.
डेविड लुबेगा ज्याने आपल्या सांगीतिक कारकिर्दीसाठी लोऊ बेगा हे नाव घेतलेलं, त्याचं मात्र हे संपूर्णपणे स्वतःच गाणं नव्हतं. १९४९ साली पेरेज प्राडो या क्युबन संगीतकार-गायकाने तयार केलेल्या माम्बो संगीत प्रकारातल्या खास नृत्यासाठी बनवलेल्या तुकड्यावर लोऊने हे गाणं बसवलेलं. त्यात त्याने स्वतःचे शब्द टाकले आणि अगदी नव्या ढंगात ते सादर केलं. संपूर्ण युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलॅण्ड इथे हे गाणं लोकप्रियतेमध्ये पहिल्या क्रमांकावर अनेक आठवडे राहिलं. अमेरिकेतही बिलबोर्ड टॉप १०० मध्ये ३ र्‍या क्रमांकापर्यंत चढलं. लोऊचं आजपर्यंत बिलबोर्ड टॉप १०० मध्ये आलेलं हे एकमेव गाणं. यानंतर त्याचं कुठलंही गाणं इतकं लोकप्रिय होऊ शकलेलं नाही. यामुळेच आपल्या 'वन हिट वंडर' यादीमध्ये पुढचं स्थान लोऊ बेगाच्या 'Mambo No. 5' ला मिळालेलं आहे. इतकी प्रचंड लोकप्रियता मिळूनही याच गाण्याला 'रोलिंग स्टोन' या लोकप्रिय पाश्चात्य संगीत विषयाला वाहिलेल्या मासिकाच्या '10 Most Annoying Songs' या कौलामध्ये ६ वे स्थान मिळाले. बाकीच्यांचं मला माहित नाही पण मला मात्र हे गाणं आवडतं, १९२०-३० सालातल्या, जुन्या क्लब्जमधल्या जॅझ म्युझिशियन्सच्या पार्श्वभूमीवाल्या त्याच्या प्रेक्षणीय विडिओ सकट. हे असं आहे 'Mambo No. 5' -
Ladies and gentleman this is Mambo no 5 One, two, three, four, five everybody in the car, so come on Let's ride to the liquor store around the corner The boys say they want some gin and juice But I really don't wanna, beer bust like I had last week I must stay deep because talk is cheap I like Angela, Pamela, Sandra and Rita And as I continue you know they are getting sweeter So what can I do I really beg you my Lord To me is flirting it's just like sport, anything fly It's all good let me dump it please set in the trumpet A little bit of Monica in my life, a little bit of Erica by my side A little bit of Rita is all I need, a little bit of Tina is what I see A little bit of Sandra in the sun, a little bit of Mary all night long A little bit of Jessica here I am, a little bit of you makes me your man Mambo no 5 Jump up and down and move it all around Shake your head to the sound, put your hand on the ground Take one step left and one step right One to the front and one to the side Clap your hand once and clap your hands twice And if it looks like this then you are doing it right A little bit of Monica in my life, a little bit of Erica by my side A little bit of Rita is all I need, a little bit of Tina is what I see A little bit of Sandra in the sun, a little bit of Mary all night long A little bit of Jessica here I am, a little bit of you makes me your man Trumpet, the trumpet Mambo no 5 A little bit of Monica in my life, a little bit of Erica by my side A little bit of Rita is all I need, a little bit of Tina is what I see A little bit of Sandra in the sun, a little bit of Mary all night long A little bit of Jessica here I am, a little bit of you makes me your man I do all, to fall in love with a girl like you You can't run and you can't hide You and me gonna touch the sky Mambo no 5 वन हिट वंडर - ४

Book traversal links for वन हिट वंडर - ५ -> 'Mambo no. 5'

  • ‹ वन हिट वंडर - ४ -> 'Cotton Eye Joe'
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
2729 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

लू बेगा चे हे गाणे सुद्धा खूप

राजो
Tue, 07/03/2012 - 16:26 नवीन
लू बेगा चे हे गाणे सुद्धा खूप लोकप्रिय होते. I got a girl in Paris.. I got a girl in Rome. I even got a girl in the Vatican Dome... I got a girl right here & one right there.. & I got a girlfriend everywhere....
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो.. माम्बो #५ चा

गवि
Tue, 07/03/2012 - 16:46 नवीन
हेच म्हणतो.. माम्बो #५ चा परिचयही मस्त.. पॅटो बँटन हाही असाच एक.. बेबी कम बॅक आठवतंय का प्रासभाऊ? (यूबी४० सोबतचं ) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजो

मस्त ,लहाणपनी गाण्याचे शब्द

पियुशा
Tue, 07/03/2012 - 17:02 नवीन
मस्त ,लहाणपनी गाण्याचे शब्द समजतच नव्हते तेव्हा आम्ही ह्याला बांबु नं ५ म्हणायचो ;) बाकी गाण मस्त फुट टँपिंग करायला लावणार :)
  • Log in or register to post comments

मस्त परिचय. मजा आली गाणे

प्रचेतस
Tue, 07/03/2012 - 17:43 नवीन
मस्त परिचय. मजा आली गाणे ऐकून.
  • Log in or register to post comments

प्रास

jaypal
Tue, 07/03/2012 - 18:07 नवीन
हा पण लेख आवडल बर का !!! गाण्याचे बोल देतोस म्हणुन थोड तरी कळत बघ.
  • Log in or register to post comments

मस्तच..

मुक्त विहारि
Tue, 07/03/2012 - 18:34 नवीन
नेहमीप्रमाणेच सूंदर माहिती..
  • Log in or register to post comments

बांबू नं. ५

मराठे
Tue, 07/03/2012 - 19:08 नवीन
देवांग पटेल नावाच्या जोकर ने ह्या गाण्याचं केलेलं विडंबन आठवलं.
  • Log in or register to post comments

मला आवडतं हे गाणं. तसंच here

शिल्पा ब
Wed, 07/04/2012 - 09:07 नवीन
मला आवडतं हे गाणं. तसंच here come hotstepper पण र्‍हीदमीक आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा